Skip to main content

चर्चा (काथ्याकूट)

मोदी सरकार एक वरदान !!

लेखक डँबिस००७ यांनी शनिवार, 03/11/2018 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातले शेतकरी गेले दोन दशक आत्महत्या करत आहेत. वेगवेगळ्या काळातल्या सरकारने ह्या आत्महत्यांची कारण मिंमांसा व मुळ कारण शोधुन त्यावर उपाय करण्याएवजी आत्तापर्यंत सोप्पा मार्गच निवडला व तो म्हणजे शेतकर्यांना काहीतरी पैश्याची मदत करायची. शेतकर्यांच्या मालाला योग्य दर मिळाला नाही तर शेतकर्यांनी काय करायच ? शेतमाल पावसा मुळे वा पावसाच्या आभावामुळे नाश पावला तर शेतकर्याला कोण मदत देणार ? शेतकर्याला योग्य दर का मिळत नाही ह्याच कारण , पुर्ण बाजार आडत्याच्या, एजंटच्या व्यापार्याच्या हातात ! शेतीमाल उत्पादन करणार्या पेक्षा विकणार्या चेन मध्ये सर्वात जास्त नफा आहे.

पगार, स्त्री-पुरुष समानता आणि जॉर्डन पीटरसन

लेखक अस्वस्थामा यांनी गुरुवार, 04/10/2018 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
जॉर्डन पीटरसन हे नाव कधी जास्त ऐकलेलं नव्हतं. कुठुन तरी युट्युबबाबाने सजेस्ट केलं आणि त्याचे काही विडिओ पाहण्यात आले. या बाबाचे काही मुद्दे मस्त पटले तर काही अजिबात नाही. खरंतर काही ठिकाणी तो अगदी इथल्या अजोसारखा पण वाटला. माणूस अगदी शांतपणे मुद्द्याला धरुन जे शब्दच्छल अथवा गोळीबंद रचना करतो ती खरंच इंप्रेसिव वाटली. आता या इथे शेअर केलेल्या वरच्या लिंकमध्ये कॅथीबाईंनी यांची मस्त तासू अशा ठरावाने घेतलेली मुलाखत पहा. काका काही म्हणाले की 'म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का...' अशा सुरुवातीने बाई त्यांची अतर्क्य अशी कंन्क्लुजन फेकतात.

मिपावर "ग्रामीण" विभाग

लेखक विशुमित यांनी शुक्रवार, 18/05/2018 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.misalpav.com/node/42631 अशा ग्रामीण बाज असणाऱ्या कथांना/धाग्यांना भरभरून मिळणाऱ्या प्रतिसादावरून एक प्रस्ताव मांडू इच्छितो की मिपावर "ग्रामीण विभाग" देखील चालू झाला पाहिजे. देशविदेशातील आपल्या बांधवांना मुरलेल्या लोणच्याचा आस्वाद तरी घेता येईल. -- वेगळी ओळख कशासाठी याबद्दल मतमतांतरं असू शकतात. तुम्हाला काय वाटते मंडळी ?

पदराआडचे इतिहासकार

लेखक गावठी फिलॉसॉफर यांनी मंगळवार, 01/05/2018 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ:- नरवीर तानाजी मालुसरे स्मारकाजवळ, सिंहगड (स्मारकाची डागडुजी आणि नूतनीकरण चालू असते. दगड फोडून कोरीव काम करण्याचे काम चालू असल्याने वाटेत अडथळे येत असतात.) वैभव: गौरव व्यवस्थित चाल.... पुढे दगड कोरून ठेवले आहेत. गौरव: नरवीर तानाजी मालुसरेंच्या समाधीचे दर्शन तुम्हा सर्वांअगोदर मीच घेणार. मीच पहिला नतमस्तक होणार!!! विक्रम: ok.... शेवटी तुम्ही बलकवडे घराण्याचे वंशज.... सरदार!!!!! (शेवटी आम्ही सगळे स्मरकाजवळ पोचतो. तिथे एक पस्तीशितील जोडपे सेल्फी घेत असते. आम्ही थोडा वेळ उभे असतो पण त्यांचे ते चाळे चालूच असतात.) प्रशांत: किती निर्लज्ज लोक आहेत..... समधी स्थळाजवळ चप्पल घालून वावरतात....

मूलभूत नीतितत्त्वे

लेखक यनावाला यांनी शनिवार, 03/03/2018 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
मूलभूत नीतितत्त्वे : यनावाला [ईश्वरवादी--निरीश्वरवादी या दोघांतील प्रश्नोत्तररूपी संवाद . प्रश्न आस्तिकाचे, उत्तरे नास्तिकाची.] प्रश्न :- तुम्ही म्हणता की, "आजच्या प्रगत युगात समाजाला देवा-धर्माची आवश्यकता नाही. पुरातनकाळीं अज्ञानयुगातील माणसाला सुचलेल्या आणि रुचलेल्या या संकल्पनांचे आता काही प्रयोजन उरलेले नाही. सर्वांनी त्या डोक्यातून काढून टाकल्या पहिजेत" असे करणे योग्य होईल का ? उत्तर :- हो निश्चितच. इथे "धर्म" या शब्दात जगातील सर्व प्रचलित धर्म (उपासना पद्धती) समाविष्ट आहेत. तसेच देव हा शब्द जगातील सर्व देव-देवतांविषयीं आहे.

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...

लेखक यनावाला यांनी सोमवार, 19/02/2018 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...... यनावाला जगनिर्माता, जगन्नियंता, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, पूजा-अर्चा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धाऊन येणारा, ईश्वर अस्तित्वात आहे असे आस्तिक लोक मानतात. किंबहुना अशा ईश्वराचे अस्तित्व सत्य मानणार्‍यांना आस्तिक म्हणतात. आस्तिक शब्दाचा हाच अर्थ आज प्रचलित आहे. ( काहीजण केवळ जगनिर्मात्या ईश्वराचे अस्तित्व मानतात. --म.फुले यांनी त्याला निर्मिक म्हटले आहे.-- उपासनेचा देव मानत नाहीत. पण त्यांची संख्या नगण्य आहे.) जगातील बहुसंख्य माणसे अजून आस्तिक आहेत.

लोकशाहीची अधोगती ?

लेखक गणेश.१० यांनी शनिवार, 13/01/2018 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
कालचा गोंधळ म्हणजे फक्त निमित्त. आपली न्याय व्यवस्था अगदी सर्वोच्च पातळीवरही आतून किती पोखरलेली आहे याची एक झलक काल (१२ जानेवारी २०१८) पाहायला मिळाली. लोकशाहीचा आधारस्तंभ असं बिरुद मिरवणारी न्यायव्यवस्था तिला मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून अधोगतीकडे वेगाने प्रवास करतेय असं स्पष्ट दिसतंय. तसं पाहायला गेलं तर चारही आधारस्तंभ संविधानात अभिप्रेत असलेली जबाबदारी खरंच पार पाडताहेत का याची काही सोप्या शब्दात मांडणी केली तर उत्तर 'नाही' असेच मिळेल. मी कोणत्याही पक्षाची वकिली करत नाही. माझा हेतू पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण थोडंसं आत्मचिंतन करावं एवढाच.

ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा

लेखक गावठी फिलॉसॉफर यांनी शनिवार, 30/12/2017 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
"इतिहासाला जो विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही" हे सत्यवचन आहे. इतिहास अनेक अनेक प्रकारे समजू शकतो. त्यासाठी अनंत साधने आहेत. कादंबरी, शोधग्रंथ, निबंधमाला ही जनमानसात रुजलेली आणि विस्तृतपणे इतिहास समजण्यास मदत करणारी साधने. इतिहास अध्ययनाचे आणि वाचकांचे अनेक प्रकार असू शकतात. त्यापैकी इतिहास प्रेमी, इतिहास अभ्यासक आणि इतिहास संशोधक याप्रकारे एक वर्गवारी होऊ शकते. इतिहासप्रेमी हे इतिहास वाचनासाठी कादंबरी, लेखमाला, काही प्रसिद्ध ग्रंथांचा आधार घेतात. इतिहास अभ्यासक हे बखरी, ग्रंथ, डायरी, पत्रे, शिलालेख, पुरातन नकाशे यांचा आधार घेतात.

आनंददायी इहलोक

लेखक यनावाला यांनी शुक्रवार, 17/11/2017 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
आनंददायी इहलोक: यनावाला प्रश्न:- प्रत्येक जीवा एक जन्म । जो प्रथम तोचि अंतिम । नाही कोणाही पुनर्जन्म । ऐसा तुमचा विचार ॥१॥ सत्य जर तो मानियेला । अल्पसा काळ आयुष्याला । मग आनंद तो कसला। क्षणभंगुर जीवनी ?

अठ्ठावीस लक्ष रुपये

लेखक यनावाला यांनी शनिवार, 04/11/2017 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
अठ्ठावीस लक्ष रुपये .......यनावाला "पैशांचा पाऊस ! भोंदू बाबाने व्यावसायिकाला अठ्ठावीस लाख रु.ना गंडवले." या शीर्षकाची बातमी पुणे म.टा.(31-01-2017) मध्ये अनेकांनी वाचली असेल. ती अशी:- मंदार अरविन्द वैद्य ( वय ४७ वर्षे, विठ्ठलनगर, सिंहगड मार्ग, पुणे) यांचा शिरवळ येथे कारखाना आहे. ते श्रद्धाळू आहेत. त्यांच्याकडे बुवा-बाबा-स्वामींचे येणे- जाणे असते. सागरनाथ नावाचा बुवा वैद्यांकडे आला. " तुम्हांला धंद्यात आर्थिक अडचणी आहेत. मी अक्षय धनाचा कुंभ देतो. हवे तेवढे धन मिळेल. " असे सांगून त्याने नऊ हजार रुपये मागितले. वैद्यांनी आनंदाने दिले. नंतर कांही दिवसांनी , "अडथळे आहेत.