Skip to main content

ऐतिहासिक लढे

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित ५७ स्लाईड्सशो चे उद्घाटन

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 24/06/2022 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, ज्या मिसळपावने मला अनेक वाचक दिले. माझ्या लेखनाचा आस्वाद घेतला. त्या संस्थळाला माझे अभिवादन आणि कार्यक्रमाचे निमंत्रण. पुण्यात श्री छत्रपती शिवाजी महाराज म्युझियममधे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्य गाथेवर आधारित ५७ स्लाईड्सशो चे उद्घाटन शनिवार दि २५ जून रोजी सकाळी ११ वाजता होत आहे. या कार्यक्रमाला फ्रेंच पत्रकार फ्रानसुआ गोतिए विशेष अतिथी असतील. याशिवाय ज्यांनी या स्लाईड्समधे आपले विचार व्यक्त केले आहेत त्या १० वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांपैकी काही उपस्थित राहतील. प्रदर्शन कक्ष क्र. ९ मधे हे प्रदर्शन कायम स्वरूपी लावलेले आहे.