Skip to main content

अनुभव

त्र्यंबकेश्वरमधील योग शिबिर आणि निसर्गाचा सत्संग

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 18/02/2025 या दिवशी प्रकाशित केले.
✪ त्र्यंबकेश्वरमध्ये बिहार स्कूल ऑफ योगाचं योग शिबिर ✪ पण त्याआधी प्रसिद्ध संस्थानाच्या नावाने झालेली ऑनलाईन फसवणूक ✪ "अखंड सावधान असावे दुश्चित कदापि नसावे!" ✪ परमहंस निरंजनानंद सरस्वतींच्या उपस्थितीतील सत्संग ✪ "चार मिले, चौसठ खिले, बीस करें जोड़" ✪ BSY चं सुंदर आयोजन आणि सत्रांची मेजवानी ✪ आदर्श गुरू बरोबर आदर्श शिष्यत्वाचं उदाहरण! ✪ साधकांची मांदियाळीसह कीर्तन, भजन आणि ध्यान ✪ त्र्यंबकेश्वर भटकंती व ब्रह्मगिरीचा अविस्मरणीय ट्रेक सर्वांना नमस्कार. नुकताच त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या बिहार स्कूल ऑफ योगा ह्या मोठ्या योग विद्यापीठाच्या एका योग शिबिरामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.

चार आर्यसत्ये - एक चिंतन

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शनिवार, 15/02/2025 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : १. हा लेख नेहमीप्रमाणेच स्वान्तःसुखाय आहे. इथे कोणाला काहीही पटवुन द्यायचे धोरण नाही कि कोणाचे काहीही मत खंडन करावयाचा विचार नाही. त्यामुळे तुम्हाला लेख पटला काय की न पटला काय मला काहीही फरक पडत नाही. २. हा लेख लिहिताना जमेल तितकी तथ्ये आणि संदर्भ वापरण्याचा प्रयत्न केला आहे तथापि काही तथ्येच चुकीच्या शब्दात उधृत केलेली असतील तर आपण जरुर माझ्या निदर्शनास आणुन द्यावीत ही नम्र विनंती ! ३. हा लेख बहुतांशपणे माझ्या वैयक्तिक जीवनातील अनुभवातुन आलेल्या चिंतनांवर आधारीत आहे. तुम्हाला आलेले अनुभव , तुमचे चिंतन , तुमचा अभ्यास , तुमचे आकलन भिन्न असु शकते !

अ न्युरल नेटवर्क विथ अ सिंगल डेटा पॉईंट

लेखक प्रसाद गोडबोले यांनी सोमवार, 10/02/2025 या दिवशी प्रकाशित केले.
"तुम्हाला आर्टिफिशियल न्युरल नेटवर्क्स विषयी माहीत आहे का पंत ?" "माहीती आहे पण खुप डिटेल्स्ड असं नाही" "बेसिक कन्सेप्ट्स माहीत आहेत ना , हां तेवढं पुरेसे आहे , हा एक इन्टरेस्टिंग प्रश्न ऐका :"
समजा एखाद्या न्युरल नेटवर्कला वेगवेगळा डेटा न देता , केवळ एकच डेटा पॉईंट वारंवार दिला , तर ते न्युरल नेटवर्क काय लर्न करेल ?

गीतारहस्य चिंतन-१

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 04/02/2025 या दिवशी प्रकाशित केले.
मला साधारणतः खुप प्रश्न‌ पडतात.त्यात जर भारतीय अध्यात्मावर प्रश्न असतील तर किती तरी काळ ते अनुत्तरितच राहायचे.पण जानेवारी २०२५ पासून हा जो लोकमान्य टिळकांनी लिहिलेला गीतारहस्य ग्रंथ वाचनास सुरूवात केली आहे.त्यामुळे अनेक प्रश्नांची सहज उत्तरे मिळत आहेत.या ग्रंथातील आकलन वा लिहून काढावे असे वाटलेले ज्ञान इथे देत आहे.हे सर्व टिळकांचे मत ,विचार आहेत,जे तुम्हाला नक्कीच भरघोस ज्ञान देईल. गीतारहस्य -कर्मयोगशास्त्र प्रकरण १ १.विषयप्रवेश अद्वैत मोक्ष द्वैत विशिष्टाद्वैत, पातंजलयोग हे निवृत्तिपर मार्ग गुलामी होती असे कोणी म्हटले तर ? भगवद गीतेवर टीका

एका आगीची छोटीशी गोष्ट

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 31/01/2025 या दिवशी प्रकाशित केले.
(काल्पनिक कथा) दिल्लीच्या रायसिना भागात केंद्र सरकारच्या सचिवलयांच्या इमारती आहेत. अधिकान्श इमारती पाच ते सात माल्यांच्या आहेत. अग्नि शामक नियमांच्या अनुसार कर्मचार्‍यांना इमारतीत चढण्या उतरण्यासाठी किमान दोन वेगवेगळ्या पायर्‍या असल्या पाहिजे. पण जागेची कमतरता असल्याने इमारतीच्या कोपर्‍यांवर जी मोकळी जागा असते तिथे ही निर्माण झाले असल्याने कर्मचार्‍यांना उतरण्यासाठी एकच पायरी उपलब्ध असते. इमारतींत अवैध निर्माण असल्याने अधिकान्श इमारतींना अग्नि शामक विभागाचे प्रमाण पत्र नाही. तरीही अग्निपासून असुरक्षित इमारतींत मंत्री ते संत्री हजारो कर्मचारी काम करतात. मी ज्या इमारतीत कामाला जात होतो.

सिंग्युलॅरिटी ऑफ वर्ड्स

लेखक प्रसाद गोडबोले यांनी सोमवार, 20/01/2025 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : १. सर्वच लोकांची बुध्दीमत्ता समान नसते. हे अगदी वैश्विक सत्य आहे. आणि आपल्याला हे अगदी लहानपणापासुन माहीती आहे. त्यामुळे सगळ्यांना सगळं कळलंच पाहिजे , अनुभवाला आलेच पाहिजे असा आपला हट्ट किंवा दुराग्रह नाही. २. मुळात कोणाला काही तरी कळावं ह्यासाठी काहीही खटाटोप करणे ह्यात आपला काय फायदा ? आपण आपल्या स्वानंदासाठी लिहावं . आपलं आपल्याला कळाल्याशी मतलब. आपल्याला जे कळलं अनुभवाला आलं त्याचेच निरनिराळे पैलु आपणच उपभोगावेत ह्यासाठी लिहावे हे उत्तम ! ३.

सामान्यांमधले असामान्य: कर्नल समीर गुजर

लेखक मार्गी यांनी शनिवार, 04/01/2025 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. भारतीय सेनेमध्ये महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल नावाजले गेलेले मूळचे परभणीचे असलेले कर्नल समीर गुजर हे माझे मित्र! हे सांगताना अतिशय अभिमान वाटतो! नुकताच त्यांच्या सहवासाचा योग आला. सेनेमध्ये इतक्या उच्च पदावर व दायित्वावर असूनही जनतेसोबतचं त्यांचं आत्मीयतेचं वागणं- बोलणं, गावच्या लोकांसोबत व समाजासोबत असलेली त्यांची बांधिलकी, इतक्या उंचीवर पोहचूनही त्यांचं डाउन टू अर्थ वागणं हे खूप जवळून बघता आलं. त्यांच्याकडून त्यांच्या वाटचालीतले काही किस्से ऐकायला मिळाले. माझे गावचे मित्र म्हणून हे लिहावसं वाटलं.

​आणि... हॉस्टलर मुलांकरिता सुपरफास्ट गाडी स्टाॅपेज नसलेल्या स्टेशनावर थांबली...

लेखक महामाया यांनी गुरुवार, 26/12/2024 या दिवशी प्रकाशित केले.
रेलवेच्या आठवणी असाच एका कामानिमित्त बहिणीकडे भोपाळला गेलो होतो... भोपाल- बिलासपुर अमरकंटक एक्सप्रेसनी परत येत होतो... (वाटेत लागणारया जबलपुरला थांबलेली माझी आई तिथूनच आमच्या सोबत पुढे येणार होती.) गाडीत पाय ठेवायला जागा नव्हती... दोन दिवसानंतर दिवाळी होती. म्हणून गाडीत सगळी हॉस्टलर मुला-मुलींची ही गर्दी होती... भोपाळला शिकायला आलेली ही मंडळी सणावारासाठी आपापल्या घरी परत जात होती... आमच्या जवळपास बसलेल्या मुलं-मुलींच्या बोलण्या वरुन समजलं की ते या गाडीने जबलपुरपर्यंत जातील. तिथून दुसरी गाडी ‘इस्पात नगरी...’ पकडून पुढे जातील... ती गाडी रात्री साढे दहाला होती...

रामानुजनचे वारस: गणिताचा आनंद घेणार्‍या मुलांना भेटण्याचा सुखद धक्का!

लेखक मार्गी यांनी रविवार, 22/12/2024 या दिवशी प्रकाशित केले.
✪ मुलांचं गणित शिकणं व शिकवणं! ✪ शिकण्याची अशी "प्रक्रिया, "स्पेस" आणि "मिती" ✪ गणित अवघड असतं ह्या भ्रमाला "पूर्ण छेद" ✪ कठिण गोष्टी सोपं करणं इतकं सोपं! ✪ पालकांसाठी व मुलांसाठी सोपं गणिती कोडं ✪ तुमच्या वाढदिवसाला तुम्हांला किती चॉकलेटस मिळायला हवेत? नमस्कार. आज २२ डिसेंबर म्हणजे जगातला विलक्षण गणितज्ज्ञ असलेल्या श्रीनिवास रामानुजन ह्यांची जयंती व त्यामुळे आज राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. ह्या दिवसानिमित्त मुग्धाताई नलावडेंच्या "प्रक्रिया को-लर्निंग स्पेसद्वारे" आयोजित एका सुंदर उपक्रमाचा अनुभव घेता आला.

अपघात टळला तो प्रवास

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 21/12/2024 या दिवशी प्रकाशित केले.
फोटो एका लग्नाच्या निमित्तानं अलीकडेच नागपूरला जाणं झालं होतं. 32 वर्षांनी नागपूरला जाणं होत असल्यामुळं उत्साह वाढलेला होताच. मग बऱ्याच आधी मी पुणे-अजनी एक्सप्रेसच्या विनावातानुकुलित श्रेणीचं आरक्षण करून ठेवलं.