✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कोकण दर्शन (भाग - २)

ज
जागु यांनी
Wed, 11/23/2011 - 22:59  ·  लेख
लेख
२१) वेळणेश्वरला आम्हाला अगदीच संध्याकाळ झाली म्हणून आम्ही तिथल्याच समुद्रकिनार्‍या जवळ असणार्‍या एम.टी.डी.सी. च्या रुम्स मध्ये राहीलो. तिथे रात्री अगदी शांत, थंड आणि समुद्राच्या लाटांचा आवाज ह्या वातावरणात आम्ही गप्पा मारत बसलो. ही सकाळ २२) २३)मला सगळ्यात जास्त आवडलेला हा नजारा. २४) तिथे हे पक्षी भरपूर होते पण पोझ देत नव्हते. २५) पारव्याने मात्र व्यवस्थित भाव न खाता फोटो काढून दिला. २६) कण्हेरीची फुले २७) तिथुन निघून आम्ही प्रथम हेदवीच्या गणपतीच्या दर्शनाला गेलो. २८) हेदवीच्या गणपतीच्या आजूबाजूचा हिरवागार परीसर. २९) ३०) ही फुले कोकणात सगळीकडेच पहायला मिळाली. ३१) तिथून आम्ही मालवणच्या दिशेने निघालो त्या वाटेतील दृश्ये. ३२) ३३) मालवणात जाता जाता अचानक भराडी देवीच्या दर्शनाला जायचे ठरले. आणि इतके सुंदर मनमुराद दर्शन झाले की आम्हाला खुप प्रसन्न वाटून दिवसभराचा थकवा क्षणात दूर झाला. तिथे स्ट्रीक्टली देवीचा फोटो काढणे मनाई आहे. ३४) त्या रात्री तारकर्लीला राहून आम्ही सकाळी समुद्र सफर करण्यास सज्ज झालो. ३५) तारकर्लीच्या किनार्‍यावर लागलेल्या बोटी ह्या समुद्र सफर घडवून आणणार्‍या फायबरच्या बोटी आहेत. आम्ही लाकडाची बोट घेतली होती. ३६) ही आम्ही बुक केलेली लाकडी बोट. बिचारे ते बोटवाले खुप कष्ट करून बोट आत नेतात आणि बाहेर आणतात. ३७) ३८) तिथले सगळेच समुद्रकिनारे स्वच्छ आणि अप्रतिम. तारकर्लीच्या समुद्र किनार्‍यावे हे शंख शिंपले आलेले. त्यातील पाण्यातले बरेचशे शंख जिवंतही होते. ३९) सुंदर दिसत आहेत ना. ४०) वेगवेगळे प्रकार ४१) अफाट समुद्र आम्ही बोट मध्ये बसुन न्याहाळत होतो. ४२) सकाळच्या उन्हात किनारा चमकत होता. ४३) ४४) ४५) हा बहुतेक वेंगुर्ल्याचा किनारा.

Book traversal links for कोकण दर्शन (भाग - २)

  • ‹ कोकण दर्शन (भाग १)
  • Up
  • कोकण दर्शन (भाग - ३) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
10878 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

छान आलेत फोटो २३वा फोटो मलाही

जाई.
Wed, 11/23/2011 - 23:07 नवीन
छान आलेत फोटो २३वा फोटो मलाही फार आवडला
  • Log in or register to post comments

बोटीची सफर किती वेळाची

रेवती
Wed, 11/23/2011 - 23:38 नवीन
बोटीची सफर किती वेळाची होती? सगळे फोटू आवडले.
  • Log in or register to post comments

सगळे फोटो सफर घडवुन

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/24/2011 - 00:16 नवीन
सगळे फोटो सफर घडवुन अणतायत्...पण नंबर-२३...म्हणजे लाजवाब
  • Log in or register to post comments

फोटो आवडले.

विलासराव
गुरुवार, 11/24/2011 - 00:51 नवीन
फोटो आवडले.
  • Log in or register to post comments

मला शंख शिंपल्यांचे फोटो

पिंगू
गुरुवार, 11/24/2011 - 04:59 नवीन
मला शंख शिंपल्यांचे फोटो आवडले. जागुताय काही शंखशिंपले गोळा केलेस का? - पिंगू
  • Log in or register to post comments

अरे वा... मस्त कोकण दर्शन

मदनबाण
गुरुवार, 11/24/2011 - 07:07 नवीन
अरे वा... :) मस्त कोकण दर्शन घडतयं !
  • Log in or register to post comments

अप्रतिम फोटो

प्रचेतस
गुरुवार, 11/24/2011 - 08:29 नवीन
अप्रतिम फोटो जागुतै. तळकोकणाचे सुरेख दर्शन घडवलत.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

सविता००१
गुरुवार, 11/24/2011 - 10:28 नवीन
जागुताई, तुम्ही आणलेत का काही शंखशिंपले? कसले मस्त आहेत! बाकी तुमचे फोटो नेहमीच सुंदर असतात.:)
  • Log in or register to post comments

शंखशिंपले

साबु
गुरुवार, 11/24/2011 - 11:28 नवीन
शंखशिंपल्यान्चे फोटो मस्तच...
  • Log in or register to post comments

मस्त... खूप प्रसन्न वाटलं

सुहास झेले
गुरुवार, 11/24/2011 - 11:35 नवीन
मस्त... खूप प्रसन्न वाटलं फोटो बघून :) :)
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणे सुंदर अमोल

अमोल केळकर
गुरुवार, 11/24/2011 - 11:44 नवीन
नेहमीप्रमाणे सुंदर :) अमोल
  • Log in or register to post comments

अत्यंत सुंदर.. कोंकण म्हणजे

गवि
गुरुवार, 11/24/2011 - 12:01 नवीन
अत्यंत सुंदर.. कोंकण म्हणजे जिवाभावाची गोष्ट..
  • Log in or register to post comments

मस्त फटु आहेत.... लौकरच जायचे

प्यारे१
गुरुवार, 11/24/2011 - 12:14 नवीन
मस्त फटु आहेत.... लौकरच जायचे आहे. ;)
  • Log in or register to post comments

डॉल्फिन

अन्या दातार
गुरुवार, 11/24/2011 - 12:41 नवीन
तारकर्लीला पहाटे पहाटे डॉल्फिन्स दिसतात म्हणे. तुम्ही बघितलेत का? (कॉलेजमधला डॉल्फिन ग्रुप सदस्य) अन्या
  • Log in or register to post comments

मन प्रसन्न झाले फटु

वपाडाव
गुरुवार, 11/24/2011 - 13:08 नवीन
मन प्रसन्न झाले फटु पाहुन.....
  • Log in or register to post comments

सुंदर कोंकण..

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 11/24/2011 - 13:31 नवीन
निसर्गरम्य कोंकणाची अप्रतिम छायाचित्रे. अभिनंदन. चिपळूण सासुरवाडी असल्याने अनेकदा चिपळूणास भेट दिली आहे. हेदवी, गणपतीपुळेही पाहून झाले आहे. पण, छायाचित्रांची हौस भागविण्यासाठी लवकरच समग्र कोंकणाचा फेरफटका मारण्याच्या विचारात आहे. पाहूया कधी योग जुळून येतो ते.
  • Log in or register to post comments

वरील सर्वांशी सहमत.

गणपा
गुरुवार, 11/24/2011 - 13:46 नवीन
वरील सर्वांशी सहमत. :)
  • Log in or register to post comments

इतके शंख शिंपले पाहून मी तर

शिल्पा नाईक
गुरुवार, 11/24/2011 - 15:57 नवीन
इतके शंख शिंपले पाहून मी तर वेडीच झाले असते. आमच्या विरारच्या समुद्रावर कधी कधी असाच खच पडतो. गोळा केलेस की नाही शंख?
  • Log in or register to post comments

हेदवीची ब्राम्हण घळ राह्यली

५० फक्त
गुरुवार, 11/24/2011 - 17:30 नवीन
हेदवीची ब्राम्हण घळ राह्यली वाट्ट्ं, जाम भारी जागा आहे ती एक, तरी बाकीचे सगळेच फोटो एकदम मस्त आलेत, आता जातोच आहोत जानेवारीत तेव्हा एक फोटोची स्पर्धाच आयोजित करतो मी.
  • Log in or register to post comments

अन्या नाही त्या दिवशी आम्हाला

जागु
Sat, 11/26/2011 - 00:02 नवीन
अन्या नाही त्या दिवशी आम्हाला त्यांनी समुद्रातूनच इक इक केले असणार. सर्वांना मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सुरेख फोटो आहेत.

चिंतामणी
Sat, 11/26/2011 - 08:28 नवीन
२३वा अप्रतीमच आहे. वॉल पोस्टर करण्यासारखा आहे.
  • Log in or register to post comments

छान.

चित्रा
Mon, 11/28/2011 - 18:39 नवीन
सुंदर. शिंपल्यांचे फोटो फार आवडले.
  • Log in or register to post comments

मस्त!! आमच्या वेळणेश्वरचा

प्राजु
Tue, 11/29/2011 - 01:53 नवीन
मस्त!! आमच्या वेळणेश्वरचा किनारा आहेच सुंदर!! :)
  • Log in or register to post comments

प्रसन्न वाटल..

टुकुल
Tue, 11/29/2011 - 05:00 नवीन
सर्व फोटो इतके सुंदर आलेत कि कोकणात एकदा निवांत वेळ काढुन फिरायला जायचा मोह आवरत नाहीये. --टुकुल
  • Log in or register to post comments

चिंतामणी, चित्रा, प्राजू

जागु
Tue, 11/29/2011 - 12:24 नवीन
चिंतामणी, चित्रा, प्राजू धन्यवाद. टुकूल कोकण फोटोंपेक्षाही सुंदर आहे. एकदा नक्कीच जा. फोटोत काहीच भाग कैद झालाय पण तिथल्या डोंगर वाटांचे सौंदर्य अजून डोळ्यात कैद आहे.
  • Log in or register to post comments

जागुतै, मस्त फोटो. तारकर्लीचा

सोत्रि
Tue, 11/29/2011 - 15:13 नवीन
जागुतै, मस्त फोटो. तारकर्लीचा समुद्र किनारा अतिशय सुंदर आहे. 'क्रिस्टल क्लीयर' म्हणावे असा. त्या किनर्‍यावर मला स्टार फिश आणि रंगीत मासा दिसला होता. स्टार फिशला पकडले ही होते. दुर्दैवाने तेव्हा कॅमेरा नव्हता जवळ. - (तारकर्लीच्या आठवणीत बुडालेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा