मंत्रिमंडळ बदल : ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या
सुप्रीम लीडर नी भारताच्या इतिहासातील सर्वांत "तरुण" मंत्रिमंडळ म्हणून नवीन मंत्रिमंडळाची निर्मिती काल केली. त्यामुळे सरासरी वय ६१ वरून आता कोवळ्या ५८ ह्या तरुण वयावर येऊन थांबले आहे. ह्या तारुण्याच्या जोशांत नवीन मंत्रिमंडळ भरपूर काम करेल अशी अशा करूया.
मंत्रीमंडळ म्हणे "परफॉर्मन्स" पाहून निर्माण करण्यात आले आहे. काँग्रेस ने ह्यावर प्रचंड आश्चर्य व्यक्त केले. परफॉर्मन्स पाहून मंत्रीपदे बदलणे ह्याचा अर्थ कुणी तरी मंत्री परफॉर्म करत नाही असे मान्य करणे आहे असे श्री शिडंबरम इत्यादींनी म्हटले. परफॉर्मन्स आणि मंत्रिपद ह्यांचा संबंद नक्की काय हे समजण्यास राहुल गांधी ह्यांनी आपल्या भाडोत्री विद्वानांची बैठक बोलावली आहे असे गुप्त सुत्रा कडून मला समजले आहे.
त्याशिवाय सुप्रीम लीडर नि एक नवीन मंत्रालय निर्माण केले आहे "सहकार मंत्रालय". आधीच देशाच्या मृतवत शरीरावर जी अनेक मंत्रीरुपी गिधाडे बसली होती त्यांत आणखीन एकाची भर पडली. कोळसा मंत्रालयाने कोळशाची वाट लावली, विमानवाहूतक मंत्रांनी विमानवाहतूक खड्ड्यांत घातली, वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली आपण बांगलादेश आणि व्हिएतनाम च्या हि खाली आलो. त्यामुळे सहकार मंत्रालय सुद्धा भारत सरकारच्या ह्या गौरवशाली परंपेरला कायम ठेवून सहकार क्षेत्र खड्ड्यांत घालील ह्यांत मला तरी शंका नाही. बारामतीश्रेष्ठिनी ह्या मंत्रिपदाचा धसका घ्यायला पाहिजे.
नवीन मंत्रीपदे कुणाला मिळाली आहेत ह्यापेक्षा कुणा कुणाला नारळ देण्यात आला आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे समजून घेणे मजेशीर आहे.
- डॉक्टर हर्षवर्धन ह्यांना आरोग्यमंत्रालयातून नारळ देण्यात आला आहे.
हा निर्णय अत्यंत योग्य आहे. हर्षवर्धन हे "हात लावीन तिथे आग" ह्या प्रकारचे आहेत. ह्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा दिल्लीचे संपूर्ण पतन झाले. त्यांच्याच नेतृत्वाखाली द्वितीय कोविड ने भारतांत धुमाकूळ घातला. हर्षवर्धन ह्यांनी दुसरी वेव्ह येणार नाही अशी मोदी ह्यांना खात्री दिली होती म्हणूनच मोदी हे गाफील राहिले. आपली गच्छंती होणार हे हर्षवर्धन ह्यांना आधीच समजले असल्याने त्यांनी मागील महिनाभर सर्वत्र मोदी ह्यांच्या पायाखाली लोटांगण घालण्याचे सत्र आरंभले होते. त्यांनीच "हेल मोदी" हे "हेल हिटलर" छाप बिरुद ट्विटर वर वापरायला सुरुवात केली होती. ह्यांची जागा मनसुख मांडवीया ह्यांना देण्यांत आली आहे.
हर्षवर्धन हे गोठ्यात असलेल्या म्हाताऱ्या गायीप्रमाणे आहेत. दूध देणार नसली तरी आपुलकी म्हणून हिला गोठ्यांत जागा दिली जाते. हर्षवर्धन ह्यांच्याकडून काही लक्षवेधी काम भविष्यांत होणारे नाहीच.
- प्रकाश जावडेकर
ह्यांच्या जाण्याने मला प्रचंड दुःख झाले आहे. पूर्णपणे निष्क्रिय असा हा माणूस मोदी सरकारविषयी विनोदाची गंगाच होती. ह्यांची संपूर्ण कारकीर्द हि निष्क्रियतेने भरलेली आहे. MHRD म्हणून ह्यांनी शून्य काम केले आणि वर अभिमानाने "काँग्रेसचाच वारसा आपण चालवत आहोत" असे आम्हाला सांगितले. आपण काही करायचे नाही आणि दिवसभर ट्विटर वरून सुप्रीम लीडर ह्यांना visionary, historic असली विशेषणे लावत भरपूर चाटुकारिता करायची हे एकच काम ह्यांनी आरंभले होते. आता ह्यांची राजकीय कारकीर्द सॅम्पलयांत जमा आहे.
ह्यांच्या कडे नक्की कुठले मंत्रिपद होते हे सुद्धा लक्षांत राहत नव्हते कारण त्याविषयावर ह्यांचे ज्ञान आणि कार्य शून्य होते. त्यांच्या मुलाखती विनोदी बनल्या होत्या आणि मोदी सरकारच्या अकार्यक्षमतेचा चेहेरा म्हणजे जावडेकर बनले होते. ट्विटर वर जावडेकर शोधले तर तुम्हाला जबरदस्त विनोद सापडतील.
- रवी शंकर प्रसाद
जावडेकरांना निष्क्रियतेच्या बाबतीत जर कोणी टक्कर देऊ शकत असेल तर ते हे महापुरुष. निष्क्रियता सोडून द्या उलट काँग्रेस मधील नेते मंडळींचा सल्ला घेऊनच कायदे निर्माण करण्याचे सत्र ह्यांनी आरंभले होते. ह्यांच्या नेतृत्वाखालील नवीन IT कायदे काँग्रेसी खेचरांनीच पुढे रेटले होते. काँग्रेस ची हार आणि सुप्रीम लीडर चा उदय ह्याला प्रमुख कारण म्हणजे सरकारी नियंत्रणापासून दूर असलेली आधुनिक मीडिया हे काँग्रेस च्या नेत्यांनी आतापर्यंत ओळखले आहे आणि आधुनिक मीडिया चे कंबरडे मोडणे आणि सरकारी दंडुक्याची भीती पुंन्हा सामान्य मतदाराच्या हृदयांत घालणे हे काँग्रेस सरकारचे आताचे नवीन ध्येय आहे. सुदैवाने प्रसाद ह्यांनी काँग्रेस चे काम जास्त सुकर केले आणि नवीन IT कायदे पुढे आणले.
ट्विटर ने ह्या कायद्यांचे पालन करण्यास नकार दिल्याने मात्र प्रसाद ह्यांची शोभा तर झालीच पण उलट प्रसाद ह्यांच्यामुळे सुप्रीम लीडर "वीक" वाटतात अशी कुजबुज सुरु झाली. त्याशिवाय भाजपचे IT सेल वाल्यानी सुद्धा म्हणे ह्या नवीन कायद्यावर सुप्रीम लीडर कडे तक्रार केली. पण सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे हे कायदे प्रसाद ह्यांनी नक्की पुढे का रेटले ह्यावरच शंका उत्पन्न झाली होती. बहुतेक वेळा असे दूरगामी कायदे हे सर्व कंपन्यांना विश्वासात घेऊनच केले जातात पण ह्यावेळी तसे घडले नाही आणि सुमारे $३००M च्या भारतीय गुंतवणुकी आता अमेरिकन आणि चिनी कंपन्यांनी पॉज केल्या आहेत. त्याशिवाय अमेरिकन दूतावास आणि विविध CEO ह्यांनी प्रसाद ह्यांच्या कारभारावर बऱ्याच तक्रारी केल्या होत्या म्हणे. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अश्या अविर्भावांत प्रसाद ह्यांनी ट्विटर ला धमकी दिली पण ट्विटर ने अजून कायद्याचे पालन केले नाही तरी प्रसाद विनवणी सोडून आणखीन काहीही करू शकले नव्हते. भाजपच्या आतील वर्तुळाने ट्विटर वर बंदी आणणे भाजपच्या फायद्याचे नाही त्यामुळे जागतिक स्तरावर भारताची नाचक्की तर होईलच पण अमित मालवेर च्या अर्ध्या टीम ला काहीही काम राहणार नाही असे चिंतन केले होते म्हणे. त्याशिवाय तामिळनाडू मधील उदाहरण पाहून ह्या कायद्याने भाजप कार्यकर्त्यांनाच जास्त त्रास होईल असे भाजप समर्थकांचे म्हणणे होते. थोडक्यांत प्रसाद ह्यांनी कुणा काँग्रेस धार्जिण्या माणसांचेच ऐकून हि गडबड केली होती.
प्रसाद ह्यांची राजकीय कार्यकीर्द आता संपल्यांत जमा आहे.
- पोखरीयल
MHRD च्या बाबतीत सुप्रीम लीडर नेहमीच अत्यंत दुर्दैवी ठरले आहेत. किंवा कदाचित बिनकामाच्या व्यक्ती त्यांनी जाणून बुजून इथे पार्क केल्या असाव्यात. आधी स्मृती इराणी MHRD होत्या ज्यांनी आपल्या शिक्षणाच्या बाबतीत खोटे प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यांना अचानक काढून त्यांच्या जागी जावडेकर ह्यांना आणले. ह्यांनी त्या पदावर विक्रमी स्तराची कामचुकारी दाखवली आणि वरून त्याचे समर्थन केले.
त्यानंतर ह्या पोखरीयल ह्या माणसाची नेमणूक झाली. ह्यांचे नाव सुद्धा लक्षांत ठेवणे कठीण होते आणि हि व्यक्ती कालपर्यंत आपण उर्दू भाषेच्या प्रसारासाठी किती मेहनत घेतली आहे ह्याची बतावणी करत होते. आता पोखरीयल ह्यांना दोष देऊन फायदा नाही कारण ह्या मंत्रिपदाचा सुप्रीम लीडर काहीही महत्व देत नाहीत हेच कदाचित त्याचे कारण असावे.
पोखरीयल ह्यांची राजकीय कार्यकीर्द तशी मोठी नाव घेण्यासारखी नव्हतीच.
****
स्म्रिती इराणी - ह्यांना वस्त्रोद्योग मधून काढून आता महिला कल्याणात टाकले आहे. ह्यांची उचलबांगडी वारंवार का होत आहे हे मला एक कोडे आहे. MHRD मध्ये ह्यांनी आधी भरपूर गोधळ घातला असला तरी उत्तरार्धांत त्यांना तेथील कामाची बऱ्यापैकी समज आली होती. RTE ह्या विषयावर गांभीर्याने विचार केलेली हि एकमेव भाजपाची मंत्री. आधी तिने काहीच ऐकून घेण्यास नकार दिला असला तरी शेवटी त्यांनी ह्या विषयांत लक्ष घातले. पण तेंव्हाच त्यांना काढून जावडेकर ह्यांना आणले. आता वस्त्रोद्योगात त्यांचा जम बसला असे वाटत होते तेंव्हाच त्यांना महिला कल्याणात टाकले आहे. हे प्रोमोशन आहे कि डिमोशन समजणे अशक्य आहे.
****
सुप्रीम लीडर ह्यांचे कॅबिनेट मधील टॅलेंट डेफिसिट अतिशय उघड दिसून येत आहे. स्वयंप्रकाशी असे एक दोनच नेते इथे आहेत. त्यांच्यांत सुद्धा विशेष कार्यक्षमता आहे असे दिसत नाही. जेटली, स्वराज, पर्रीकर ह्यांना परमेश्वराने अकाली नेले. त्यांच्यात जी नेतृत्व क्षमता होती ती धमेंद्र प्रधान, राजनाथ सिंग, सीतारामन किंवा पियुष गोयल ह्यांच्यात दिसत नाही. पप्पू च्या आजूबाजूला जो घोळका असतो तसाच हा घोळका वाटतो.
कदाचित सुप्रीम लीडर ना सुद्धा हे ठाऊक आहे. त्यांना कदाचित स्वयंप्रकाशी नेत्यांची भीती तरी वाटत असावी किंवा त्यांना आपली स्वतंत्र बुद्धी आहे हा त्यांच्या साठी अडथळा बनत असावा. त्यामुळे परराष्ट्र खाते सारख्या विभागांत ह्यांनी जुन्या बाबूंना मंत्री म्हणून नेमले आहे. आता सुद्धा विविध मंत्रिपदावर जुने बाबू लोक आहे. ह्यांना हुकूम ऐकून निर्बुद्ध पणे अंमलबजावणी करण्याची सवय असते आणि सुप्रीम लीडर च्या कार्यशैलीला हे कदाचित चांगले वाटत असावे.
नवे मंत्री
तुमची लेखन शैली छान आहे.
In reply to तुमची लेखन शैली छान आहे. by स्वराजित
छान?
In reply to छान? by प्रदीप
याला ज्ञानाच्या भाराने
हम्म साहने
In reply to हम्म साहने by माईसाहेब कुरसूंदीकर
आता तू पेट्रोलियम मंत्री
In reply to हम्म साहने by माईसाहेब कुरसूंदीकर
माई लॉजिक बरोबर.
In reply to माई लॉजिक बरोबर. by कॉमी
विरोधकानी
In reply to हम्म साहने by माईसाहेब कुरसूंदीकर
टेलेन्ट ह्याचा अर्थ पुस्तकी
In reply to टेलेन्ट ह्याचा अर्थ पुस्तकी by साहना
मी पेट्रोलियम मंत्री असते तर
In reply to मी पेट्रोलियम मंत्री असते तर by गॉडजिला
चुकीचे उदाहरण आहे. देशांत
In reply to चुकीचे उदाहरण आहे. देशांत by साहना
अरे खरेच की... अमेझॉनला ऑर्डर दिली की घरपोच पेट्रोल मिळेल ना
In reply to अरे खरेच की... अमेझॉनला ऑर्डर दिली की घरपोच पेट्रोल मिळेल ना by गॉडजिला
अंबानी किंवा ऍमेझॉन सर्व
In reply to अंबानी किंवा ऍमेझॉन सर्व by साहना
:)
In reply to :) by गॉडजिला
स्वीगी झोमॅटो ह्या धंदा
In reply to स्वीगी झोमॅटो ह्या धंदा by एकुलता एक डॉन
बरोबर... एकद तुम्ही यांचे मिंधे बनलात की
In reply to :) by गॉडजिला
काय पिळवणूक केली आहे ?
In reply to काय पिळवणूक केली आहे ? by साहना
काय पिळवणूक केली आहे ?
In reply to काय पिळवणूक केली आहे ? by गॉडजिला
आपल्याला स्पर्धा झाली कि
In reply to आपल्याला स्पर्धा झाली कि by साहना
स्वीगी काय जबरदस्ती करणार ?
उसाच्या फडातल्याला
नवे आरोग्य मंत्री
In reply to नवे आरोग्य मंत्री by कपिलमुनी
असे वाचावे
In reply to नवे आरोग्य मंत्री by कपिलमुनी
जर लोक सन्कटात असताना घरी
In reply to नवे आरोग्य मंत्री by कपिलमुनी
मैलाचा दगड
या मन्त्रीमन्डळाच सर्वात
In reply to या मन्त्रीमन्डळाच सर्वात by रामदास२९
अज्ञानात सुख असते
समर्थन करण्यासाठी
देश आणि महाराष्ट्रात
राम नाईक
In reply to राम नाईक by सौन्दर्य
बरोबर आहे
टॅलेंट डेफिसिट
In reply to टॅलेंट डेफिसिट by डाम्बिस बोका
+ १
तुम्ही केलेले पृथक्करण वरवरचे
In reply to तुम्ही केलेले पृथक्करण वरवरचे by रावसाहेब चिंगभूतकर
> दुसरं म्हणजे जावडेकर आणि
उद्वेग करुन काहीही उपयोग नाही
In reply to उद्वेग करुन काहीही उपयोग नाही by प्रसाद गोडबोले
पर्फेक्ट २
In reply to उद्वेग करुन काहीही उपयोग नाही by प्रसाद गोडबोले
पेट्रोलियम पदार्थांच्या किमती
In reply to पेट्रोलियम पदार्थांच्या किमती by साहना
उलट मागणी कमी होऊन
In reply to उलट मागणी कमी होऊन by प्रसाद गोडबोले
तुम्ही कसे काय बुवा गेर तोशाव
पेट्रोल का महाग आहे फक्त भारतात
In reply to पेट्रोल का महाग आहे फक्त भारतात by Rajesh188
तुम्ही बिडिंग का केलं नाही
अतिशय कमजोर सरकार भारताच्या
In reply to अतिशय कमजोर सरकार भारताच्या by नावातकायआहे
सोडून द्या. अज्ञानी
तेच-तेच मुद्दे वाचून कंटाळा
काय हिरा शोधला आहे
अश्वीनी वैष्णव
In reply to अश्वीनी वैष्णव by बाजीगर
ह्यांत सिमेन्स चे VP हे एकच
In reply to ह्यांत सिमेन्स चे VP हे एकच by साहना
का बुवा
In reply to का बुवा by माईसाहेब कुरसूंदीकर
आयआयटी गोल्ड मेडल मिळालं
In reply to आयआयटी गोल्ड मेडल मिळालं by Rajesh188
येथे
In reply to का बुवा by माईसाहेब कुरसूंदीकर
> आय आय टी कानपूरला प्रवेश
In reply to > आय आय टी कानपूरला प्रवेश by साहना
माझ्या दृष्टिकोनातून साधा
In reply to अश्वीनी वैष्णव by बाजीगर
श्री. राजीव चंद्रशेखर
In reply to श्री. राजीव चंद्रशेखर by नावातकायआहे
आशियानेट हि मीडिया कंपनी
बुडणारे जहाज
राणेंवर असलेला राग सर्व
राणेंना बळी कुणी बनवले?
पुलाव
In reply to पुलाव by माईसाहेब कुरसूंदीकर
> पेट्रोल्/डिझेलच्या किंमती
In reply to > पेट्रोल्/डिझेलच्या किंमती by साहना
सरकारी असेट विकून टॅक्स मनी
In reply to सरकारी असेट विकून टॅक्स मनी by कॉमी
बरोबर
In reply to बरोबर by माईसाहेब कुरसूंदीकर
जनता सरकारी उत्पन्न साठी नाही
In reply to जनता सरकारी उत्पन्न साठी नाही by साहना
मग
In reply to मग by माईसाहेब कुरसूंदीकर
ज्या गोष्टी "पब्लिक गुड्स"
In reply to ज्या गोष्टी "पब्लिक गुड्स" by साहना
वोव
In reply to वोव by गॉडजिला
स्कुल व्हाऊचर सिस्टम काही
In reply to स्कुल व्हाऊचर सिस्टम काही by साहना
धन्यवाद
In reply to जनता सरकारी उत्पन्न साठी नाही by साहना
सरसकटिकरण आणि उद्वेग
In reply to > पेट्रोल्/डिझेलच्या किंमती by साहना
"त्याच पद्धतीने पेट्रोल आणि
In reply to "त्याच पद्धतीने पेट्रोल आणि by सुक्या
हे सध्या कायद्याने गुन्हा आहे
In reply to Lol तुमचे प्रतिसाद आताशा १८८ प्रभुंशी स्पर्धा करू लागलेत :) by रंगीला रतन
पेट्रोल चे भाव
In reply to पेट्रोल चे भाव by Rajesh188
वरची पोस्ट लिहत असताना चुका झाल्या
In reply to वरची पोस्ट लिहत असताना चुका झाल्या by Rajesh188
जिथे मागणी जास्त तिथे दर
सरकार कुठे खर्च करते
- प्रकाश जावडेकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Aaj Phir Full Video Song | Hate Story 2 | Arijit Singh | Jay Bhanushali | Surveen ChawlaIn reply to - प्रकाश जावडेकर by मदनबाण
हम्म
In reply to - प्रकाश जावडेकर by मदनबाण
मला पण फार प्रचंड दुःख झाले
मला पण फार प्रचंड दुःख झाले आहे,इतक्या निष्क्रिय माणसाला पद सोडायला सांगतात म्हणजे फार मोठी चूक आहे ! :)))अगागा :) =)) =))सहाना जी अन Rajesh188
In reply to सहाना जी अन Rajesh188 by गॉडजिला
अगम्य तुलना
In reply to अगम्य तुलना by प्रदीप
तुमचा काहीतरी गोधळ झालाय
In reply to अगम्य तुलना by प्रदीप
माझे लेखन थोडे तावातावाने
In reply to माझे लेखन थोडे तावातावाने by साहना
तुम्ही जे बोलत आहात ते फक्त प्रकाश मध्ये असणारे आहे
In reply to माझे लेखन थोडे तावातावाने by साहना
तुम्ही च विचार करा.
In reply to तुम्ही च विचार करा. by Rajesh188
नेहमीप्रमाणेच
In reply to नेहमीप्रमाणेच by प्रदीप
+ १
हा तुमचा, ज्या विषयावर आपण लिहीतो आहोत, त्याची कसलीही धड माहिती न घेता लिहीलेला अजून एक प्रतिसाद आहे. ह्यांत नवीन काही नाही, पण तुम्ही असे करतांना अतिशय मूर्ख व निरर्गल आरोप इतरांवर करता, तेव्हा कधीतरी उत्तर देणे भाग पडते.+ १ कोणत्याही विषयातील कणभरही माहिती नसूनही तेच तेच वारंवार ठोकून देण्याचे श्री श्री १८८ यांचे कौशल्य अतुलनीय आहे.In reply to नेहमीप्रमाणेच by प्रदीप
तुमच्या इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्या
In reply to तुमच्या इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्या by गॉडजिला
मी माझ्या मालकीची जागा एका
In reply to मी माझ्या मालकीची जागा एका by श्रीगुरुजी
फक्त हे सर्व विद्यार्थी आता
In reply to फक्त हे सर्व विद्यार्थी आता by गॉडजिला
ये फिर गडबडा...
In reply to ये फिर गडबडा... by प्रदीप
पुन्हा चूक
In reply to फक्त हे सर्व विद्यार्थी आता by गॉडजिला
तुमचा क्लास सोडून तुमच्या
तुमचा क्लास सोडून तुमच्या भाडेकरूंच्या क्लासला शिफ्ट झाले आहेत...मुळात माझी जागा रिकामी होती. माझा तेथे क्लास किंवा इतर कोणताही व्यवसाय नव्हता. मी एका गुरूजींना माझी जागा भाड्याने देऊन माझ्या उत्पन्नाची सोय केली. ते गुरूजी पहिली दुसरीच्या शिकवण्या घेणार की आयआयटीचे क्लास घेणार हा निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही. नाही. त्यांनी कोणते विषय शिकवावे, शुल्क किती आकारावे, एका वर्गात किती संख्या असावी हे ठरविण्याचा सुद्धा मला अधिकार नाही.In reply to तुमच्या इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्या by गॉडजिला
लुटतात?
In reply to लुटतात? by चंद्रसूर्यकुमार
बास हो
In reply to बास हो by गॉडजिला
मुद्दा तोच आहे
In reply to मुद्दा तोच आहे by चंद्रसूर्यकुमार
लिहते रहा
In reply to तुमच्या इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्या by गॉडजिला
काही लिहिताना किमान बेसिक
In reply to काही लिहिताना किमान बेसिक by साहना
ऍडव्हान्स रिसर्च करूनच विधान केले आहे
In reply to ऍडव्हान्स रिसर्च करूनच विधान केले आहे by गॉडजिला
वस्तूस्तिथी ही आहे की खाजगी
In reply to वस्तूस्तिथी ही आहे की खाजगी by गॉडजिला
खाजगी कंपनी आणि जीओ ह्यात
आपल्याला, अनेक गोष्टी
आपल्याला, अनेक गोष्टी सरकारनेच पुरवल्या पाहिजेत असे नेहमीच ठामपणे वाटत आलेले आहे. पूर्वापारची संवंय हे एकभारतात लोकशाही ही स्वकीय राजेशाही उलथवून झालेल्या क्रांतीने निर्माण झालेली नाही त्यामुळे लोकशाहीतही जनता स्वतःला तशी कमजोरच समजते सत्ताधाऱ्यापुढे... त्यातूनच सरकारनेच काही करावे ही भावना वाढीस लागते ही मानसिकता बदलायला अजूनही वेळ जाईल विशेषतः हजारो वर्षे राजेशाहीत काढल्यावर मानसिकता सहज बदलत नसतेव खाजगी कंपन्या जनतेला लुटायलाच आलेल्या आहेत, हा खास समजावादाच्या पगड्यांतून आलेला गैरसमज, हे दुसरे-- अशी दोन कारणे आपल्याला, थोडीतरी बाजूला ठेवता येतील काय?खाजगी कंपन्या समाजकल्याणासाठी स्थापल्या आहेत हे ही भाबड्या जनतेला समजायला थोडा वेळ द्यावा गुरुजीIn reply to आपल्याला, अनेक गोष्टी by गॉडजिला
हम्म्......
In reply to हम्म्...... by प्रदीप
मी बीएसएन एल वापरतो
In reply to मी बीएसएन एल वापरतो by गॉडजिला
परत एकदा...
In reply to परत एकदा... by प्रदीप
१. बहुतांश नव्हे, सर्वच खाजगी
In reply to १. बहुतांश नव्हे, सर्वच खाजगी by गॉडजिला
पुन्हा चूक?
In reply to पुन्हा चूक? by प्रदीप
:)
In reply to :) by गॉडजिला
अधिक उजेडासाठी
In reply to मी बीएसएन एल वापरतो by गॉडजिला
> हेच सांगा की बहुतांश खाजगी
In reply to > हेच सांगा की बहुतांश खाजगी by साहना
उदाहरण म्हणजे अमेझॉन, गुगल
In reply to उदाहरण म्हणजे अमेझॉन, गुगल by गॉडजिला
बरं या खाजगी कंपन्या इतक्या बलाढ्य व धनाड्य आहेत
In reply to आपल्याला, अनेक गोष्टी by गॉडजिला
शिंपल गोष्ट
In reply to शिंपल गोष्ट by चंद्रसूर्यकुमार
मला कळत नाही मी खाजगी मक्तेदारी विरोधात आहे
मते आणि लेखनशैली
प्रदीप याNइ साहनाजी
In reply to प्रदीप याNइ साहनाजी by आनन्दा
सल्ला मान्य आहे. ह्यावर
लिहिते राहा.
परिपूर्ण ज्ञान असणारा ह्या जगात तरी कोणी नाही
In reply to परिपूर्ण ज्ञान असणारा ह्या जगात तरी कोणी नाही by Rajesh188
लिहते रहा
In reply to परिपूर्ण ज्ञान असणारा ह्या जगात तरी कोणी नाही by Rajesh188
आफ्रिकेतील गरीब देशात भांडवल
भारताचा विचार केला तर
In reply to भारताचा विचार केला तर by Rajesh188
नका हो असं बोलून
In reply to भारताचा विचार केला तर by Rajesh188
सरकारी उद्योग
In reply to सरकारी उद्योग by गॉडजिला
सरकारी उद्योग भांडवलदारांच्या
In reply to सरकारी उद्योग भांडवलदारांच्या by सॅगी
मी नक्की काय बोललो समजले नाही ?
In reply to मी नक्की काय बोललो समजले नाही ? by गॉडजिला
मी दिलेली ऊदाहरणे समजली नाहीत?
In reply to मी दिलेली ऊदाहरणे समजली नाहीत? by सॅगी
विषय मिटला
In reply to विषय मिटला by गॉडजिला
ऊदाहरणे समजून घ्यायची नव्हती म्हणून विषय मिटवला
In reply to ऊदाहरणे समजून घ्यायची नव्हती म्हणून विषय मिटवला by सॅगी
हरकत नाही
In reply to हरकत नाही by गॉडजिला
हरकत नाही
In reply to हरकत नाही by सॅगी
हरकत नाही
In reply to हरकत नाही by गॉडजिला
हरकत नाही
In reply to हरकत नाही by सॅगी
हरकत नाही
In reply to हरकत नाही by गॉडजिला
हरकत नाही
In reply to हरकत नाही by सॅगी
तुमची हरकत आहे का ?
In reply to तुमची हरकत आहे का ? by गॉडजिला
सर्वांना
In reply to सर्वांना by सॅगी
पूर्व दिशेला
In reply to सरकारी उद्योग by गॉडजिला
अमेरिकेत लिबरटेरियन लोक इतकं
In reply to अमेरिकेत लिबरटेरियन लोक इतकं by कॉमी
USPS ३० वर्षे मागेच बंद
In reply to USPS ३० वर्षे मागेच बंद by साहना
हा हा हा
In reply to USPS ३० वर्षे मागेच बंद by साहना
संथ गतीने हे मान्य
In reply to संथ गतीने हे मान्य by सौन्दर्य
अमेरिकेत राहून भारताचा अनुभव
In reply to अमेरिकेत राहून भारताचा अनुभव by गॉडजिला
अमेरिकन कायद्याप्रमाणे USPS
In reply to अमेरिकन कायद्याप्रमाणे USPS by साहना
खायला तिकडे अन पादायला इकडे
अमेरिकन कायद्याप्रमाणे USPS ला पत्रांची मोनोपॉली आहे. फेडेक्स वगैरे पत्रे पाठवत नाहीत त्यामुळे कुणाला पत्र वगैरे पाठवायचे असेल आणि त्याची व्यवस्थित रिसीट हवी असेल तर USPS सोडून पर्याय नाही.जर नाईलाज म्हणुन तुम्ही त्या घाणेरड्या संस्थेत जाता मग सरळ तसेच लिहा की कशाला उगाचअमेरिकेत राहून भारताचा अनुभव हवा असेल तर मी नेहमीच ह्या घाणेरड्या संस्थेत जाते.अशी गरळ ओकायची? त्यातुन आमची अमेरीका कित्ती कित्ती छान आणी तुमचा भारत कसा घाण हे दाखवायला? आमच्या इथे बोलीभाषेत एक म्हण आहे खायला तिकडे अन पादायला इकडे तसं झालं की हे. मिपा सारखी तिकडेही काही संस्थळे असतील की, लिहा त्यावर या मोनोपॅाली विरोधात अमेरीकन जनतेला प्रोव्होक करणारे लेख, करा USPS च्या खाजगीकरणाची मागणी, नोंदवा अमेरीकन सरकारचा निषेध.माझी भांडणे सर्वत्र होत असल्याने बऱ्याच वेळा असल्या नोटिसा पाठविण्यासाठी मला USPS मध्ये जावे लागते.ही तुमची वैयक्तिक समस्या आहे त्याचं फ्रस्ट्रेशन काढायला उगा भारताला कशाला मधे आणता?In reply to खायला तिकडे अन पादायला इकडे by रंगीला रतन
सहमत
In reply to सहमत by गुल्लू दादा
+१
In reply to सहमत by गुल्लू दादा
USPS हे अमेरिकन पोस्ट खाते
In reply to USPS हे अमेरिकन पोस्ट खाते by साहना
चोराच्या उलट्या बंबा
In reply to चोराच्या उलट्या बंबा by गॉडजिला
> USPS ३० वर्षे मागेच बंद
In reply to > USPS ३० वर्षे मागेच बंद by साहना
ज्या दिवशी मी माझ्या आकलन शक्तीला आपणास जबाबदार धरेन