मी पाहिलेले मस्कत - भाग १ - सलालाह
गेली ३२ वर्षे मी व्यवसायानिमित्त सल्तनत ऑफ ओमान उर्फ मस्कत येथे राहातो आहे. ह्या वास्तव्यात ह्या देशाच्या नयनरम्य प्रदेशांचे दर्शन घेतले आहे. त्यावरच एक लेखमाला लिहावी अशा विचाराने आज कळफलक बडवायला घेतला आहे.
भारताच्या पश्चिमेस १६०० कि.मी. वर आणि दुबईपासून ३५०-४०० कि.मी. अंतरावर अरबस्थानात हा देश आहे. 'मस्कत' हे ह्याचे पूर्वापार आणि रुढ नांव असले तरी कागदोपत्री 'सल्तनत ऑफ ओमान' हे नांव आहे. संक्षिप्तपणे ह्याला 'ओमान' असेही म्हणतात. 'ओमान' (मस्कत)च्या सीमा उत्तरेस युएई (दुबई), पश्चिमेस सौदी अरेबिया आणि दक्षिणेस येमेन ह्या देशांना जुळलेल्या आहेत. एकेकाळच्या रखरखीत वाळवंटात मनुष्यनिर्मित निसर्ग खूप आहे. ओमानची राजधानी मस्कत आहे. पूर्वीच्या काळी मस्कतच्या दक्षिणेस असलेले 'सलालाह' हे शहर देशाची (मस्कतची) राजधानी होते. परंतु, सध्याच्या राजाने राज्यभार स्विकारल्यावर (१९७०) आपली राजधानी 'मस्कत' ह्या शहरी केली. लोकसंख्येच्या दृष्टीने 'मस्कत' क्रमांक १ वर आहे तर 'सलालाह' क्रमांक २ वर. संपूर्ण देशभर वाळवंटी रखरखाट असला तरी मधे मधे 'ओअॅसिस' म्हणजे गोड्यापाण्याचे साठे आहेत. बहुतेक अशा पाण्याच्या साठ्यांच्या अवतीभवती शहरं वसली आहेत. परंतु ह्याला अपवाद 'सलालाह' हे शहर. इथे हिरवा निसर्ग आणि गोडे पाणी तुरळक नाही तर, मुबलक प्रमाणात आणि सर्वत्र आढळते. त्याचे कारण म्हणजे ह्या एकमेव प्रदेशाला लाभलेले 'पावसाळा' ह्या ऋतुचे वरदान. सलालाहचे ऐतिहासिक महत्व आणि राजाचे जन्मगाव म्हणून आपण आपल्या मालिकेची सुरुवात 'सलालाह' पासून करीत आहोत.
सलालाह विमानतळाबाहेर पडल्या पडल्या नजरेस पडणारा आखीवरेखीव हमरस्ता







आज बकरीईदच्या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी आहे आणि म्हणून बोटी समुद्रात गेल्या नाहीत.









वर्गीकरण
खरच नयनरम्य !
खरच नयनरम्य !
छान सचित्र वर्णन.
जबराट वर्णन!!! चित्रे अन
सुंअदर फोटो आणि वर्णनही!
मस्त !
In reply to मस्त ! by डॉ सुहास म्हात्रे
जुने सलालाह.
In reply to जुने सलालाह. by प्रभाकर पेठकर
१९८८ ते १९९१ या सलग काळात
मस्त लेखमाला....
मस्त!
चान चान ट्रीप
एकदम सह्हि....
लेख आणि फोटो.. सर्वच छान!
छान .......
सचित्र वर्णन आवडले. समुद्राची
छान ! लिहित राहा .
फारच छान माहीती. आता दुसरा
छान
मला इतके वर्ष वाटत होते की
In reply to मला इतके वर्ष वाटत होते की by त्रिवेणी
अस्वच्छता आणि रोगराई पसरण्याची भिती...
व्वा.
भाग २ - कधी?