✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रवीतेज

श
श्रीरंग_जोशी यांनी
Mon, 06/25/2012 - 03:27  ·  लेख
लेख
दिवे आगर कास तलाव सेंट पॉल सेंट पॉल सेंट पॉल सेंट पॉल हडसन, विस्कॉन्सिन हडसन, विस्कॉन्सिन खडकवासला सॅन फ्रान्सिस्को मोरो रॉक, कॅलिफोर्निया प्रेरणा - इयत्ता नववीच्या कुमारभारतीमधील काकासाहेबांचा पाठ (मी पाहिलेला सूर्यास्त). चित्रांची अनुक्रमणिका: १) दिवे आगर, कोकण - जून २००७ २) कास तलाव, सातारा जिल्हा - मार्च २००४ ३, ४, ५, ६ व ७) सेंट पॉल, मिनेसोटा येथील माझ्या घराची बाल्कनि - मे, जून २०११ ८ व ९) हडसन, विस्कॉन्सीन येथील सेंट क्रॉय नदी -ऑक्टोबर २०११ १०) ओळखा पाहू कुठे आहे हे? - ऑक्टोबर २००७ ११) सॅन फ्रान्सिस्को - ऑक्टोबर २००८ १२) मोरो रॉक, सेकोया राष्ट्रीय उद्यान, कॅलिफोर्निया -सप्टेंबर २००८
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
17535 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

वा वा फोटु एकदम मस्त.. पहिला

मराठमोळा
Mon, 06/25/2012 - 04:50 नवीन
वा वा फोटु एकदम मस्त.. पहिला फोटु पाहुन मनात आलंच होतं की दिवे आगार चा असेल म्हणून आणि खाली वाचलं तर तेच निघालं.. बाकी तो सॅन फ्रँसिस्को वाला फोटु "फिशरमन्स वार्फ" वरुन घेतलाय का?
  • Log in or register to post comments

नाही, कॉयट टॉवरवरून...

श्रीरंग_जोशी
Mon, 06/25/2012 - 05:09 नवीन
धन्यवाद ममो! सॅन फ्रँसिस्को वाले छायाचित्र कॉयट टॉवरवरून काढले आहे. खालून तिसरे नाही ओळखू शकलात? तुम्ही तेथे नक्कीच गेला असाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

अच्छा.. >>खालून तिसरे नाही

मराठमोळा
Mon, 06/25/2012 - 05:52 नवीन
अच्छा.. >>खालून तिसरे नाही ओळखू शकलात? तुम्ही तेथे नक्कीच गेला असाल नाही बुवा. अवघड आहे.. तसं मग खडकवासला / नाशिकचं ओझरखेड/ ऊटीचा तलाव यापैकी काहीतरी असावं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

छन्न प्रतिसाद!

श्रीरंग_जोशी
Mon, 06/25/2012 - 05:57 नवीन
जरा वाट पाहूया इतर कुणी सांगू शकतं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

शिवाजी सागर,

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 06/25/2012 - 09:18 नवीन
जोशी सर, खालुन तिसरा शिवाजी सागर अर्थात कोयना धरणाच्या पाण्याचा फोटो आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

नाही...

श्रीरंग_जोशी
Mon, 06/25/2012 - 09:25 नवीन
पैजारबुवा - कृपया सर म्हणू नका हो. श्रीरंग / रंगा / रंग्या / श्री यापैकी काहीही म्हणू शकता... (आदेश बांदेकर ताक धिना धीन इष्टाईल मध्ये) उत्तर चुकलेलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

जोशी सर, थोडा चुक्याच, पानशेत

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 06/25/2012 - 09:47 नवीन
जोशी सर, थोडा चुक्याच, पानशेत चा तलाव आहे तो नक्कीच (म्हणु द्या हो जोशीसर, त्या मागे बर्‍याच आठवणी आहेत आमच्या. अर्थात तुम्हाला आवडत नसेल तर नाही म्हणणार)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

हरकत काही नाही पण...

श्रीरंग_जोशी
Mon, 06/25/2012 - 11:27 नवीन
सर एकतर गुरुजनांना म्हणावे अथवा कर्माने किंवा वयाने ज्येष्ठ व्यक्तींना म्हणावे. मी कशातच बसू शकत नाही. विशेषकरून तर इथे तर एवढी मोठी माणसे आहेत की आपल्यासारख्यांचे नशीब त्यांचा सहवास लाभतोय. त्यामुळे कुणी सर असे संबोधले तर कानकोंडे वाटणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

वाहव्वा! क्या फोटू, क्या

अत्रुप्त आत्मा
Mon, 06/25/2012 - 06:51 नवीन
वाहव्वा! क्या फोटू, क्या फोटू ,लाजवाब!
  • Log in or register to post comments

मस्त खुप छान आहेत फोटो आणि

५० फक्त
Mon, 06/25/2012 - 07:25 नवीन
मस्त खुप छान आहेत फोटो आणि आवडीचा विषय फोटोंचा धन्यवाद.
  • Log in or register to post comments

छान!

पैसा
Mon, 06/25/2012 - 08:23 नवीन
सगळे फोटो आवडले.
  • Log in or register to post comments

सर्व फोटो आवडले.

चित्रगुप्त
Mon, 06/25/2012 - 09:05 नवीन
विशेषतः अगदी खालच्या फोटोत वरच्या गडद निळ्या रंगापासून हळूहळू खालच्या पिवळ्या-नारिंगी-तपकिरी रंग-छटांपर्यंत होणारे बदल खूपच भावले.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!

श्रीरंग_जोशी
Mon, 06/25/2012 - 10:00 नवीन
हे ठिकाण म्हणजे एक डोंगराएवढा उंच खडक आहे.त्यावर चढून जाण्यासाठी जिन्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सूर्यास्ताच्या वेळी पोचलात तर सूर्यदेवाच्या कृपेने फारच रम्य सोहळा बघायला मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अप्रतिम फोटो. आवडले.

प्रचेतस
Mon, 06/25/2012 - 09:15 नवीन
अप्रतिम फोटो. आवडले.
  • Log in or register to post comments

अप्रतिम फोटो :)

अक्षया
Mon, 06/25/2012 - 09:40 नवीन
अप्रतिम फोटो :) खुप आवडले..
  • Log in or register to post comments

छान आहेत सगळे फोटु! खालुन

एमी
Mon, 06/25/2012 - 10:59 नवीन
छान आहेत सगळे फोटु! खालुन तीसरा मानस, मुळशी किँवा गोवा??? (सगळे मटके मारलेत ;-))
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!

श्रीरंग_जोशी
Mon, 06/25/2012 - 11:12 नवीन
मटके चुकलेत, पण जवळपास आहात त्यामुळे पुन्हा एकदा प्रयत्न करा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

अर्रर्र चुकले मटके : -

एमी
Mon, 06/25/2012 - 11:41 नवीन
अर्रर्र चुकले मटके : - ( लोणावळा?? गणपतीपुळे?? अजुनच दुर गेले का?? हे हे हे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

हो ना, दुरच...

श्रीरंग_जोशी
Mon, 06/25/2012 - 11:44 नवीन
उत्तर खरंच सोपे आहे, त्यामुळे फार लांब जाऊ नका...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

खडकवासल्यावरून घेतलेला आहे

प्रचेतस
Mon, 06/25/2012 - 11:52 नवीन
खडकवासल्यावरून घेतलेला आहे फोटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

बरोबर!

श्रीरंग_जोशी
Mon, 06/25/2012 - 12:06 नवीन
वल्ली -एकदम अचूक उत्तर दिलंत. वर ममोंनीही दिलं होतं पण ते ३ पैकी १ असं होतं. त्यामुळे खात्रीशीर अचूक उत्तर देणारे तुम्ही पहिलेच. पुण्यात राहणाऱ्या वयाने व मनाने तरुण असणाऱ्यांसाठी हे प्रिय असे स्थळ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

(No subject)

प्रचेतस
Mon, 06/25/2012 - 12:11 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

अफाट!!

प्राजु
Mon, 06/25/2012 - 11:24 नवीन
अफाट!! :)
  • Log in or register to post comments

लय भारी.

नन्दादीप
Mon, 06/25/2012 - 12:16 नवीन
खतरनाक छायाचित्र.......!!! लय भारी.
  • Log in or register to post comments

वाह श्रीरंग...काय हे रंग !

तर्री
Mon, 06/25/2012 - 12:25 नवीन
खूप छान.
  • Log in or register to post comments

सगळेच फोटो मस्त

अमृत
Mon, 06/25/2012 - 13:06 नवीन
सोबतीला तुमचा(तुझा म्हटलं तर चालेल?) मिपावरील 'यत्र तत्र सर्वत्र' संचारपण आवडला :-) ;-) अमृत
  • Log in or register to post comments

चालेल काय धावेल.

श्रीरंग_जोशी
Mon, 06/25/2012 - 20:21 नवीन
अवश्य मित्रा, 'तू' असे म्हंटलस तर आनंदच वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृत

सर्व फोटो लै भारी आहेत.

बॅटमॅन
Mon, 06/25/2012 - 13:34 नवीन
सर्व फोटो लै भारी आहेत. क्षणभर नाव वाचून धागा तेलुगु हीरो रवीतेजा बद्दल आहे की काय, असे वाटले :)
  • Log in or register to post comments

शीर्षकामागची प्रेरणा..

श्रीरंग_जोशी
Mon, 06/25/2012 - 22:14 नवीन
शीर्षक काय द्यावे यावर विचार करत असताना, 'हा खेळ सावल्यांचा' हे गाणे आठवले. ~ हा चंद्र ना स्वयंभू रवीतेज वाहतो हा, ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा.. वाह, काय गीत आहे!! मला तरी हेच शीर्षक समर्पक वाटले. रा. रा. चित्रपट पहावा लागल्यामुळे रवीतेजाबद्दल बराच संताप निर्माण झालाय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

शीर्षक समर्पक आहेच.

बॅटमॅन
Tue, 06/26/2012 - 10:54 नवीन
शीर्षक समर्पक आहेच. रवीतेजाबद्दल माझे मत "एक अभिजात पानपट्टी हीरो" असे आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

एक अभिजात पानपट्टी हीरो

श्रीरंग_जोशी
Tue, 06/26/2012 - 11:06 नवीन
काय ढांसू विशेषण आहे, वाह!! मानले तुम्हाला!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सुंदर.

जागु
Mon, 06/25/2012 - 14:33 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments

लै भारी !!

सूड
Mon, 06/25/2012 - 18:39 नवीन
लै भारी !!
  • Log in or register to post comments

मस्त आलेत फोटू!

मराठे
Mon, 06/25/2012 - 20:48 नवीन
मस्त आलेत फोटू!
  • Log in or register to post comments

छानच आहे फोटो

जाई.
Mon, 06/25/2012 - 21:58 नवीन
छानच आहे फोटो
  • Log in or register to post comments

छान फोटो. विविध रंगांची उधळण

Pearl
Tue, 06/26/2012 - 01:20 नवीन
छान फोटो. विविध रंगांची उधळण असलेले ३ ते ९ फोटो जास्त आवडले.
  • Log in or register to post comments

सहमत

श्रीरंग_जोशी
Tue, 06/26/2012 - 01:31 नवीन
मलाही ते अधिक आवडतात. क्र. २ तर साध्या रीळवाल्या कॅमेऱ्याने काढून नंतर स्कॅन (मराठी शब्द?) केलेला आहे. माझ्या अनुभवानुसार, अमेरिकेत भारतापेक्षा अधिक सुंदर सूर्यास्त दिसतात. कदाचित कर्कवृत्तापासून अधिक उत्तरेला असल्याने वगैरे असावे. काही महिन्यांपूर्वी जालावर कुणीतरी मराठीत नॉर्वेच्या सूर्यास्ताचे अप्रतिम वर्णन लिहिले होते. तो देश तर उत्तर धृवाच्या अधिकच जवळ आहे. तरी देखील ३ ते ९ मध्ये एक खडकवासल्याचा आहेच :-).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl

दोनदा प्रकाशित झाल्याने

Pearl
Tue, 06/26/2012 - 01:21 नवीन
प्र.का.टा.आ.
  • Log in or register to post comments

आभार!!

श्रीरंग_जोशी
Tue, 06/26/2012 - 09:01 नवीन
सर्व प्रतिक्रियांबद्दल आपले मनापासून आभार. धागा प्रकाशित करताना खालील छायाचित्र नेमके राहून गेले. Image removed. "अंताकडे निघालेल्या सूर्यनारायणाचे तेजोमय रूप पाहून मला वाटले की कर्तृत्ववान माणसे सूर्याप्रमाणेच माध्यान्हीच्या काळात प्रखर तेजाने तळपत असली तरी अडचणीच्या समयी त्यांचे तेजस्वी रूप बघण्यासारखे असते. " धाग्यात उल्लेखलेल्या काकासाहेब गाडगीळांच्या पाठात वरील वाक्य होते. ही शब्दरचना मी माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर जुळवली आहे त्यामुळे जशीच्या तशी नाहीये. पण हे वाक्य माझ्यासाठी आजही तेवढेच प्रेरणादायक आहे जेवढे प्रथम वाचल्यावर होते.
  • Log in or register to post comments

अफाट सुंदर वाक्य!!!

शुचि
Tue, 06/26/2012 - 18:04 नवीन
अफाट सुंदर वाक्य!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

सुंद्रर !!

अक्षया
Tue, 06/26/2012 - 09:21 नवीन
अतिशय सुंदर फोटो..आणि वाक्यही.. :)
  • Log in or register to post comments

मस्त

दिपक
Tue, 06/26/2012 - 11:18 नवीन
श्रीरंगराव फोटो आवडले.
  • Log in or register to post comments

सगळेच फोटो छान!

सुधीर
Tue, 06/26/2012 - 13:42 नवीन
सगळेच फोटो छान! वरून ५वा आणि खडकवासलाचा विशेष आवडला.
  • Log in or register to post comments

क्या बात है!!!

शुचि
Tue, 06/26/2012 - 18:04 नवीन
क्या बात है!!!
  • Log in or register to post comments

मस्त फोटो.. :-)

मोदक
Fri, 06/29/2012 - 00:45 नवीन
मस्त फोटो.. :-)
  • Log in or register to post comments

रंगराव ... रंगाचा खेळ लई भारी ...!!

चौकटराजा
Fri, 06/29/2012 - 05:05 नवीन
आता आय एस ओ १२००० पर्यंत सेन्सेविटी असणारे कॅमेरे आलेयत. त्यामुळे लो लाईट फोटो ही रेखीव यायला मार्ग मोकळा झाला आहे. सूर्यास्त व सूर्योदयाचा सुंदर फोटो हा अप्राप्य राहिलेला नाही. तेंव्हा यात आता थीम महत्वाची रहाणार आहे यापुढे .आपले पहिले दोन फोटो हे सामान्यतः कोणीही काढू शकतो असे आहेत. पण बाकीचे फोटोत आपण एकेक इतर विषयही घेतला आहे. काहीत एकटा ढग, काहीत सिटी स्काय लाईन, काहीत हिल स्केप ,त्यामुळे हे सर्व फोटो काहीतरी बोलतात आपल्याशी. हे आपले यश आहे. कारण आता तांत्रिक गुण सर्वांच्याच फोटोत येणार आहेत. बोलणारे फोटो हा येणारा जमाना आहे. आपल्या या धाग्याला मी " बोलकी क्षितीजे" असे नांव देतोय. रंगा खुष ?
  • Log in or register to post comments

रंगा आपला आभारी...

श्रीरंग_जोशी
Fri, 06/29/2012 - 05:30 नवीन
चौरा सर - आपल्या वस्तुनिष्ठ प्रतिसादाबद्दल आपले मनापासून आभार मानतो. हो या क्षेत्रात खूपच शिकणे बाकी आहे अजून. आपले मार्गदर्शन मिळाल्यास आनंद होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

बोलका फोटो??

चौकटराजा
Fri, 06/29/2012 - 09:57 नवीन
Image removed. रंगा फोटूग्राफर, आम्ही मार्गदर्शन काय करणार कप्पाळ ? आमचीच फोटूग्राफी अजून अडखळत चालू आहे. त्यातील एक फोटो डकवतोय. हा बोलका वाटतो का ब्वॉ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

अप्रतिम

श्रीरंग_जोशी
Fri, 06/29/2012 - 10:24 नवीन
चौरा - सही आहे हे छायाचित्र. छायाचित्रातील व्यक्ती जर गतिमान असतील तर छायाचित्रकाराच्या नाकी ९ येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

अप्रतिम

स्पा
Fri, 06/29/2012 - 08:21 नवीन
वा कसले क्लास फोटु आहेत.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा