Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मैत्र on Tue, 04/21/2009 - 07:24
  • Log in or register to post comments
  • 35157 views

प्रतिक्रिया

Submitted by निखिल देशपांडे on Tue, 04/21/2009 - 14:30

Permalink

आपली चर्चा

आपली चर्चा आणी म. टा वरिल हा दुवा बघुन खरेच प्रश्न पडला खासदाराची कर्तव्ये काय? ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
  • Log in or register to post comments

Submitted by सूहास (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 04/21/2009 - 18:36

In reply to आपली चर्चा by निखिल देशपांडे

Permalink

मान्य आहे...

सुहास सध्या " सखाराम गटणे" कोठे दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by विकि on Tue, 04/21/2009 - 23:22

Permalink

मंत्र तंत्र

काहीही बरळू नका.काँग्रेस आणि भाजपाने देश विकत घेतला नाही .इथे लोकशाही आहे.आधी प्रादेशिक पक्ष निघण्यास कोण कारणिभूत ठरले याचा आढावा घ्या मगच बोला.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 04/21/2009 - 23:34

Permalink

आजपर्यंत

आजपर्यंत या राष्टीय म्हणवणार्‍या काँग्रेस आणि भाजपा पक्षाने या देशाचं काय भलं केलं?? अहो स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली तरी यांना साधं वीज आणि पाणी देता आलेलं नाही! आजही कित्येक गावांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. खेडेगावात तर सोडाच परंतु आर्थिक राजधानी मुंबैच्या शेजारी असलेल्या आमच्या ठाण्यात रोजची तीन तीन तास वीज नसते. खेडेगावात तर आठ आठ, दहा दहा तास वीज नसते! सर्व सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार नांदतो आहे! कुठल्या पक्षाने या देशाचं भलं केलं आहे?? मी कुठल्याही पक्षाला मतदान करून देशद्रोह करणार नाही! मी मतदान करणार नाही..! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सुहास on Wed, 04/22/2009 - 02:55

In reply to आजपर्यंत by विसोबा खेचर

Permalink

मी मतदान करणार नाही!

मी कुठल्याही पक्षाला मतदान करून देशद्रोह करणार नाही! मी मतदान करणार नाही..! मीही मतदान करणार नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on Wed, 04/22/2009 - 10:18

In reply to आजपर्यंत by विसोबा खेचर

Permalink

असहमत

मूलभूत गरजांचा विचार केला तर साठ वर्षात खरंच काम झालेलं नाही. पण ४७ साली ज्या मध्ययुगीन स्थितीत स्वातंत्र्य मिळाले त्याचा विचार करता नक्कीच वाईट स्थिती नाहीये. गेल्या शतकाच्या शेवटी (साधारण १८४० ते १९२०) इतर देशात प्रगती होत असताना, लोकशाही येत असताना, सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी काम होत असताना भारतात ब्रिटीश राज्यात दयनीय स्थिती होती. त्या स्थितीत अचानक स्वातंत्र्य मिळाले आणि नंतर कितीतरी वर्षे फक्त राजकारण केले गेले. भ्रष्टाचार आणि सत्तेची हाव या दोन गोष्टींमुळेच आत्ता जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते उभे आहेत आणि अन्न वस्त्र निवारा - वीज, पाणी, रस्ते, साक्षरता अशा साध्या गोष्टी पण नाहियेत. पण म्हणून मी कुठल्याही पक्षाला मतदान करून देशद्रोह करणार नाही! मी मतदान करणार नाही..! हे साफ चुकीचे आहे. मतदान न करणे हाच नक्की देशद्रोह आहे... जर आपण स्वतः राजकारणात पडत नाही, तिथे गुंडगिरीशी, धूर्तपणाशी लढत नाही, लोकांसाठी काही करत नाही तर मतदान तरी केलेच पाहिजे. कारण सर्व जण हे करणार नाहीत. आपले काम, छंद, कुटुंब यात आनंदाने राहणे काहीच गैर नाही. पण मग आजूबाजूच्या परिस्थितीचा मी भागच नाही आणि त्या नालायक, हरामखोर लोकांमुळे हे सगळे होते आहे अशी नावे ठेवून मी मतदानच करणार नाही म्हणणे चुकीचे आहे. तसे असल्यास कुठल्याही अराजकाला, भ्रष्टाचाराला, मूलभूत सुविधांच्या अभावाला, जाती धर्माच्या राजकारणाला, राजकीय गुंडगिरीला नावे ठेवण्याचा कसलाही अधिकार उरत नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Wed, 04/22/2009 - 10:20

In reply to असहमत by मैत्र

Permalink

तसे

तसे असल्यास कुठल्याही अराजकाला, भ्रष्टाचाराला, मूलभूत सुविधांच्या अभावाला, जाती धर्माच्या राजकारणाला, राजकीय गुंडगिरीला नावे ठेवण्याचा कसलाही अधिकार उरत नाही... सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by दवबिन्दु on Wed, 04/22/2009 - 12:24

In reply to असहमत by मैत्र

Permalink

मतदानला पवित्र काम समजा

आपल्याकड निदान लोकशाहि आहे. मत देता येतय. पन पाकिस्तानमधे झिया वगरे हुकुमशाह असताना त्याना बिचाऱया पाकिस्तानी लोकाना तर मत पन देता येत नव्हत. आपल्याकड लोकशाही आहे तर कोनाला पन त्याची किमत उरलेली नाय. सोमालिया, चीन सारख वातावरण असत तर कळल असत. Ballot is powerful than a bullet.
  • Log in or register to post comments

Submitted by विकि on Tue, 04/21/2009 - 23:39

Permalink

तात्या

अस करू नका मतदान करा आपल्याला हुकुमशाही नाही लोकशाही हवी आहे.तुम्ही नुसते राजकारण्यांना शिव्या देऊ नका तर पाणी,वीजप्रश्न याबाबत दखल न घेणार्‍या आएएस(प्रशासकीय अधिकारी) लॉबीला ही घाला.या सर्व गोष्टी राजकारण्यांपेक्षा यांच्या हातात असल्याचे कळते.
  • Log in or register to post comments

Submitted by सुहास on Wed, 04/22/2009 - 03:06

Permalink

जिथे यांचे

जिथे यांचे परंपरागत साथीदार आहेत जसे शिवसेना / राष्ट्रवादी त्यांना मतदान करा. पण बसपा / सपा / प्रजाराज्यम / कम्युनिस्ट / अपक्ष अशा कुठल्याही पक्षाला नको. शिवसेना / राष्ट्रवादी खरेच इतके विश्वासू आहेत काय? उद्या राष्ट्रवादी बसपा / सपा / प्रजाराज्यम / कम्युनिस्ट ला सामील होणार नाही कशावरुन? त्यावेळी मत वाया जाणार नाही काय? आणी हो... पुढील २-३ वर्शांत पुन्हा निवडणुका होतील हे माझे भाकीत आहे.. --सुहास
  • Log in or register to post comments

Submitted by सुहास on Wed, 04/22/2009 - 03:08

Permalink

जिथे यांचे

जिथे यांचे परंपरागत साथीदार आहेत जसे शिवसेना / राष्ट्रवादी त्यांना मतदान करा. पण बसपा / सपा / प्रजाराज्यम / कम्युनिस्ट / अपक्ष अशा कुठल्याही पक्षाला नको. शिवसेना / राष्ट्रवादी खरेच इतके विश्वासू आहेत काय? उद्या राष्ट्रवादी बसपा / सपा / प्रजाराज्यम / कम्युनिस्ट ला सामील होणार नाही कशावरुन? त्यावेळी मत वाया जाणार नाही काय? आणी हो... पुढील २-३ वर्शांत पुन्हा निवडणुका होतील हे माझे भाकीत आहे.. --सुहास
  • Log in or register to post comments

Submitted by यन्ना _रास्कला on Wed, 04/22/2009 - 05:15

Permalink

मैतरशी सहमत

लोकसभा राश्ट्रीय पातळीवरच्या प्रश्नासाटी जसे की दहशतवाद, देशाची अर्थव्यवव्स्था आनि विधानसभा घरगुती प्रश्नासाठी. लोकसभेमधे राष्ट्रिय पक्श तर विधान सभेत लोकल पक्श.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 04/22/2009 - 10:28

Permalink

राष्ट्रीय पक्ष

भारतात अधिकृतपणे असलेले राष्ट्रीय पक्ष पुढील प्रमाणे आहेत:
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (अध्यक्षः सोनिया गांधी)
  • भारतीय जनता पक्ष (अध्यक्षः राजनाथ सिंह)
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अध्यक्षः शरद पवार)
  • बहुजन समाज पक्ष (अध्यक्षः मायावती)
  • भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्स्कवादी) (अध्यक्षः प्रकाश करात)
  • भारतीय कम्युनिस्ट पार्टी (अध्यक्षः ए. बी. बर्धन)
राष्ट्रीय पक्षांना मतदान करा ह्या आपल्या मताशी सहमत. मात्र हे हि लक्षात ठेवा मायावती, डावे हे देखील राष्ट्रीय पक्षाचेच प्रतिनीधी आहेत -ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on Wed, 04/22/2009 - 12:27

In reply to राष्ट्रीय पक्ष by ऋषिकेश

Permalink

राष्ट्रीय पक्ष

निवडणुक आयोगाच्या नियमांप्रमाणे ४ किंवा जास्त राज्यांमध्ये (किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये) ४% किंवा जास्त मते मिळवणारे पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मानले जातात. तसेच ४ किंवा जास्त राज्यात काही (बहुदा ४ किंवा जास्त) विधानसभा जागा मिळविणारा पक्षही राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता पावतो. यात चार राज्यांचा आकार नेमका किती हवा किंवा त्या राज्यांमधून लोकसभेवर किती खासदार निवडले जावेत याला काहीही नियम नाहीत. महाराष्ट्रात शिवसेनेला ४% पेक्षा जास्त मते मिळतातच. शेजारच्या गोवा, दादरा नगरहवेली आणि दिव-दमण या भागांमध्ये मराठी वस्ती काही प्रमाणात आहेच.समजा शिवसेनेने तिथे ही ४% पेक्षा जास्त मते मिळवली तर शिवसेना हा पक्ष महाराष्ट्र, गोवा, दिव-दमण आणि दादरा नगरहवेली या ४ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये ४% पेक्षा जास्त मते मिळवेल आणि तो ही राष्ट्रीय पक्ष बनू शकतो.तसेच शिवसेनेचा निपाणी-संकेश्वर या सीमाभागात काही प्रमाणात जोर आहेच.समजा भविष्यकाळात शिवसेनेने बेळगाव आणि विजापूर जिल्ह्यातून कर्नाटक विधानसभेच्या ४ जागा मिळवल्या (सद्यपरिस्थितीत ते फारच कठिण आहे) तर त्या पक्षासाठी आणखी चांगले. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की निवडणुक आयोगाच्या नियमांप्रमाणे एखादा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यताप्राप्त झाला तरी त्याचा देशभर प्रभाव असेल असे मानायचे कारण नाही. सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव मुख्यत्वे महाराष्ट्र आणि मेघालय या राज्यांत, बसपचा प्रभाव उत्तर प्रदेश आणि काही प्रमाणात दिल्लीत आणि तसेच कम्युनिस्ट पक्षांचा प्रभाव पश्चिम बंगाल, केरळ आणि त्रिपुरात आहे.तांत्रिकदृष्ट्या ते राष्ट्रीय पक्ष जरूर आहेत पण त्यांचे पूर्ण देशात वर्चस्व आहे असे नक्कीच नाही. अवांतर: भाजपची आणि काही प्रमाणात काँग्रेसचीही सध्या होणारी घसरगुंडी चालूच राहिली तर ते ही काही वर्षांनी असेच ’तांत्रिकदृष्ट्या’ राष्ट्रीय पक्ष होतील असे वाटते. ---विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 04/22/2009 - 13:31

In reply to राष्ट्रीय पक्ष by क्लिंटन

Permalink

तांत्रिकद

तांत्रिकदृष्ट्या ते राष्ट्रीय पक्ष जरूर आहेत पण त्यांचे पूर्ण देशात वर्चस्व आहे असे नक्कीच नाही.
+१ मात्र देशात त्यांचे वर्चस्व आहेत असे मीही म्हटलेले नाहि. हा मुद्दा मांडला कारण चर्चा विषयाचा मथळा "मतदान करा आणि राष्ट्रीय पक्षालाच करा " असा आहे. आणि खालील मसुद्यामधे मात्र "पण बसपा / सपा / प्रजाराज्यम / कम्युनिस्ट / अपक्ष अशा कुठल्याही पक्षाला नको." असे लिहिले आहे तेव्हा हा विरोधाभास दाखवण्यासाठी हा प्रपंच ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by निखिलराव on Wed, 04/22/2009 - 12:10

Permalink

शत प्रतिशत भा.ज्.पा.

मी कोणाला मत द्यावे याचा विचार करुन गोंधळलो होतो. वरील सगळ्या मि.पा करांच्या प्रतिक्रीया वाचल्या, पुण्याचा विचार करता, सध्याचे खासदार कलमाडींना मत नाही द्यायचं हे तर ठाम होत. डि.एस्.के चांगला माणुस वाट्ला, पण पक्ष (बहुजन समाज पक्ष ) मायावती ? नको... (साहेबांनी कलमाडीची मतं खाण्य्यासाठी डि.एस्.के ला उभं केलय ? ) रविवारी म.न्.से ची राज ठाकरे यांची सभा नेहमीप्रमाणे जबरदस्तचं झाली. मराठीचा मुद्दा चांगलाच, उमेदवार रणजित शिरोळे पण चांगलाच, पण निवडुन येण्याचे चान्चेस खुपचं कमी वाट्तात, मत वाया जाईल असे मना पासुन वाट्ते. (कलमाडींनी भा.ज्.प च्या अनिल शिरोळयांची मत खाण्य्यासाठी रणजित शिरोळेंना उभ केलय, राज ला १० ते १५ कोटी दिले ???) अनिल शिरोळे हे कलमाडींना टक्करं देणारा, निवडुन येण्याचे चान्चेस असणारा, एका राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार वाट्तात. आमचं मत भा.ज्.पा ला........ तुम्हीही मत द्या भा.ज्.पा ला........
  • Log in or register to post comments
Profile picture for user सातारकर

Submitted by सातारकर on Wed, 04/22/2009 - 12:12

Permalink

पुढार्‍यांची माहीती

कदाचित अवांतर असेल, इथे अर्ज भरलेल्या सगळ्या पुढार्‍यांची माहीती आहे जी त्यांनी निवडणूक आयोगाकडे दिली आहे. अजून थोडीशी भर या चर्चेत माझ्यातर्फे ती म्हणजे Thoughts On Linguistic States (१९५५, डॉ. बाबासाहेब आंबेडकर) मधली माहीती. ती भाषांतर न करता जशीच्या तशीच इथे देत आहे. कॉंग्रेसच्या ध्येयधोरणासंदर्भातील (मी काँग्रेसविरोधकांचा समर्थक नाही, ही माहीती फक्त काँग्रेसशी संबधीत म्हणून पाहीली जावी.) It is not that such a question can be asked about Maharashtra alone. It can be asked about many other States in India. I give four statements relating to Part A States, Part B Stales and the Central Government from Part III of the Report of the Taxation Inquiry Committee presided over by Dr. John Mathai (See Tables 4, 5, 6 and 7). From these statements the following propositions stand out: (1) That up to a certain year in the life of the States there was no deficit. They were all viable. It is only after Congress came into office that States ceased to be viable. (2) That since the Congress came into office the Excise Revenue has begun to dwindle. It has gone down to a vanishing point. (3) That Income Tax and Sales Tax have increased enormously. These are the causes which explain why States have ceased to be viable. The Excise Revenue is being sacrificed for a false ideology which has no meaning, no sense and no reality. आणखी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा: The Congress always wins, so it is found. But no one asks why does the Congress win? The answer is that Congress is very popular. But why is the Congress popular? The true answer is that Congress always puts up candidates which belong to castes which are in the majority in the constituencies. Caste and Congress are closely linked. It is by exploiting the caste system that the Congress wins. ----------------------------------------------------------------------------------------- I have seen GOD. He bats at no. 4 for India Matthew Hayden
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on गुरुवार, 04/23/2009 - 13:31

Permalink

आपण आज

आपण आज आपले मत नोंदवले का ? B) -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com