Skip to main content

माझं "पलायन" ८: हाफ मॅरेथॉनच्या पुढची वाटचाल

लेखक मार्गी यांनी सोमवार, 06/05/2019 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
८: हाफ मॅरेथॉनच्या पुढची वाटचाल डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

माझं "पलायन" ५: सिंहगड घाट रस्त्यावर धावताना

लेखक मार्गी यांनी शनिवार, 27/04/2019 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
५: सिंहगड घाट रस्त्यावर धावताना डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

चान्स मिळाला रे मिळाला की अ‍ॅक्टिंग!

लेखक स्वीट टॉकर यांनी बुधवार, 17/04/2019 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
होतकरू अभिनेता झाल्यावर मी आपोआपच होतकरू अभिनेत्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये दाखल झालो. यात फक्त अभिनेते अन् अभिनेत्रीच नव्हे, तर दिग्दर्शक, शूटिंगचं सामान भाड्यानी देणारे, साउंड रेकॉर्डिस्ट, अभिनयाचे आणि तत्सम इतर क्लासेस चालवणारे वगैरे सगळेच सामावलेले असतात. त्या विषयाशी संलग्न सर्व प्रकारच्या बातम्या इथे समजतात. एक हिंदी आणि एक मराठी चित्रपटासाठी अमुक रविवारी अमुक कंपनीच्या ऑफिसमध्ये ऑडिशन होणार असल्याची बातमी आली. त्या रविवारी मी कॉलेजच्या कामासाठी पुण्याच्या बाहेर असणार असल्यामुळे मी त्यांना फोन करून माझी ऑडिशन आधी घेण्याची विनंती केली.

श्री अमृतानुभव अध्याय दुसरा - श्रीगुरुस्तवन

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 16/04/2019 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
फार दिवसांपुर्वी व्हॉट्सप्प वर एम मीम आलेला. असे काही डेरिव्हेटीव्ह्स, इन्टिग्रल्स, पार्शियल डिफरन्शियल एक्वेशन चे चित्र होते आणि खाली मेसेज होता की - "कॉलेज संपुन १० वर्षे होत आली पण अजुनही ह्याचा उपयोग काय ते कळलेले नाहीये ख्यॅ ख्यॅ ख्यॅ " वगैरे वगैरे. मी म्हणालेलो " तुम्हाला उपयोग करता येत नाही ह्याचा अर्थ उपयोगच नाही असा होत नाही" त्यावरुन मोठ्ठा वाद झाला ग्रुपवर . . तेव्हा एक मित्र म्हणालेला- " अरे तू इतके सीरीयसली का घेतोस? विनोद विनोद म्हणुन का घेऊ शकत नाही ? " तेव्हा त्या मित्राला म्हणालो - " कारण त्यात विनोद असा काही नाहीये, त्यात केवळ अज्ञानाचे प्रदर्शन आहे.

आठवणीतील गीत रामायण...

लेखक महामाया यांनी सोमवार, 15/04/2019 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
रवींद्र दत्तात्रय तेलंग 1983 साल आठवणीत घर करुन आहे कारण त्यावर्षी क्रिकेटचा वर्ल्ड कप कपिलच्या चमू ने जिंकला होता... ते उन्हाळ्याचे दिवस होते... दुसरं कारण जास्त महत्वाचं कारण या दिवसांमधेच मी गीत रामायणाचं पारायण केलं... माझ्या चुलत भावाचं इलेक्ट्रिकचं दुकान होतं. साउंडबाक्स, ढीग भर कैसेट्स...त्याच्या कडे गीत रामायणाचा 10 की 12 भागांचा सेट होता.

अमृतानुभव - अध्याय पहिला - शिवशक्तीसमावेशनमन

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 11/04/2019 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ १ ॥ देवा तूंचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु । म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥ २ ॥ _________________________________/\________________________________ हे सारं स्वान्तःसुखाय आहे. आपल्याला कोणाला काही पटवून द्यायचं नाहीये की कोणाचं काही मत खोडून काढायचं नाही. कोणाला वाटेल हे सारं टनाटनी आहे , कोणाला वाटेल हे अज्ञानमुलक स्वात्मरंजन आहे ! असो , आपला आता कोणताच अभिनिवेश नाही , खरेतर आहेच हे स्वात्मरंजन!

मैत्र - ११

लेखक शाली यांनी मंगळवार, 09/04/2019 07:09 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही माथ्यावर उभे होतो. मी मागे पसरलेल्या गवताकडे पाहीले. ते छान हवेवर डोलत होते. पण आता दुरवरुन यावेत तसे हळू हळू बंदुकींच्या फैरी झडाव्या तसा कडकड आवाज यायला सुरवात झाली. डोलणाऱ्या गवताच्या वर हवा एकदम मृगजळासारखी हलताना दिसायला लागली. अचानक अतिशय गरम हवेचा एक झोत अंगावरुन गेला. डोळ्यांची आग झाली. घसा एकदम कोरडा पडल्यासारखा झाला. धुर दिसत नसला तरी त्याचा वास सगळ्या वातावरणात भरुन राहीला होता. धोंडबाने एका झटक्यात माझा हात ओढला. चांगलाच हिसडा बसुन मी त्याच्या मागे ओढला गेलो. पण आम्ही जाणार कुठे? दोन्ही बाजूला उंच वाळलेले गवत होते.

माझं "पलायन" ३: मंद गतीने पुढे जाताना

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 28/03/2019 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
३: मंद गतीने पुढे जाताना डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

एक गाणे अनेक कथा भाग १ :- चाहूँगा मैं तुझे हरदम

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 23/03/2019 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
एक गाणे अनेक कथा भाग १ :- चाहूँगा मैं तुझे हरदम एक विनंती :- कृपया अक्षरास हसू नये... वैधानिक इशारा :- हा धागा वाचकांनी आपल्या स्वत:च्या जबाबदारीवर वाचावा, परिणामांना धागाकर्ता किंवा मिपा व्यवस्थापन जबाबदार रहाणार नाही. मित्रांनो एक गाणे अनेक कथा या माझ्या लेख मालेतले पहिले पुष्प तुमच्या पुढे सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे.

औरंगाबाद येथील वेरुळ लेणी

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 02/03/2019 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
औरंगाबाद येथील वेरुळ लेणी औरंगाबाद जवळील अजंता आणि वेरुळ लेणी पाहावीत हे स्वप्न मनात गेली अनेक वर्ष जपलं होतं. कोणाची तरी सोबत असली की गप्पा खूप होतात आणि मग आपलं मन इच्छा असूनही आपल्याशी बोलत नाही; असं मला नेहेमी वाटतं. म्हणूनच मला ही लेणी एकटीने पहायची होती. बहुतेक माझी ही दुर्दम्य इच्छा ईश्वर चरणी रुजू झाली; आणि अगदी अचानक औरंगाबादला जाण्याचा योग आला. त्यात देखिल एकटीने लेणी बघू शकणार होते. हे म्हणजे "आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन!'' अस झालं. पण एकच दिवस मिळणार होता. वेरुळ लेणी औरंगाबादपासून साधारण तीस किलोमीटरवर आहेत; मात्र अजंता खूपच लांब आहेत.