अग्निपथ

समाजात सगळ्यांनी सैनिकी शिक्षण घेतले पाहिजे व सैन्यसेवा सक्तीची केली पाहिजे असे कित्येक लोकांना वाटते. अशाने जागरूकता येईल, शिस्त वाढेल व त्याच बरोबर तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्याची शक्यता आहेच. पण लोकांना जरी वाटले तरी ते शक्य होणारे नाही कारण सरकारी तिजोरीत सगळ्यांना पगार देण्याइतके पैसेच नाहीत. सरकारी सैन्यात पेन्शन खूप आहे व त्याचा खर्च इतका मोठा व दरवर्षी वाढत जाणारा आहे की सरकारला तो झेपणारा नाही.

ट्युशन , क्लासेस , coaching classes

खाजगी क्लासेस , tution , coaching class याबाबत चर्चेसाठी हा धागा आहे 1. क्लासेस , ट्युशन , ट्युटोरियल यात काय फरक असतो ? की सगळे एकच ? 2. क्लास सुरू करताना कोणत्या सरकारी परवानग्या लागतात ? व्यवसाय कर , दुकान नोंदणी ( bombay shop act ) , GST इ इ काय लागेल ? 3. इतर सरकारी नियम काय आहेत ? महाराष्ट्र शासनाचे काही कठोर नियम येणार होते , अद्याप आलेले नसावेत 4. याबाबतचे आपले अनुभव .

फी कनसेशन मेडिकल साठी ओबीसी ला आहे का ? sc,st साठी काय?

फी कनसेशन मेडिकल साठी ओबीसी ला आहे का ? sc,st साठी काय? माझी मुलगी मेडिकल ला प्रवेश घेवू इच्छिते तर ओबिसिला private ला फी सवलत आहे का? कारण मेडीकॅल ची फी बघून दडपण आलेय आणि जरा प्रवेश प्रकिया समजावून सांगितली तर खूप चं होईल ८५ ,१५, नीट प्रकिया डोक्यावरून जात आहे तरी सोप्पी करून सांगा collGES लिस्ट private गोव. deemed सर्व सांगा फी structure पण माहित असेल तर SHARE करा प्लीज खूप आभारी असेन

मराठी माध्यमातल्या शाळांचा दर्जा आताशा घसरु लागलाय का?

मराठी माध्यमात शिकणार्‍या मुलांच्या पालकांचा हा धागा http://www.misalpav.com/node/41541 वाचला.चांगला उपक्रम होतोय.शुभेच्छा! याच विषयावर ग्रुपमधे चर्चा सुरु होती.त्या दरम्यान एक मुद्दा असा पुढे आला की विषयाचं आकलन चांगलं होण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण घेणं वगैरे ठिक आहे.पण हे चांगलं आकलन झालेले मराठी माध्यमातले विद्यार्थी जागतिक दर्जाच्या संस्थांमधे का दिसत नाहीत? मागच्या १०-१२ वर्षात शालेय शिक्षण मराठी माध्यमातून घेतलेल्यांपैकी कितीजण पुढे IIT/IIM हार्वर्ड,INSEAD सारख्या संस्थांतून शिक्षण घेतलेले आहेत,किंवा याच दर्जाच्या अन्य संस्थांतून शिकलेले आहेत?प्रायव्हेट बँकिंग,इन्व्हेस्टमेंट बँक

कार्यानुभवाचा तास

सकाळीच घंटानाद, नेहमीचे वर्तमानपत्र, कचरा, दुध हे घंटानाद झाल्यावर चा हा चौथा. स्वनिर्मित नाष्ट्याचा आस्वाद आई सोबत घेत होतो, थोड्याशा नाराजीनेच दरवाजा उघडला. दारात शेजारच्या घरातील नवी सून उभी, “अंकल आपको सिलेंडर चेंज करने आता है क्या” हां आता है, आता हुं असे म्हणून आत वळलो टी शर्ट अडकवून गेलो. सिलेंडर बदलला, घरात फक्त नवी जोडी. सासूबाई, स्मिताची मैत्रीण बाहेरगावी गेलेली. मुलगा व सून दोन्ही ही छोटीशी कृती कशी करावी याबाबत पूर्ण अशिक्षित. दुसरा सिलेंडर सील सकट होता बाजूला , म्हणजे प्रयत्न ही केलेला नव्हता. मोबाईल, गाड्या, नवी नवी उपकरणे यात भलतीच स्मार्ट असलेली ही पिढी. मन सहज मागे गेले.

परदेशात पदवीचे शिक्षण घ्यावे काय?

दहावी बारावीत चमकायचे किंवा बरे गुण मिळवायचे , भारतात इंजिनियरिंग करायचे आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी म्हणून परदेशी जायचं ते न परतण्यासाठीच ! असा सर्वसाधारण प्रवास दोन पिढ्यानी केल्यावर आता कल बदलतोय की काय असं वाटतंय. पदवीलाच परदेशी जाणारे चारपाच जण पाहिले अन बरेच तसा विचार करताहेत. माझा एक शाळूमित्र व्यावसायिक असल्याने तिकडे गावाकडेच रहातो. गेल्या महिन्यात तो विचारत होता की मुलाला बारावीनंतर पदवीसाठी कुठल्यातरी (!) देशात पाठवायचंय, ही कल्पना कशी आहे सांग ?

भाषेचं शिक्षण आणि शिक्षणाची भाषा

ब्लॉग दुवा - http://www.apurvaoka.com/2016/06/mother-tongue-education-india.html विषय जुना आहे, काथ्या कुटून झालेला आहे. पण रहावलं नाही म्हणून पुन्हा तोच राग आळवतोय. ज्यांची मतं ठाम आहेत त्यांनी दुर्लक्ष करावं, डळमळीत आहेत त्यांनी जरूर वाचावं, आणि तटस्थ असलेल्यांनी क्षमा करावी किंवा मजा घ्यावी. पुढचा लेख वाचला नाहीत तरी ही चार वाक्य कृपया वाचा. जरी शिक्षण म्हणजे इंग्रजी माध्यम असं पक्कं समीकरण आजकाल झालेलं असलं, तरीही मातृभाषा शिक्षणाबद्दल काही सत्य आणि त्यासंबंधी जगात बळावत असलेली भावना सांगण्याचा इथे प्रयत्न आहे.

शिक्षणाचा जिझीया कर अर्थांत Right To Education कायदा

शिक्षणाचा अधिकार (RTE) हा कायदा काँग्रेस सरकारने पास केला. काहीही विरोध न होता सोनिया गांधी ह्याचा हा कायदा संसदेत विरोध न होता पास झाला. ह्या कायद्याची स्तुती जवळ जवळ सर्वच लोकांनी केली. महाराष्ट्रातील भाजप सरकार सुद्धा हा कायदा अतिशय तडफेने लागू करत आहे आणि मोडी सरकारच्या एका समितीने हा कायदा अकरावी बारावी साठी सुद्धा लागू करावा अशी मागणी केली आहे. माझ्या मते मागील ६५ वर्षांत जेव्हडे कायदे सरकारने पास केले त्यातील RTE हा कायदा सर्वाधिक धोकादायक असून हा कायदा अतिशय तातडीने रद्द बातल केला पाहिजे. वास्तविक पाहता हा कायदा जेंव्हा मी लोकांना समजावून सांगितला तेंव्हा त्याचे सुद्धा तेच मत बनले.

भारतातील आफ्रीकन विद्यार्थ्यांचा प्रश्न

आफ्रीकेतील बर्‍याच देशातील विद्यार्थी कायदा पालन विषयक समस्यांसाठी ओळखले जातात (सर्वच तसे असतील असे नव्हे). अलिअडच्या काळात दिल्ली, गोवा, इथे काही घटना घडून गेल्या यावेळी बेंगलोरची वेळ आहे. या वेळच्या बेंगलोर केस मध्ये एका सुदानी विद्यार्थ्याच्या गाडीखाली येऊन एका बेंगलोरच्या स्त्रीस अपघात झाला. स्थानिक जमावाने चिडून अपघाताशी संबंध नसलेल्या तांझानीयन विद्यार्थ्यांची गाडी अडवून जाळली आणि कार मधील तांझानीयन विद्यार्थ्यांंचे हाल करून वड्याचे तेल वांग्यावर काढले.
Subscribe to शिक्षण