Skip to main content

misalpav

३७० रुपये वारले (नाहीत)..

लेखक गवि यांनी सोमवार, 15/06/2026 17:20 या दिवशी प्रकाशित केले.

ते ७० रुपये वारले आणि हे ३७० रुपये वारेनात..

"अशी ही बनवाबनवी" कोण विसरेल? म्हणजे तुम्ही हा सिनेमा पाहण्याइतक्या भाबड्या काळात जन्माला आला असाल तर. त्यातला अशोक सराफ आणि सुधीर जोशी यांचा तो कल्ट ठरलेला संवाद आपण शेकडो वेळा पाहिला ऐकला असेल. पांढऱ्या बंडीतले घरमालक विश्वास सरपोतदार जेव्हा आपल्या ७० रुपयांचा हिशोब मागतात, तेव्हा बेरकी धनंजय माने (इथेच राहतात का फेम) अत्यंत गंभीर चेहऱ्याने आणि तितक्याच भाबडेपणाने म्हणतात,"७० रुपये वारले!" 

८० च्या दशकातला हा डायलॉग आता निष्पाप कोवळ्या विनोदाचा पेंढा भरलेला नमुना म्हणून उरला आहे. 

सुटलेलं पोट आणि 'उद्यापासून' सुरू होणाऱ्या व्यायामाचा महाअजेंडा!

लेखक अनिशासूत यांनी रविवार, 14/06/2026 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
आरशात पाहिल्यावर छातीच्या दोन पावले पुढे दिसणारं पोट आणि रोज रात्री ठरवून सकाळी अलार्मसोबत मोडीत निघणारे व्यायामाचे बेत! मध्यमवर्गीय तरुणांच्या सुटलेल्या पोटावर आणि कधीही न उजाडणाऱ्या 'पुढच्या सोमवार'वर मारलेला एक अत्यंत खुसखुशीत आणि विनोदी नक्ष स्टाईल दृष्टीक्षेप. वाचा आणि तुमची पोटाची कहाणी कमेंटमध्ये सांगा! ☕

.

लेखक आशानिल यांनी सोमवार, 08/06/2026 13:41 या दिवशी प्रकाशित केले.

कोर्टशिप

लेखक आजी यांनी गुरुवार, 28/05/2026 14:00 या दिवशी प्रकाशित केले.

मी वर दिलेल्या "कोर्टशिप" या शीर्षकाचा आणि कोर्टकचेरीचा काहीही संबंध नाही, हे तुमच्या सहज लक्षात येईल. त्यासाठी तुम्ही "चाणाक्ष वाचक" वगैरे असण्याची काहीच गरज नाही. कोर्टाची पायरी चढण्याची वेळ कुणावरही न येवो, पण कोर्टशिप करण्याची संधी मात्र प्रत्येकाला मिळावी. 

 

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ४: पोंगल आणि गुडलूर- उटी- वेलिंग्टन ६७ किमी

लेखक मार्गी यांनी सोमवार, 13/04/2026 09:23 या दिवशी प्रकाशित केले.

✪ उदकमंडलम् अर्थात् उटी!! ✪ हिमालय आणि सह्याद्रीचा संगम ✪ पोंगलचा उत्साह आणि सजावट ✪ २० किलोमीटरमध्ये १२०० मीटर चढ असलेला उटीचा घाट ✪ वन्य परिसरातून वर चढत जाणारा रस्ता! ✪ वेलिंग्टन कँटमध्ये राहण्याचा अनुभव नमस्कार. जानेवारीमधल्या सायकल प्रवासाचे अनुभव शेअर करत आहे. १५ जानेवारीची‌ सकाळ. सायकल प्रवासाचा चौथा दिवस. काल गुडलूरमध्ये थांबलो होतो. गुडलूर! उटीच्या पायथ्याचं आगळं- वेगळं ठिकाण. अगदी डोंगराळ प्रदेशात आल्यासारखं वाटावं असं. आज उटीला जायचं आहे. उटीचा घाट! लहानपणी आजोबांसोबत व्यापार खेळताना उटी, कोचीन, दार्जीलिंग, मद्रास अशी‌ गावं ओळखीची झाली! ते उटी!