हा मेसेज मला एका WhatsApp वर एका डॉक्टर स्नेह्यांनी पाठवला आहे.त्यात त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.याबद्दल आपल्याला काय वाटते हे जाणावेसे वाटते.तसेच या बाबत कायदा काय म्हणतो हे ही येथे कोणी सांगितल्यास उपकृत होऊ.कारण या समाजाशी बांधिलकीतून केलेल्या अपेक्षा आहेत.पण प्रत्यक्षात अशा प्रकारे डॉक्टरांवर/पोलिसांवर/आरोग्य कर्मचार्यांवर हल्ला करणार्या लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकणे कितपत शक्य आहे हे जाणून घ्यायचे आहे.
कोरोना साथीच्या अतिशय कठीण वेळप्रसंगी जे डॉक्टर, सिस्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि संरक्षक दलांचे बंधू-भगिनी आपला स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालून समाजाची, देशाची सेवा करत आहेत, त्यांच्यावर थुंकणाऱ्या/हल्ले करणाऱ्या/दगडफेक करणाऱ्या किंवा कुठलेही राष्ट्रविरोधी/समाजविघातक कार्य करणाऱ्या लोकांना शोधून काढून, आता अतिरेकी,दहशतवादी घोषीत करण्याची वेळ आहे.
आणि इथून पुढे त्यांच्यावर आर्थिक आणि सामाजिक बहिष्कार टाकायला जायला हवा. हे काम केवळ सरकारचेच नाही तर या कामात देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यायला हवाय. या दहशतवाद्यांना/अतिरेक्यांना इथून पुढे, आजन्म सर्व शासकीय सुविधा नाकारल्या जाव्यात.
उदा. १) यांना आणि यांच्या परिवारातील सदस्यांना इथून पुन्हा कधीही आणि कुठल्याही रोगासाठी देशभरातल्या कुठल्याही शासकीय रूग्णालयात किंवा महानगरपालिकेच्या दवाखान्यात उपचार मिळायला नकोत.
२) यांना किंवा यांच्या परिवारातील सदस्यांना कुठल्याही शासकीय/महानगरपालिकेच्या शाळा/कॉलेजात शिक्षणाला परवानगी नसावी, जर हे आधीच तिथे शिकत असतील तर तिथले त्यांचे प्रवेश कायमस्वरूपी रद्द केले जायला हवेत.
३) कुठल्याही शासकीय आस्थापनेत यांना आणि यांच्या कुटूंबातील सदस्यांना नोकरी नाकरण्यात यावी. व्यवसायासाठी भांडवल देण्यात येऊ नये. जर हे लोक आधीपासूनच या सुविधांचा लाभ घेत असतील तर त्वरित या सुविधांपासून यांना वंचित करायला हवे.
४) या लोकांना पॕन कार्ड/आधार कार्ड/मतदान ओळखपत्र/पासपोर्ट आणि सर्व महत्त्वाची कागदपत्रे नाकारण्यात यावीत. यांच्याकडे ही कागदपत्रे आधीपासूनच असतील तर ती जप्त करण्यात यावीत.
५) यांचा मतदानाचा हक्कसुद्धा हिरावून घ्यायला हवा.
६) केंद्र किंवा राज्य शासनाव्दारे चालवल्या गेलेल्या कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ यांना घेता येणार नाही, अशी तरतूद व्हायला हवी.
या उपाययोजनांमुळे आपण केवळ उपलब्ध राष्ट्रीय साधनसंपत्तीचा कार्यक्षम उपयोग करू, इतकेच नाही तर कितीतरी गरजू लोकांना यामूळे शिक्षण, रोजगार आणि उपजिवीकेच्या नव्या संधी मिळतील आणि या अतिरेक्यांच्या/दहशतवाद्यांच्या आपोआपच मुसक्या आवळल्या जातील आणि त्यांचे कुटूंबीयही या गोष्टींमुळे त्यांना या मार्गाकडे जाण्यापासून परावृत्त करतील, इतकेच नव्हे तर भविष्यातही अशी राष्ट्रविरोधी/समाजविघातक कामे करायला कुणीही धजावणार नाही.
गरज भासल्यास यासाठी कायद्यातही बदल करून घेण्यासाठी तज्ञांची मदत घ्यायला हवी.
मित्रांनो, तुम्हाला हा संदेश जर योग्य वाटत असेल, या उपायांनी अशा कृत्यांना आळा बसेल आणि देशाला याचा फायदा होईल असे वाटत असेल तर हा संदेश सगळीकडे पसरू देत.
वंदे मातरम!
[मिपासाठी: सदर पोस्ट ही अपेक्षा स्वरुपातील आहे.सद्याचा काळ संवेदनशील असल्याने आणि पोस्टमधील अपेक्षा या बहिष्कार स्वरुपाच्या असल्याने जर इथे स्विकारणं शक्य नसेल आणि त्यामुळे धागा डिलीट करावा लागल्यास तसे कृपया मला व्यनिमधे कळवावे.माझी कोणतीही तक्रार असणार नाही.फक्त धागा कुठे गेला हे शोधण्यात अकारण वेळ खर्ची होऊ नये यासाठी हे लिहिले आहे. _/\_ ]
वर्गीकरण
वाचने
8179
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्याने काही होत नसत
माझा प्रतिसाद
१) मानसोपचारपद्धती या
In reply to माझा प्रतिसाद by उपयोजक
क्रमांक ३ शी सहमत
In reply to १) मानसोपचारपद्धती या by पिंट्याराव
चुकीचा संदेश !
सहमत
In reply to चुकीचा संदेश ! by धर्मराजमुटके
सहमत
In reply to चुकीचा संदेश ! by धर्मराजमुटके
तुमच्या एकूण म्हणण्याविषयी
In reply to चुकीचा संदेश ! by धर्मराजमुटके
लेखाच्या एकूण आशयाशी सहमत आहे
?
In reply to लेखाच्या एकूण आशयाशी सहमत आहे by वामन देशमुख
>>> बाजारातील विक्रेता
In reply to ? by शा वि कु
.
In reply to >>> बाजारातील विक्रेता by वामन देशमुख
सांप्रतचा काळ
आशयाशी सहमत
@आगाऊ म्हाद्या
In reply to आशयाशी सहमत by आगाऊ म्हादया......
बहिष्कार घालणे हे मूलभूत
बहिष्कार घालणे हे मूलभूत
बरेच महिने
चांगली बातमी