Skip to main content

टेलिस्कोपने धुमकेतू बघण्याचा रोमांचक अनुभव!

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 24/01/2023 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
✪ दुर्बिणीतून धुमकेतू C/2022 E3 (ZTF) शोधण्याचा व बघण्याचा अनुभव ✪ हा धुमकेतू बायनॅक्युलरद्वारे सध्या दिसू शकतो ✪ शहरापासून लांबचं आकाश आणि धुमकेतूची अचूक स्थिती माहित असणे आवश्यक ✪ त्याची स्थिती वेगाने बदलते आहे ✪ १ फेब्रुवारीच्या सुमारास सर्वाधिक तेजस्वी असेल सर्वांना नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की, सध्या एक धुमकेतू- C/2022 E3 (ZTF) बायनॅक्युलरने दिसण्यासारखा आहे. २४ जानेवारीपर्यंत तो नुसत्या डोळ्याने दिसू शकेल, इतका तेजस्वी झालेला नाही आहे. परंतु तो बायनॅक्युलरने किंवा छोट्या टेलिस्कोपने बघता येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला स्वच्छ आणि काळोख असलेलं आकाश लागेल.

पैशाचे झाड भाग :-२

लेखक अतरंगी यांनी मंगळवार, 24/01/2023 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
पैशाचे झाड भाग : १. https://www.misalpav.com/node/51032 हो नाही करत शेवटी ऐन वेळी कोणाचेही कॅन्सल न होता, कोणतेही विघ्न न येता, ठरल्याप्रमाणे सगळा गृप कोकण ट्रिपला निघाला. बर्‍याच दिवसांनी सगळे जण एकत्र ट्रिपला निघाल्यामुळे थट्टा मस्करीला पार ऊत आला होता. क्षणाक्षणाला हसण्याचे फवारे फुटत होते. नवे- जुने संदर्भ घेऊन एकेकावर धपाधप जोक्स पडत होते. प्रत्येक वेळेस मुले गाडीतच पेग भरायला लागली की आनंदच्या मनात धाकधूक होत होती. अजून नव्या गाडीची नवलाई संपली नव्हती. पाच जणात दोन खंबे कधी संपले पत्ता पण नाही लागला.

आम्ही जातो आमुच्या गावा (भाग १- व्याप आवरते घेणे)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 23/01/2023 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, आयुष्याची सांजवेळ सामोरी आलेली आहे. दूरदेशीच्या ‘आपुल्या गावा’ कायमचे जाण्यासाठी वळकटी बांधून आता तयार राहिले पाहिजे आणि तिकडे नेणारा दूत आला की हसतमुखाने त्याला सामोरे गेले पाहिजे. समवयस्क मित्र एकेक करून आपापल्या दूताबरोबर रवाना होत आहेत आणि त्यांच्या तशा जाण्यातून आपलीही वेळ आता फारशी दूर नाही, ही जाणीव प्रबळ होत चालली आहे. तर आपले एकंदरीत व्याप वगैरे आता तरी आवरते घेतलेच पाहिजेत … आता व्याप म्हटले तर ते कोणकोणते ?

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ६: कोल्हार- विजयपूरा- सिंदगी (१०१ किमी)

लेखक मार्गी यांनी सोमवार, 23/01/2023 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
✪ “कौसल्या सुप्रजा...” च्या वातावरणात राईडची सुरुवात! ✪ पवनचक्क्या व डोंगराळ प्रदेशातील राईड ✪ ऐतिहासिक विजयपूरा अर्थात् विजापूर! ✪ एरोबिक राईड (फक्त नाकाद्वारे श्वास घेऊन) ✪ सायकलिंगचे मानसिक पैलू ✪ भाषेचा अडथळा?

पैशाचे झाड- भाग १

लेखक अतरंगी यांनी सोमवार, 23/01/2023 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो" "बोल" " कुठे आहेस?" " घरी" "किती वेळ लागेल?" "का?" "अरे, का म्हणजे? तू येतोएस ना? सगळे थांबले आहेत?" "कोण थांबले आहेत? आणि कुठे?" विनितला कळेचना की, हा असा का बोलतोय? "अरे तू गृपवर मेसेज नाही पाहीले का?" "नाही, माझा स्मार्ट फोन बंद आहे. काय झालं? " "नित्याच्या घरी सगळे बसलोय ये लवकर.." "स्टॉक आहे की घेऊन येऊ?" "अरे तीन खंबे आहेत, सगळे आज लोळत नाहीतर झिम्मा खेळतच घरी जाणार आहेत.

हरंगुळचं "हरहुन्नरी" शिक्षणकेंद्र

लेखक मार्गी यांनी शनिवार, 24/12/2022 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
✪ हरंगुळच्या शिस्तबद्ध व अष्टावधानी जनकल्याण निवासी विद्यालयाला भेट ✪ विद्यार्थ्यांसाठी आकाश दर्शन व फन लर्न सत्र घेण्याचा अनुभव ✪ सत्रांमधला मुलांचा सहभाग आणि ऊर्जा! ✪ पहाटे चंद्र बघण्याचा मुलांचा अनुभव आणि त्यांना तो दाखवण्याचा माझा अनुभव! ✪ शिक्षकांचं काम किती कठीण असतं ह्याची झलक ✪ दिवसातून अडीच तास मैदानावर खेळणारे विद्यार्थी- दुर्मिळ दृश्य! ✪ सेरेब्रल पाल्सी व इतर बौद्धिक व शारीरिक दिव्यांगांसाठीच्या संवेदना प्रकल्पाला भेट सर्वांना नमस्कार. लातूरजवळच्या हरंगुळ इथे असलेल्या जनकल्याण निवासी विद्यालयामध्ये तीन दिवस राहण्याचा योग नुकताच आला. आदरणीय प्रकाशजी लातुरे व श्री.

चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरूजींची

लेखक मार्गी यांनी रविवार, 11/12/2022 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
✪ तेजस्वी ता-यासारखं international space station! ✪ शनीची कडी, गुरूचे उपग्रह आणि तांबूस मंगळ ✪ सुंदर कृत्तिका- ४०० वर्षांपूर्वीचं दृश्य ✪ चंद्राचे खड्डे आणि मैदानं ✪ अहंकाराचे भ्रम दूर करणारं विराट विश्व ✪ नुसत्या डोळ्यांनी दिसणा-या गमती जमती ✪ मुलांचा व पालकांचा उत्साह सर्वांना नमस्कार. सध्या आकाश दर्शनासाठी उत्तम काळ आहे. मध्ये मध्ये येणारे तुरळक ढग सोडले तर रात्री सुंदर आकाश बघता येतं. अनेक ठिकाणी मुलांना आकाशाच्या गमती दाखवण्याची संधी मिळत आहे. आयुर्वेद व्यासपीठ परभणी ह्यांनी मुलांसाठी व मोठ्यांसाठी दि.

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ४: बेळगांव ते लोकापूर (१०८ किमी)

लेखक मार्गी यांनी बुधवार, 30/11/2022 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी) सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- चोरला घाट- बेळगांव (८८ किमी) ✪ कर्नाटकातील ग्रामीण भागातून राईड! ✪ कर्नाटकातला मराठीचा प्रभाव ✪ "यारगट्टी" गांव- ओ यारा, गत्ति कित्थे गत्ति? ✪ "क्षमस्व, गावात तुमची सोय करता आली नाही!" ✪ मुक्कामाच्या

इन्शुरन्स कंपन्यांची फसवेगिरी

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 30/11/2022 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
पॉलिसी च्या नावाखाली इन्शुरन्स कंपन्या सामान्य माणसाची कशी मनमानी लूट करत आहेत, याचा नुकताच अनुभव आला. २००९ मध्ये मी पीएनबी मेटलाईफ कंपनीकडून एक युनिट लिंक्ड लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली. वर्षाला एक लाख हप्ता आणि पुढची ५६ वर्षे १५ लाखाचे जीवनविमा कव्हर. पहिले ३ हप्ते कंपल्सरी नंतर ऑप्शनल. मी पॉलिसी घेतली आणि दोनच वर्षांनी सदर पॉलिसी नवीन ग्राहकांसाठी बंद करण्यात आली. पॉलिसी च्या नियमाप्रमाणे मी ५ वर्षांनंतर म्हणजे २०१५ मध्ये ₹ ७५०००/- पार्शल विथड्रॉवल घेतले. त्यावेळी पॉलिसी फंड व्हॅल्यू ₹ ३२५०००/- शिल्लक असल्याचे मला सांगण्यात आले.