Skip to main content

आता तरी करंट जाणार का?

लेखक निनाद यांनी बुधवार, 05/01/2022 04:22 या दिवशी प्रकाशित केले.
इलेक्ट्रॉनिक्स, वाहन आणि मेडिकल तंत्रज्ञान साठी भारत त्याच्या जवळपास सर्व सेमीकंडक्टर गरजांसाठी १००% परदेशी उत्पादकांवर अवलंबून आहे. अशा पार्श्वभूमीवर - केंद्रीय मंत्रिमंडळाने सेमीकंडक्टर (मराठी: अर्धसंवाहक?) आणि डिस्प्ले उत्पादन उद्योगांच्या विकासासाठी ₹७६,००० कोटींच्या प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली. या मोठ्या बातमी कडे फारसे लक्ष वेधलेले दिसत नाही. यामुळे धोरणात्मक महत्त्वाच्या क्षेत्रात भारताचा पाय रोवला जाईल अशी आशा आहे. पुढील सहा वर्षांत २० हून अधिक सेमीकंडक्टर डिझाइन, घटक उत्पादन आणि डिस्प्ले फॅब्रिकेशन (फॅब) युनिट्सची स्थापना केली जाईल. आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा सेमीकंडक्टर हा पाया आहे. आर्थिक स्वावलंबनाच्या या क्षेत्रांमध्ये भारताच्या तांत्रिक नेतृत्वाचा मार्ग ही येथूनच जाणार आहे. या विकासा साठी मोठा धोरणात्मक निर्णय आहे. एक वेगळी इकोसिस्टम देशात तयार केली जात आहे. मंजूर केलेले व्यापक प्रोत्साहन सेमी-कंडक्टर लॅबोरेटरी चे आधुनिकीकरण आणि व्यापारीकरण केले जाणार आहे - हा यातला फार महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय सेमीकंडक्टर डिझाईन कंपन्यांच्या वाढीस मदत केली जाईल. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले शाश्वत इकोसिस्टम विकसित करण्यासाठी दीर्घकालीन धोरणे चालविण्यासाठी, एक विशेष आणि स्वतंत्र इंडिया सेमीकंडक्टर मिशन ची स्थापना होते आहे. भारतीय उत्पादकांसह तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आणि सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स असे आघाडीचे उत्पादक यामध्ये असतील अशी आशा आहे. आज भारत हे चिप डिझाइनचे प्रमुख जागतिक केंद्र आहे. जगात सेमीकंडक्टर उद्योगातील अनेक अभियंते हे भारतीय आहेत पण ते भारतीय आस्थापनांमध्ये संशोधन आणि नोकरी करत नाहीत. ही संधी आता उपलब्ध असेल असे वाटते. मग या आधी हा सेमीकंडक्टर उद्योग भारतात नव्हता का? तर होता! पण तो पूर्णपणे गलितगात्र राहील याची संपूर्ण काळजी या आधीच्या सरकारांनी घेतली होती. पण आता आलेल्या या योजना आणि त्याची इकोसिस्टम देशात तयार केली जाणे म्हणजे पायाभूत प्रगतीची प्रथम पायरी आहे असे वाटते. या योजनेतून आता भारतीय सेमीकंडक्टर संशोधन विभागात आता तरी करंट जाईल की नाही यावर तज्ञ सदस्यांची मते जाणून घ्यायला आवडतील.

वाचने 28840
प्रतिक्रिया 80

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

असे माझ्या मर्यादित ज्ञानानुसार मला वाटते. >> छ्या!! मग काय मजा नाय! माणसानं कसं सर्वज्ञ असावं. मलाच सर्व गोष्टीतलं कळतं. मला सर्वच गोष्टीतलं कळतं. मला सर्व गोष्टीतलं कळतंच. असं पाहिजे!

In reply to by सुबोध खरे

काही क्रम असतात. १), न्याय व्यवस्था अतिशय उत्तम दर्जा ची आणि वेगवान. २), उच्च दर्जा चे अतिशय संवेदनशील ,वेगवान ,भ्रष्टाचार मुक्त प्रशासन. ३) देशातील बेसिक गरजा, ४)सर्वांस प्राथमिक आणि उच्च शिक्षण परवडेल अशा खर्चात. ५) infrastructure, He सर्व झाल्यानंतर . लष्करी takat ,लष्करी हत्यार , missile. तुमचे विचार. कमजोर पायावर मजबूत कळस चढवला जावा अशा प्रकारचे आहेत. शेख चिली सारखे. . कमजोर पायावर उभा असणारा कळस पण कमजोर च असतो.

In reply to by sunil kachure

भारतामध्ये चंदीगड येथे एक सरकारी आणि अत्यंत अकार्यक्षम अर्धसंवाहक उत्पादन कारखाना आहे. त्यातून आजवर काहीही नोंद घेण्याजोगे बाहेर आलेले नाही!

कचरे बुवा वेगवान न्यायव्यवस्था, उत्तम प्रशासन, सर्वाना उच्च शिक्षण आणि नोकरी (हे दिवास्वप्न) एवढे मिळेपर्यंत, आपले स्वसंरक्षण आणि स्वयंपूर्णता बाजूला ठेवले तर अर्धा देश गमावण्याची पाळी येईल आणि तुमचे सुशासन आणि सुव्यवस्था कचऱ्याच्या डब्यात जाईल. पं नेहरूंनी अहिंसा हे आपले धोरण असेल असे ठरवले असता पाकिस्तानने काश्मीर मध्ये घुसखोर घुसवून त्यांच्या तोंडाला काळे फासले. Shortly after independence, General Lockhart as the army chief took a strategic plan to the prime minister, asking for a government directive on the defence policy. He came back to Jick's office shell-shocked. When asked what happened, he replied, The PM took one look at my paper and blew his top. 'Rubbish! Total rubbish!' he shouted. 'We don't need a defence plan. Our policy is ahimsa (non-violence). We foresee no military threats. Scrap the army! The police are good enough to meet our security needs' https://www.hindustantimes.com/india/nehru-wanted-army-scrapped/story-4… हा इतिहास तुम्ही विसरता आहात कि तुमच्या डावा मेंदू काय टंकतो आहे आणि उजवा मेंदू काय विचार करतो आहे याचा परस्पर संबंध नाही.

अबुधाबी-इस्रायल समूह कर्नाटकमध्ये तीन अब्ज डॉलरचा र्धसंवाहक चिप बनवण्याचा कारखाना उभारणार आहे. ISMC हा अबू धाबी स्थित नेक्स्ट ऑर्बिट व्हेंचर्स आणि इस्रायलचा टॉवर सेमीकंडक्टर यांचा संयुक्त उपक्रम आहे. भारतातील पहिल्या अर्धसंवाहक कारखान्या मधून १५०० हून अधिक प्रत्यक्ष नोकऱ्या आणि दहा हजार अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

In reply to by निनाद

तीन वर्षे झाली मूळ बातमीला. आज हे स्टेटस आहे. ISMC समूह कर्नाटकातील म्हैसूर येथे $3 अब्ज (अंदाजे ₹23,000 कोटी) च्या प्रस्तावित गुंतवणुकीसह 65nm सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांटची योजना आखत आहे. हा प्रकल्प भारत सरकारच्या सेमीकंडक्टर मिशनचा एक भाग होता आणि कंपनीने गुजरातला पर्यायी स्थान म्हणून विचारात घेतल्याने कर्नाटकची निवड करण्यात विलंब झाला, याचे कारण राज्याचे प्रोत्साहन पॅकेजेस आणि पाण्याची उपलब्धता होते. 2025 च्या सुरुवातीपर्यंत, या प्रकल्पाला अद्याप अंतिम सरकारी मान्यता मिळाली नव्हती, जरी भारतात सेमीकंडक्टर उत्पादन स्थापन करण्याच्या उपक्रमांतर्गत हा एक महत्त्वाचा प्रस्ताव होता.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) विक्रम ३२०१ नावाची खास चिप तयार केली आहे. या चिपला विक्रम-३२ असेही म्हणतात. ही चिप अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रातील अत्यंत कठीण वातावरणासाठी बनवली आहे, जिथे तापमान -५५°C पासून +१२५°C पर्यंत असू शकते. ही चिप १०० मेगाहर्ट्झच्या गतीवर काम करते. विक्रम-३२ चिपचा मुख्य उपयोग रॉकेट आणि उपग्रहांच्या दिशादर्शनासाठी आणि त्यांच्या कामांचे व्यवस्थापन करण्यासाठी होतो. या चिपमुळे भारताचे परदेशी चिप्सवरील अवलंबित्व कमी होणार आहे, ज्यामुळे देशाची आत्मनिर्भरता वाढेल. या चिपचे तंत्रज्ञान जुने असले, तरी ती भारताची क्षमता दाखवते. सध्या जागतिक पातळीवर ३-नॅनोमीटर तंत्रज्ञान वापरले जाते, पण इस्रोने १८०-नॅनोमीटर तंत्रज्ञानावर आधारित ही चिप बनवली आहे. मुख्य म्हणजे या धाग्यात मी ही सुरुवातीला साशंक होतो पण आता असे दिसते आहे की खरोखरच भारतामध्ये सेमीकंडक्टर उद्योगाची सुरुवात झाली आहे. गुजरातच्या साणंदमध्ये सीजी पॉवरने पहिली सेमीकंडक्टर असेंब्ली आणि चाचणी सुविधा ऑगस्ट २०२४ मध्ये सुरू केली आहे. सध्या इथे दररोज ५ लाख युनिट्स बनतात आणि लवकरच उत्पादन वाढवण्याची योजना आहे. (कुठे याचा वापर होतो हे अजून कळले नाही.) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ ऑगस्ट २०२५ रोजी घोषणा केली की, देशात अनेक सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांटचे काम सुरू आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या वर्षात २८-९० नॅनोमीटरची पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येईल.

SCL च्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी काम केले आहे , इथले ऑपरेटरसुद्धा त्यावेळच्या खाजगी अभियंत्यापेक्षा अधिक पगार घेत होते . प्रकल्पासाठी पैश्यांबतीत नि सुविधांबाबतीत कधी आढेवेढे घेतले नाही. आम्हास सांगण्यात आले होते कि या चीप्स अंतराळ संस्थेसाठी बनवत आहेत . ख खो दे जा

प्रगत संगणन विकास केंद्र अर्थात 'सी-डॅक'ने 'ध्रुव ६४' या पहिल्या स्वदेशी मायक्रोप्रोसेसरची (मराठी: सूक्ष्म प्रक्रिया यंत्राची?) निर्मिती केली आहे. आजवर मायक्रोप्रोसेसरसाठी भारत पूर्णपणे परकीय आयातीवर अवलंबून होता. ध्रुव ६४ च्या आगमनाने हे चित्र आता बदलणार आहे असे दिसते. देशाचा अमूल्य डेटा आणि संरक्षण यंत्रणा आता अधिक सुरक्षित होतील. स्वदेशी बनावटीमुळे यात कोणतीही गुप्त तांत्रिक त्रुटी किंवा हेरगिरीचा धोका उरणार नाही असे वाटते. हा प्रोसेसर मुक्त ओपन सोर्स आणि स्वतंत्र अशा 'रिस्क-व्ही' (RISC-V) पद्धतीवर आधारित आहे. यामुळे भारताला परकीय कंपन्यांना कोणतीही रॉयल्टी देण्याची गरज नाही. यात ड्युअल-कोर असून ६४-बिटची रचना आहे. त्यामुळे अत्यंत गुंतागुंतीची आणि जड कामे हा प्रोसेसर सहज आणि वेगाने करू शकतो. आधुनिक इंटरनेट यंत्रणा, माहिती साठवण्याची साधने आणि वेगवान संवादासाठी लागणारी सर्व नियंत्रणे या चिपमध्ये आधीच अंतर्भूत केलेली आहेत असे बातमी वरून समजते. ध्रुव ६४' हे एक दमदार पाऊल दिसते आहे. सी-डॅक आता यापेक्षाही शक्तिशाली अशा धनुष ६४ आणि धनुष ६४+ या क्वाड कोर (कोर = गाभा?, म्हणजे चौ गाभा?) वर काम करत आहे. येत्या २०२६ पर्यंत ऑक्टा कोर प्रोसेसर विकसित करण्याचे प्रयत्न आहेत. तज्ञांनी 'रिस्क-व्ही' (RISC-V) वर अजून माहिती द्यावी ही विनंती!