Skip to main content

विज्ञान

सिद्ध करता येईल का?

लेखक उपयोजक यांनी रविवार, 27/08/2023 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भ https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/india-news/sanskrit… वरील भाषणानंतर कौतुक आणि द्वेष दोन्ही सुरु झाले आहे. आता बाजूने बोलणारे अमुक शोधाची मूळे भारतात कशी होती हे सांगू पाहतायत.

विश्ववाची उत्पत्ती - प्रश्न

लेखक रणजित चितळे यांनी बुधवार, 22/05/2019 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस एक प्रश्न मनात आहे त्याला समर्पक उत्तर सापडत नाही. आपले विश्व बिगबॅन्गने सुरू झाले असा सिद्धांत आहे. त्या पेक्षा पडणारा मोठा प्रश्न म्हणजे, बिगबॅन्ग होण्यासाठी लागणारा पदार्थ किंवा घटना अस्तित्वात असायला हवी, तो पदार्थ किंवा ती घटना कोठून आली. एनर्जी वा मॅटरच्या आधी काय होते. ते कोठून आले, कशातून आले व ज्याच्यातून आले ते कोठून आले ह्याला समर्पक उत्तर कोणी देऊ शकेल का. मी जालावर प्रयत्न केला समर्पक उत्तर सापडत नाही. कोणी म्हणते की बिगबॅन्गच्याच वेळेला वेळ सुरू झाली. आता वेळ ही आपल्यासाठी आहे. वेळेच्या आधी काहीतरी असणारच. काहीच नसेल तर मग हे सगळे उत्पन्न कसे झाले.

अंधश्रद्धा व मेंदुविज्ञान- सुबोध जावडेकर

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 20/06/2018 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
मेंदुच्या मनात या सुबोध जावडेकरांच्या पुस्तकातील प्रकरण अंधश्रद्धा आणि मेंदूविज्ञान सचिन तेंडुलकर आपल्या डाव्या पायाला पॅड आधी बांधतो, मग उजव्या पायाला, राहुल द्रविड़ मैदानात शिरताना नेहमी उजव पाऊल आधी टाकतो. सुनील गावसकर फलंदाजीसाठी मैदानात उतरताना न चुकता जोडीदाराच्या उजवीकडून चालत असे. सौरभ गांगुली नेहमी आपल्या गुरूचा फोटो खिशात ठेवून खेळायला येत असे आणि स्टीव्ह व आपल्या डाव्या खिशात त्याच्या आजोबांनी दिलेला काल हातरुमाल ठेवत असे. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत हे उघडच आहे. पण त्या त्या खेळाडूच्या दृष्टीने त्यांना फार महत्त्व आहे.

दोन "भयचकीत" करणारी संशोधनवृत्ते

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 14/04/2018 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
मी नुकत्याच अधिजनुकशास्त्रावर लिहीलेल्या लेखात काही धोक्याच्या इशारे दिले. ते इशारे देण्य़ाने मी भीति पसरवत आहे असा एक आरोप माझ्यावर करण्यात आला. हे इशारे काही वास्तव बिंदूना जोडून उभे राहणार्‍या चित्राकडे पाहून दिले होते, याकडे पूर्ण दूर्लक्ष करण्यात आले होते. पण ते असो. नुकतीच दोन "भयचकीत" करणारी संशोधनवृत्ते वाचनात आली. त्यांचे दूवे देत आहे - ० २०५० पर्यंत अन्नधान्याची समस्या वाढून समाज कोलमडू शकतो.

ओपिनियन फॉर्मेशन (माहिती हवी आहे)

लेखक आबा यांनी सोमवार, 28/12/2015 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
मी आणि माझा मित्र नेटवर्क सायन्स मधील एका समस्येवर काम करीत आहोत. सामुहीक मत तयार होण्याच्या प्रक्रीयेचा अभ्यास करण्याचा आमचा उद्देश्य आहे. यासाठी काही माहिती जमा करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही एक लहान प्रश्नावली तयार केलेली आहे. या प्रश्नावलीमध्ये राजकीय मुद्यांवरची तुमची मते, फक्त १० वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात मागवलेली आहेत. ही माहीती भरून आम्हाला अभ्यासासाठी मदत करावी अशी आमची विनंती आहे, ही उत्तरे देण्यासाठी स्वत:चे नाव देण्याची गरज नसल्याने इथे व्यक्त केलेली मते पूर्णत: सुरक्षित असतील याची आम्ही हमी देतो.