आयुर्वेदिक/होमिओपाथिक वैद्य-डॉक्टरः तातडीने माहिती हवी आहे
नमस्कार!
माझा एक अत्यंत जिवलग मित्र (जो दिल्ली येथे रहातो) गेले काही महिन्यांपासून आजारी आहे व त्याच्यावर अॅलोपॅथिक उपचार चालू आहेत. मात्र अॅलोपॅथिक उपचारांनी पूर्ण बरा होण्याची हमी दिली नसल्यामुळे तो एखाद्या उत्तम आयुर्वेदिक/होमिओपाथिक वैद्य-डॉक्टरच्या शोधात आहे. त्या शोधात आपल्यापैकी कोणाची मदत होते का हे पहावे म्हणून हा धागा ...
आजाराचे नाव: Myelitis
आजाराची माहिती: आठेक महिन्यांपूर्वी त्याच्या spinal cordवर एक जखम (lesion) आढळून आली ज्यामुळे त्याच्या डाव्या पायातील ताकद गेली होती व चालण्यास त्रास होत होता. स्टेरॉईडस देऊन त्रास आटोक्यात आणला गेला. आता दीडेक महिन्यांपूर्वी त्याच्या उजव्या पायातील ताकद गेली व bladderवरील नियंत्रण सुध्दा कमी झाले होते. या खेपेस अशीच एक जखम त्याच्या मेंदूवर आढळली आहे. या आजारात आपल्या शरीरातील auto-immune system काही कारणामुळे आपल्याच systemsवर हल्ला करते, ज्यामुळे अशा अंतर्गत जखमा होतात. स्टेरॉईडस देऊन त्रास परत थोडाफार कमी झाला आहे. सध्या (स्वत:च्या व्यवसायाच्या) कामांमधून रजा घेऊन मित्र दीड महिना घरी आहे. पूर्णपणे बरा होण्यासाठी तो पर्यायी उपचारांसाठी एखाद्या उत्तम आयुर्वेदिक/होमिओपाथिक वैद्य-डॉक्टरच्या शोधात आहे.
हा धागा वैद्यकीय सल्ला मागण्यासाठी नसून अशा आयुर्वेदिक/होमिओपाथिक वैद्य-डॉक्टरच्या शोधात कोणाची काही मदत होत असल्यास पहावे यासाठी आहे. आजाराची एवढी सविस्तर माहिती एवढ्यासाठीच दिली की असाच आजार इतर कोणाला झाला असल्यास तिच्या-त्याच्या अनुभवाचा फायदा व्हावा. या आजाराच्या इतर एखाद्या पेशंटची कोणाला माहिती असल्यास त्याच्या अनुभवाची देखील माझ्या या मित्राला मदत व्हावी हा सुध्दा या धाग्याचा उद्देश आहे.
Just to prompt ... लोणावळ्यातील (वा जवळील) आयुर्वेदिक वैद्य डॉ. बालाजी तांबे यांच्याविषयी कोणाला काही माहिती वा अनुभव (इतर आजारासाठी असला तरी) आहे का? तसेच, उरळीकांचन येथे जे केंद्र (निसर्गोपचारांसाठी?) आहे त्याचा उपयोग या आजारात होऊ शकतो का? अन्य कोणत्या आयुर्वेदिक वा होमिओपाथिक वैद्य-डॉक्टरांची आपण शिफारस कराल? दिल्लीजवळ असल्यास उत्तम पण नसल्यास देखील चालेल.
आपल्याला कोणतीही माहिती वा टीप असल्यास व ती येथे दिल्यास प्रचंड आभारी राहीन.
- दिपोटी
वर्गीकरण
वाचन
9114
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
..मल्टिपल स्क्लेरॉसिस
नाही, मायलायटिस ...
सुधारणा ...
वैद्य बगेवदिकर यन्न भेत
आगाऊ सल्ला
मुंबई येथे अंधेरी वेस्टला
धन्यवाद!
बालाजी तांबे यांचा अनुभव
मुंबईला डॉ. शहा हे होमिओपॅथी
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by दिपोटी
..जे उपचार घ्यावेसे वाटतील ते
रुग्णास लवकर बरे वाटावे ही
ही एक लिंक मिळाली
ही एक लिंक मिळाली
In reply to ही एक लिंक मिळाली by चतुरंग
अजून एक राहिले
पुनश्च धन्यवाद!