Skip to main content

प्रश्न

Edison New jersey मध्ये 1 बेडरूम घर

लेखक Nishantbhau यांनी बुधवार, 20/07/2022 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार एडिसन area मध्ये 1 बेडरूम किंवा 2 बेडरूम घर शोधत आहे. शक्यतो ग्राउंड फ्लोअर हवा आहे. कोणी मदत करू शकेल का?

अशा श्रृंगापत्तीत तो आहे.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 21/08/2016 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
सुबोध खरेंचा "श्रृंगापत्ती" हा लेख वाचल्यावर मला एक प्रश्न पडला की,स्त्रीबरोबर शारिरीक संबध झाल्यावर पुरूष आपलं काम करून नामानिराळा व्हावा असं निसर्गाने उद्देशपूर्वक केलं आहे का? निसर्गाचे असे काय बरं उद्देश असतील? श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

शनि ग्रह आणि पृथ्वीवरचे जीव

लेखक वैभव जाधव यांनी बुधवार, 13/04/2016 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
पृथ्वी आणि चंद्र यांच्या रोजच्या फुगडीतून चंद्राच्या गुरुत्वाकर्षणा मुळे आठ तासा तून एकदा भरती आणि नंतर ओहोटी होते. 4 4 मीटर लाटा उसळतात. चंद्र जवळ आहे म्हणून असं होतं म्हणे. माणसाच्या शरीरात असलेल्या पाणी सदृश घटकांवर परिणाम होतो असं मानायला जागा आहे का? अशा मुळे माणसाच्या वागण्यावर ठराविक दिवशी (अमावस्या पौर्णिमा) परिणाम होतो असं मानलं जातं. आता काथ्याकुटाचा मूळ विषय- म्हणजे शनि आणि पृथ्वी यांचं त्यांच्या त्यांच्या कक्षेत फिरताना काही आकर्षण प्रतिकर्षण होत असतं का? जर ते तसं होत असेल तर तो शनीचा माणसावर होणारा परिणाम मानावा का?

घोस्टहंटरच्या निमित्ताने!

लेखक DEADPOOL यांनी मंगळवार, 22/12/2015 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
घोस्टहंटरच्या निमित्ताने! तसं बघायला गेलं तर घोस्टहंटर ही माझी दुसरी कथा! पण खरं पहायला गेलं तर पहिलीच! (दोन वेडे ट्रायल म्हणून लिहिली,आणि फसलो!) ही कथा गेले ३ वर्ष डोक्यात घोळत होती.मात्र मिसळपावने ही कथा प्रकाशित करु दिल्याबद्दल संपादकांचे आभार. घोस्टहंटरचा आवाका अत्यंत मोठा आहे. शतकी भाग झाले तरी कथा संपणार नाही.परंतु ही कथा मी लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करेल. आता मूळ मुद्यावर येतो.ही माझी पहिलीच कथामालिका असल्याने मिपाकर मंडळींच्या मार्गदर्शनाची यापुढेही आवश्यकता आहे.

'सात' वार, 'आठ' वडा?

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 14/12/2015 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
एकूण वार 'सात' आहेत. हिंदी मध्ये आठवड्याला सप्ताह म्हणजे सप्त (सात) वारांचा समूह म्हणतात पण मराठीत त्याला 'आठ'वडा का म्हणतात? मला पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर कुणाला माहित असेल तर सांगावे. माझा प्रश्नच चुकीचा असेल किंवा गृहितकं चुकत असतील तर तसे ही सांगावे. धन्यवाद!!

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग २

लेखक किणकिनाट यांनी शुक्रवार, 28/08/2015 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
धाग्याच्या आधीच्या भागात प्रतिसाद शंभरहून जास्त झाल्याने नवीन भाग सुरु करत आहोत - आधीचा भाग वाचनमात्र करतो आहोत. यापुढील चर्चा इथे चालू रहावी. संपादक मंडळ.