Skip to main content
लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 25/10/2019 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका


ह्या असल्या पाऊसरात्री




ह्या असल्या पाऊसरात्री मी नीज लोटुनी देतो आठवांच्या मऊ उशीला हलकेच कुशीत घेतो
रात्र कशी सरावी? या अवघड प्रश्नामध्ये नाव कागदी सोडून हेलकावे बघत बसतो
प्रौढ जलधारांच्या सुरात चालती गप्पा मी त्यांच्या मैफलीला पहिल्या रांगेत बसतो
किती नाही म्हणावे मी हळवा उगाच होतो तुझे गाणे तुझ्यासाठी माझ्याही नकळत गुणगुणतो

20191016-122815
अनुक्रमणिका

वाचने 2754
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया