Skip to main content

मिपाकट्टा २०२२: पावसाळी भेट - मोहाडी

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 11/08/2022 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक १५ ऑगस्ट २०२२, सोमवार मिपाकट्टा - पावसाळी भेट मोहाडी, ता दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे आयोजित केली आहे. अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदीर (लाकडी बांधकाम. रंगकाम एक नंबर) गोसावी समाज साधू मंदीर नवनाथ मंदीर मोहाडेश्वर मंदीर अहिल्यादेवी बारव मोहाडमल्ल देवस्थान सोमवंशी वाडा ग्रामपंचायत कार्यालय सह्याद्री फार्म कारखाना भेट व तेथेच जेवण (जेवणाचा हेडकाऊंट आधीच सांगावा लागेल) परततांना नाशिक एअरपोर्ट पाहता येईल. तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी १० वाजेपर्यंत मोहाडी येथे जमावे. नाशिक सीबीएस सीबीएस वरून सीटीलींक बसने ( किंवा एसटी बसने) १०वा मैल स्टॉप. (ओझर, पिंपळगाव लोकल बस पकडा.

नाते प्राजक्ताचे

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 10/08/2022 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळपासून पावसाची रिपरिप चालू आहे. श्रावणातला पाऊस तो हत्ती सारखा थोडाच कोसळणार. दररोजची प्रभातफेरी चुकली. येताना देवपूजेला फूले घेऊन येण्याचा नित्यनेम. लाईट नव्हती, पाच माळे उतरून खाली जावे की न जावे द्विधा मनस्थितीत. नित्यनेम चुकला की दिवसभर रुखरुख लागते. त्यापासून वाचण्यासाठी खाली उतरायचे ठरवले. विचारमग्न अवस्थेतच पाचव्या मजल्यावरून खाली आलो,छत्री विसरल्याचे लक्षात आले. अरे देवा! आता पुन्हा पाचा वर जावून शून्यावर यायचे.जाऊ द्या थोडं भिजल्याने काय होणार आहे ?

पापा की परी

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 05/08/2022 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
पापा कि परी गोष्ट अगदी अलीकडली. अगदी ८१ सालातली असेल. कोकणातील गुहागर तालुक्यातील एक छोटंसं खेडं .गुहागर हुन ४/५ किमी आरे गावचा फाटा आणि त्याही पुढे दीड एक किलोमीटर खोतांच घर. अगदी आजही जिथे दिवसातून एखादीच एस टी जाते. एक घर या इथे तर दुसरं घर कमीत कमी अर्धा किमी मागे/पुढे. आसपास काय ती नारळी पोफळीची वाडी. आजही पाटाचं पाणी इथे वाहतं. वीज केव्हा असते केव्हा नाही. मोबाईल च्या रेंजची तीच कथा. रिंग गेली तरी कॉल पूर्ण होईल याची शाश्वती नाही. इथल्या खोतांच्या घरी जन्माला आल्या दोन पऱ्या. मोठी प्राजक्ता तर दुसरी मुग्धा. आई बाबांच्या लाडक्या. तेव्हा सुद्धा दोन्ही मुलीचं का ?

ध्यान- लाखमोलाचं लक्ष!

लेखक मार्गी यांनी शनिवार, 30/07/2022 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
IMA- परभणीद्वारे ध्यान सत्र सर्वांना नमस्कार. परभणीमध्ये इंडियन मेडीकल असोशिएशन अर्थात् 'आयएमएच्या' वतीने ध्यान सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. ते सत्र घेतानाचा अनुभव आपल्या सर्वांसोबत शेअर करत आहे. मला हे सत्र घेण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम आयएमए परभणी व डॉ. अनील दिवाण सर, डॉ. जी. एम. चांडक सर, आयएमए परभणीचे अध्यक्ष डॉ. अनील कान्हे सर, श्री. कारेगांवकर सर व सर्वांना धन्यवाद. त्याबरोबर ह्या आयोजनामध्ये अनेक प्रकारे सोबत असलेल्या निरामय परिवाराचेही धन्यवाद.

नमस्कार, मी भाऊ तोरसेकर… तुम्ही बघत आहात || प्रतिपक्ष ||

लेखक टर्मीनेटर यांनी सोमवार, 25/07/2022 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळी युट्युबचे एक नोटीफिकेशन आले त्यात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकिय विश्लेषक श्री.

राष्ट्रपतींचे डबे

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 21/07/2022 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
Presidential Saloon भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्यावर डॉ. राजेंद्र प्रसाद सार्वभौम भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यावेळी राष्ट्रपतींसाठी रेल्वेचा खास डबा असावा असा विचार पुढे आला नव्हता.

वह्या पुस्तके

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 19/07/2022 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
जून महिना चालू झाला की साधारणपणे मध्यमवर्गीयांच्या घरात शालेय वस्तू खरेदी करण्याची लगबग चालू होते. बहूतेक कुटूंबवत्सल पालक पगार झाला की शाळेसाठी लागणार्‍या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात निघतात. मान्सूनचा पाऊस जरी चालू असला तरी एखाद्या सुटीच्या दिवशी आपापली मुले, त्यांच्या आया यांची स्कुटरवर निघालेली गर्दी रस्त्यावर पहायला मिळते. आजकाल सरकारी शाळातच सरकारी पुस्तके मिळत असतात. त्यामुळे शालेय सामाना मिळणार्‍या दुकानांत पुस्तकांची विक्री सोडून वह्या व इतर गोष्टी विकायला ठेवतात. नाही म्हटले तरी इंग्रजी शाळांतील मुलांना मात्र पुस्तके दुकानातूनच खरेदी करावी लागतात.

आठवणींच्या जंगलात

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 02/07/2022 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वरंग त्रेचाळीस वर्षापुर्वीची आठवण व अंतरजालावर उपलब्ध आसलेली माहीती एकत्र गुंफून धागा विणायचा प्रयत्न त्यामुळे कुठे कुठे विषयांतर झाले आहे.

यह मेरा काम नही है

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 01/07/2022 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे सचिन यहा आना तो." अनिल ने मला त्याच्या कॅबीनमध्ये बोलावले. अनिल म्हणजे डाटा सेंटरचा हेड मॅनेजर होता. स्वभावाने अगदीच मोकळा नसला तरी एक माणूस म्हणून तो ठिक होता. एखादी गोष्ट, नवी टेक्नॉलॉजी माहीत करून आपल्या डेटा सेंटर मध्ये कशी आणता येईल याबाबत तो नेहमी विचार करत असे. आता त्याने मला कसल्यातरी कामाला बोलावले होते. तसेही मी काही महत्वाचे काम करत नव्हतो. "तुम्हे कल शाम को नगर जाना पडेगा. यह अपना पहेलाही प्रोजेक्ट है. वहा जाके कॉम्पूटर को नेटवर्क मे लाना यह काम है." - अनिल. "मतलब वहा जाकर कॉम्पूटर इंटॉल करना वगैरा काम है क्या?", मी प्रश्न केला. हा लगभग वही है. नगर अर्बन बॅंक है.

मैत्री स्वत:शी- मैत्री सर्वांशी

लेखक मार्गी यांनी रविवार, 26/06/2022 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
✪ मैत्री संस्थेतल्या मित्रांसोबत भेट ✪ मैत्री = सामाजिक कामासाठी काही करणा-या मित्रांचा गट ✪ मैत्रीच्या उत्तराखंड पूराच्या वेळेच्या कामाच्या आठवणी ✪ मैत्री एक इनोव्हेटीव्ह मॉडेल ✪ दोन करामती आजींचं इनोव्हेशन ✪ सामाजिक कार्य म्हणजे त्याग- परिश्रम असंच असलं पाहिजे असं नाही ✪ आपण काय करू शकतो? सर्वांना नमस्कार. पुण्यामध्ये केंद्र असलेल्या "मैत्री" संस्थेच्या कामाला २५ वर्षं पूर्ण झाली. त्या निमित्ताने झालेल्या एका मेळाव्याला जाण्याचा योग आला. मैत्रीमधल्या जुन्या मित्रांना भेटता आलं. मैत्रीचं काम आणखी थोडं समजून घेता आलं.