Skip to main content

ऑनलाईन खरेदी असाही एक अनुभव.

ऑनलाईन खरेदी असाही एक अनुभव.

Published on 11/03/2018 - 12:37 प्रकाशित
अॅमेझॉन या ऑन लाईन शॉपिंग साईट वरून एक टी शर्ट COD (Cash on Delivery) ने मागवला. डिलिव्हरी आल्यावर डेबिट कार्डने पैसे दिले. पार्सल उघडून बघताच टी शर्ट योग्य मापाचा नसल्याचे जाणवले. तो परत करण्याकरता अॅमेझॉनच्या वेब साईट वर विनंती केली व परतावा रक्कम ‘अॅमेझॉन पे बॅलन्स’ मध्ये जमा करण्याचा पर्याय दिला. दुसऱ्या दिवशी कंपनीच्या कुरियरने पार्सल नेले. वेब साईट वरील माहितीनुसार पार्सल नेल्या पासून सहा तासात रक्कम माझ्या खाती जमा व्हायला हवी होती. ती न झाल्याने दोन दिवसांनी अॅमेझॉनच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीशी दूरध्वनिद्वारे संपर्क साधला. त्या प्रतिनिधीने दिलगिरी व्यक्त करून पुढील २४ ते ४८ तासात रक्कम जमा होईल असे सांगितले. दोन दिवसांनंतरही रक्कम जमा न झाल्याने पुन्हा ग्राहक सेवा प्रतिनिधीशी संपर्क साधला मात्र या वेळेस chatting द्वारे संभाषण केले. या वेळेस ग्राहक सेवा प्रतिनिधीने, ‘तुमची रक्कम अद्याप कंपनीकडे जमा झाली नसेल’ असे म्हणताच मी ‘रक्कम डेबिट कार्ड द्वारे दिल्याचे’ सांगितले. ती ग्राहक सेवा प्रतिनिधी या वर म्हणाली मी ही बाब प्राधान्याने पुढे पाठवते आणि तुमची रक्कम पुढील २४ ते ४८ तासात रक्कम जमा होईल याची खात्री देते. ‘या पूर्वीच्या प्रतिनिधीने या बाबतीत काय केले’ असे तिला विचारताच ते मी सांगू शकणार नाही असे म्हणून संभाषण बंद करून टाकले. या नंतरही पुढील दोन दिवसात रक्कम माझ्या खाती जमा न झाल्याने परत एकदा ग्राहक सेवा प्रतिनिधीशी chatting द्वारे संपर्क साधला. पुन्हा एकदा सर्व हकीकत सांगितली. या ग्राहक सेवा प्रतिनिधीनेही परत २४ ते ४८ तासाची टेप लावताच मी म्हणालो, ‘ मी २४ तास वाट बघेन, जर २४ तासात माझी रक्कम माझ्या खात्यात जमा झाली नाही तर मी अन्य मार्गांचा वापर करेन’. दोन्ही Chat सेशन मधील संभाषणे मी संगणकावर साठवून (save करून) ठेवली होती. २४ तासांनंतरही रक्कम माझ्या खाती जमा झाली नाही. या वेळेस मी कंपनीच्या ट्विटर व फेसबुक पानावर सर्व घटनाक्रम खरमरीत शब्दात लिहिला व अॅमेझॉनच्या कार्य पद्धीतीविषयी नाराजी व्यक्त केली. Chatसेशन मधील संभाषणे फेसबुकवर पोस्ट केली (रात्री सुमारे नऊवाजता). दुसऱ्या दिवशी सकाळी साडे अकरा बारा वाजण्याच्या सुमारास अॅमेझॉनच्या लंडन कार्यालयातून फोन आला, पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने ‘काय घडले’ अशी विचारणा करताच तुम्ही मला फोन करण्यापूर्वी तुमच्या प्रतिनिधींकडून माहिती करून घ्यायला हवी होती हे सुनावून सर्व माहिती दिली. ती व्यक्ती म्हणाली तुमची रक्कम पाच मिनिटात तुमच्या खात्यात जमा होईल. दिलगिरी व्यक्त करून त्या प्रतिनिधीने फोन बंद केला. .......आणि मग खरोखरी पाच मिनिटात रक्कम माझ्या खात्यात जमा झाली.

याद्या 8566
प्रतिक्रिया 28
रिफंड मिळाला ते उत्तम झालं. असा त्रास क्वचितच होतो असा अनुभव आहे. अमेझोन सर्व्हिस ओव्हरऑल चांगली दिसते.
अॅमेझॉनच्या लंडन कार्यालयातून फोन आला, पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने ‘काय
बाय द वे, त्यांचे ऑर्डर रिलेटेड सर्व फोन तिकडच्या नंबरवरुनच येतात. सुरुवातीला डब्लिन किंवा यूकेवाला नंबर बघून काहीजण तो घेतही नाहीत. फ्रॉड असेल की काय या भीतीने.

अ‍ॅमेझॉनवर माझा विश्वास उरला नाही, मोबाईलच्या दोन बॅटर्‍या डुप्लीकेट निघाल्या. पाठपुरावा काय केला नाही. सोडून दिलं. फ्लिपकार्टवर आपला फूलटू भरोसा हाय. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व्हिस बाबतीत ऍमेझॉन बेस्ट आहे. बॅटरी मध्ये quality कशी आहे ते समजत नाही बऱ्याचदा. मी एकदा बॅटरी मागावलेली. पण तिला 3-4 दिवस टेस्टिंग वरच ठेवली, चार्जिंग दिसचार्जिंग सायकल केल्या पूर्ण 5-6 वेळा, तेव्हा समजलं की बॅटरी 6-8 तासांवर टिकत नाही. मग रिप्लेस केली 15 दिवसात. सर्व पैसे परत.

१) एक कस्टमर म्हणून आपल्याला काही किंमत आहे अशा भ्रमात राहू नये. तुम्ही कुणाशीही डील करीत असलात तरी. कंपन्या ते त्यांच्या फायद्यासाठी चालवितात, तुम्हाला काही सेवा द्यावी म्हणून नाही. २) भारतात हे अधिकच खरे आहे. बँक असो, टेलिकॉम कंपनी नाहीतर वीज पुरवठा करणारे, ते तुमच्यावर उपकार करतात हे जाणून असावे. तुमचे अधिकार शून्य. ३) online खरेदीत फसवले गेल्यास, किंवा तुमच्या क्रेडिट व डेबिट कार्डचा फ्रॉड झाल्यास, कोणतीही सक्षम व्यवस्था तुमच्या मदतीसाठी नाही. माझ्या मुलीचे Forex Plus कार्ड ती मुंबईत आली असताना (साल २०१२) व कार्ड तिच्याकडे असताना, अमेरिकेतील क्लिंटन ह्या शहरात वापरले गेले आणि १४०० डॉलर्सच्या वर खरेदी केली गेली, fraudulently. ते पैसे HDFC बँकेतून मिळवायला काय काय करावे लागले ह्यावर किमान एक दीर्घकथा नक्कीच लिहिता येईल. (अन्य बँका वेगळ्या असतील असे नव्हे. कारण आपण सर्व भारतीय आहोत!) So, buy on line, or use क्रेडिट/ debit cards - on line or physically, at your own risk.

सर्व प्रथम अतिशय मुद्देसूद प्रतिसादाबद्दल धन्यवाद. १) एक कस्टमर म्हणून आपल्याला काही किंमत आहे अशा भ्रमात राहू नये. तुम्ही कुणाशीही डील करीत असलात तरी. कंपन्या ते त्यांच्या फायद्यासाठी चालवितात, तुम्हाला काही सेवा द्यावी म्हणून नाही. या विधानाशी पूर्णपणे सहमत. २) भारतात हे अधिकच खरे आहे. बँक असो, टेलिकॉम कंपनी नाहीतर वीज पुरवठा करणारे, ते तुमच्यावर उपकार करतात हे जाणून असावे. तुमचे अधिकार शून्य. अशी तुम्ही धारणा करून घेतली असेल तर ती चुकीची आहे गॅस स्टेशनवर फसवल्याच्या तक्रारी अमेरिकेतही होतात, अवाढव्य वीजबिलाच्या तक्रारी ब्रिटनमध्येही होतात.ज्यांचे निवारण होण्यात बराच काळ जातो. तुमचे अधिकार शून्य. हे तुम्ही कुठच्या प्रकारे वापरलेत यावर अवलंबून असते असे मला वाटते. ३) online खरेदीत फसवले गेल्यास, किंवा तुमच्या क्रेडिट व डेबिट कार्डचा फ्रॉड झाल्यास, कोणतीही सक्षम व्यवस्था तुमच्या मदतीसाठी नाही. माझ्या मुलीचे Forex Plus कार्ड ती मुंबईत आली असताना (साल २०१२) व कार्ड तिच्याकडे असताना, अमेरिकेतील क्लिंटन ह्या शहरात वापरले गेले आणि १४०० डॉलर्सच्या वर खरेदी केली गेली, fraudulently. ते पैसे HDFC बँकेतून मिळवायला काय काय करावे लागले ह्यावर किमान एक दीर्घकथा नक्कीच लिहिता येईल. (अन्य बँका वेगळ्या असतील असे नव्हे. कारण आपण सर्व भारतीय आहोत!) हा तुमचा अनुभव पूर्णपणे व्यक्तिगत आहे. हा नक्की कार्ड क्लोनिंग चा प्रकार आहे आणि या प्रकारचे गुन्हे प्रथम अमेरिकेतच सुरु झाले आणि नंतर जगभरात पसरले. आणि तरीही गुन्हेगाराने अमेरिकेत काढलेले हे पैसे तुम्हाला HDFC बँक या भारतीय बँकेने परत मिळवून दिले आहेत. शेवटी एकच सांगावेसे वाटते, ग्राहक म्हणून तुम्ही आपले हक्क वापरण्याचा प्रयत्न केलात तर त्याचा उपयोग होतो. या स्फुटाचा उद्देश तोच आहे...

In reply to by Nitin Palkar

१) मी हे सर्व MSEB, RTO, PF offices, बँका इ. अनेक संस्थांच्याबरोबर व्यवहार करताना अनुभवलेले आहे. (आणि यातील अनेक अनुभव मी पैसे देण्याचा सोपा मार्ग पत्करला नाही म्हणून मला आलेले आहेत, हेही मी नम्रपणाने सांगू इच्छितो.) २) HDFC या भारतीय बँकेने पैसे मिळवून दिले कारण ते कार्ड त्यांनीच issue केलेले होते! आणि पैसे परत मिळायला वेळ लागला याचे मला वैषम्य नाही, परंतु त्यांच्या स्टाफने मला जे नाचविले त्याचे नक्की आहे. The ignorance they displayed about the process was, to say the least, astounding. But for the mental agony I suffered, the experience was very hilarious also. आणि BTW, दुसऱ्या एका बँकेतून माझ्या मित्राच्या मुलाचे पैसे - रुपये ८० हजार - असेच गेले त्यास आठ वर्षे झाली. त्या पैशातील एक रुपयाही अजून मिळाला नाही. यापुढे मिळायची शक्यता कमी आहे. त्याला सांगितले की हे एक मोठे रॅकेट आहे त्याचा तपास पूर्ण होईल तेव्हा पाहू. 3) मी इंग्लंडमध्ये दोन वर्षे राहिलेलो आहे. चुका तिथेही होतात. परंतु त्या अमान्य करण्याचा आणि वर तुम्हालाच जबाबदार धरण्याचा प्रयत्न झालेला माझ्या पाहण्यात नाही. ह्यावर अधिक लिहीत नाही; नपेक्षा चर्चा भलतीकडे जायची.

In reply to by रविकिरण फडके

आता आर्ट्स ही शाखा जवळ जवळ बन्द झाली आहे. बराचसा गाळ आता कॉमर्स कडे जातो. आता तर बॅन्केत फार्मर्सी वाल्यानाही नोकरी मिळते. सबब सगळी कडे आनंदी आणंद आहे .

In reply to by रविकिरण फडके

शाखेतून काम झाले नाही तर बँकेच्या कस्टमरकेअरवर ऑनलाईन तक्रार केल्याने फरक पडू शकतो असा अनुभव आहे. तेथेही काम न झाल्यास रिझर्व बँकेने अधिकृत केलेल्या "बँक ओम्बुड्समन" या क्वासिज्युडिशियल अधिकार्‍याकडे तक्रार करता येते... हा पर्याय नेटबँकिंगच्या कस्टमरकेअर पानावर असतो. The ignorance they displayed about the process was, to say the least, astounding. स्वतःच्या प्रणाली आणि प्रोसेसबद्दल माहिती नसणे आणि त्याबद्दल ग्राहकाला जबाबदार धरणे, असा HDFC बँकेत अनुभव येणारे, तुम्ही एकटे नाही ! "तुमचे खाते बंद करताना आमच्या सिस्टिममध्ये एरर येतोय. तो नक्की कोणत्या कारणाने येतो हे मला माहित नाही. तुम्हीच तो एरर नेटबँकिंगने दुरुस्त करा." असे त्यांनी मला सांगितले होते ! "त्या एरर संदर्भात नेटबँकिंगमध्ये कोणताच पर्याय नाही, तर मग हे कसे करायचे ?" असे सांगितल्यावर त्यावर अविश्वास दाखविला म्हणून, मॅनेजरसमोर लॅपटॉपवर नेटबँकिंग साईटवर लॉगइन करून, "आता दाखवा तो पर्याय." असे सांगितले तेव्हा मॅनेजरचे आणि इतर स्टाफचे चेहरे पाहून त्यांनी स्वतः कधीच नेटबॅकिंग केले नसावे असे झाले होते. नंतर, बँकेच्या कस्टमरकेअरमध्ये वरिष्ठ स्तरावर तक्रार केली तेव्हा त्यांनी दोन महिने कुजत पडलेली समस्या (माझ्या सहभागाविना) एका आठवड्यात त्याच ब्रँचमधून सोडवून घेतली. गंमत म्हणजे, त्यानंतर मॅनेजरने "अशी वरपर्यंत तक्रार का केलीत ?" अशी तक्रार फोनवरून माझ्याकडे केली होती !!!

आपला वाईट अनुभव टाकताच विक्रेत्याचे फोन येऊ लागतात, व 'पैसे परत देतो पण शेरा मागे घ्या' अशी विनवणी होते. मला चार दिवसात धनादेश आला होता. प्रत्यक्ष अ‍ॅमेझोनने विकलेली वस्तू 'बिघाडासाठी' परत करायची आहे असे लिहिताच परतीची पसंतीची वेळ व तारिख विचारली गेली, ठरलेल्या दिवशी वेळेआधीच वस्तू उचलली गेली व पंधरा दिवस मुदत घेतलेली असतानाही तिसर्‍या दिवशी बदलीचा नग आला. अ‍ॅमेझॉनचा आतापर्यंतचा अनुभव चांगला आहे

मला व्होडाफोनचा असाच वाईट अनुभव अाला अाहे. त्यांचे सर्व चांगले अाहे, नेटवर्क वगैरे, पण माझ्या बिलाचा मोठ्ठा घोळ करून ठेवला अाहे. सोशल मिडीयावर टाकताचा मेसेजेस येतात, अांम्ही संपर्क करू म्हणतात व अनेक लोकांना पहिल्यापासून केस सांगत बसावे लागते. बिल वेव्ह अाॅफ करतो असे एका अाधिकर्याने सांगितले पण तशी इमेल मात्र केली नाही. अाता त्यांनी नोटीस पाठवली अाहे. कंटाळून सेवा बदलण्याचा निर्णय अाजच घेतला. पालकर साहेब, अापला अनुभव ‘चांगला’ नसून ‘वाईट’ अाहे, असे वाटते. मुळात चुका न करणे हे नंतर निराकरण करण्यापेक्षा अाधिक महत्वाचे. बाकी कंपन्यांच्या बाबत रविकिरण फडके यांच्याशी सहमत अाहे. कंपन्यात कस्टमर हे नेहमीच साध्य नसून साधन असते.

In reply to by स्वधर्म

मलाही २५ जून २०१५ पासून अचानक, मी कधीच न मागितलेल्या 'डेटा पॅक'चे बिल यायला लागले. फोन केला तर त्या customer executive बाईंचे एकच उत्तर; we never activate any service without express consent from the customer! मी म्हटले, मला सांगा मी केव्हा दिली होती ही express consent. (त्याआधी २ महिने मी भारतातच नव्हतो त्यामुळे express सोडाच, चुकूनही अशी consent दिली असण्याची शक्यता नव्हती.) तर बाई म्हणतात, that information we cannot give you! बराच पाठपुरावा केल्यानंतर एकदाचे ते चार्जेस रिव्हर्स झाले. आणि पुढच्याच महिन्यात पुन्हा त्याच पॅकेजचे चार्जेस माझ्या बिलात लावले! मग पुन्हा तशीच फोनाफोनी. अर्थात, इतर कंपन्याही काही फार वेगळ्या नसतात. ह्यात भर घातली आहे ती कॉल सेन्टर नावाच्या - आणि त्यातली ती IVR system - गोष्टीने. अनंत काळ वाट पाहून आणि एकच मुद्दा पुन्हा पुन्हा अनेक लोकांना सांगूनच थकून जायला होते. (तोच बहुधा उद्देश असावा!) असे भारतात आपले जीवन एकसुरी होऊ नये, त्यात थोडी गम्मत यावी, म्हणून सर्वजण झटतात. आणि ह्या सर्व कंपन्यांकडे कुठली कुठली Quality certifications असतात, ग्राहक हा आमचा देव किंवा राजा आहे असे घोषणा फलक असतात. ह्या सर्वातून आर्थिक चालना मिळते. So why complain?

In reply to by रविकिरण फडके

कस्टमर केअर शी कधीही ई-मेल वर संपर्क करावा. जे काही आहे ते लिखित स्वरूपात राहतं आणि दर वेळी तेच तेच रिपीट करायचा वेळ वाचतो. तेच तेच सांगत राहण्याने, कॉल करून वाट बघत बसल्याने फक्त आपण वैतागतो बाकी काही होत नाही. अनुभवाचे बोल बाकी काही नाही. आता असे इश्यू कधी चुकून आले तर सोडवण्यात एक्स्पर्ट झालोय. क्रेडिट कार्ड, मोबाईल, एअर लाईन, बँक, विमा सगळीकडे. ;)

अ‍ॅमेझॉन कडूण अशा वागणूक मिळणे आश्चर्य आहे ! मी गेले तीन वर्षे अ‍ॅमेझॉन वरुन मोठ्या खरेदी केल्या आहेत पण कधी तक्रारीला जागा नाही. गेल्या महीन्यात मी अ‍ॅमेझॉन कडून एक इलेक्टोनिक उपकरण मागवले होते ( किंमत 11,800) , पण ते उपकरण ऑन च होत नव्हते , डेड ऑन अरायव्हल ची केस होती. त्याच दिवशी लगेच संपर्क साधला , तक्रार नोंदवली , त्यांनी जागीच ऑफर दिली पैसे परत करु किंवा वस्तु बदलून देऊ , मी रिप्लेसमेंट मागीतली , हे सगळे शनिवारी दुपारी 3 च्या सुमारास झाले , तुमचा विश्वास बसणार पण दुसरे दिवशी रवीवार असताना सुद्धा संध्याकाळी पाच वाजता रिप्लेसमेंट माझ्या हातात होती. असेच एकदा अ‍ॅमेझॉन वरुनच सेन्नीहेजर चा इयर फोन मागवला होता, त्याच्या एका बाजुने आवाज येत नव्हता , आयटेम बदलून दिला गेला पण त्याला ही तोच प्रॉब्लेम निघाला , पुन्हा एक नवीन पीस पाठवला गेला तो व्यवस्थित होता, अ‍ॅमेझॉन ची दिलगीरी व्यक्त करणारी मेल आली आणि सोबत 100 चे गीफ्ट कुपन ! मी मागे एकदा हैद्राबाद च्या एका स्पेशल फौटन पेन कंपनी कडून एक हँड मेड पेन मागवले होते , काळ्या रंगाचेच पेन हवे ही अट होती. पेन आले पण ते गळायला लागले , कंपनी ने तक्रार ऐकून घेतली दिलगीरी व्यक्त केली आणि दुसरे पेन पाठवतो असे आश्वासन दिले. पण आठ - दहा दिवस झाले काहीच हालचाल नाही, संपर्क साधला .. त्यांनी सांगीतले की तुम्हाला काळ्या रंगाचेच पेन हवे आहे त्याचा स्टॉक नाही म्हणून वेळ लागत आहे. त्यालाही आठ दिवस झाले आणि अचानक फेडेक्स ओव्हरनाईट डीलीव्हरीने एक पार्सल त्या कंपनी कडून आले, त्यात एक सुंदर काळे चकचकीत पेन होते मी मागवले त्या पेन चे पुढचे भारी मॉडेल (दुप्पट किंमतीचे) होते ते , सोबत एक सही केलेले पत्र त्यात लिहले होते " आपल्याला काळ्या रंगाचे पेन ज्या मॉडेल मध्ये हवे होते ते दुर्दैवाने आमच्या स्टॉक मध्ये नाही आणि नवा स्टॉक इतक्या लौकर येणार नाही , तुमच्या सारख्या मौल्यवान ग्राहकाला असे ताटकळत ठेवणे आम्हाला रुचले नाही म्हणून आम्ही तुमची ऑर्डर अपग्रेड करुन तुम्हाला हायर रेंज मधले काळ्या रंगाचे पेन पाठवत आहे, आपल्याला कोणतेही जादा आकार पडणार नाही कृपया त्याचा स्विकार करावा' बर्‍याच वेळा अशा मोठ्या ऑपरेशन्स मध्ये चुका होतात पण आपण तक्रार कशी करतो यावरही बरेचसे अवलंबुन असते.. मी नेहमी माझी समस्या भांडणाचा पवित्रा न घेता शांत , सौम्य भाषेत समजाऊन सांगतो आणि त्या कंपनीवर पूर्ण विश्वास दाखवत माझ्या समस्येचे निराकरण होईल असा आशावाद (मीच त्यांना) देतो. त्यामुळे बहुदा माझ्या तक्रारीचे निवारण प्राधान्याने होते , शिव्या घालत , उद्धार करत केलेल्या तक्रारी सायडींग़ टाकल्या जातात, लटकवत ठेवल्या जातात.

सर्व प्रतिसाद दात्यांना धन्यवाद. या लेखाचा उद्देश केवळ एवढाच आहे की 'तुमच्या तक्रारीचा तुम्ही योग्य पाठपुरावा केलात तर तिचे निराकरण होते', हे सांगावे. अॅमेझॉन कंपनीविषयी अथवा त्यांच्या कर्मचार्यांविषयी कुठेही अपशब्द मी वापरलेले नाहीत. एकतर्फी संवाद बंद करणे ही नक्कीच योग्य पद्धत नव्हे, म्हणून पुढचा संवाद chatting द्वारे करून तो, save करणे ही मी घेतलेली काळजी आहे व त्यामुळे हे सर्व संभाषण अॅमेझॉनच्या चेपू पानावर देणे शक्य झाले हे ज्यांना माहित नसेल त्यांना समजावे हा उद्देश.

साधारण 1 वर्षा पूर्वी आमोझोन वर कुणी तरी भारतीय झेंड्या च्या रंगातील पायपुसण्या विकायला ठेवल्या होत्या . त्या वेळी ट्विटर वाल्या देशभक्ता बरोबर माझे ही देशप्रेम उफाळून आले होते . मी अमेझॉन तर्फ़े साधारण 1.50 लाख रु चा टिव्ही व मोबाईल मागवला , व डिलिव्हरी च्या दिवशी " अमेझॉन ने माझ्या देशा चा अपमान केला असे सांगून " ऑर्डर कॅन्सल केली . तेंव्हा पासून मी अमेझॉन ला ब्लॅक लिस्टड आहे . नंतर वाईट वाटले की ऑर्डर कॅन्सल झाल्या चा त्रास शेवटी आपल्या भारतीय डीलर ला झाला असेल .