जाग
जाग
उसळती काळोखाच्या बहु लाटा अंबरात
किनार शुभ्र रुपेरी खुलते कृष्णमेघात ॥
तम गर्द दाटलेले काजळी दशदिशात ॥
शुक्र चांदणी एकली लखलखे निमिषात ॥
रजनी विसावलेली धरेवरी शांत शांत
चाहूल असे तिजला हलके येई प्रभात ॥
मधुगंधी गार वारा वाहतो शीळ घालीत
डोलतात वृक्षवेली अंगांग भिजे दवात ॥
गवताच्या सान पाती लवलवती तालात
फुले फुले उमलुनी बहरला आसमंत ॥
उडती गाती ते पक्षी विहरती आनंदात
जागी होत वसुंधरा नाहतसे सोन्यात ॥
-- मनीषा
दिवाळी अंक वर्ष
वाचने
3745
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
अगदी चित्रदर्शी कविता!
सुंदर काव्यात्म पहाटवर्णन. पहाटेची प्रसन्नता अंगांग रोमांचित करणारी आहे.
पहाटेचं सुरेख वर्णन ! वा
चित्रदर्शी कविता अतिशय आवडली!
छान आहे कविता
प्रसन्न पहाट समोर उभी राहिली.
मस्त..!!
सुरेख!