मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेम

MipaPremiYogesh · · दिवाळी अंक

प्रेम

प्रेम असतं गाणं दोघांच्या मनात! प्रेम असतं भिजणं चिंब पावसात!! प्रेम असतं नाचणं आनंदाच्या भरात! प्रेम असतं जगणं भान विसरून जीवनात!! प्रेम असतं चांदणं पडलेलं अंगणात! प्रेम असतं मोहरणं मोगर्‍याच्या सुगंधात !! प्रेम असतं फिरणं मोहरलेल्या चैत्रबनात! प्रेम असतं बहरणं शिशिरानंतरच्या वसंतात!!



वाचने 12751 वाचनखूण प्रतिक्रिया 13

गणेशा Sat, 11/14/2020 - 20:54
मस्त.. आणि प्रेम असतं काव्य.. तुझ्या सहवासात... आणि ह्या काव्याच्या प्रत्येक शब्दात असतेस तू.. माझी तू..फक्त माझी तू..

In reply to by गणेशा

फक्त थोडी अ‍ॅडीशन करतो प्रत्येक शब्दात असतेस तू.. माझी तू..फक्त माझी तू. पण आपल्यातल्या बोलण्यातला अंतिम शब्द असतो फक्त तुझा, फक्त तुझा (अनुभवी) पैजारबुवा,

टर्मीनेटर Sun, 11/15/2020 - 21:33

@MipaPremiYogesh

'प्रेम'

ही कविता आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

MipaPremiYogesh गुरुवार, 11/19/2020 - 20:00
धन्यवाद सगळ्यांनी वेळात वेळ काढून अभिप्राय दिल्याबद्दल