Skip to main content

गझल - नाही म्हणू नको तू

लेखक व्यंकटेश कुलकर्णी यांनी शनिवार, 14/11/2020 10:00 या दिवशी प्रकाशित केले.

गझल - नाही म्हणू नको तू

अंदाज घे मनाचा... नाही म्हणू नको तू घे कौल अंतराचा... नाही म्हणू नको तू सांगून टाक सारे, सांगू नको बहाणे... बघ नेम ना उद्याचा, नाही म्हणू नको तू! नुसता सुगंध नाही, काळीज हे फुलाचे हा गंध अत्तराचा... नाही म्हणू नको तू रंध्रात पेरले मी, आसक्त ते निखारे आवेग मीलनाचा... नाही म्हणू नको तू जाऊ नकोस इतकी, हुरळून तू यशाने घे ध्यास त्या नभाचा... नाही म्हणू नको तू संदर्भ लागतो का, नशिबातल्या खुणांचा ? हा खेळ प्राक्तनाचा... नाही म्हणू नको तू होकार द्यायचा तो, देऊन टाक आता दे शब्द काळजाचा... नाही म्हणू नको तू !
व्यंकटेश कुलकर्णी- हैैैदराबाद मोबाईल क्रमांक - ९५००४८४४४२ ईमेल- kulkarnivenkatesh513@gmail.com


वाचने 17792
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

क्या बात है ''नुसता सुगंध नाही, काळीज हे फुलाचे हा गंध अत्तराचा... नाही म्हणू नको तू रंध्रात पेरले मी, आसक्त ते निखारे आवेग मीलनाचा... नाही म्हणू नको तू'' आवडले. -दिलीप बिरुटे

In reply to by गणेशा

नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप मोलाची. मनःपूर्वक धन्यवाद - व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद


@व्यंकटेश कुलकर्णी

'नाही म्हणू नको तू'

ही गझल आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर


In reply to by प्राची अश्विनी

नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप मोलाची. मनःपूर्वक धन्यवाद - व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद

वाह काय सुंदर गझल, एकेक शेर मस्त आहे.
सांगून टाक सारे, सांगू नको बहाणे... बघ नेम ना उद्याचा, नाही म्हणू नको तू!
भयंकर आवडलेला शेर

सर्व शेर आवडले

अतिशय आवडली गजल, पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते आहे यातच सारे काही आले. लिहित रहा, पैजारबुवा,

खुप सुंदर +१ रंध्रात पेरले मी, आसक्त ते निखारे आवेग मीलनाचा... नाही म्हणू नको तू क्या बात हैं !

In reply to by Venkatesh Kulkarni

नमस्कार आपल्या वरच्या दहाही प्रतिक्रीया अत्यंत मोलाच्या आहेत. मनःपूर्वक धन्यवाद. पैजारबुवा, (जगातले सर्वोत्तम ठिकाण अर्थात पुणे); आमचे गुरुजी सांगतात जेव्हा अनेक जणांना नमस्कार करायचा असतो तेव्हा तो सगळ्यांना समजेल असा एकदाच केला तरी चालतो. उगाच १०० वेळा वाकायची गरज नसते. पैजारबुवा,