नमस्कार,
दिनांक ६ आणी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी बिहार विधानसभेसाठी निवडणूका होत आहेत. निवडणूकीचे निकाल १४ नोव्हेबर २०२५ रोजी येतील.
निवडणूक निकालांवर मिपावरील बरेच सदस्य लक्ष ठेऊन असतीलच तर निकालांची कारणीमिमांसा करणारे काही लेख १४ नोव्हेंबर २०२५ नंतर मिपावर येऊ शकतील.
मला मुख्यतः महाराष्ट्र विधानसभा आणी राष्ट्रीय स्तरावरील लोकसभेच्या निवडणूकांमधे विशेष रस असतो. मात्र बिहार विधानसभेच्या निवडणूकांबद्दल रस निर्माण झाला ते केवळ एका व्यक्तीमुळॅ ते म्हणजे प्रशांत किशोर पांडे ! (बिहार मधे आडनावाचा उल्लेख सार्वजनिक जीवनात केला जात नाही मात्र मराठी वाचकांसाठी आणि 'तुही जात कंची ?' या प्रश्नात रस असणार्यांसाठी 'पांडे' असण्याचा विशेष उल्लेख !
भारतातील राजकीय निवडणू़कांचा अभ्यास करणार्या व्यक्ती आणी संस्थांसाठी प्रशांत किशोर उर्फ पीके हे नाव अगदी ओळखीचे आहे. प्रशांत किशोर यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीची आठ वर्षे संयुक्त राष्ट्रसंघ (युनोच्या) अंतर्गत 'सार्वजनिक स्वास्थ्य कार्यक्रम' योजनेअंतर्गत काम केले. त्यानंतर त्यांनी राजकीय रणनीतीकार म्हणून अनेक राजकीय पक्षांसाठी काम केले. मला स्वतःला त्यांना राजकीय रणनीतीकार म्हणण्यापेक्षा राजकीय व्युव्हरचनाकार म्हणणे जास्त संयुक्तिक वाटते.
त्यांच्या राजकीय व्युव्हरचनाकार म्हणून काम करण्याच्या कार्यकाळात त्यांनी केलेली आणि प्रसिद्ध पावलेल्या कामांची यादी खालीलप्रमाणॅ.
भाजपा : गुजरात विधानसभा आणी लोकसभेसाठी २०१२ आणि २०१४ मधे काम केले. त्यांच्या "चाय पे चर्चा", 'रन फॉर युनिटी' "3 डी रॅली' सारख्या संकल्पना कमालीच्या यशस्वी ठरल्या.
जनता दल (युनायटेड) : २०१५ मधे नितिश कुमार आणि महागठबंधनसाठी काम केले. २०१५ मधे प्रशांत किशोर आणी इतर काही जणांनी मिळून Indian Political Action Committee (I-PAC) नावाची संस्था स्थापन केली. ह्या संस्थेने मग अनेक राज्यात आणी अनेक पक्षांसाठी निवडणूका जिंकण्यासाठी काम केले.
पंजाब काँग्रेस : २०१७ मधे पंजाबमधील निवडणूकांमधे कॅप्टन अमरींदर सिंह यांचेसाठी 'पंजाब दा कॅप्टन' मोहीम राबविली.
उत्तर प्रदेश काँग्रेस : '२७ साल बेहाल', "खाट पे चर्चा" अशा मोहिमा राबविल्या. मात्र सभेसाठी जमलेल्या लोकांनी त्या खाटा पळविल्याने ही मोहिम वेगळ्या कारणाने गाजली. या निवडणूकीत कॉंग्रेसला आणी पीके टीम ला विजय मिळवता आला नाही.
वायएसाआर कॉंग्रेस / जगनमोहन रेड्डी : यांचेसाठी २०१९ आणि २०२४ मधे निवडणूक मोहिम (२०२४ मधे वायएसाआर कॉंग्रेस / जगनमोहन रेड्डी चा पराभव होऊन तेलगु देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री झाले).
शिवसेना (अखंड शिवसेना, आताची उबाठा शिवसेना) : पीके आणी (I-PAC) यांनी यांचेसाठी काम केले. या कामाची फी म्हणून प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरेंना विनंती केली होती की तुमच्या राजवटीत बिहारी मजुरांना शिवसेनेकडून मारहाण होऊ नये याची काळजी घ्या.
२०२० मधे केजरीवाल आणि आम आदमी पार्टी दिल्लीसाठी काम केले.
२०२१ मधे तामिळनाडू मधे एम. के. स्टॅलीन साठी काम केले.
२०२१ आणी २०२४ मधे प.बंगालमधे तृणमुल कॉग्रेस साठी निवडणूक मोहिमेत भाग घेतला. (प्रशांत किशोर यांनी मात्र २०२१ मधेच राजकीय व्युव्हरचनाकार म्हणून आपल्या कामातून निवृत्ती घेतली आणी त्यांनी आपले पुर्ण लक्ष बिहारवर केंद्रीत केले.
२०२२ मधे त्यांनी जनसुराज आंदोलन चालू केले आणी त्या बॅनरखाली जवळ्जवळ दोन वर्ष ३००० किलोमीटर पदयात्रा करुन पुर्ण बिहार उभा आडवा पिंजून काढला, गावोगाव फिरले आणी बिहारची स्थिती जाणून घेतली आणी आपण राजकीय पक्षाची स्थापना करु असे जाहिर केले. पिवळ्या रंगाच्या झेंड्यावर सुरुवातीला गांधीजीची प्रतिमा होती.
२ ऑक्टॉबर २०२४ गांधीजयंतीच्या दिवशी आपण "जनसुराज पक्ष" ची स्थापना करत असून त्या नावाखाली निवडणूका लढवू असे जाहिर केले. आता पक्षाच्या झेंड्यावर गांधीजींसोबत बाबासाहेबांची देखील प्रतिमा आहे. पक्षाचे निवडणूक चिन्ह "स्कुल का बस्ता" म्हणजे "शाळेचे दप्तर" आहे.
उद्याच्या निवडणुकीत त्यांनी जवळपास सगळ्याच मतदारसंघांमधे (२४३ पैकी २३८ जागांवर) उमेदवार दिले आहेत. जवळपास सगळेच उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत. बरेचसे उमेदवार चागले शिकलेले, प्रशासकीय पदावरून किंवा चांगल्या पदावरुन निवृत्त झालेले आहे. मात्र मुस्लीम, मागासवर्गीय आणि अगदी तळागाळातील जातीतील उमेदवार देखील दिले आहेत.
त्यांची बिहार स्थितीबद्द्लची बरीचशी अनुमाने सटीक आहेत व विचार करण्यास प्रवृत्त करतात. उदा.
१. बिहार मधे कागदावर दिसते त्यापेक्षा जास्त गरीबी आहे.
२. बिहारी मतदार जातीपातीवर आधारीत मतदान करतात हा गैरसमज आहे. देशातील बाकी मतदार जितका जातीपातीचा विचार करुन मतदान करतात तेवढाच विचार बिहारी मतदार करतात.
३. ज्यांनी लालूंचे जंगलराज अनुभवले आहे ते केवळ ते जंगलराज परत येऊ नये म्हणून नितीश कुमारांना आणि (एनडीए ला) मतदान करतात.
४. मुसलमानांना भाजपाची भीती वाटते त्यामुळे बरेचशे नाईलाजाने लालूंच्या पक्षाला मतदान करतात.
५. देशातील सगळ्यात जास्त आय एस / आय पीएस हे बिहारमधून येतात हा मोठा गैरसमज आहे. हे बिहारी मुळातच बिहारमधून निघून इतरत्र स्थायिक झालेत व तिकडे त्यांना जे चांगले वातावरण लाभले आहे त्याच्या परीणाम म्हणून आपल्याला जास्त बिहारी सरकारी नोकरीत दिसतात.
६. बिहारी मजूर म्हातारपणी थकल्यावर तरी आपल्या घरी परत येईल मात्र शिकला सवरलेला बिहारी आजची परिस्थिती पाहता बिहार मधे येण्याची शक्यताच नाही.
७. दक्षिण भारतातील राज्ये प्रगत होण्याचे एक मोठे कारण म्हणजे तिथले मतदार भाकरी फिरवितात. सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ कोणताच पक्ष सत्तेवर राहत नाही. त्यामानाने बिहारमधे पर्याय नसल्यामुळे मतदार आलटून पालटून लालू किंवा नितिश यांनाच मते देतात.
मतदारांना तिसरा व चांगला पर्याय मिळावा म्हणून आपण जनसुराज पक्षाची स्थापना केल्याचे ते सांगतात आणी बिहार मधून पोटपाण्यासाठी बाहेर पळणार्यांना बिहार मधे रोजगार उपलब्ध व्हावा आणि प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळावे हे त्यांचे मुख्य कार्यक्रम आहेत असे ते सांगतात.
निवडणूकांमधे त्यांना किती जागा मिळतील त्याच्या अंदाज सांगताना ते म्हणतात की मुळात बिहार ची परिस्थिती सुधरु शकते हा विश्वासच तेथील लोक गमावून बसले आहेत. जनसुराज पक्ष हा तिसरा पर्याय आहे याची त्यांना व्यवस्थित जाणीव झाली तर १५० पेक्षा जास्त जागा येऊ शकतील आणि नाही झाली तर १० जागांच्या आतमधेच त्यांचा खेळ संपेल असे अनुमान ते सार्वजनिक रित्या वर्तवतात. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या प़क्षाला ३० ते ६० दरम्यान जागा येऊ नयेत असे त्यांना वाटते कारण त्यामूळे इंडिया किंवा एनडीए ला घोडेबाजार करायला उत्तेजन मिळेल आणी त्या गोंधळात जनसुराज चे विजयी उमेदवार इतर पक्षांच्या वळचणीला जाऊ शकतील आशी भिती त्यांना वाटते.
युट्यूबवर त्यांच्या बर्याच चित्रफिती आहेत, अधिक माहितीसाठी त्या इच्छूकांनी बघाव्यात.
"इस बार अपने बच्चों के भविष्य के लिए वोट दो" हे त्यांचे निवडणूक घोषवाक्य आहे.
मी भाजपासमर्थक असलो तरी प्रशांत किशोर आणि जनसुराज पक्षाला बिहार मधे चांगले यश मिळावे असे मनापासून वाटते.
नितीश, तेजस्वी किंवा काँग्रेस यांचेपैकी कुणाकडेही सत्ता गेल्यास मागील पाढे पंचावन्न असेच म्हणावे लागेल.
लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान देखील एक उत्तम नेते आहेत त्यांना देखील चांगले यश लाभावे असे वाटते. त्यांचा पक्ष २८ जागांवर लढत आहे.
प्रशांत किशोर यांचेकडे अनेक निवडणूकांची रणणिती तयार करणे, इतर राजकीय पक्षाची रणणिती माहित असणे, उत्तम वक्ता असणे, चांगले व्यक्तीमत्त्व, भारदस्त आवाज, दुर्दम्य मात्र आंधळा नसलेला आशावाद, आणि हे सगळे गुण आहेत.
मात्र ते ब्राह्नण असणे, प्रत्यक्ष राजकीय पक्ष चालविण्याचा अनुभव नसणे, पक्षात इतर लोकप्रिय नेते नसणे अशा काही कमतरता आहेत.
शेवटी एक बिहारी सब पे भारी पडतो, की मागे पडतो, की उठून अजून संघर्ष करतो हे १४ नोव्हेंबर आणी त्यानंतर येणारा काळच ठरवू शकतो.
मात्र बिहारला तिसरा पर्याय हवा हे बिहारींच्या आणि इतर देशासाठी देखील महत्वाचे आहे.
वर्गीकरण
वाचने
17447
प्रतिक्रिया
130
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रशांत किशोर एक चांगला माणूस
बिहार मध्ये यादव 14.26% आणि
काहीही हं श्री !
In reply to बिहार मध्ये यादव 14.26% आणि by विवेकपटाईत
बिहारी मतदारांची मानसिकता
केजरीवालांच्या अनुभवामुळे
In reply to बिहारी मतदारांची मानसिकता by चंद्रसूर्यकुमार
दिल्लीत कोणीही केजरीवालची
In reply to केजरीवालांच्या अनुभवामुळे by कपिलमुनी
बिहारच्या मतदारांची मानसिकता कळणे अवघड आहे.
In reply to बिहारी मतदारांची मानसिकता by चंद्रसूर्यकुमार
पीके
In reply to बिहारच्या मतदारांची मानसिकता कळणे अवघड आहे. by धर्मराजमुटके
पीकेंची तिसरा पर्याय उभा
In reply to बिहारी मतदारांची मानसिकता by चंद्रसूर्यकुमार
मतदानाची टक्केवारी वाढलीय.
एस.आय.आर चा किती वाटा असेल?
In reply to मतदानाची टक्केवारी वाढलीय. by शाम भागवत
एस.आय.आर
In reply to एस.आय.आर चा किती वाटा असेल? by चंद्रसूर्यकुमार
नुसत्या टक्केवारीचा विचार
In reply to एस.आय.आर चा किती वाटा असेल? by चंद्रसूर्यकुमार
तरीही हरियाणातून बिहारला एका
In reply to नुसत्या टक्केवारीचा विचार by शाम भागवत
:)
In reply to तरीही हरियाणातून बिहारला एका by आग्या१९९०
हरियाणातून बिहारला एका दिवसात
In reply to तरीही हरियाणातून बिहारला एका by आग्या१९९०
ह्या स्पेशल गाड्यांची घोषणा
In reply to हरियाणातून बिहारला एका दिवसात by सुबोध खरे
मुंबई हुन बिहारला (नेपाळ ला)
In reply to ह्या स्पेशल गाड्यांची घोषणा by आग्या१९९०
सणासुदीला सोडल्या जाणाऱ्या
In reply to मुंबई हुन बिहारला (नेपाळ ला) by सुबोध खरे
जरा गुगलून पहा कि रेल्वे
In reply to सणासुदीला सोडल्या जाणाऱ्या by आग्या१९९०
म्हणून तर म्हटलं की स्पेशल
In reply to जरा गुगलून पहा कि रेल्वे by सुबोध खरे
उत्तराच्या प्रतीक्षेत. आता
In reply to म्हणून तर म्हटलं की स्पेशल by आग्या१९९०
तुम्हाला सगळं रेडिमेड हवंय
In reply to उत्तराच्या प्रतीक्षेत. आता by आग्या१९९०
तुम्हाला सगळं रेडिमेड हवंय
In reply to तुम्हाला सगळं रेडिमेड हवंय by सुबोध खरे
बवोर्र्र
In reply to तुम्हाला सगळं रेडिमेड हवंय by आग्या१९९०
बवोर्र्र
In reply to बवोर्र्र by सुबोध खरे
पण आमची एक मुंबई -नाशिक-
In reply to मुंबई हुन बिहारला (नेपाळ ला) by सुबोध खरे
शेवटची काडी
In reply to नुसत्या टक्केवारीचा विचार by शाम भागवत
:)
In reply to शेवटची काडी by अभ्या..
सनातनी प्रो मॅक्स
In reply to :) by शाम भागवत
:)
In reply to सनातनी प्रो मॅक्स by अभ्या..
थ्यान्क्यू भागवत साहेब
In reply to :) by शाम भागवत
अभ्याजी,
In reply to थ्यान्क्यू भागवत साहेब by अभ्या..
रोचक
In reply to अभ्याजी, by शाम भागवत
:)
In reply to रोचक by स्वधर्म
उपाय सांगा
In reply to :) by शाम भागवत
तुमच्या प्रश्नाचं उत्तर
In reply to उपाय सांगा by स्वधर्म
तो प्रश्नच नव्हता
In reply to तुमच्या प्रश्नाचं उत्तर by शाम भागवत
मी फक्त मत देतो.
In reply to तो प्रश्नच नव्हता by स्वधर्म
धन्यवाद भागवतसाहेब
In reply to अभ्याजी, by शाम भागवत
मोदींना विरोध करण्याची अयशस्वी पध्दत मोदी विरोधक बदलत नसतील तर मला हसायला येत.विरोध मोदींना नाहिये हे माहीत असतानाही फक्त मोदींनाच पुढे करण्याच्या प्रत्येक पध्दतीचे मला हसू येतं. तुमची ती विश्वप्रसिध्द स्मायलीच वापरावी वाटते.नेहमी नाही पण बऱ्याच वेळेस मला उचकावण्यासाठी उत्तरं दिलेली असतात. पण माझं काम झालेलं असतं. त्यामुळे काही करण्यासाठी उरलेलं नसतं. मग स्मायली टाकणं पुरेसं असतं.पण माझ्या स्माईलीमुळे लिहीणाराच जास्त चिडीला येतो असा माझा अनुभव आहे. हा दुसरा फायदा आहे.काय आहे तुमचं नेमकं काम? लिहिणार्यांना चिडीला आणण्यात तुमचा काय फायदा? मग नुसत्या स्मायली टाकणं एवढेच का करत नाही? ;)माझी राजकारणाकडे पाहाण्याची पध्दत वेगळी आहे. मी फक्त मतदान टक्केवारीला महत्व देतो. त्या टक्केवारीचा दिर्घकालीन कल लक्षात घेतो.राजकारणाकडे पाहण्याच्या पध्दतीतल्या हा बदललेल्या ह्या दीर्घकालीन कलाशी मी चांगलाच परिचित आहे. मूळ विरोध साध्यांना नाही, साधनांना आहे.पण या तत्वाकडे दुर्लक्ष झालं तर राजकीय नेत्यांच्या खेळीमागची रणनिती लक्षात येऊ शकणार नाही असं माझं मत आहे. तसंच एखादा नेता हे तत्व कशा पध्दतीने साधतो हा माझा अभ्यासाचा विषय नाही. त्यामुळे त्याबाबतच्या वादविवादात मी पडत नाही.ह्या वादविवादात पडणार नसाल तर छानच. आधीचे उत्तर त्यासाठीच आहे. राहता राहिला पेरे पाटलांबद्दल मुद्दा. भेटलेलो आहे, पाटोद्याशी परिचित आहे सो....तेही तुमच्या अभ्यासाच्या विषयात येत आहेत तर ह्या बदलाबद्दल मनापासून शुभेच्छा.तुम्ही एक प्रामाणिक व कष्टाळू व्यक्ति आहात असं माझं मत बनलेलं आहे. फक्त पटकन राग येणं हा तुमचा स्वभाव असावा असंही वाटत आलेलं आहे. पण तुम्ही खोलवर विचार करण्याची क्षमता बाळगता असं वाटल्याने हे एवढं सगळं लिहीलं आहे. अन्यथा एक स्मायली पुरेशी होती.प्रामाणिकपणे सांगतो, इतके लिहावेसे वाटले तुम्हाला. चांगलेच आहे. माझी बायकोही माझ्या पटकन राग येण्याद्दल बोलते. तुम्ही दुसरे. खोलवर विचार करण्याच्या क्षमतेचा वापर अजून वाढवायला पाहिजे ह्याची पुन्हा जाणीव झाली. तो करावा लागू नये अशीच स्वभावसुलभ इच्छा असते पण काय करणार? संविधानाची इमोजी करायला हवी. वापरायला आणी समजावयाला सोपी अशी. :)धन्यवाद दिल्याबद्दल धन्यवाद.
In reply to धन्यवाद भागवतसाहेब by अभ्या..
एक लिहायचं राहीले. पेरे पाटील
In reply to धन्यवाद दिल्याबद्दल धन्यवाद. by शाम भागवत
पेरे पाटलांवा भेटून
In reply to धन्यवाद भागवतसाहेब by अभ्या..
हत्तीला सात सोंडा असल्या तर
In reply to शेवटची काडी by अभ्या..
आकडे
In reply to नुसत्या टक्केवारीचा विचार by शाम भागवत
मतदानाची टक्केवारी वाढलीय.
वरील अंदाजाला पुष्टी देणारी बातमी
In reply to मतदानाची टक्केवारी वाढलीय. by धर्मराजमुटके
लिंक चालत नाही.
In reply to वरील अंदाजाला पुष्टी देणारी बातमी by धर्मराजमुटके
बातमीचा दुवा
In reply to लिंक चालत नाही. by चंद्रसूर्यकुमार
अकरा तारखेला रात्री अंदाज
public memory is short
ही माहिती वाचून वाईट वाटले.
In reply to public memory is short by सुबोध खरे
गायपट्टा
In reply to ही माहिती वाचून वाईट वाटले. by रामचंद्र
हे त्यांच्या मातृसंस्थेने
In reply to गायपट्टा by स्वधर्म
बरोबर
In reply to हे त्यांच्या मातृसंस्थेने by रामचंद्र
अनेक सुशिक्षित राजकीय
In reply to गायपट्टा by स्वधर्म
अनेक सुशिक्षित राजकीय दृष्ट्या जागृत लोक तरीही अशा पक्षांचे हिरिरिने समर्थन करत आहेतसुशिक्षित आहे म्हणजे जागृत असतीलच असे नाही, गोबरयुगाचे, अशिक्षित नेत्याचे, त्याच्या खोट्या गोष्टींचे उघद समर्थन करतात!बहुतेक अनेकांना शिक्षित आणि
In reply to अनेक सुशिक्षित राजकीय by अमरेंद्र बाहुबली
नेता अशिक्षित आहे, त्याला
In reply to अनेक सुशिक्षित राजकीय by अमरेंद्र बाहुबली
आपल्या महाराष्ट्रात जेवढा
In reply to गायपट्टा by स्वधर्म
जातीयवादाचा सुरवंट
In reply to आपल्या महाराष्ट्रात जेवढा by विवेकपटाईत
महाराष्ट्रात गायपट्टा कुठे
जिथे जिथे भाजप चे उमेदवार
In reply to महाराष्ट्रात गायपट्टा कुठे by कंजूस
पाच वाजता ६७.१४ % मतदान
आता अबा, अभ्या, आग्या व
In reply to पाच वाजता ६७.१४ % मतदान by शाम भागवत
पूर्व विश्लेषण राहू द्या
लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी
धर्मराज मित्रा - १४ तारखेनंतर
धन्यवाद मित्रा !
In reply to धर्मराज मित्रा - १४ तारखेनंतर by खटपट्या
ऍक्सिस माय इंडिया नुसार 90%
पी.के. म्हणजे केजरीवाल नव्हे.