गझल - नाही म्हणू नको तू
अंदाज घे मनाचा... नाही म्हणू नको तू
घे कौल अंतराचा... नाही म्हणू नको तू
सांगून टाक सारे, सांगू नको बहाणे...
बघ नेम ना उद्याचा, नाही म्हणू नको तू!
नुसता सुगंध नाही, काळीज हे फुलाचे
हा गंध अत्तराचा... नाही म्हणू नको तू
रंध्रात पेरले मी, आसक्त ते निखारे
आवेग मीलनाचा... नाही म्हणू नको तू
जाऊ नकोस इतकी, हुरळून तू यशाने
घे ध्यास त्या नभाचा... नाही म्हणू नको तू
संदर्भ लागतो का, नशिबातल्या खुणांचा ?
हा खेळ प्राक्तनाचा... नाही म्हणू नको तू
होकार द्यायचा तो, देऊन टाक आता
दे शब्द काळजाचा... नाही म्हणू नको तू !
व्यंकटेश कुलकर्णी- हैैैदराबाद
मोबाईल क्रमांक - ९५००४८४४४२
ईमेल- kulkarnivenkatesh513@gmail.com
दिवाळी अंक वर्ष
वाचने
17864
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहाहा !
क्या बात है
''नुसता सुगंध नाही, काळीज हे फुलाचे
हा गंध अत्तराचा... नाही म्हणू नको तू
रंध्रात पेरले मी, आसक्त ते निखारे
आवेग मीलनाचा... नाही म्हणू नको तू''
आवडले.
-दिलीप बिरुटे
नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप
In reply to अहाहा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप मोलाची. मनःपूर्वक धन्यवाद - व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद
नुसता सुगंध नाही, काळीज हे
नुसता सुगंध नाही, काळीज हे फुलाचे
हा गंध अत्तराचा... नाही म्हणू नको तू
वाह! अप्रतिम..
नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप
In reply to नुसता सुगंध नाही, काळीज हे by गणेशा
नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप मोलाची. मनःपूर्वक धन्यवाद - व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद
जाऊ नकोस इतकी, हुरळून तू
जाऊ नकोस इतकी, हुरळून तू यशाने
घे ध्यास त्या नभाचा... नाही म्हणू नको तू
कातिल गझल!!
नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप
In reply to जाऊ नकोस इतकी, हुरळून तू by Bhakti
नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप मोलाची. मनःपूर्वक धन्यवाद - व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद
@व्यंकटेश कुलकर्णी
@व्यंकटेश कुलकर्णी
'नाही म्हणू नको तू'
ही गझल आवडली 👍
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
✨ शुभ दीपावली ✨
टर्मीनेटर
@व्यंकटेश कुलकर्णी
'नाही म्हणू नको तू'
✨ शुभ दीपावली ✨
टर्मीनेटर
नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप
In reply to @व्यंकटेश कुलकर्णी by टर्मीनेटर
नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप मोलाची. मनःपूर्वक धन्यवाद - व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद
वाह! माझी आवडती गझल.
वाह! माझी आवडती गझल.
नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप
In reply to वाह! माझी आवडती गझल. by प्राची अश्विनी
नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप मोलाची. मनःपूर्वक धन्यवाद - व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद
छान !
छान !
सुंदर गझल
वाह काय सुंदर गझल, एकेक शेर मस्त आहे.
भयंकर आवडलेला शेर
नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप
In reply to सुंदर गझल by मित्रहो
नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप मोलाची. मनःपूर्वक धन्यवाद - व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद
सुंदर
सर्व शेर आवडले
नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप
In reply to सुंदर by किरण कुमार
नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप मोलाची. मनःपूर्वक धन्यवाद - व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद
सुरेख
अतिशय आवडली गजल, पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते आहे यातच सारे काही आले.
लिहित रहा,
पैजारबुवा,
नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप
In reply to सुरेख by ज्ञानोबाचे पैजार
नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप मोलाची. मनःपूर्वक धन्यवाद - व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद
खुप सुंदर +१
खुप सुंदर +१
रंध्रात पेरले मी, आसक्त ते निखारेआवेग मीलनाचा... नाही म्हणू नको तू
क्या बात हैं !
नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप
नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप मोलाची. मनःपूर्वक धन्यवाद - व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद
नमस्कार आपल्या वरच्या दहाही
In reply to नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप by Venkatesh Kulkarni
नमस्कार आपल्या वरच्या दहाही प्रतिक्रीया अत्यंत मोलाच्या आहेत. मनःपूर्वक धन्यवाद. पैजारबुवा, (जगातले सर्वोत्तम ठिकाण अर्थात पुणे);
आमचे गुरुजी सांगतात जेव्हा अनेक जणांना नमस्कार करायचा असतो तेव्हा तो सगळ्यांना समजेल असा एकदाच केला तरी चालतो. उगाच १०० वेळा वाकायची गरज नसते.
पैजारबुवा,