Skip to main content

रामलीला मैदानातील जनसभा : सत्ताबदलाची चाहूल?

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 26/10/2026 09:32 या दिवशी प्रकाशित केले.

 

दिल्लीतील रामलीला मैदान हे मोर्चे, जनसभा आणि विविध राजकीय कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. या मैदानात अशा कार्यक्रमांसाठी कायमस्वरूपी व्यासपीठही उभारण्यात आलेले आहे. सुमारे ४८,६०० चौ. मी. (सुमारे १२ एकर) क्षेत्रफळ असलेल्या या मैदानात पूर्वी वर्षातून अनेक वेळा मोठ्या जनसभा होत असत. येथे साधारण ३० ते ४० हजार लोक बसू किंवा उभे राहू शकतात. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवणे कठीण होत असल्याने गेल्या दोन दशकांत येथे मोठ्या जनसभा तुलनेने कमी झाल्या आहेत.

१९७७ मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली येथे ऐतिहासिक जनसभा झाली होती. आणीबाणीच्या काळातही त्या सभेला इतकी प्रचंड गर्दी झाली होती की रामलीला मैदान अपुरे पडले आणि हजारो लोक रस्त्यांवर उभे राहून भाषणे ऐकत होते. परिसरातील जवळपास सर्वच प्रतिष्ठित नागरिक त्या सभेला उपस्थित होते. त्यानंतर भारतीय राजकारणात पहिल्यांदा प्रजातांत्रिक पद्धतीने   सत्ताबदल घडून आला होता.

१ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी या मैदानात मोठी जनसभा घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या सभेसाठी देशभरातून मोठ्या संख्येने लोकांनी दिल्लीत यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विविध स्तरांवरील पक्ष पदाधिकाऱ्यांनाही शक्य तितके कार्यकर्ते आणि समर्थक दिल्लीत आणण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले जाते.

मात्र आजच्या घडीला सुरक्षा व्यवस्था, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, गर्दी नियोजन आणि मैदानाचे विविध विभागांमध्ये विभाजन यांसारख्या कारणांमुळे प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध जागा कमी होते. त्यामुळे मैदानात ३० हजारांपेक्षा जास्त लोकांना सामावून घेणे अवघड ठरू शकते. अशा परिस्थितीत जर प्रत्यक्षात एक लाख किंवा त्याहून अधिक लोक उपस्थित झाले, तर गर्दी नियंत्रणाचे मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. आयोजक एवढ्या मोठ्या जनसमुदायाचे नियोजन प्रभावीपणे करू शकतील का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. (दिल्लीतील बुराडी मैदानात निरंकारी, राधास्वामी इत्यादी संस्थांचे मोठे सत्संग होत असतात, जिथे लाखो लोक सामावू शकतात.)

नवरात्री ते दिवाळी हा कालावधी दिल्लीतील घाऊक बाजारांसाठी वर्षातील सर्वाधिक उलाढालीचा मानला जातो. देशभरातील व्यापारी या काळात मोठ्या प्रमाणावर माल खरेदीसाठी दिल्लीत येतात. विशेष म्हणजे अनेक प्रमुख घाऊक बाजार रामलीला मैदानाच्या पाच किलोमीटर परिसरात आहेत. काही व्यापारी संघटनांच्या मते, अलीकडील आंदोलनांमुळे व्यापाराचे आधीच मोठे नुकसान झाले आहे. अशा वेळी या जनसभेमुळे वाहतूक, बाजारपेठा आणि खरेदी-विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे   व्यापारी संघटनांनी ही सभा दिवाळीनंतर घेण्याची विनंती केल्याचेही सांगितले जाते. मात्र या मागणीला अद्याप मान्यता मिळालेली नाही. झुरळ आंदोलन ते 1  तारखेच्या जनसभेमुळे दिल्लीतील व्यापारांचे एकूण नुकसान सुमारे 10 1हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे."

1 नोव्हेंबरला सकाळी दिल्लीच्या कनॉट प्लेसच्या मध्यवर्ती बगीच्यात दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला पाच ते सहा हजार मराठी बांधव उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कार्यक्रम सकाळी सुरू होऊन दहा वाजेपर्यंत चालणार आहे. हा कार्यक्रम ही स्थगित झाला नाही आहे.

१ नोव्हेंबरच्या जनसभेचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल, हे काळच ठरवेल. बहुतेक उत्तर प्रदेश निवडणूकीत अखिलेश कडून जास्त जागा मागण्यासाठी उपयोग निश्चित होईल.  पण यावर मिपावकरांचे विचार, अपेक्षित. 

 

(एआय कडून भाषा सौम्य आणि शुद्ध करून घेतली आहे) 

लेख वर्गीकरण

वाचने 1224
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

दोन मुद्दे:

१. ही सभा १ नोव्हेंबरला आयोजित केली जाणार आहे. १९८४ साली ३१ ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधींची हत्या झाली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून दिल्लीत 'राजीव गांधी सिख मारो योजना' सुरू झाली होती. त्यामुळे शिखांमध्ये १ नोव्हेंबर या तारखेविषयी आक्षेप आहेत. ही सभा १ नोव्हेंबरलाच का आयोजित करणार आहेत समजले नाही. १ नोव्हेंबर रविवार आहे म्हणून असेल तर ३१ ऑक्टोबरलाही विकांत- शनीवार आहे. त्या दिवशी पण सभा आयोजित करता आली असती. इंदिरा गांधी पुण्यतिथी आणि सरदार पटेल जयंती या दोन्हींच्या निमित्ताने- बघा सरदार पटेलांनी देश एकत्र केला आणि इंदिरा गांधींनी तो देश एकत्र ठेवण्यासाठी आपले रक्त सांडले त्यांच्या जयंती/पुण्यतिथीच्या दिवशी आम्ही ती सभा आयोजित करत आहोत असली काहीतरी मल्लीनाथी तरी करता आली असती.

२. खरं तर ही सभा दिवाळीच्या इतकी जवळ आलेली असताना आणि त्यातही दिवाळीच्या आधीच्या शेवटच्या विकांताला आयोजित करण्याचे लॉजिक समजले नाही. एकतर ज्ञानेश कुमार मुद्द्यामध्ये सामान्य लोकांना फार रस आहे असे दिसत नाही. टिव्ही चॅनेलच्या चर्चांमध्ये आणि जनेयु सारख्या विद्यापीठांमध्ये बसलेले ढुढ्ढाचार्य म्हणजे सगळा देश नाही. त्यात दिवाळीच्या आधी शेवटच्या विकांताला- जेव्हा लोकांना दिवाळीची तयारी/खरेदी यामध्ये रस असणार ते सोडून ज्या मुद्द्यात मुळात फारसा रस नाही अशा मुद्द्यावरील सभेस लोक जातील का? अर्थात सभेला गर्दी होणार नाही असे म्हणत नाही. पैसे टाकले की १४० कोटींच्या भारतात २-४ लाख रिकामटेकडे गोळा करून सभेला आणणे कॉग्रेससारख्या राजकीय पक्षाला फारसे कठीण जाऊ नये. मात्र ती सभा जनमानसाचे प्रतिबिंब असेल की टिव्ही चॅनेलवरील चर्चांचे?

 

बघू काय होते ते.      


मोठा गवगवा करून राजकुमार कार्यक्रम ठरवतात, खरगे आणि इतर त्यास जोरदार पाठिंबा देतात पण नंतर सरुवातीलाच काहीतरी भन्नाट मुद्दा उपस्थित करतात आणि सगळा विचका होतो. काल परवाच खरगे यांनी एक मोदिविरोधी फटाका विधान करून रोष ओढवून घेतला आहे. तर भजपा याचं उट्टं त्याच दिवशी काढेल. मागे भारत जोडो पदयात्रेत सावरकर मुद्दा काढायची गरज नव्हती. भारत जोडोशी काय संबंध होता?  झुरळ आंदोलनास पाठिंबा द्यायला वेळ लावून शेवटी राजकुमाराने वेगळीच छात्रों की गूंज पेटी वाजवायला घेतली आणि तेही आंदोलन गळाले. केरळचे जुने कॉन्ग्रेस नेते वेळोवेळी राजकुमारविरोधी विधाने करून अडचणीत आणतात. सीजेपीप्रमाणे कॉन्ग्रेस युवापिढीशी सूत जुळवत नाही म्हटल्यावर मग तसे धडाकेबाज कार्यक्रम आखण्यात आले. 

अगदीच नाकाशी आग आली तर भाजपकडे काही हुकमाच्या दुऱ्या तिऱ्या उतरी करते. डेक्कन हेराल्ड, वडेरा प्रकरणे वर काढते. 


In reply to by कंजूस

भाऊ तोरसेकर म्हणतात की रागा असले प्रकार मुद्दामून करत आहेत. आधी विरोधी पक्षातील पूर्ण स्पेस कॉग्रेससाठी व्यापायची आणि त्यासाठी विरोधी पक्षांनाच अडचणीत आणायचे हा डाव आहे. इतर विरोधी पक्ष दुबळे झाले की मग त्यांची मते आपल्याकडे आपसूकच वळतील हा डाव आहे. काहीही झाले तरी विरोधी पक्षांना मते देणारे बरेच मतदार भाजपकडे जाणार नाहीत. मग त्यांना कॉग्रेस हा एकच पर्याय शिल्लक राहणार असे त्याला वाटते. हे सगळे विरोधी पक्ष कॉग्रेसची जागा व्यापून मोठे झाले आहेत. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, दिल्ली-पंजाबमध्ये (आणि बऱ्याच अंशी गुजरातमध्ये) आप, बिहारमध्ये राजद, बंगालमध्ये तृणमूल, आंध्र मध्ये वायएसआर कॉग्रेस वगैरे. भाजपशी नंतर लढू पण आधी आपली गेलेली मते परत आणायला हवीत असे रागाला वाटत असावे.

त्यातूनच मग आपल्याच मित्रपक्षांना अडचणीत आणायचे प्रयत्न सुरू होतात. होईल तितका मित्रपक्षांचा उपयोग करून घ्यायचा पण त्याबरोबरच त्यांनाही अडचणीत आणायचे. महाराष्ट्रात उबाठा सेनेला अडचणीत आणायला म्हणून मुद्दामून महाराष्ट्रात भारत तोडो यात्रा आल्यावर सावरकरांना माफीवीर म्हणणे, बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला एकदाच जाणे पण तिथे गेल्यावरही बंगालमध्ये भाजपच्या वाढीला ममता जबाबदार आहेत हे विधान करणे, तामिळनाडूत द्रमुक निवडणुक हरल्यानंतर लगेच द्रमुकला वाऱ्यावर सोडून थळपती विजय जोसेफ यांच्या टीव्हीके पक्षाबरोबर जाणे, मागच्या वर्षी बिहार विधानसभा निवडणुक तोंडावर आलेली असताना व्होटचोरी वगैरे निरर्थक मुद्दे पुढे आणून मग तेजस्वीला पण फरपटत तिथे नेणे वगैरे त्याचेच भाग असावेत. उत्तर प्रदेशात अखिलेश स्वत:च्या मुस्लिम आणि यादव या समीकरणावर आता निवडणुक जिंकू शकणार नाही. त्याला कॉग्रेसची जी काही दीड-दोन टक्के मते आहेत ती मिळाली तर चांगले होईल त्यामुळे अखिलेशलाही कॉग्रेसची गरज आहे हे रागाला चांगले माहित आहे. आता ते ४०३ पैकी २०० जागांची मागणी करायला लागले आहेत. तेवढ्या मिळणे शक्य नाही हे रागालाही माहित असावे. पण अखिलेशवर दबाव टाकून जास्तीत जास्त जागा मिळवून घ्यायच्या आणि नाही दिल्या तर मग त्याला कॉग्रेसची दीड-दोन टक्के मते मिळायची नाहीत ही भिती. बरं २०२३ मध्ये मध्य प्रदेशात अखिलेशला ५ जागाही द्यायला कॉग्रेस तयार नव्हती. हम किसी अखिलेश वखिलेशको जानते नही हे कमलनाथ यांनी जाहीरपणे उद्गार काढले होते. म्हणजे आपण जिथे कमकुवत आहोत अशा उत्तर प्रदेशात अखिलेशकडून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या पण आपण जिथे ताकद राखून आहोत अशा मध्य प्रदेशात मात्र अखिलेशला शिरकाव करू द्यायचा नाही हा डाव.

भाऊ म्हणत आहेत ते खरे असेल तर त्यातून एक धोका कॉग्रेससाठी उद्भवतो. समजा आपसारखा वेगळाच नवा विरोधी पक्ष आला तर तो कॉग्रेसची जागा व्यापू शकतो. अर्थात कॉग्रेसचे पूर्ण देशात थोडेफार अस्तित्व सगळीकडे आहे त्यामुळे असा नवा पक्ष राष्ट्रीय पातळीवर सगळीकडे कॉग्रेसची जागा व्यापेल ही शक्यता कमी. पण मुळात कॉग्रेस जिथे थोडीफार ताकद राखून आहे अशा राज्यांमध्येही कॉग्रेसची जागा व्यापणारा पक्ष आला तर त्यातून कॉग्रेसची अवस्था आणखी वाईट होईल ही पण भिती आहे.


रागा चे लॉजिक त्याना स्वत:लाच समजू शकते.

१ नोव्हेंबरला दिल्लीत म्हणे १० लाखांचा जनसमुदय येणार आहे.

इतके लोक बाहेरून आले त्यानी मोर्चा काढला तो शांततेने होईल याची हमी रागा घेणार आहे का?

लोकांचे काही नुकसान झाले तर जबाबदार कोण?

दुसरे म्हणजे सणासुदीचे दिवस आहेत त्यावेळेस मोर्चात सहभागी होणारे रिकामटेकडे  लोक कोण असतील  याचा अंदाज लावता येतो. 

झुरळ आंदोलन मागे पडले पण त्याचा प्लॅटफॉर्म करून रागा स्वत:ची पोळी भाजून घेताहेत.  पोळी भाजण्यासाठी त्याना तवा मिळाला आहे  दुर्दैवाने कणीकीची वानवा आहे.


4 अप्रैल 1991 मध्ये इंडिया गेट वर वीएचपी रेली झाली होती।  इंडिया गेटचे सर्व बगीचे भीड़ ने भरलेले होते। तेंव्हा 4 लाख लोग जमले होते असा अंदाज होता। रामलीला  मैदानात 30-35 हजार लोग समावू शकतात। पण खरोखर 50 हजार ही आले तर हजारो लोग  रस्त्यावर फिरत राहतील। तीच मुख्य भीती आहे।  बाकी 50 हजारच्या भीड़ला ही 5 किंवा 10 लक्ष म्हणनारे मिपावकर ही  दिसले तर नवल नाही। 


मोदींना सांगा की ज्ञानूला हाकलून द्या, ३० सेकंदात आंदोलन मागे घेतो असे श्रीमान राहुलजींनी विएतनाममध्ये विपश्यना करताना सांगितले आहे.

 

म्हणजे राहुलजींना जनतेच्या समस्यांची जाणीव आहे व ते समजूतदार असून अजिबात दुराग्रही, आडमुठे नाहीत. आता चेंडू व्यापाऱ्यांच्या बाजूला आहे आणि त्यांनी ठरवायचे आहे की मोदींना सांगून ज्ञानूला घालवायचे की राहुलजींची न्याय मागणी नाकारून स्वतःचे नुकसान करून घ्यायचे. 


मोदी किंवा सुप्रीम कोर्ट ही ज्ञानेश्वराला घालवू शकत नाही त्यासाठी लोकसभेत महाअभियोग प्रस्ताव आणावे लागेल एवढी साधी गोष्ट राहुलला कळत नाही. बाकी ज्ञानेशने असे काही चुकीचे केले नाही त्यामुळे त्यांना घालवण्याचा प्रश्न येतच नाही.  विदेशी शक्तीने राहुलला बिना निवडणूक सत्ता मिळेल असे आश्वासन दिलेले आहे त्यामुळे हा अज्ञानी वाटेल तसे बडबडत राहतो.  

 


रविवारी १ नोव्हेंबरला दिल्लीत आंदोलन केले तर दिवाळीच्या मुहुर्तावर आमचे खूप नुकसान होईल असे पत्र व्यापाऱ्यांनी राष्ट्रमातेला लिहिले आहे. असेच पत्र व हीच विनंती यापूर्वी दोन तीन वेळा राजपुत्राला केली होती. परंतु लोकशाही, राज्यघटना व देश वाचविण्यासाठी राजपुत्र आंदोलन मागे घेण्यास तयार नाही.‌

 

२०१३ विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला २५ टक्के मते होती व ८ आमदार जिंकले होते.‌ २०१५ विधानसभा मध्यावधी निवडणुकीत ९ टक्के मते व ० जागा आणि २०२० मध्ये ४ टक्के मते व ० जागा अशी कामगिरी होती. २०२५ मध्ये स्वतंत्र लढून कॉंग्रेसने ६ टक्के मते व ० जागा जिंकल्या होत्या.‌ म्हणजे २०२० च्या तुलनेत परिस्थिती किंचित सुधारली होती.

 

परंतु आता आंदोलन केले तर किंचितशी वाढलेली मते जाऊन आधी मिळालेल्या ४ टक्के मतातही घट होऊ शकते. 

 

परंतु ० मते मिळाली तरी चालेल, पण मी लोकशाही, देश व राज्यघटनेचे संरक्षण करणारच असा खंबीर निर्धार राजपुत्राने केला आहे.

 

शेवटी १ नोव्हेंबरचे आंदोलन पुढे ढकलून राजपुत्र एक पाऊल मागे येईल असा अंदाज आहे.‌


आता एक वृत्तवाहिनी पाहत होतो व शेवटच्या पाच मिनिटांचं आदरणीय राहुलजींचं घणाघाती भाषण ऐकलं. अक्षरशः तोफांचा भडीमार होता. सर्व दिल्ली दणाणून गेली असणार. प्रत्येक वाक्याला होणाऱ्या टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटामुळे धरणीकंप होत असल्यासारखे वाटले. जमलेल्या कोट्यवधी नागरिकांच्या चेहऱ्यावर मोशाज्ञाविरूद्ध संताप अनावर झालेला दिसत होता.‌

 

राहुलजींविषयी काय बोलावं.‌ वर्णन करायला मराठीचा शब्दकोश अपुरा पडेल. ज्वालामुखी, तळपता सूर्य, धगधगते अग्निकुंड हे शब्दही अपुरे पडतील. चेहरा तर इतका तेज:पुंज की नयनांना अंधत्व येऊ नये यासाठी काळा चष्मा लावून पहावे लागले.

 

मोदी घाबरलाय, शाह घाबरलाय, ज्ञानेशकुमार घाबरलाय, मोदीला झोप लागत नाही, शाहला झोप लागत नाही, ज्ञानेशकुमारला झोप लागत नाही, आम्ही सत्तेत आल्यानंतर मोदीला, शाहला, ज्ञानेशकुमारला तुरूंगात टाकणारच हा घणाघात ऐकल्यानंतर जमलेले कोट्यवधी नागरिक लोकशाहीच्या भवितव्याविषयी निश्चिंत झाल्याचे दिसले. 

 

आम्ही प्रेमाचं दुकान टाकलंय, त्यात आम्ही केवळ प्रेम विकतो, मोदीच्या दुकानात केवळ द्वेष विकतात, आम्ही यापुढे त्याला द्वेष विकून देणार नाही या आपल्या निर्धाराचा प्रतिभास्कर राहुलजींनी पुनरूच्चार करून भडिमार थांबविल्यानंतर जमलेले कोट्यवधी नागरिकांनी खिशात ठेवलेले पोते बाहेर काढून कॉंग्रेसच्या प्रेमाच्या दुकानाकडे धाव घेतली. घरी जाताना पोतंभर प्रेम विकत घेऊन घरच्यांना प्रेमाची दिवाळी भेट देण्याची कल्पना अभिनव आहे. 

 

आता मोशाज्ञा जाणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. गेल्यातच जमा आहेत. 

 


In reply to by श्रीगुरुजी

प्रत्येक वाक्याला होणाऱ्या टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटामुळे धरणीकंप होत असल्यासारखे वाटले. जमलेल्या कोट्यवधी नागरिकांच्या चेहऱ्यावर मोशाज्ञाविरूद्ध संताप अनावर झालेला दिसत होता.‌...

जबरदस्त.


विरोधी पक्षाने विरोध करायचा असतो ते ठीक आहे.  पण राहुलने INDIA block बद्दल बोलायला हवे. तृणमूल तिकडे वेगळा लढून हरून परत आला आहे. कॉ° स्वबळावर का ब्लॉकमध्ये याचा निर्णय काय तो लोकांना सांगावा. आता भाजप/ एनडीए यांनी स्वतः च काही घोटाळा केला तर विरोधकांची सरशी आहे. 

पुन्हा आणखी एक मुद्दा राहिलाच. कॉ° मुसलमानांबरोबर आहे हे वैमानिकाबद्दल गप्प राहून दाखवलेच पण मुसलमानांतील युवक/महिला/मुल्ला गट यांतील कोणाबरोबर हे निश्चित नाही. 


काल रामलीला मैदानातील सभेला नक्की किती लोक आले होते याविषयी कळले का? वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळे आकडे सांगितले जात आहेत. रागासमर्थक म्हणत आहेत की एकदम विराट सभा झाली तर भाजपसमर्थक लोक म्हणत आहेत की फ्लॉप शो झाला.

 

कालच्या सभेत नेहा बोरा पण व्यासपीठावरून बोलली. जर रागा, कॉग्रेस अध्यक्ष, राज्यांचे माजी मुख्यमंत्री वगैरे मंडळी व्यासपीठावरून बोलली असतील तर त्याच व्यासपीठावरून नेहा बोराला पण बोलायची संधी दिली आणि तिला मोठे महत्त्व दिले गेले असे झाले. एकूणच राहुल गांधींच्या काळात कॉग्रेसमध्ये डाव्या लोकांचे प्राबल्य वाढलेले दिसते. कन्हैय्या कुमार आता कॉग्रेसमध्येच आहे. पूर्वी तो सी.पी.आय म्हणजे त्यातल्या त्यात सगळ्यात सौम्य कम्युनिस्ट पक्षाचा होता. पण नेहा बोरा म्हणजे सी.पी.आय (एम.एल) म्हणजे चारू मजुमदारसारख्या नक्षलवाद्याला प्रात:स्मरणीय मानणाऱ्या संघटनेची. या डाव्या लोकांकडून कोणतीही विधायक गोष्ट होणे नाही. जे काही आहे त्याची मोडतोड करायची आणि अराजक माजवायचे इतकेच त्यांना जमते. मुळात रागा या मनुष्याकडून फार काही होईल अशी अपेक्षाच नव्हती. त्यात या डाव्यांना बरोबर घेतले म्हणजे काय... त्यात मद्य प्याला अशाप्रकारची स्थिती. 

असो.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

कॉंग्रेसमध्ये कोणीच रागाला आवरू शकत नाही का? ३ दिवसांपूर्वी अभिरूप संसद बोलवून ज्ञानेशकुमारांना घालवून देण्याचा भातुकलीचा खेळ केला. काल ज्ञानेशकुमारांना घालविण्यासाठी मोर्चा काढून सभा घेतली. रामलीला मैदानाची क्षमता जेमतेम ५०,००० आहे. त्यात बरीच जागा व्यासपीठाने व्यापली होती व निम्मे मैदान रिकामे होते. म्हणजे २०-२५ हजार इतकेच प्रेक्षक असावे.‌

 

रागाने भाषणात वारंवार मोदी, शहा, ज्ञानेशकुमार यांचा एकेरी उल्लेख केला. भाषणातील फुशारक्या ऐकून उबाठा सभेतील राऊत, उठा इ. वक्ते स्मरले. मोशाज्ञा घाबरले आहेत, त्यांना रात्री झोप लागत नाही, आम्ही सत्तेत आल्यानंतर त्यांना तुरूंगात टाकणार, आम्ही प्रेमाचे दुकान टाकलंय इ. बाळबोध बडबड नेहमीप्रमाणेच केली. शंकराची वरात हे काहीतरी नवीन खूळ आणलं. शंकराच्या वरातीत यायला, नाचायला कोणालाही बंदी नाही, असा भारत आम्हाला हवाय असलं काहीतरी असंबद्ध बोलला. २०२४ मध्ये ज्ञानेशकुमारांमुळे मोी पंतप्रधान व शाह गृहमंत्री झाले हे अगाध अज्ञान ऐकून हसू आवरेना कारण  ज्ञानेशकुमार मुख्य निवडणूक आयुक्त झाले फेब्रुवारी २०२५ मध्ये. 

 

उठाच्या भाषणात खंजीर, कोथळा, वाघनखे, छाताड, थडगं यापलिकडे काहीही नसते, त्याप्रमाणे रागाच्या भाषणात प्रेमाचे दुकान, मोदी मला घाबरतात, मोदी माझ्या डोळ्यांना डोळे भिडवू शकत नाहीत, मतचोरी यापलिकडे काहीही नसतं. 

 

असले मोर्चे काढून, भाषणं ठोकून एकही अधिकचे मत कॉंग्रेसला मिळणार नाही. उलट दिल्लीत मिळणारी ५-६ टक्के मते सुद्धा जातील. 


In reply to by श्रीगुरुजी

शंकराची वरात हे काहीतरी नवीन खूळ आणलं. शंकराच्या वरातीत यायला, नाचायला कोणालाही बंदी नाही, असा भारत आम्हाला हवाय असलं काहीतरी असंबद्ध बोलला. 

हे असंबद्ध नाही. नेमका तसाच भारत राहुल गांधी आणि त्याचे समर्थन करणाऱ्या डापु गॅंगवाल्यांना हवा आहे. शंकराच्या वरातीत यायला, नाचायला कोणाचीही बंदी नाही तद्वतच भारतात बांगलादेशी, रोहिंग्या, पाकिस्तानी आणि कोण कोण यावेत आणि इथल्याच लोकांना त्यांनी हाकलून लावावे असाच भारत त्यांना अपेक्षित आहे. आम्हाला देशात रेजिम चेंज करायचा आहे हे प्रशांत भूषण आणि नेहा बोरा बोलून गेले आणि त्यांचे खरे उद्दिष्ट देशात अराजक माजवायचे आहे हे त्यांनी चुकून स्पष्ट केले तशाप्रकारचे हे रागाचे विधान झाले. 

 

बाकी त्याच्या भाषणातील काहीकाही क्लिपा फिरत आहेत त्या बघून असले काही तो खरोखरच बोलला होता का हा प्रश्न पडला आहे. सध्याच्या ए.आय च्या काळात कोणीही कसल्याही क्लिपा बनवू शकतो. पण तो खरोखरच तसे बोलला असला तर मात्र धन्य. व्होटचोरीमुळे प्रदूषण झाले आहे? बोंबला.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

मी साधारणपणे शेवटची ७-८ मिनिटे ऐकलं. त्याचा सारांश वर दिलाय.  


शंकराची वरात म्हणजे सर्व चित्रविचित्र भूतगण सामील असलेली भावक शिवगणांची यात्रा, हा पारंपरिक अर्थ... सरकारविरोधातले कोणीही यात सहभागी होऊ शकतात, असं अपेक्षित असणार.


काल टीव्ही वर पहाताना जाणवले की भाषन देताना  ममता बानर्जी आणि राहुल गांधी दोघांचा ही आवाज एकसारखाच वाटतो.


पत्रकार अशोक वानखेडेंचे चेपुवरील मनोगत -

_______________________

 

#राहुल गांधी आणि इंडी आघाडीचे आभार !!

 

आज दिल्ली येथील रामलीला मैदानावर  देशभरातील विविध पक्षांचे, विविध जातीधर्माचे लाखोंच्या संख्येने नागरिक एकत्र येऊनही आजची रॅली व सभा अत्यंत शांततेत व शिस्तीत पार पाडल्याबद्दल राहुल गांधींचे पुन्हा एकदा आभार .

 

आज दिवसभरात दिल्लीत कुठे ना कुठे राडा केला जाईल अशी भीती बहुतांश भारतीयांना होती , पण तसे काहीही झाले नाही . 

 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही एक सकारात्मक घटना म्हणायला हरकत नाही . 

 

एक मात्र निश्चित की, आज काहीच घडले नाही याचा अर्थ  मोदी सरकारवर दबाव आणण्यात व ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागण्यात राहुल गांधी आणि इंडी आघाडीला अपयश आले आहे . 

 

आता ह्या प्रकरणातील हवा निघून गेली आहे . 

 

दिवाळी असल्याने हा विषय आता मागे पडला आहे . आणि दिवाळी नंतर देखील ह्या आंदोलनाचा उत्साह व जोर शिल्लक राहणार नाही . 

 

त्यामुळे ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आता काही होत नाही . 

 

म्हणजे  SIR ची प्रक्रिया देखील यापुढे विना अडथळा सुरळीत पार पडेल . 

SIR प्रक्रिया  राबवण्यात जे दोष विविध आंदोलनातून दाखवले गेलेत ते दूर करून ही प्रक्रिया निर्दोष करण्याची मोठी संधी आता निवडणूक आयोगाला प्राप्त झाली आहे . 

 

उत्तर प्रदेशाच्या निवडणुका मार्च २०२७ च्या आसपास म्हणजे अजून ५ महिने वेळ आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका तर चक्क अडीच वर्षानंतर म्हणजे 30 महिन्यानंतर आहेत.

 

त्यापूर्वी जनतेच्या शंकांचे समाधान करण्यात निवडणूक आयोग यशस्वी झाल्यास त्याचा फायदा मग उत्तर प्रदेशातील निवडणुकीत भाजपाला होईल आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकीत भाजपाला यश मिळाल्यास २०२९ ला पुन्हा सत्ता राखण्यात भाजपाला यश मिळू शकेल . 

 

ह्या आंदोलनांनी खरेतर गाफील व सुस्त भाजपा नेत्यांना जागे करण्याचे काम केले आहे . ह्या आंदोलनातून भाजपा नेते  आपल्या रणनितीत योग्य त्या सुधारणा करतील अशी आशा करू या . 

 

बाकी एक गोष्ट मात्र जाणवली ती म्हणजे, CAA विरोधी शाहीन बाग आंदोलन असो वा SIR विरुद्ध ही आंदोलने असोत , साऱ्या आंदोलकांना काळजी आहे ती मुस्लिमांची.‌

 

हा सारा लढा वैध/अवैध मुस्लिमांची नावे मतदार यादीतून कुठल्याही परिस्थितीत गाळली जावू नयेत यासाठीच आहे.

 

भारतातील मुसलमान नशिबवान आहेत हेच खरे.  असो.


मेट्रो ने जोडलेल्या एनसीआरची जनसंख्या 4 कोटीहून जास्त असताना ही रामलीला मैदानात फक्त बाहेरून आलेले अधिकान्श भाडोत्री 20 हजारच्या जवळ होते.  सेंट्रल पार्क सीपी दिवाळी पहाटला 5 हजाराहून जास्त मराठी लोक होते. याचा एकच अर्थ तरुण वर्ग हा बेरोजगार नाही. त्यामुळे कुणीही दिल्लीकर तिथे दिसला नाही. या शिवाय हुड्डा साहेबांनी हरियानातून भीड पाठविली नाही.