मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जाग

मनीषा · · दिवाळी अंक
जाग उसळती काळोखाच्या बहु लाटा अंबरात किनार शुभ्र रुपेरी खुलते कृष्णमेघात ॥ तम गर्द दाटलेले काजळी दशदिशात ॥ शुक्र चांदणी एकली लखलखे निमिषात ॥ रजनी विसावलेली धरेवरी शांत शांत चाहूल असे तिजला हलके येई प्रभात ॥ मधुगंधी गार वारा वाहतो शीळ घालीत डोलतात वृक्षवेली अंगांग भिजे दवात ॥ गवताच्या सान पाती लवलवती तालात फुले फुले उमलुनी बहरला आसमंत ॥ उडती गाती ते पक्षी विहरती आनंदात जागी होत वसुंधरा नाहतसे सोन्यात ॥ -- मनीषा
दिवाळी अंक वर्ष

वाचने 3745 वाचनखूण प्रतिक्रिया 7

प्रभाकर पेठकर 02/11/2013 - 09:54
सुंदर काव्यात्म पहाटवर्णन. पहाटेची प्रसन्नता अंगांग रोमांचित करणारी आहे.