Skip to main content

पाटेश्वर - अजुन एक शाक्तपंथीय देवस्थान.

लेखक ५० फक्त यांनी बुधवार, 31/08/2011 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणाच्या पहिल्या रविवारी भुलेश्वर ते शेवटच्या रविवारी पाटेश्वर असा शाक्तपंथीय शिवालयांचा प्रवास घडला, भुलेश्वराचे फोटो आधीच टाकलेत म्हणुन हे पाटेश्वराचे.

फेसबुक आणि मास्लोची चढती भाजणी

लेखक शुचि यांनी मंगळवार, 30/08/2011 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
नीलीमा चहाचा कप खाली ठेवत पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारती झाली - "पण शुचि मला एक कळत नाही तुला जिम आहे, पुस्तकं आहेत,रुममेट आहेत मग फेसबुकची गरजच काय?" माझ्या प्रश्नार्थक चेहेर्‍याकडे पाहून ती उत्तरली "अगं म्हणजे "किलींग टाईम इज नॉट अ प्रॉब्लेम." यावर परत परत तक्रार काय करायची म्हणून मी अचूक भावनिक मुद्दा शोधू लागले - "हे बघ नीलू" मीदेखील चहाचा घुटका घेत म्हटले "प्रत्येक मित्र-मैत्रिणीचे माझ्या आयुष्यात काही एक स्थान आहे. काही जणांच्या कमेंट्स तर काही जणांनी टाकलेले व्हिडीओ तर काही जणांची विचारपूस मला ताजीतवानी करते, रोज नव्या दिवसाला सामोरी जायची उभारी देते.

साद रामेश्वरमची .... - भाग १

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 30/08/2011 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
साद रामेश्वरमची .... - भाग १
"शशिकांतजी आप को हमारे साथ रामेश्वरम आना है।"
असा हुकूम वजा आदेश मला फोनवरून आला व मी तात्काळ होकार कळवला. झाले. मी कामाला लागलो. तोवर हवाई प्रवासाची तिकीटे आली. मधल्याकाळात मला महर्षीं अत्रींच्या जीव नाडीत सांगण्यात आले, "तुला सांगून अजूनही अमुक अमुक ते सोपस्कार तू केलेले नाहीस.

पराठे वाला कट्टा

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 30/08/2011 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
एका तहात दुस-या तहाची बीजं असतात असं म्हणलं जातं,तसंच होतं, एका कट्ट्यालाच पुढच्या कट्ट्याच्या ठिकाण ठरवलं जातं, राहते ते फक्त दिवस आणि वेळ ठरवणं. २९ जुलैच्या कट्ट्यातच दोन ठिकाणांवर चर्चा झाल्या होत्या, एक दिल्ली किचन (प्रस्तावक-श्री.वपाडाव) आणि दुसरं शाजीज पराठा हाउस. व्यनि, फोन, एसेमेस इत्यादीच वापर मुबलक वापर करुन २७ ला संध्याकाळी शाजीज पराठा हाउस इथं जमायचं ठरलं,कट्ट्याला काहीतरी वेगळं करायचं होतं,दोन गोष्टी होत्या एक या हाटेलातलं च्यालेंज आणि दुसरी श्री.

होड्या सोडणे

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी सोमवार, 29/08/2011 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
hodi होड्या सोडणं (पुड्या नव्हे!) अन् खोड्या काढणं हा तर आम्हां मुलांचा पावसाळ्यातील मजेशीर उद्योग असायचा. त्यातल्या त्यात साचलेल्या पावसाच्या उथळ पाण्यात कागदी होड्या करून सोडणं व त्या कशा वाहत जातात, कोणाच्या कशा डुबकी मारतात किंवा कोणाच्या कशा तिरक्या होऊन गटांगळ्या खातात हे पाहणं फार मौजेचं गणित असायचं. होड्या तयार करणे आम्हांला जमत नसल्याने मोठ्या पोरांकडून बनवून घाव्या लागत.

रारंग ढांग - एक सो सो पुस्तक !

लेखक यकु यांनी रविवार, 28/08/2011 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
कपाट बरेच भरून वाहात असल्याने व तीन-चार लायब्रऱ्याही खुडूस झाल्याने बऱ्याच दिवसांपासून पुस्तके विकत घेणे बंद केले होते. पण तोत्तोचान, दुनियादारी, रारंगढांग, उत्सुकतेने मी झोपलो या पुस्तकांबद्दल वर्तमानपत्रे व आंतर्जालावर वारंवार वाचायला मिळत होते. म्हणून ही सगळीच्या सगळी व व्यंकटेश माडगुळकरांचे “गावाकडच्या गोष्टी” हे फार जुने, पूर्वी कित्येकदा वाचलेले अगदी फर्मास पुस्तक व गो.नि.दां.ची वाघूर व रानभुली, श्याम मनोहरांचे हे ईश्वरराव.. हे पुरुषोत्तम राव ही पुस्तके एकदाची आणून टाकली. मौज प्रकाशनकडून प्रकाशित प्रभाकर पेंढारकरांचे “रारंगढांग” हे पुस्तक नुकतेच वाचून संपवले.

पाऊसगोष्ट तुझी माझी

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 27/08/2011 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
तू मजसोबत येशील अशी शक्यता वाटत नव्हती. पण तू पटकन गाडीवर माझ्यामागे सावरून बसलीस. तेव्हा खरे तर माझ्या मनात कल्लोळ उठला होता. तुझं तसं मजसमीप असणं जगावेगळं वाटत होतं. त्यात मौसम ‘घन उतरू आलं...’ अशा झिम्मड पावसाचा. तुला कुठे सोडायचं हे ठरलं नव्हतं. मी तर थेट तुझ्या घरापर्यंत साथसोबत केली असती पण तुझ्या मनात ते जलतरंग होते कुठे? नव्हतेच. मीच आपला सप्तरंगी स्वप्नायुष्य भन्नाटवेगे पळवत चाललो होतो... रस्ते म्हणजे खड्डेच की. तू माझ्यावर मागून आदळली नाहीस असं होणार नव्हतं. तरीपण तुझाही तोल सावरीत मी बेताने गाडी घेतली आणि माझं ते संयत वागणं पाहून त्या वरच्या मसीहाला माझी दया आलीच.

सौंदर्यनगरीतील कलावैभव: शिल्पकला

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 25/08/2011 03:31 या दिवशी प्रकाशित केले.
(या धाग्याचे स्वरूप शिल्पकलेविषयी माहितीपूर्ण, तौलनिक, समिक्षात्मक लेखनप्रपंच असे नसून निखळ रसग्रहणात्मक आहे). पॅरिसमध्ये भ्रमण करताना ठायी ठायी सौदर्यदेवता कुठल्या ना कुठल्या स्वरूपात रसिकांना दर्शन देतच असते...