दहा वर्षांच्या मुलीच्या तिरळ्या डोळ्यांच्या उपचारासाठी सल्ला / उपाय / मार्गदर्शन हवे आहे
माझ्या परिचयातील एका मुलीला तिरळे डोळे व आळशी डोळे हा त्रास आहे.
फॅक्टस अँड फिगर्स:
- मुलीचे सध्या वय: दहा वर्षे आहे. तिरळेपणाचे व आळशी डोळ्याचे पहिल्यांदा निदान पाच वर्षांपूर्वी झाले.
- निदानानंतर, दोन डोळ्यांना वेगवेगळ्या नंबरचा चष्मा आणि तिरळा+आळशी नसलेला, चांगला डोळा झाकण्यासाठी पॅच असा उपचार सुरु केला. औषधे ड्रॉप्स इ दिलेले नव्हते.
- उजवा डोळा सामान्य आहे आणि त्यात +१.० पॉईंट आहे. डाव्या (तिरळ्या व आळशी) डोळ्यात सध्या + ६.५ पॉईंट आहे, हा नंबर मागच्या पाच वर्षांत कमी-जास्त झाला आहे. उपचार या डोळ्यावर सुरु आहेत.
- आतापर्यंत पाच सहा वेळा चष्मा बदलला आहे. साधारणतः सहा आठ महिन्यांत एकदा तिच्या डोळ्यांची तपासणी होते. मागच्या एक वर्षात तिच्या डाव्या डोळ्याचा नंबर वाढला आहे. म्हणजेच तो डोळा अधिकाधिक आळशी होत आहे असे वाटते.
- डोळ्याचा तिरळेपणा स्थिर नाही. म्हणजे फोकस एकाच बाजूला आणि एकाच अंशात नाही.
वर्गीकरण
वाचन
12320
प्रतिक्रिया
0