Skip to main content

फुलपाखरु

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 08/02/2011 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
आठवांचे फुलपाखरु: फुलपाखरु - गणपा भाऊ ने विशेष मदत करुनही मला येथे मीपा वर text format मध्ये हे फुलपाखरु व्यवस्थीत देता आले नाही, खाली मुळ text देतो आहे, माझ्या येथे जेंव्हा मी हे पोस्ट करतो तेंव्हा मराठी शब्द चौकोन म्हणुन दिसतात , बाकीच्यांकडे मधील स्पेस विस्कळीत होते. असो येथे देतो आहे, नीट नाही दिसले तर वरील इमेज नक्की दिसेन म्हणुन इमेज दिली आहे. text format:
मी                                       मी                मी                                          मन
   असाच                                तु               तु                                  हे होउन
    तळ्याकाठी                        झे           झे                         फुलपाखरु
     सांजसमयी बसता              च        च                 शोध तुझाच आई
      आभाळ हे दाटुन येती        श     गी           नभी थकलेला चाँद
        सोनेरी  किरणे हळुवार       ब्द त       केविलवाना हा प्रवास
         आठवांचे तोरण बांधती       आई      तुझ्या आठवांची वाट
           उसवुनी श्वासधागे अंतरी    आ   तुटलेले मायेचे हे धागे
         दूरवर निजती सूर्यपक्षी         ठ       मनपक्षी माखले सारे
        स्वप्नफुलांची ओली रात्र          व          छतावरी सुन्न  पहारा
       अशृंत कोरडी  वाहते              तो               चंद्राची ढगात हुल
     जीवन देव्हारा रिक्त                                         अंगणी पाणावल्या
    स्मरणात असते                                                      स्मरणात ओल्या
   फक्त तुच                                                                          ठिपक्यांच्या
 आई                                                                                                ओळी
                                                          Ganesha               3 feb 2011
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8328
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

छान किती दिसते फुलपाखरु!आधी झेंडा मग फुलपाखरु लगे रहो ,लगे रहो ! अर्थही छान्च आहे.

In reply to by मुलूखावेगळी

कविता छान आनि रचना पन
सहमत .. कविता आणि रचना खुपंच सुंदर आहेत ;) त्या दोघी काकु नाहीत

सुंदर चित्रमय कविता.

वर गणेशायांनी टेक्स्ट मध्ये दिलेली कविता मला वेडी वाकडी दिसतेय.. कदाचीत ब्राउझरचा घोळ असावा.. खाली टंकलेली तीच कविता मला व्यवस्थीत दिसतेय. _मी___________________मी___________मी__________________मन __असाच________________तु__________तु__________________होउन ___तळ्याकाठी_____________झे_______झे______________फुलपाखरु ____सांजसमयी बसता_____________________शोध तुझाच आई _____आभाळ हे दाटुन येती_________गी______नभी थकलेला चाँद ______सोनेरी किरणे हळुवार______ब्द______केविलवाना हा प्रवास _______आठवांचे तोरण बांधती____आई____तुझ्या आठवांची वाट _________उसवुनी श्वासधागे अंतरी____तुटलेले मायेचे हे धागे ________दूरवर निजती सूर्यपक्षी________मनपक्षी माखले सारे ______स्वप्नफुलांची ओली रात्र___________छतावरी सुन्न पाहरा _____अशृंत कोरडी वाहते_________तो_________चंद्राची ढगात हुल ___जीवन देव्हारा रिक्त________________________अंगणी पाणावल्या __स्मरणात असते_____________________________स्मरणांची ओल्या _फक्त तुच_________________________________________ठिपक्यांच्या आई__________________________________________________ओळी

In reply to by गणपा

गणपा भाऊ मनापासुन धन्यवाद. वरील प्रतिक्रिया मराठीत दिसते आहे, परंतु स्पेस तरीही हलतो आहे .. बहुतेक एक्स्प्लोरर चा प्रॉब्लेम आहे. असो तुम्ही केलेल्या मदतीमुळे छान वाटले ... कविता लिहायला बोर होत होते .. आता कविता बनवत आहे त्यामुळॅ जरा जास्त छान वाटते आहे

" छान्क किती दिसते फुलपाखरु .. गोड मनी हसते फुलपाखरु .." अप्रतिम कविता.. अन फुलपाखरु पण

In reply to by नरेशकुमार

आपल्या मागील प्रोत्साहनपर रिप्लायामुळेच आनखिन अश्या कविता लिहाव्यात/बनवाव्यात असे वाटले . धन्यवाद .. तुमच्याच मुळे उलट आनखिन कविता बनवत आहे.

एकदम झकास........................

जपानी हायकूंमधे चित्र हा कवितेचा भाग असतो, तू तसाच काहीसा प्रकार मस्त हाताळतो आहेस. एकदम नावीन्यपूर्ण रचना!

In reply to by पैसा

धन्यवाद हायकू मला माहित आहेत, पण त्यात चित्र हा कवितेचा भाग असतो हे माहित नव्हते. अजुन ही माहिती असल्यास सांगावी. आवडेल.

दृश्यकविता मस्तच.