Skip to main content

तुम्हाला कुणाशी गप्पागोष्टी करायला आवडतील?

लेखक विकास यांनी बुधवार, 16/09/2009 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
दोन चार दिवसांपुर्वी, आर्लिंग्टन व्हर्जिनियाच्या एका शाळेतील मुलाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामांना एक प्रश्न विचारला की, तुम्हाला जिवंत अथवा ऐतिहासिक पैकी कशातही बसणार्‍या कुठल्या एकाच व्यक्तीबरोबर जेवायला आवडेल? ओबामांचे उत्तर होते महात्मा गांधी! :
"Dinner with anyone dead or alive? Well, you know, dead or alive, that's a pretty big list," Obama responded amidst laughter. The next moment he was serious. "You know, I think that it might be Gandhi, who is a real hero of mine," Obama said. "Now, it would probably be a really small meal because he didn't eat a lot," he said amidst laughter. "But Mahatma Gandhi is someone who has inspire people across the world for the past several generations," he said. (दुवा)
तर या बातमीमुळे एक प्रश्न (थोडा बदलून) मनात घोळू लागला. जर आपल्याला कुणाएका ऐतिहासिक (हयात नसलेली) व्यक्तीबरोबर गप्पा मारायला मिळाल्या तर त्या कुणा बरोबर असतील? या काथ्याकुटा निमित्ताने काही निर्बंध घालूया: अशी ऐतिहासिक व्यक्ती १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात सहभागी झालेली अथवा नंतरची असावी. जास्तीत जास्त पाच व्यक्ती (कमीत कमी अर्थात एक) असू शकतील मात्र त्या विविध विस्तृत (ब्रॉड) क्षेत्रातील असाव्यात. प्रत्येक क्षेत्रातील एकचः राजकारण, साहीत्य, शास्त्र, कला, समाजकारण. बोला कोण कोण येतात डोक्यात आणि नक्की त्यांच्यातील कशाचे आकर्षण वाटते?

वाचने 23650
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

नांवे.
  1. बालगंगाधर टिळक,
  2. ज्ञानेश्वरराव विट्ठलपंत कुलकर्णी-आपेगांवकर,
  3. बाळशास्त्री हरदास,
  4. पामुलपर्ति वेङ्कट नरसिंह रावु
  5. मुहम्मद पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम)
  6. सुब्रमणियभारति,
  7. नामक्कल रामलिङ्गम पिळ्ळै,
  8. टी. एम. सौन्दर राजन,
  9. एम. एस. सुब्बुलट्चुमि
  10. आनंद राजगोपाल कुलशेखर भागवत,
- हैयो हैयैयो!

माझी चॉईस... राजकारण - लोकमान्य टिळक, शास्त्रीजी, स्वा. सावरकर, एसेम जोशी, नथुराम गोडसे साहित्य - शेक्सपिअर, भाईकाका, वपु, पी.जी.वुडहाऊस शास्त्र - जगदिशचंद्र बोस, रामानुजन, डॉ. भाभा, विक्रम साराभाई, डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या कला - दादासाहेब फाळके, मदनमोहनजी, तलत मेहमुद्,संजीवकुमार आणि पंचमदा समाजकारण - महर्षी कर्वे, बाबा आमटे, मदर टेरेसा.......... सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

बर्‍याच मोठ्या लोकांनी निदान गेल्या शंभर-दोनशे वर्षात केलेले कार्यत्यांच्या व त्यांच्यावरच्या साहीत्य, शोधनिबंध, काहींचा दृक्श्राव्यफिती माध्यमातुन उपलब्ध आहे त्यामुळे त्यांना भेटण्यात तसा फारसा इंटरेस्ट नाही. तर अश्या त्यांना भेटण्यापेक्षा इंटरेस्ट आहे तो ह्या मोठ्या लोकांची उमेदीची वर्षे कशी होती, त्यांना आपल्यातल्या उर्जेची, श्रेष्ठत्वाची जाणीव, आकलन कसे झाले ते उमजुन घेण्यात. त्यामुळे (प्रसिद्ध व्यक्तिंपेक्षा) आता भेटायचे म्हणले तर बरेचदा आपल्याला आपल्याच पणजोबांपेक्षा मागल्या पिढीतले कोणीच माहीती नसते तर त्या लोकांना, पारतंत्र्याच्या काळात त्यांची रहाणी, विचारसरणी, त्यांच्यावरचे पगडे, ज्या गोष्टी-विचार आपण अगदी गृहीत धरुन चालतो तीच गृहीतके त्याकाळात कशी होती. आपले डिएनए जिथुन आले त्या आपल्याच खानदानातील लोकांबद्दल जास्त माहीती /समाजातील/समुहातील, प्रगती/अधोगती समजुन घ्यायला जास्त आवडेल. तरी अगदीच विकासरावांच्या धाग्याला धरुन नाव सांगायचे म्हणल्यास महाराष्ट्रातील कुठलाही एक मोठा संत महात्मा व लिओनार्डो दा विंची (बराच जुना काळ)

सर्व प्रतिक्रिया वाचल्यावर मी या निर्णयास पोचलो आहे कीं मिपावर फक्त तीन लोक प्रामाणिक आहेत! १. विसोबा खेचर २. अमित अभ्यंकर ३. प्रा. बिरुटे कुणाहणापुरुषाने मेरीलिन मन्रो, जॅकी केनेडी, मीनाकुमारी, नूतन, महाराणी गायत्री देवी यांच्यासारख्या सुंदर स्त्रियांची नावे का दिली नाहीत? बरे दिसत नाही म्हणून? बायकांनीही क्लार्क गेबल, चार्ल्स्टन हेस्टन, गेरी कूपर, ग्रेगरी पेक, रॉबर्ट मिचम, राजकुमार, मा. विनायक, राज कपूरसारख्या पुरुषांची नावे का नाही दिली? खरे बोलायला का लोक घाबरतात बॉ? ते. रा.

In reply to by तेन्नालीराम

बायकांनीही क्लार्क गेबल, चार्ल्स्टन हेस्टन, गेरी कूपर, ग्रेगरी पेक, रॉबर्ट मिचम, राजकुमार, मा. विनायक, राज कपूरसारख्या पुरुषांची नावे का नाही दिली?
सगळेच लोकं वन-ट्रॅक विचार करत नाहीत म्हणून! त्यातून तुम्हाला राज कपूर, राज कुमार, मा. विनायक, ग्रेगरी पेक फारच आकर्षक वाटत असतील तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे ... लवकरात लवकर मास्तरांना भेटा. अदिती (अधिक माहितीसाठी ३०% लोकांना विचारा.)