Skip to main content

प्रश्नोत्तरे

पुणे ते कन्याकुमारी सोलो ट्रीप

लेखक Nishantbhau यांनी रविवार, 29/10/2023 04:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, पुणे ते कन्याकुमारी car ने सोलो ट्रीप करायची आहे. आपल्या पैकी कोणी अशी ट्रीप केली आहे का? सोलो ट्रीप करताना काय काळजी घ्यावी? कोणी मार्गदर्शन करू शकेल का?

लक्षद्वीप किवा अंदमान

लेखक Nishantbhau यांनी शनिवार, 09/09/2023 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, कुटुंबा बरोबर हिवाळी सहली वर जायचा विचार सुरु आहे. लक्षद्वीप/अंदमान इथं खुप सुंदर समुद्रकिनारा आहे, असे समजले. तर या २ ठिकाना बद्दल थोडं मार्गदर्शन हव आहे. सोबत 6 महिन्याच बाळ आसनार आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जाणं योग्य आहे का ? तसेच गरज पडली तर लहान मुलांचे डॉक्टर उपलब्ध असतील का? एकंदरीत सहलीचं नियोजन करण्यासाठी थोडं मार्गदर्शन हवं आहे

मदत हवी आहे - कोरिया भ्रमण

लेखक विअर्ड विक्स यांनी मंगळवार, 17/01/2023 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण कोरियाला ( जोंगि ) ३०-४५ दिवस ट्रेनिंग साठी जावयाचे आहे . तर पुढील संदर्भात माहिती हवी होती १. शाकाहारी जेवण उपलब्धता - भारतातून डाळ व तत्सम पदार्थ कोरियात विमानातून नेऊ शकतो का ? २. हवामान - जबर थंडी चा मोसम आहे तर हीटर व तत्सम कपडे रास्त दारात उपलब्ध होतील का भारतातून आणणे श्रेयस्कर ? ३. भाषा काठिण्य - इंग्रजी सहज बोलली जाते व कोणते विशिष्ट app डाउनलोड करावे लागेल भाषा सुलभतेसाठी ? ४. सिम कार्ड - गरज आहे का भारतीय ४G फोन चालतील वायफायवर ? ५.

ईन्कम टॅक्स रीटर्न फाईल करण्यात मदत हवी आहे.

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 12/12/2022 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे मला कळत नाहीये की कोणता पर्याय निवडायचा. मी वर्ष २०२१-२२ साठी ईन्कम टॅक्स रीटर्न फाईल करुन पहात आहे. ITR मी फ्रीलान्सर म्हणुन आयटीआर बनवत आहे, कृपया माहीतीगारांनी मदत, मार्गदर्शन करावे. जे जास्त उत्सुक असतील त्यांनी मला पुर्ण आयटीआर तयार करुन दीली तर मला काहीही हरकत नाही. खरोखर! (ह्युश चला वाचले हजार दीड हजार!)

दोन प्रश्न आहेत, कृपया सहाय्य करावे.

लेखक शानबा५१२ यांनी मंगळवार, 06/12/2022 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दीवसांनी इथे लिहत आहे. सर्वांना नमस्कार. दोन प्रश्न होते, ते खालीलप्रमणे: १) चुकीचे लोन एक्सेपेरीयन रीपोर्टवर येणेबाबत : मला मध्ये, गेल्या महिन्यात एक लोन हवे आहे का म्हणुन फोन आला. आयडीएफसी फर्श्ट बँकमधुन. मी माझी माहीती सांगितली, बोलणारा व्यक्ती अनुभवी वाटला. व मी जस्टडायलमध्ये केलेल्या चौकशीचा हा रिस्पोन्स असावा असे वाटले.मी मा़झी माहीती दीली. पॅन कार्ड, आधार कार्ड विचारल्याचे आठवत नाही. ते मला बोलले की आमचा ऑफीसर तुम्हाला भेटायला येईल. नंतर पुन्हा कॉल आला की तुमच्या ईथे आमची शाखा नाही आहे.

कोविड १९ घडामोडी : समज, गैरसमज

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 08/06/2020 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
(शेवटचे संपादन : २० /०३/२०२१) गेले तीन महिने आपण सर्व कोविडमय झालेलो आहोत. हा आजार नवा असल्याने त्यावर अविरत संशोधन होत आहे. या दरम्यान अनेक प्रसारमाध्यमांतून या आजाराबद्दलची विविध माहिती दिली जात आहे. त्यापैकी काही विश्वासार्ह असते, पण त्याच बरोबर चुकीची माहिती, अर्धवट माहिती आणि अनेक अफवा यांचाही सुकाळ आहे. या संदर्भात मला व्यक्तिगत संपर्काद्वारा अनेक प्रश्न विचारले गेले. त्यातून असे जाणवले की काही बाबतीत समाजात बरेच गैरसमज पसरले आहेत. त्यांचे निराकरण करावे या उद्देशाने हा स्वतंत्र धागा काढत आहे.

पंढरीची वारी आणि विवाह

लेखक nishapari यांनी शनिवार, 17/11/2018 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
शंकर पाटील यांच्या एका ग्रामीण विनोदी कथेत लेखकाचे वडील दरसालाप्रमाणे पंढरपूरच्या वारीला जातात आणि तिथे चांगल्या ओळख झालेल्या स्वजातीतील वारकऱ्याच्या दोन उपवर झालेल्या मुलींशी आपल्या दोन उपवर मुलांची लग्नं ठरवून बोलणी उरकूनच येतात . पुढे वारी संपल्यावर रीतसर पाहण्याचा कार्यक्रम होऊन लग्न ठरतं . वारीत अशा प्रकारचे रोटीबेटी व्यवहार खरोखरच होत असत का ती लेखकाने रचलेली गोष्ट आहे ? आणि होत असतील तर सध्याही होतात का ? कोणाला याबद्दल सविस्तर माहिती असेल तर कृपया उत्तरात सांगा ..

भारतीय इतिहासातले विज्ञान - प्रश्न-उत्तरे (सर्व समावेशक धागा)

लेखक अत्रे यांनी मंगळवार, 22/08/2017 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस मिपावर या विषयावर चर्चा होत आहे. विज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा! पुराणातल्या विमान शास्र वैगेरे वांग्याच चमचमीत भरीत ! डोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं! (Tribute to Dr. N. G. Dongare, who unearthed the roots of Physics in ancient Indian texts ) पण वरच्या चर्चातुन फारसे काही निष्पन्न होताना दिसत नाही - याचे कारण प्रश्न विचारताना आणि उत्तरे देताना आपण नीट काळजी घेत नाही.

आकाशवाणी वरील जुने कार्यक्रम कुठून/कसे मिळवायचे?

लेखक अत्रे यांनी गुरुवार, 15/06/2017 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
युट्युब वर "old radio" असे शोधल्यास बरेच इंग्रजी कार्यक्रम सापडतात (जसे की वेगवेगळ्या पुस्तकांची वाचने, नाटक , मुलाखती वगैरे) . बीबीसी तर आपले जुने कार्यक्रम ऑडिबल वर "ऑडिओ बुक" म्हणून विकताना दिसते. आपल्या भारतीय आकाशवाणीवरही असे बरेच कार्यक्रम स्वातंत्र्य मिळाल्यापासून (किंवा त्या आधीही) होत आहेत. पण ते कधी पब्लिक डोमेन मध्ये सगळ्यांसाठी खुले असताना दिसत नाहीत. म्हणजे - भारताला स्वातंत्र्य मिळत असताना रेडिओवर काय बातम्या देत होते किंवा ३० वर्षांपूर्वी रेडिओवर कोणत्या पुस्तकाचे झालेले वाचन किंवा पु ल देशपांडेंचा रेडिओवर एखाद्या कार्यक्रमात असलेला सहभाग..

परदेशात पदवीचे शिक्षण घ्यावे काय?

लेखक खेडूत यांनी शुक्रवार, 10/06/2016 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
दहावी बारावीत चमकायचे किंवा बरे गुण मिळवायचे , भारतात इंजिनियरिंग करायचे आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी म्हणून परदेशी जायचं ते न परतण्यासाठीच ! असा सर्वसाधारण प्रवास दोन पिढ्यानी केल्यावर आता कल बदलतोय की काय असं वाटतंय. पदवीलाच परदेशी जाणारे चारपाच जण पाहिले अन बरेच तसा विचार करताहेत. माझा एक शाळूमित्र व्यावसायिक असल्याने तिकडे गावाकडेच रहातो. गेल्या महिन्यात तो विचारत होता की मुलाला बारावीनंतर पदवीसाठी कुठल्यातरी (!) देशात पाठवायचंय, ही कल्पना कशी आहे सांग ?