Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विकास on Wed, 09/16/2009 - 09:29
  • Log in or register to post comments
  • 23580 views

प्रतिक्रिया

Submitted by अमित बेधुन्द म… on Wed, 09/16/2009 - 22:54

Permalink

भरपुर

राजकारण - बाळ गंगाधर टिळक / सावरकर साहित्य - ग. दि. माडगुळकर / पु. ल. शास्त्र - आईनस्टाईन / सी व्ही रामन कला - भक्ति बर्वे / काशिनाथ घाणेकर / समाजकारण - बाबा आमटे / प्रबोधनकार ठाकरे
  • Log in or register to post comments

Submitted by shekhar on गुरुवार, 09/17/2009 - 00:27

Permalink

आधुनिक सेनानी

तात्या टोपे - मला अशी आशा आहे की आपल्या सैन्यातले प्रमुख पदाधिकारी तात्यांच्या डावपेचांचा अभ्यास करत असतील. - शेखर
  • Log in or register to post comments

Submitted by अडाणि on गुरुवार, 09/17/2009 - 02:08

Permalink

ह्म्म्म्म...

हि बातमी पेपर मधे वाचून फार छान वाटले.. परंतु, प्रतिक्रियांमधे काही जणांनी गोडसे बरोबर गप्पा मारायला आवडेल असे वाचून अंमळ दु:ख झाले... असो... प्रत्येकाची आवड-निवड... - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 09/17/2009 - 05:36

In reply to ह्म्म्म्म... by अडाणि

Permalink

मला वाटते...

परंतु, प्रतिक्रियांमधे काही जणांनी गोडसे बरोबर गप्पा मारायला आवडेल असे वाचून अंमळ दु:ख झाले... मला वाटते की गोडसे, हिटलर, स्टॅलीन अशा प्रकारची नावे ही काही वैयक्तिक हिरो म्हणून कोणी डोक्यात ठेवून लिहीली नसावीत. अशा प्रकारच्या मनोवृत्ती (विकृती?) कशा विचार करतात हा डोक्यात आलेला विचार असावा... उ.दा. तेंडूलकरांनी फाशी जाणार्‍या गुन्हेगारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. सुधीर गाडगिळांकडून जक्कलच्या मुलाखतीसाठी ते आणि मोहन गोखले ("माफीचा साक्षिदार" काढण्याआधी) गेले होते त्यावेळेला गजाआडचा जक्कल कसा रानटीपणे वागला हे सांगितले होते. त्याच पठडीतील हा विचार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on गुरुवार, 09/17/2009 - 08:22

In reply to मला वाटते... by विकास

Permalink

+१ कोणतीही

+१ कोणतीही विचारसरणी समजुन घेणे नक्क्कीच वाईट नसते. भले ती वाईट असो वा चांगली.
  • Log in or register to post comments

Submitted by अडाणि on गुरुवार, 09/17/2009 - 22:53

In reply to मला वाटते... by विकास

Permalink

पुन्हा एकदा...

विकास भौ तुमचि प्रतिक्रियेतील भावना समजली, पण तोच भाव तुमच्या प्रश्नात 'वरिजनली' नव्हता.... तुमच्या प्रश्नातील आणि ओबामांना विचारलेल्या प्रश्नातील भाव (मला समजलेला) नक्कीच वैयक्तिक हिरो म्हणून होता. तुम्ही दिलेले प्रस्तुत उदाहरण नक्कीच चुकीचे आहे आणि इथे गैरलागू आहे. सुधीर गाडगीळ (त्यांच्या बद्दल संपूर्ण आदर राखून) यांचा संपूर्ण जन्म लोकांच्या मुलाखती घेण्यात गेला (आणि ति गोष्ट ते फार सुंदर करतात) ... त्यात त्यांनी जक्कल ची मुलाखत घेतली तर काही वेगळे नाही केले. जर त्यांना विचारले असते कि आयुष्यात एका व्यक्तीला भेटायचे, ती कोणती आणि त्यावर त्यांनी जक्कलचे नाव सांगीतले असते तर ते ईथे लागू झाले असते.... बराचश्या प्रतिक्रियांवरून मला तरी समजले कि सर्वांनी आपले व्यक्तिगत आदर्श डोळ्यासमोर ठेवून नावे दिलेली आहेत, त्यात गोडसे हे नाव प्रकर्शाने खटकते. @गटणे - कोणतीही विचारसरणी समजुन घेणे नक्क्कीच वाईट नसते. भले ती वाईट असो वा चांगली. मुद्दा बरोबर आहे पण तो विचारसरणीला लागू आहे, जिथे काही विचारसरणीच नाही तिथे गैरलागू आहे. विचारसरणी वैगेरे अवघड शब्द वापरून उगाचच गोडसेचे उदात्तीकरण करू नका. - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments

Submitted by निमीत्त मात्र on गुरुवार, 09/17/2009 - 23:17

In reply to मला वाटते... by विकास

Permalink

विकास, मला

विकास, मला नाही वाटत गोडसे, हिटलर ह्यांचे नाव घेतलेले सभासद त्यांना विकृत मानतात. त्यांची पसंती हिरो म्हणूनच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 09/17/2009 - 23:48

In reply to विकास, मला by निमीत्त मात्र

Permalink

हे उदाहरण पहा...

हे उदाहरण पहा: (मोडकसाहेबांचा प्रतिसाद)
१. हिटलर - मागं वळून पाहताना काय वाटतं? खेद, स्वतःची घृणा की जे केलं ते बरोबरच होतं? २. स्टालीन - एक माणूस-नेता म्हणून, कम्युनिझ्म तुमच्यामुळं अपयशी ठरला की, तुम्ही कम्युनिझ्ममुळं? ३. लादेन - का, का हे सारं?
यातून काय तुम्हाला ही त्रयी त्यांची होरो वाटते? बाकी अडाणींचा मुद्दा बरोबर आहे. पण प्रत्येक प्रतिसाद हा माझ्या मूळ प्रश्नाला (आणि त्यात घातलेल्या मर्यादांना) संदर्भ ठेवून दिला आहे असे वाटत नाही. नाहीतर हयात नसलेल्या व्यक्तीत विसोबा, मिभो, विकास आणि माधुरी दिक्षित दिसले नसते. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by निमीत्त मात्र on Fri, 09/18/2009 - 01:56

In reply to हे उदाहरण पहा... by विकास

Permalink

मोडक हे

मोडक हे अपवाद असतील. पण इतर मिपाकर गोडसे आणि हिटलरला विकृत समजत नसावेत असा माझा अंदाज आहे. त्यांनी तसे स्पष्ट इथे लिहिले तर माझे शब्द मागे घेईन.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Fri, 09/18/2009 - 05:41

In reply to मोडक हे by निमीत्त मात्र

Permalink

अंदाज

मोडक हे अपवाद असतील. पण इतर मिपाकर गोडसे आणि हिटलरला विकृत समजत नसावेत असा माझा अंदाज आहे. त्यांनी तसे स्पष्ट इथे लिहिले तर माझे शब्द मागे घेईन. असतील? अंदाज? हे काय स्पष्ट शब्द आहेत का? यात एकच गोष्ट स्पष्ट दिसते, ती म्हणजे तुम्ही वेगळ्या चष्म्याने प्रत्येकास बघत आहात आणि फुकाचे आरोप करत गैरसमज पसरवत आहात. बाकी तुमच्यासारखा, मला जर विकृतीलाच हिरो समजणार्‍यांच्या समुदाययाचा अनुभव आला तर मी स्वतःच्याच चपला घालून, रामदासांनी म्हणल्याप्रमाणे, "नसे राम* ते धाम सोडूनी द्यावे, सुखा लागे आरण्य सेवीत जावे" असे आचरणे योग्य समजेन. * येथे "राम" या शब्दाचा अर्थ आपला (जो काही) आदर्श (असला तर), त्याचा जिथे अभाव आहे तेथे न राहणे पसंद करणे असा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निमीत्त मात्र on Fri, 09/18/2009 - 06:55

In reply to अंदाज by विकास

Permalink

आता माझा

आता माझा अंदाज मांडला तर त्यात काय इतकं चिडण्यासारखं बुवा? फुकाचे आरोप करत गैर समज पसरावयचे असते तर ह्या लोकांना असेच म्हणायचे आहे असे खात्रीने ठोकून दिले असते ना! (टिळकांचा आणि हिंदुत्वाचा संबंध नाही असे तू मागे म्हणाला होतास तसे.) असो..पुण्याचे पेशवे, धमाल मुलगा इ. सदस्यांना नथुराम गोडसे विकृत मनोवृत्तीचा वाटण्याची शक्यता कमी आहे असा माझा त्यांच्या लिखाणावरुन अंदाज आहे. आणि आपल्याला एखाद्याचे विचार विकृत वाटले म्हणून सगळ्यांना तसे वाटलेच पाहिजेत असेही नाही. प्रत्येकाची मते असतात आणि त्याचा सर्वांनी आदर करावा. पुण्याचे पेशवे, धमाल मुलगा इ. सदस्यांनी त्यांना नथुराम विकृत विचारसरणीचा आहे असा प्रतिसाद दिल्यास मी माझे शब्द मागे घेऊन सर्वांची माफी मागेन. पण तसा प्रतिसाद न आल्यास तू मात्र चपला घालून राम म्हणू नयेस एवढीच विनंती :)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Fri, 09/18/2009 - 08:07

In reply to आता माझा by निमीत्त मात्र

Permalink

अंदाज

आता माझा अंदाज मांडला तर त्यात काय इतकं चिडण्यासारखं बुवा? चिडतोय कोण? मी फक्त इतरांकडून स्पष्ट शब्द मागणारा स्वतः मात्र अंदाज म्हणजेच वास्तव असे म्हणतो तेंव्हा त्यातील विरोधाभास दाखवून दिला. असो..पुण्याचे पेशवे, धमाल मुलगा इ. सदस्यांना नथुराम गोडसे विकृत मनोवृत्तीचा वाटण्याची शक्यता कमी आहे असा माझा त्यांच्या लिखाणावरुन अंदाज आहे. परत तेच अंदाज! कशाची खात्री म्हणून दिसत नाही :) पण तसा प्रतिसाद न आल्यास तू मात्र चपला घालून राम म्हणू नयेस एवढीच विनंती मी त्यांच्याकडून कुठल्याच प्रतिसादाची वाट पहात नाही आहे. विकृत वगैरे तुम्हाला वाटले आहे, मला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by निमीत्त मात्र on Fri, 09/18/2009 - 08:12

In reply to अंदाज by विकास

Permalink

फ्लिप

फ्लिप फ्लॉपींग नको!
मला जर विकृतीलाच हिरो समजणार्‍यांच्या समुदाययाचा अनुभव आला
हे तूच म्हणाला आहेस..नथुराम, हिटलर हे विकृत मनोवृत्तीचे लोक नव्हेत काय?
मी फक्त इतरांकडून स्पष्ट शब्द मागणारा स्वतः मात्र अंदाज म्हणजेच वास्तव असे म्हणतो तेंव्हा त्यातील विरोधाभास दाखवून दिला.
मी कधी कुणाला अंदाज नोंदवू नका म्हणालो? 'हा माझा अंदाज आहे' असे 'स्पष्ट' लिहावे इतकाच माझा आग्रह असतो. फरक लक्षात आला असेल..
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Fri, 09/18/2009 - 10:25

In reply to फ्लिप by निमीत्त मात्र

Permalink

मला देखील

मला देखील नथुराम गोडसेना भेटायला आवडेल. त्यांनी जे काही केलं ते केवळ असमर्थनीयच होतं. कुठल्याही मानवाचा खुन किंवा हत्येचे समर्थन मी कधीही करणार नाही. गांधींच्या तर नाहीच नाही. कारण कुणी कितीही म्हणो आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीत त्यांचा मोलाचा वाटा होता आणि आहे. पण म्हणुन मी नथुरामला विकृत मनोवृत्तीचा नाही म्हणणार. कारण एवढी एक घटना सोडली तर नथुरामच्या आयुष्यात कोणी बोट दाखवावे असे काही घडलेले नाही. तो विकृत असता तर त्यापुर्वीसुद्धा त्यांने कर्तव्याच्या नावाखाली आणखी काहीजणांना मारले असते किंवा प्रयत्नतरी केला असता. पण तसे कुठेच आढळत नाही. मग म. गांधींसारख्या लोकोत्तर व्यक्तिमत्वासच जिवे मारण्याचा निर्णय त्याने का घेतला असेल? गोपाळ गोडसेंनी त्यांच्या पुस्तकात भले नथुरामचे समर्थन केले असेल. पण या निर्णयाप्रत येण्याचे नक्की कारण काय होते? ते नथुरामकडुनच जाणुन घ्यायला मला आवडेल. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 09/18/2009 - 12:09

In reply to आता माझा by निमीत्त मात्र

Permalink

मलाही असे

मलाही असे वाटते की हे निमित्तमात्र साहेबाना जे जे त्याना पटते ते ते खरे बाकी सगळे विकृत. आमचे गुरु दत्तात्रेय आहेत. त्यानी स्वतः २४ गुरु केले. त्यानीच हे शिकवले आहे की ज्याच्याकडे जे जे चांगले आहे ते ते उचला. विकृती प्रत्येकामधे असतात त्याच्याकडे दुर्लक्ष करुन जमले तर त्याचे गुण बघावे. त्यामुळे रामायणाचा व्हिलन रावण वैदिक संस्कृतीत अजूनही मानला जातो (पूजला नव्हे) ते त्याच्या बुद्धीमत्तेमुळे. वेदांच्या पठण पद्धतीमधील घनपठणाच्या आधीचे क्रम आणि जटा हे प्रकार रावणाने निर्माण केल असे आजही मानले जाते. (आता या गोष्टीत तुम्हाला रस नसेल तर तो माझा दोष नाही). शेवटी प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगवेगळ्या असतात आणि प्रकृती-विकृतीही कालसापेक्ष असतात. त्यामुळे तुम्ही जरी असो..पुण्याचे पेशवे, धमाल मुलगा इ. सदस्यांना नथुराम गोडसे विकृत मनोवृत्तीचा वाटण्याची शक्यता कमी आहे असा माझा त्यांच्या लिखाणावरुन अंदाज आहे. आणि आपल्याला एखाद्याचे विचार विकृत वाटले म्हणून सगळ्यांना तसे वाटलेच पाहिजेत असेही नाही. प्रत्येकाची मते असतात आणि त्याचा सर्वांनी आदर करावा हे लिहीले असले तरी पुण्याचे पेशवे, धमाल मुलगा इ. सदस्यांनी त्यांना नथुराम विकृत विचारसरणीचा आहे असा प्रतिसाद दिल्यास मी माझे शब्द मागे घेऊन सर्वांची माफी मागेन. ह्यातून तुमचे म्हणणे असे वाटते की माझ्या पेक्षा वेगळी आणि विरुद्ध मते असतील तरी सर्वांनी माझीच मते मानली पाहीजेत. बाकी हिटलर आणि नथुराम विषयी त्या धाग्यांवर लिहीनच. पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 09/18/2009 - 10:21

In reply to मोडक हे by निमीत्त मात्र

Permalink

शब्द मागे घेणे

मोडक हे अपवाद असतील. पण इतर मिपाकर गोडसे आणि हिटलरला विकृत समजत नसावेत असा माझा अंदाज आहे. त्यांनी तसे स्पष्ट इथे लिहिले तर माझे शब्द मागे घेईन.
मोडक अपवाद आहेत तर मीही अपवाद आहे. मलाही गोडसे आणि हिटलर हीरो वाटत नाहीत. आणि श्रावण काकांना प्रश्नांची उत्तर मिळाली तर मला श्रावण काकांशी या विषयावर बोलायला आवडेल. धमु आणि/किंवा पुण्याचे पेशवे यांना काय आवडेल हे त्यांनी लिहावं ना, तुम्ही का त्यांच्याबद्दल बोलताय? शिवाय हे दोघं म्हणजे सगळे मिपाकर नव्हेत. (खरंच नवे लोकं मिपा नीट वाचत नाहीत आणि वर सरसकट, सर्वसमावेशक विधानं करतात.) अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 09/18/2009 - 14:02

In reply to शब्द मागे घेणे by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

अदितीबै, गैरसमज आहे!

धमु आणि/किंवा पुण्याचे पेशवे यांना काय आवडेल हे त्यांनी लिहावं ना, तुम्ही का त्यांच्याबद्दल बोलताय? शिवाय हे दोघं म्हणजे सगळे मिपाकर नव्हेत.
असं कसं? त्याशिवाय का मजा पहायला मिळणार?
(खरंच नवे लोकं मिपा नीट वाचत नाहीत आणि वर सरसकट, सर्वसमावेशक विधानं करतात.)
=)) =)) =)) नवे?????? ...............आर यु शुअर??? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 09/18/2009 - 11:01

In reply to मोडक हे by निमीत्त मात्र

Permalink

तरी बरं,..

प्रत्येकाला काय विचारतो आहे ते लिहिलं हे एक बरं झालं. एरवी कुठून या धाग्यावर प्रतिसाद दिला अशी स्थिती झाली असती. माझ्या मूळ प्रतिसादातील जी. कांबळे यांच्यासाठी केलेल्या प्रश्नाचाही खुलासा आत्ताच करतो - 'त्या' छत्रपती शिवरायांची प्रेरणा आज दिसतीये कुठं? असा हा प्रश्न आहे. प्रश्नाचा सूर उघडच ती प्रेरणा आज दिसत नाही असा आहे. तो तसाच आहे. आज ती प्रेरणा दिसत नाही. त्याचा अर्थ शिवरायांची प्रेरणा संपली असा आता काढू नका. ती धारण केली जात नाही असा त्या प्रश्नाचा सूर आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Fri, 09/18/2009 - 09:03

In reply to ह्म्म्म्म... by अडाणि

Permalink

"हम्म्म्म्म" ऐवजी "हंssssss" जास्त चपलख आहे

मला असे वाटते की "Hmmmm" याचे मराठीकरण "हम्म्म्म्म" असे न करता "हंssssss" असे करावे! जसे मी "WOW"चे मराठीकरण "वाsssssव" असे केले तसे. जस्ट एक सूचना! हम्म्म्म्म म्हटले की लहानपणच्या "हम्मा"चीच (गाय) आठवण येते! सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments

Submitted by लवंगी on गुरुवार, 09/17/2009 - 08:11

Permalink

किशोर कुमार

भरपूर गप्पा मारायला आवडतील
  • Log in or register to post comments

Submitted by हैयो हैयैयो on गुरुवार, 09/17/2009 - 09:11

Permalink

नांवे.

नांवे.
  1. बालगंगाधर टिळक,
  2. ज्ञानेश्वरराव विट्ठलपंत कुलकर्णी-आपेगांवकर,
  3. बाळशास्त्री हरदास,
  4. पामुलपर्ति वेङ्कट नरसिंह रावु
  5. मुहम्मद पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम)
  6. सुब्रमणियभारति,
  7. नामक्कल रामलिङ्गम पिळ्ळै,
  8. टी. एम. सौन्दर राजन,
  9. एम. एस. सुब्बुलट्चुमि
  10. आनंद राजगोपाल कुलशेखर भागवत,
- हैयो हैयैयो!
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 09/17/2009 - 11:07

Permalink

माझी

माझी चॉईस... राजकारण - लोकमान्य टिळक, शास्त्रीजी, स्वा. सावरकर, एसेम जोशी, नथुराम गोडसे साहित्य - शेक्सपिअर, भाईकाका, वपु, पी.जी.वुडहाऊस शास्त्र - जगदिशचंद्र बोस, रामानुजन, डॉ. भाभा, विक्रम साराभाई, डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या कला - दादासाहेब फाळके, मदनमोहनजी, तलत मेहमुद्,संजीवकुमार आणि पंचमदा समाजकारण - महर्षी कर्वे, बाबा आमटे, मदर टेरेसा.......... सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वेश on गुरुवार, 09/17/2009 - 22:06

Permalink

नाथूराम गोडसे

त्यांच्याशी बोलायला आवडेल
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 09/18/2009 - 07:51

Permalink

फारच अवघड प्रश्न

बर्‍याच मोठ्या लोकांनी निदान गेल्या शंभर-दोनशे वर्षात केलेले कार्यत्यांच्या व त्यांच्यावरच्या साहीत्य, शोधनिबंध, काहींचा दृक्श्राव्यफिती माध्यमातुन उपलब्ध आहे त्यामुळे त्यांना भेटण्यात तसा फारसा इंटरेस्ट नाही. तर अश्या त्यांना भेटण्यापेक्षा इंटरेस्ट आहे तो ह्या मोठ्या लोकांची उमेदीची वर्षे कशी होती, त्यांना आपल्यातल्या उर्जेची, श्रेष्ठत्वाची जाणीव, आकलन कसे झाले ते उमजुन घेण्यात. त्यामुळे (प्रसिद्ध व्यक्तिंपेक्षा) आता भेटायचे म्हणले तर बरेचदा आपल्याला आपल्याच पणजोबांपेक्षा मागल्या पिढीतले कोणीच माहीती नसते तर त्या लोकांना, पारतंत्र्याच्या काळात त्यांची रहाणी, विचारसरणी, त्यांच्यावरचे पगडे, ज्या गोष्टी-विचार आपण अगदी गृहीत धरुन चालतो तीच गृहीतके त्याकाळात कशी होती. आपले डिएनए जिथुन आले त्या आपल्याच खानदानातील लोकांबद्दल जास्त माहीती /समाजातील/समुहातील, प्रगती/अधोगती समजुन घ्यायला जास्त आवडेल. तरी अगदीच विकासरावांच्या धाग्याला धरुन नाव सांगायचे म्हणल्यास महाराष्ट्रातील कुठलाही एक मोठा संत महात्मा व लिओनार्डो दा विंची (बराच जुना काळ)
  • Log in or register to post comments

Submitted by तेन्नालीराम on Fri, 09/18/2009 - 10:25

Permalink

प्रतिक्रियांवर माझी प्रतिक्रिया!

सर्व प्रतिक्रिया वाचल्यावर मी या निर्णयास पोचलो आहे कीं मिपावर फक्त तीन लोक प्रामाणिक आहेत! १. विसोबा खेचर २. अमित अभ्यंकर ३. प्रा. बिरुटे कुणाहणापुरुषाने मेरीलिन मन्रो, जॅकी केनेडी, मीनाकुमारी, नूतन, महाराणी गायत्री देवी यांच्यासारख्या सुंदर स्त्रियांची नावे का दिली नाहीत? बरे दिसत नाही म्हणून? बायकांनीही क्लार्क गेबल, चार्ल्स्टन हेस्टन, गेरी कूपर, ग्रेगरी पेक, रॉबर्ट मिचम, राजकुमार, मा. विनायक, राज कपूरसारख्या पुरुषांची नावे का नाही दिली? खरे बोलायला का लोक घाबरतात बॉ? ते. रा.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 09/18/2009 - 10:46

In reply to प्रतिक्रियांवर माझी प्रतिक्रिया! by तेन्नालीराम

Permalink

बायकांनीह

बायकांनीही क्लार्क गेबल, चार्ल्स्टन हेस्टन, गेरी कूपर, ग्रेगरी पेक, रॉबर्ट मिचम, राजकुमार, मा. विनायक, राज कपूरसारख्या पुरुषांची नावे का नाही दिली?
सगळेच लोकं वन-ट्रॅक विचार करत नाहीत म्हणून! त्यातून तुम्हाला राज कपूर, राज कुमार, मा. विनायक, ग्रेगरी पेक फारच आकर्षक वाटत असतील तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे ... लवकरात लवकर मास्तरांना भेटा. अदिती (अधिक माहितीसाठी ३०% लोकांना विचारा.)
  • Log in or register to post comments

Submitted by तेन्नालीराम on Fri, 09/18/2009 - 12:17

In reply to बायकांनीह by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

गोरे तर गोरे!

ठीक आहे. गोरे तर गोरे! ते. रा.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: Ramgude Prakas…
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 16:44
  • सदस्य: kalash११
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 23:00
  • सदस्य: newexploring2020
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 22:15
  • सदस्य: अकोलेकर
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 18:00
  • सदस्य: राजा स्वामी
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 12:15

Pagination

  • First page « पहिले
  • Previous page ‹ मागे
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com