Skip to main content

मार्गदर्शन

कामामुळे ताण तणाव

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 26/08/2020 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो वेलनेस लाईफ कोच म्हणून एक नवीन मिशन हातात घेतोय. " स्ट्रेस मॅनेजमेंट " स्ट्रेस ताण तणाव यामुळे बरेच काही घडते आणि बिघडते देखील. "स्ट्रेस" खास करून इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणारांसाठी तो कायमचाच गळ्यात पडलेला असतो काही जणांसठी कामाचा ताण प्रेरक असते. तर काहींसाठी तो मनस्वास्थ्य बिघडवणारा उत्पात घडवतो. मनस्वास्थ्य बिघडते तब्येतीची वाट लागते. हाय ब्लड प्रेशर, पाठ दुखी, संताप , फ्रस्ट्रेशन डिप्रेशन , डायबिटीस , हार्मोनचे संतुलन बिघडणे , दारू सिगरेट सारखी व्यसने असे बरेच काही होते. या साठी एक मिशन हातात घेतोय. स्ट्रेस कमी करण्याचे .

मार्गदर्शन /नवी सुरवात

लेखक सन्घमित्रा यांनी रविवार, 16/07/2017 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
सातत्याने येत असलेल्या व्यावसायिक अपयशातून बाहेर कसे पडावे ? दैवी मार्गदर्शन असे काही असते का ? नवी सुरवात कशी करावी ?

अशा वेळी तुम्ही नक्की काय करता ... २

लेखक विदेशी वचाळ यांनी गुरुवार, 27/04/2017 04:38 या दिवशी प्रकाशित केले.
घरामध्ये कोणी तरी आजारी आहे. आजारी माणसाची कायम चीड चीड होत असते. तशी ती कोणाचीही होताच असते. आजार मुकाट्याने सहन करा असा सल्ला देणारा मी नाही. पण जर का आजारपण दीर्घकाळ असेल तर? मग घरात कायमच चीड चीड होत राहते. कधी आजारी माणसाची तर कधी इतरांची. बरं प्रॉब्लेम असा होतो कि या आजारी माणसाशी काय बोलायचे आणि कसे बोलायचे? आपण म्हणावे आज सकाळी छान हवा पडली होती तर सकाळी नेमके त्या माणसाला गरगरत असावे. आपण गेल्या डिसेंबर च्या ट्रिप बद्दल बोलायचे म्हणाले तर त्याला तो माणूस येऊ शकलेला नसायचा. एकंदरीतच एकाच घरात असून पण आपले प्रांत वेग वेगळे होऊ लागलेले असतात. बोलायचे तर असते पण बोलणार काय?

दहा वर्षांच्या मुलीच्या तिरळ्या डोळ्यांच्या उपचारासाठी सल्ला / उपाय / मार्गदर्शन हवे आहे

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 31/12/2016 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या परिचयातील एका मुलीला तिरळे डोळेआळशी डोळे हा त्रास आहे. फॅक्टस अँड फिगर्स:
  • मुलीचे सध्या वय: दहा वर्षे आहे. तिरळेपणाचे व आळशी डोळ्याचे पहिल्यांदा निदान पाच वर्षांपूर्वी झाले.
  • निदानानंतर, दोन डोळ्यांना वेगवेगळ्या नंबरचा चष्मा आणि तिरळा+आळशी नसलेला, चांगला डोळा झाकण्यासाठी पॅच असा उपचार सुरु केला. औषधे ड्रॉप्स इ दिलेले नव्हते.
  • उजवा डोळा सामान्य आहे आणि त्यात +१.० पॉईंट आहे.