तो परत येतोय !
तो आला, त्याला पाहिलं आणि त्याने सगळ्यांना जिंकलं. अनेक वर्षे त्याने लोकांच्या मनावर अधिराज्य केलं. त्याच गारुड इतकं की लोक 'त्याच्यासाठी कायपण' म्हणायचे.
होय. तोच तो, नोकीया ३३१०.
नोकियाचा सुपरहिट 3310 हा 'अनब्रेकेबल' आणि 'अनबिटेबल' मोबाइल परत एकदा बाजारात येतोय. नवीन रुपातील या मोबाईलची किंमत सुमारे ४५०० रुपयापर्यंत असू शकते. तो स्मार्ट फोन नसुन फिचर फोन असणार आहे. स्क्रीन कदाचित रंगीत असणार आहे. नव्या 3310ची बॅटरी आधीसारखीच दीर्घकाळ टिकावी, यादृष्टीने डिस्प्ले जास्त प्रकाशमान नसेल.
मिसळपाव