मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वेळ व्यवस्थापन

२-५-१०-१५ मिनीटे एकटेच थांबण्याच्या प्रसंगातील अँक्झायटी आणि वेळ व्यवस्थापन

माहितगार ·
सध्या वेळ व्यवस्थापन विषयक धागा मालिका चालू केलेली आहे त्यातील पहिली चर्चा उशीरहोणार्‍यांसाठी (चांगल काही) (दुवा: http://www.misalpav.com/node/34159) सध्या चालूच आहे त्या चालू चर्चेला अजून २-४ दिवस फारस डिस्टर्ब न करता ह्या विषयावरील चर्चाही समांतर चालू राहू शकेल या अदमासाने हा विषय हातात घेतो आहे. काही जणांना काही विशीष्ट प्रसंगी तर बर्‍याच जणांना कोणत्याही प्रसंगी २-५-१०-१५ मिनीटे एकट्याने थांबण्याचा/ वेळ काढण्याचा प्रसंग -इथे एकटेच म्हणजे आपल्याशी वेव्हेलेंथ जुळणारी व्यक्ती सोबत नसणे एवढेच- आलातर कळत नकळत बरीच अस्वस्थता अँक्झायटी होत असावी. मला व्यक्तीशः रेल्वे स्टेशनवर रेल्वेचे वाट पहात