Skip to main content

अार्थिक - राजकीय - सामाजिक

घराणेशाही चांगली की वाईट?

लेखक आनन्दा यांनी शनिवार, 02/11/2019 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
कदाचित अवांतर होइल, पण नेहरूंच्या धाग्यावरून माझ्या मनात आलेला प्रश्न आहे.. आपण सरसकट घराणेशाही म्हणजे वाईटच असे विधान करतो, पण खरंच घराणेशाही चांगली की वाईट? म्हणजे कसे बघा. सामान्यपणे आपण असे मानतो की माणसाचे बहुतांशी गुण - दोष हे त्यांना मिळणार्‍या अनुवांशिक वारश्यातून, आणि त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीतून येतात. म्हणजे एखादा माणुसघाणा असेल की बोलघेवडा, राजकीय समज किती असेल, आर्थिक समज किती असेल या गोष्टींना अनुवांशिक आणि सामाजिक कारणे असतात.

टोल आणि काही प्रश्न

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 23/07/2019 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात गडकरींनी टोल संदर्भात " टोल हा कधीच रद्द होणार नाही ,किमान या जन्मीतरी . एका रस्त्यावर गोळा केलेला टोल हा इतरत्र रस्ते बांधण्यासाठी वापरला जातो " अशा अर्थाचे उद्गार काढले. गडकरींनी / सरकारने टोल घ्यावा की नाही किंवा त्या घेतलेल्या पैशांचे काय करावे हा प्रश्न नाही मात्र त्या अनुशंगाने काही प्रश्न उपस्थित होतात. आणि त्याची उत्तरे द्यायचे गडकरी / सरकार शिताफीने टाळतात. १) टोल हा कर आहे की उपकर? २) एकूण किती टोल गोळा झाला याची आकडेवारी सरकार केंव्हा देते?

नोटबंदी - कायमची बंदी

लेखक धर्मराजमुटके यांनी बुधवार, 14/12/2016 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
नोटबंदी चे काय होणार , त्याचे परिणाम वगैरे सर्व चर्चांचा आता अतिरेक होऊ लागला आहे. मुळात काळा पैसा फारसा रोख स्वरुपात नाहीच. तो अगोदरच सोन्यात, जमिनित कन्व्हर्ट झालाय असेही बर्‍याच लोकांचं म्हणणे आहे.

अर्थक्रांती आणि त्याबद्दलचे प्रश्न

लेखक बोका-ए-आझम यांनी मंगळवार, 15/11/2016 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी पंतप्रधानांनी ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा रद्द करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर अनिल बोकील आणि त्यांचा अर्थक्रांती प्रस्ताव हे दोन्हीही प्रकाशात आले. त्यावर आणि त्याच्या परिणाम, व्यवहार्यता आणि गरज यावर चर्चा व्हावी हा या धाग्याचा उद्देश आहे. आदूबाळ आणि मी यांच्यात खफवर झालेली चर्चादेखील मी इथे पेस्टवतो आहे - लोकांच्या संदर्भासाठी.