इलेक्ट्रॉनिक्स, वाहन आणि मेडिकल तंत्रज्ञान साठी भारत त्याच्या जवळपास सर्व सेमीकंडक्टर गरजांसाठी १००% परदेशी उत्पादकांवर अवलंबून आहे. अशा पार्श्वभूमीवर -
केंद्रीय मंत्रिमंडळाने सेमीकंडक्टर (मराठी: अर्धसंवाहक?) आणि डिस्प्ले उत्पादन उद्योगांच्या विकासासाठी ₹७६,००० कोटींच्या प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली. या मोठ्या बातमी कडे फारसे लक्ष वेधलेले दिसत नाही. यामुळे धोरणात्मक महत्त्वाच्या क्षेत्रात भारताचा पाय रोवला जाईल अशी आशा आहे. पुढील सहा वर्षांत २० हून अधिक सेमीकंडक्टर डिझाइन, घटक उत्पादन आणि डिस्प्ले फॅब्रिकेशन (फॅब) युनिट्सची स्थापना केली जाईल.
आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा सेमीकंडक्टर हा पाया आहे. आर्थिक स्वावलंबनाच्या या क्षेत्रांमध्ये भारताच्या तांत्रिक नेतृत्वाचा मार्ग ही येथूनच जाणार आहे. या विकासा साठी मोठा धोरणात्मक निर्णय आहे. एक वेगळी इकोसिस्टम देशात तयार केली जात आहे. मंजूर केलेले व्यापक प्रोत्साहन सेमी-कंडक्टर लॅबोरेटरी चे आधुनिकीकरण आणि व्यापारीकरण केले जाणार आहे - हा यातला फार महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय सेमीकंडक्टर डिझाईन कंपन्यांच्या वाढीस मदत केली जाईल.
सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले शाश्वत इकोसिस्टम विकसित करण्यासाठी दीर्घकालीन धोरणे चालविण्यासाठी, एक विशेष आणि स्वतंत्र इंडिया सेमीकंडक्टर मिशन ची स्थापना होते आहे.
भारतीय उत्पादकांसह तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आणि सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स असे आघाडीचे उत्पादक यामध्ये असतील अशी आशा आहे.
आज भारत हे चिप डिझाइनचे प्रमुख जागतिक केंद्र आहे. जगात सेमीकंडक्टर उद्योगातील अनेक अभियंते हे भारतीय आहेत पण ते भारतीय आस्थापनांमध्ये संशोधन आणि नोकरी करत नाहीत. ही संधी आता उपलब्ध असेल असे वाटते.
मग या आधी हा सेमीकंडक्टर उद्योग भारतात नव्हता का? तर होता! पण तो पूर्णपणे गलितगात्र राहील याची संपूर्ण काळजी या आधीच्या सरकारांनी घेतली होती.
पण आता आलेल्या या योजना आणि त्याची इकोसिस्टम देशात तयार केली जाणे म्हणजे पायाभूत प्रगतीची प्रथम पायरी आहे असे वाटते.
या योजनेतून आता भारतीय सेमीकंडक्टर संशोधन विभागात आता तरी करंट जाईल की नाही यावर तज्ञ सदस्यांची मते जाणून घ्यायला आवडतील.
वर्गीकरण
वाचने
29433
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
असे माझ्या मर्यादित ज्ञानानुसार मला वाटते.
In reply to कचरे बुवा by सुबोध खरे
सुबोध खरे
In reply to कचरे बुवा by सुबोध खरे
चंदीगड कारखाना आहे ना...
In reply to भारता पुढे जात असेल तर आनंद च आहे by sunil kachure
कचरे बुवा
कर्नाटकमध्ये तीन अब्ज डॉलरचा चिप बनवण्याचा कारखाना
तीन वर्षे झाली मूळ बातमीला.
In reply to कर्नाटकमध्ये तीन अब्ज डॉलरचा चिप बनवण्याचा कारखाना by निनाद
विक्रम ३२०१ चिप - सेमीकंडक्टर उद्योगाची आश्वासक सुरुवात.
SCL
आशादायक ध्रुव ६४
अधिक महिती
In reply to आशादायक ध्रुव ६४ by निनाद
टाटा इलेक्ट्रॉनिक्स एएसएमएल सेमीकंडक्टर करार
टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि डच कंपनी एएसएमएल यांच्यात झालेला सेमीकंडक्टर करार भारतासाठी अत्यंत ऐतिहासिक आहे. या दोन्ही मोठ्या कंपन्या भारतात चिप बनवण्याचा पहिला व्यावसायिक कारखाना सुरू करण्यासाठी एकत्र आल्या आहेत.
चिप बनवण्यासाठी लागणारी अतिप्रगत यंत्रसामग्री तयार करण्यात एएसएमएल ही जगात आघाडीवर आहे. त्यांच्या मदतीने भारत आता केवळ चिपचे डिझाईन न करता प्रत्यक्ष भारतातच चिपची निर्मिती करू शकणार आहे. या करारानुसार नेदरलँड्सची एएसएमएल कंपनी टाटाच्या गुजरात मधील अकरा अब्ज डॉलर्सच्या महाकाय कारखान्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवणार आहे!
पण विरोधकांनी यावर झोड उठवली.
In reply to टाटा इलेक्ट्रॉनिक्स एएसएमएल सेमीकंडक्टर करार by निनाद
भारतात एवढे कंडक्टर असताना परदेशातले कशाला आणायचे असाही टोला मारलाय.
म्या लय वरीस मागं मेल्ऱ्टॉन…
म्या लय वरीस मागं मेल्ऱ्टॉन कंपनीत जायाचो. एकदम सरकारी कंपनी व्हती. १९९९ - २००० च्या सालाला कंपनी बंद पडली. आन लई वरीस पडून व्हती. त्येंचेवाली रहायच्या वेगळ्या जागी मोट्टी रहायची इमारत आली. कंपनी नंतर पाडून टाकली आन त्या जागी कायतरी येगळं बनतंय आता. आपल्यालाबी काय विंट्रेस राहीला नाही का बाबा काय नवीन बनतंय याचं.
बाकी कंपनीतलं ज्येवान लई ग्वाड असायंच. लई पदार्थ असायचे.
महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड!
In reply to म्या लय वरीस मागं मेल्ऱ्टॉन… by पाषाणभेद
मेल्ट्रॉन म्हणजेच महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड! महाराष्ट्र शासनाचा उपक्रम!
महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला चालना देण्यासाठी याची स्थापना करण्यात आली होती. नाशिक मध्ये अंबड भागात मेल्ट्रॉन प्लँट होता..
नाशिकमधील प्लँटमध्ये प्रामुख्याने सेमीकंडक्टर पॉवर डायोड्स झेनर डायोड्स वगैरे उत्पादन केले जायचे. मला वाटते मेल्ट्रॉन कंपनी टेलिफोन सिस्टीम्स पण बनवत होती. नाशिकला इलेक्ट्रॉनिक्स हब बनवण्यात मेल्ट्रॉनचा मोठा वाटा होता. ही नोकरी एक भारीतली नोकरी मानली जात असे.
असो जे काय सरकारी कंपनीचे होते, तेच या कंपनीचे पण झाले... काय करणार!!?