Skip to main content

जनातलं मनांतलं

राम मंदिर शीलान्यास

लेखक Nitin Palkar यांनी बुधवार, 05/08/2020 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
राम जन्मभूमी शिलान्यास एक हजार वर्षांनंतर आज अयोध्येत सबल हिंदू एकतेचे प्रदर्शन होत आहे. एकवीस वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाई नंतर सम्पूर्णपणे संसदीय मार्गाने, परकीय आक्रमकाने उद्धवस्त केलेल्या मंदिराचे पुनर्निर्माण आज सुरू होत आहे. प्रत्येक हिंदू माणसासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. 'शांतीप्रिय धर्माचे लोक आक्रमकपणे संघटीत होत असताना निद्रिस्त हिंदूंनी जागे होण्याचा हा क्षण आहे. राम मंदिराच्या निर्माणाने कोरोना जाईल का असले प्रश्न विचारून तोंड वाकडे करणाऱ्यांना या देशाची नाळ कधीच समजली नाही.

अशा लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकावा का?

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 21/04/2020 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
हा मेसेज मला एका WhatsApp वर एका डॉक्टर स्नेह्यांनी पाठवला आहे.त्यात त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.याबद्दल आपल्याला काय वाटते हे जाणावेसे वाटते.तसेच या बाबत कायदा काय म्हणतो हे ही येथे कोणी सांगितल्यास उपकृत होऊ.कारण या समाजाशी बांधिलकीतून केलेल्या अपेक्षा आहेत.पण प्रत्यक्षात अशा प्रकारे डॉक्टरांवर/पोलिसांवर/आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ला करणार्‍या लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकणे कितपत शक्य आहे हे जाणून घ्यायचे आहे. कोरोना साथीच्या अतिशय कठीण वेळप्रसंगी जे डॉक्टर, सिस्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि संरक्षक दलांचे बंधू-भगिनी आपला स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालून समाजाची,

मेडिकल हेल्थ इन्शुअरन्स २०१८_१९

लेखक कंजूस यांनी रविवार, 05/08/2018 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
मेडिकल इन्शुअरन्स २०१८-१९ ( वाढत्या वयाला आरोग्य विमा चालू ठेवावा का?) आरोग्यविमा म्हणजे आजारी पडलो, अॅक्सिडंटमध्ये दुखापत झाली, अपेन्डिक्स, ताप इत्यादि अचानक उद्भवणारे रोग झाल्याने हॅास्पिटलमध्ये भरती /दाखल होऊन उपचार करताना जो खर्च येतो तो "आरोग्य विमा" देणाऱ्या कंपन्या थोडाफार परत देतात. जे लोक कोणत्यातरी मोठ्या कंपनीत स्थिर नोकरीत असतात तिथे त्यांना कंपनीकडून परस्पर खर्च भरपाईची सोय होते परंतू सर्वचजण अशा काही नोकरीत नसतात आणि त्यांना स्वत: विमा हप्ते भरून एकेक वर्षासाठी विम्याचे संरक्षण घ्यावे लागते. मागे एकदा असा सल्ला मिळालेला की नोकरी कायमची नसते आणि मग तुम्ही बाहेरून विमा काढायला गे

च्यानेलांचे जाहिरातप्रदूषण

लेखक सामान्यनागरिक यांनी शनिवार, 25/07/2015 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
मी थेट-घरात ( आंग्ल भाषेत – डीटीएच) दूरदर्शन सेवेचा एक ग्राहक आहे. साधारण सातेक वर्षांपूर्वी मी ही सेवा घेतली. त्यावेळी खासगी च्यानेले अगदी भरात आलेली होती. मलाही त्यावळी ही सेवा घेतल्याचा आनंद झाला. अर्थात खासगी च्यानेले म्हणजे जाहिराती असणारच. आणि त्यावेळी तीस मिनीटांच्या कार्यक्रमात किंवा मालिकेच्या भागात आठे ते दहा मिनीटांच्या जाहिराती असायच्या. बरेच वेळा त्या नको तेंव्हा चालु व्हायच्या पण मालिकेचा भाग कोणता आणि जाहिराती कोणत्या हे नक्की ओळखु यायचे. संध्याकाळ्चे कार्यक्रम बघतांना आमची सौ.