धन्यवाद.....
तात्या तसं बघायला गेलं तर मलाही जसराज जी आवडत नाहीत पण त्यांचे फोटो काढायला मात्र आवडतं कारण त्यांचे फोटो खुप मस्त येतात...
पण तुमच्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद... :)
मी पुढचे फोटो लवकरच टाकेन..
मिंटे आवडल्या गं भावमुद्रा!
तुझा हात चांगला चालतो....छायाचित्रणात! :)
ह्या छायाचित्रात भीमसेनजी प्रवचन करणारे एखादे बुवा किंवा महाराज वाटताहेत.
त्यांची जुनी एखादी गातानाची प्रसन्न भावमुद्रा असलेली छबी असेल तर चढव इथे.
सगळे फोटो सपष्ट आले आहेत. आवडले.
पं शिवकुमार शर्मा यांच्या संबंधीत एक आठवण झाली. दोनेक वर्षांपूर्वी डोंबिवलीमधे चतुरंगच्या रंगसंमेलनात त्यांचे वादन होते. फ्लड लाईट मुळे त्यांच्या भोवती बरेच किडे, पाकोळ्या फिरू लागल्या. म्हणून त्यांनी स्टेजवरचे दिवे मालवायला सांगितले. तरीही हा त्रास थांबेना. शेवटी त्यांनी संतूराच्या दोन्ही काड्या एकाच हातात धरल्या व एका हाताने किडे हाकलत वाजवू लागले. तरीही डोळे बंद करून ऐकले असते तर कळले नसते की काहि व्यत्यय आला आहे. तिथेच मी त्यांच्या वादनाला सलाम ठोकला.
नंतर पूर्ण रात्र झाली तसे किडे गेले आणि मैफल रंगतच गेली.
बाकी थकलेल्या अण्णाना पाहून वाईट वाटले.
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
सवाई गंधर्वच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या !
धन्स मिंटी (-- एक खारोटी का ? महाराष्ट्र बँकेच्या जाहिरातीतली ! ;) )
(अवांतरः आमचे फोटो चांगले काढून दाखव तर मानलं !!!) :)
प्रतिक्रिया
सुरेख
वा..
सुरवातीचे
असेच म्हणतो
सुंदर ! गं
धन्यवाद.....
ओहो......
मस्त आहेत भावमुद्रा!
हम्म! आता
काय थकलेत
तात्या
सही फोटो आहेत..
छान
वा
मस्त आहेत फोटो
छान आहेत