✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक - प्रबोधनात्मक

ॐ
ॐकार यांनी
गुरुवार, 09/20/2007 - 17:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14834 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

अ
अप्पासाहेब गुरुवार, 09/20/2007 - 17:54 नवीन

काय सुदिक कल्ले नाय बा..

सरळ , सादे , सोप्प लिवा की राव, अन त्ये आवडलेल्या लेखकंच्या नावाचे काय झाले वो?
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 09/20/2007 - 17:58 नवीन

प्रबोधनाचे लाडू

पहिल्या परिच्छेदातच आपण सर्व डबे रिकामे केल्याने आम्हांस खाण्यासारखे या लेखात काही उरले नाही. लेखाच्या शेवटी आधी मुलांशी खेळावे म्हणजे नाते जडेल प्रभुशी ही नवी शिकवण मिळाल्याने आम्हांस आनंद झाला. प्रबोधन मिळाले (की झाले? ते प्रबोधन काय असते? कोठल्या लाडवाचा प्रकार आहे का? बेसन आणि प्रबोधन यांत काही प्रास आहे म्हणून शंका आली). आता कृती करण्याइतका दम राहतो ते बघायचे :) --(प्रबोधित) लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्याने जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/20/2007 - 18:09 नवीन

ओंकार स्वरुपा

ओंकार स्वरुपा, गमभन हुरुपा , अ -लेखांच्या लेखा तुज नमो तुझे हे रुप आवडले. असेच आमचे प्रबोधन व्हावे. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
स
सरपंच गुरुवार, 09/20/2007 - 18:13 नवीन

सन्मान!

खुद्द 'गमभन'कारांनी येथे येऊन दोन सबुत लिवले हा आमी मिसळपावाचा सन्मान समजतो! आपला, सरपंच, मिसळपाव ग्रामपंचायत.
  • Log in or register to post comments
र
रंजन गुरुवार, 09/20/2007 - 18:17 नवीन

मस्त

समस्त गळेकाढू, गळेपडू, गळेकापू सदस्यांनी ... मस्त
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट गुरुवार, 09/20/2007 - 18:30 नवीन

कसे होईल मराठी वाङ्मयाचे?

व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णने, नाट्यछटा, समीक्षा, चर्चा , मुलाखत या-ना त्या प्रकारे रिकाम्या डोक्याला आणि परिणामी हातांना सतत खाद्य पुरवणार्‍या या लेखकांचे आणि त्यांचा साहित्याचे मोल अजून समाजाला कळलेले नाही. आणि कधीच कळू नये अशी अनेक विघ्नसंतोषींची प्रामाणिक इच्छा आहे. मराठीला पुढचे जी.ए, मर्ढेकर इंटरनेटावरच मिळणार आहेत, हे कसे ह्या दळभद्र्यांना कळत नाही. जी. ए. जाऊ द्या बाबूराव अर्नाळकर मिळाले तरी खूप असे काही हलकट म्हणतात. असो, अशाने कसे होईल मराठी वाङ्मयाचे? यूके, यूएसमधली खेडी.. हं. हं हं... नॉन रेसिडेंट मराठी लोकांची नॉन रेसिडेंट सुखदुःखांची जाहिरातबाजी व्हावी म्हणून बहुतेक वेबसायटा स्थापन झाल्या आहेत की काय, असे वाटते. "जर्सीमध्ये हे मिळत नाही. हं... ती मजा नाही हं... गड्या ते दिवस राहिले नाही रे आणि मग हं.... ... ती मिसळ नाही .. हं.... हं ..हं... हं..... " (हेमामालिनीसारखे 'हं' म्हणायचे. 'नहीं' आठवा तिचा.) सुखवस्तू कण्हणे सगळीकडे ऐकू येते. मध्ये मध्ये भारतात येणे होतेच. मग परतल्यावर 'हं...हं... हं...'ची आणखी एक सिरीज... "सवाईला गेलो होतो हं... चितळेच्या बाकरवड्या हं.... ह्याची मिसळ खाल्ली हं.... फ्ल्याट रिनोवेट केला हं..." असो. थांबतो. असो. (येताना टकिलेला सोबत आणायला विसरू नये. तिघांनी ह्या गहन प्रश्नावर आल्याबरोबर गंभीर चर्चा करायला हवी. )
  • Log in or register to post comments
प
प्रियाली गुरुवार, 09/20/2007 - 19:32 नवीन

मिस केले!

मिस केले (म्हणजे मिसला मिसेस केले माहित आहे..पण) हे मिस केलेच्या भुतावर "एनाराय" (ऐश्वर्याची बहिण) सर्वसमावेशक साहित्य निर्मिती दर दिवशी पाडत असतात. त्यातून हे आयटीवाले भारतातून अमेरिका, अमेरिकेतून भारत, भारतातून युके, युकेतून जर्मनी, जर्मनीतून भारत अशा फेर्‍या मारत राहतात आणि
  • अमेरिकेत आल्यावर भारतात काय मिस केले?
  • भारतात आल्यावर अमेरिकेत काय मिस केले?
  • इंग्लंडात आल्यावर अमेरिकेत काय मिस केले?
  • अमेरिकेत आल्यावर इंग्लंडात काय मिस केले?
  • --- बाकीच्या जोड्या वाचकांनीच जुळवा!
यावर पानेच्या पाने कुरतडत असतात. दर सकाळी उठून हे मिस केले लेख वाचले नाही की काहीतरी जाम मिस होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्तरंजन भट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/21/2007 - 23:36 नवीन

मध्यंतरी

मध्यंतरी सकाळच्या पैलतीर सदरात "माझा अमेरिकेचा पहिला प्रवास" सारखे इतक्या रिटायर्ड स्त्रियांकडून लेखन झाले, की नवसह्याद्री भागात राहणार्‍या तमाम लोकांना अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात यावा अशी मागणी करावीशी वाटली. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
ल
लिखाळ गुरुवार, 09/20/2007 - 18:36 नवीन

आ?!!

<< नॉन रेसिडेंट मराठी लोकांची नॉन रेसिडेंट सुखदुःखांची जाहिरातबाजी व्हावी म्हणून बहुतेक वेबसायटा स्थापन झाल्या आहेत की काय, असे वाटते. >> आ?!! जोर्रात ठसका लागला आहे मला. नंतर प्रतिसाद लिहितो. (माझा मेडिकल इंश्युरन्स ..आ...इकडे साधी खडिसाखर नाही मिळत हो ! .....) --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 09/20/2007 - 19:56 नवीन

चकित

ॐकार यांचे हे रुप पाहून चकित झालो. मिसळपावावर एकंदर उपहासपूर्वक लेखन करणार्‍यांचा जोरदार धिंगाणा आहे. लेख मस्त झाला आहे :) चालू द्या. अवांतरः पण कुणाच्या धोतरात असा हात घालणे बरे नव्हे टीपः धोतराला हात घालतात... धोतरात नव्हे.
  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार गुरुवार, 09/20/2007 - 22:26 नवीन

अक्षम्य गुन्हा

टीपः धोतराला हात घालतात... धोतरात नव्हे. या अक्षम्य गुन्ह्याबद्दल 'रावसाहेब' आम्हांस योग्य ती शिक्षा देतील.... :) आजचा शोध - काय रावसाहेब -- आज पावडरबिवडर जास्त लावलीय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/21/2007 - 23:38 नवीन

खरंच

ओंकारचे हे स्वरूप आम्हाला माहितीच नव्हते. लेख फक्कड झाला आहे !! - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॐकार
स
सन्जोप राव Fri, 09/21/2007 - 07:00 नवीन

धोतर आणि हात घालणे

धोतराला हात घालणे आणि धोतरात हात घालणे या सर्वस्वी विभिन्न हेतुजन्य कृती आहेत. याचे उद्देश, कृती आणि परिणाम वेगवेगळे आहेत. 'मिसळपाव' चे संपादन शिथीलक्षम असले तरी इतकी क्रांतीची लाट इथेसुद्धा झेपणार नाही या भयाने तपशीलात जाता येत नाही. जिज्ञासूंनी वैयक्तिकरीत्या संपर्क साधावा. सन्जोप राव
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Fri, 09/21/2007 - 07:33 नवीन

शिथीलक्षम संपादन

धोतरात चे धोतराला केले हो :-) - (मिसळपाव पंचायत सदस्य) कोलबेर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
ज
जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 07:36 नवीन

धोतर आणि हात घालणे

'मिसळपाव' चे संपादन शिथीलक्षम असले तरी इतकी क्रांतीची लाट इथेसुद्धा झेपणार नाही या भयाने तपशीलात जाता येत नाही. जिज्ञासूंनी वैयक्तिकरीत्या संपर्क साधावा. अाठवड्याभरात सर्व जिज्ञासूंचे अाड्रेस इथे प्रकाशित करावेत. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
प
प्रकाश घाटपांडे Fri, 09/21/2007 - 10:23 नवीन

धोतर आणि रस्सा

प्रश्न- पु लं च्या ' भ्रमणमंडळा'त कुणाच्या धोतरात रस्सा सांडला होता? त्यावर ' हळूच चाटला बिटलात कि काय?' असे कोण म्हणाले? प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/21/2007 - 22:45 नवीन

कोडी

प्रकाशकाका, कोडी घालण्याची बीमारी तुम्हालाही जडली काय ? असो. बाबूकाका खरे काशीनाथ नाडकर्णी (अनुक्रमे) - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ज
जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 12:33 नवीन

धोतर आणि रस्सा

> प्रश्न- पु लं च्या ' भ्रमणमंडळा'त कुणाच्या धोतरात रस्सा सांडला होता? त्यावर ' हळूच चाटला बिटलात कि काय?' असे कोण म्हणाले? काकाजी अाणि अाचार्य.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 09/21/2007 - 14:55 नवीन

नाही

नाही, ती तुज आहे तुजपाशी मधील पात्रे आहेत प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगन्नाथ
प
प्रमोद देव Fri, 09/21/2007 - 15:08 नवीन

तसे म्हणणारी...

बटाट्याच्या चाळीतील पात्रं आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगन्नाथ
क
क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 20:39 नवीन

ऐतिहासिक

ऐतिहासिक दस्तऐवज. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे गुरुवार, 07/22/2010 - 22:27 नवीन

.

प्र.का.टा.आ.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा