Skip to main content

मंत्रिमंडळ बदल : ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या

लेखक साहना यांनी गुरुवार, 08/07/2021 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रीम लीडर नी भारताच्या इतिहासातील सर्वांत "तरुण" मंत्रिमंडळ म्हणून नवीन मंत्रिमंडळाची निर्मिती काल केली. त्यामुळे सरासरी वय ६१ वरून आता कोवळ्या ५८ ह्या तरुण वयावर येऊन थांबले आहे. ह्या तारुण्याच्या जोशांत नवीन मंत्रिमंडळ भरपूर काम करेल अशी अशा करूया. मंत्रीमंडळ म्हणे "परफॉर्मन्स" पाहून निर्माण करण्यात आले आहे. काँग्रेस ने ह्यावर प्रचंड आश्चर्य व्यक्त केले. परफॉर्मन्स पाहून मंत्रीपदे बदलणे ह्याचा अर्थ कुणी तरी मंत्री परफॉर्म करत नाही असे मान्य करणे आहे असे श्री शिडंबरम इत्यादींनी म्हटले. परफॉर्मन्स आणि मंत्रिपद ह्यांचा संबंद नक्की काय हे समजण्यास राहुल गांधी ह्यांनी आपल्या भाडोत्री विद्वानांची बैठक बोलावली आहे असे गुप्त सुत्रा कडून मला समजले आहे. त्याशिवाय सुप्रीम लीडर नि एक नवीन मंत्रालय निर्माण केले आहे "सहकार मंत्रालय". आधीच देशाच्या मृतवत शरीरावर जी अनेक मंत्रीरुपी गिधाडे बसली होती त्यांत आणखीन एकाची भर पडली. कोळसा मंत्रालयाने कोळशाची वाट लावली, विमानवाहूतक मंत्रांनी विमानवाहतूक खड्ड्यांत घातली, वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली आपण बांगलादेश आणि व्हिएतनाम च्या हि खाली आलो. त्यामुळे सहकार मंत्रालय सुद्धा भारत सरकारच्या ह्या गौरवशाली परंपेरला कायम ठेवून सहकार क्षेत्र खड्ड्यांत घालील ह्यांत मला तरी शंका नाही. बारामतीश्रेष्ठिनी ह्या मंत्रिपदाचा धसका घ्यायला पाहिजे. नवीन मंत्रीपदे कुणाला मिळाली आहेत ह्यापेक्षा कुणा कुणाला नारळ देण्यात आला आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे समजून घेणे मजेशीर आहे. - डॉक्टर हर्षवर्धन ह्यांना आरोग्यमंत्रालयातून नारळ देण्यात आला आहे. हा निर्णय अत्यंत योग्य आहे. हर्षवर्धन हे "हात लावीन तिथे आग" ह्या प्रकारचे आहेत. ह्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा दिल्लीचे संपूर्ण पतन झाले. त्यांच्याच नेतृत्वाखाली द्वितीय कोविड ने भारतांत धुमाकूळ घातला. हर्षवर्धन ह्यांनी दुसरी वेव्ह येणार नाही अशी मोदी ह्यांना खात्री दिली होती म्हणूनच मोदी हे गाफील राहिले. आपली गच्छंती होणार हे हर्षवर्धन ह्यांना आधीच समजले असल्याने त्यांनी मागील महिनाभर सर्वत्र मोदी ह्यांच्या पायाखाली लोटांगण घालण्याचे सत्र आरंभले होते. त्यांनीच "हेल मोदी" हे "हेल हिटलर" छाप बिरुद ट्विटर वर वापरायला सुरुवात केली होती. ह्यांची जागा मनसुख मांडवीया ह्यांना देण्यांत आली आहे. हर्षवर्धन हे गोठ्यात असलेल्या म्हाताऱ्या गायीप्रमाणे आहेत. दूध देणार नसली तरी आपुलकी म्हणून हिला गोठ्यांत जागा दिली जाते. हर्षवर्धन ह्यांच्याकडून काही लक्षवेधी काम भविष्यांत होणारे नाहीच. - प्रकाश जावडेकर ह्यांच्या जाण्याने मला प्रचंड दुःख झाले आहे. पूर्णपणे निष्क्रिय असा हा माणूस मोदी सरकारविषयी विनोदाची गंगाच होती. ह्यांची संपूर्ण कारकीर्द हि निष्क्रियतेने भरलेली आहे. MHRD म्हणून ह्यांनी शून्य काम केले आणि वर अभिमानाने "काँग्रेसचाच वारसा आपण चालवत आहोत" असे आम्हाला सांगितले. आपण काही करायचे नाही आणि दिवसभर ट्विटर वरून सुप्रीम लीडर ह्यांना visionary, historic असली विशेषणे लावत भरपूर चाटुकारिता करायची हे एकच काम ह्यांनी आरंभले होते. आता ह्यांची राजकीय कारकीर्द सॅम्पलयांत जमा आहे. ह्यांच्या कडे नक्की कुठले मंत्रिपद होते हे सुद्धा लक्षांत राहत नव्हते कारण त्याविषयावर ह्यांचे ज्ञान आणि कार्य शून्य होते. त्यांच्या मुलाखती विनोदी बनल्या होत्या आणि मोदी सरकारच्या अकार्यक्षमतेचा चेहेरा म्हणजे जावडेकर बनले होते. ट्विटर वर जावडेकर शोधले तर तुम्हाला जबरदस्त विनोद सापडतील. - रवी शंकर प्रसाद जावडेकरांना निष्क्रियतेच्या बाबतीत जर कोणी टक्कर देऊ शकत असेल तर ते हे महापुरुष. निष्क्रियता सोडून द्या उलट काँग्रेस मधील नेते मंडळींचा सल्ला घेऊनच कायदे निर्माण करण्याचे सत्र ह्यांनी आरंभले होते. ह्यांच्या नेतृत्वाखालील नवीन IT कायदे काँग्रेसी खेचरांनीच पुढे रेटले होते. काँग्रेस ची हार आणि सुप्रीम लीडर चा उदय ह्याला प्रमुख कारण म्हणजे सरकारी नियंत्रणापासून दूर असलेली आधुनिक मीडिया हे काँग्रेस च्या नेत्यांनी आतापर्यंत ओळखले आहे आणि आधुनिक मीडिया चे कंबरडे मोडणे आणि सरकारी दंडुक्याची भीती पुंन्हा सामान्य मतदाराच्या हृदयांत घालणे हे काँग्रेस सरकारचे आताचे नवीन ध्येय आहे. सुदैवाने प्रसाद ह्यांनी काँग्रेस चे काम जास्त सुकर केले आणि नवीन IT कायदे पुढे आणले. ट्विटर ने ह्या कायद्यांचे पालन करण्यास नकार दिल्याने मात्र प्रसाद ह्यांची शोभा तर झालीच पण उलट प्रसाद ह्यांच्यामुळे सुप्रीम लीडर "वीक" वाटतात अशी कुजबुज सुरु झाली. त्याशिवाय भाजपचे IT सेल वाल्यानी सुद्धा म्हणे ह्या नवीन कायद्यावर सुप्रीम लीडर कडे तक्रार केली. पण सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे हे कायदे प्रसाद ह्यांनी नक्की पुढे का रेटले ह्यावरच शंका उत्पन्न झाली होती. बहुतेक वेळा असे दूरगामी कायदे हे सर्व कंपन्यांना विश्वासात घेऊनच केले जातात पण ह्यावेळी तसे घडले नाही आणि सुमारे $३००M च्या भारतीय गुंतवणुकी आता अमेरिकन आणि चिनी कंपन्यांनी पॉज केल्या आहेत. त्याशिवाय अमेरिकन दूतावास आणि विविध CEO ह्यांनी प्रसाद ह्यांच्या कारभारावर बऱ्याच तक्रारी केल्या होत्या म्हणे. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अश्या अविर्भावांत प्रसाद ह्यांनी ट्विटर ला धमकी दिली पण ट्विटर ने अजून कायद्याचे पालन केले नाही तरी प्रसाद विनवणी सोडून आणखीन काहीही करू शकले नव्हते. भाजपच्या आतील वर्तुळाने ट्विटर वर बंदी आणणे भाजपच्या फायद्याचे नाही त्यामुळे जागतिक स्तरावर भारताची नाचक्की तर होईलच पण अमित मालवेर च्या अर्ध्या टीम ला काहीही काम राहणार नाही असे चिंतन केले होते म्हणे. त्याशिवाय तामिळनाडू मधील उदाहरण पाहून ह्या कायद्याने भाजप कार्यकर्त्यांनाच जास्त त्रास होईल असे भाजप समर्थकांचे म्हणणे होते. थोडक्यांत प्रसाद ह्यांनी कुणा काँग्रेस धार्जिण्या माणसांचेच ऐकून हि गडबड केली होती. प्रसाद ह्यांची राजकीय कार्यकीर्द आता संपल्यांत जमा आहे. - पोखरीयल MHRD च्या बाबतीत सुप्रीम लीडर नेहमीच अत्यंत दुर्दैवी ठरले आहेत. किंवा कदाचित बिनकामाच्या व्यक्ती त्यांनी जाणून बुजून इथे पार्क केल्या असाव्यात. आधी स्मृती इराणी MHRD होत्या ज्यांनी आपल्या शिक्षणाच्या बाबतीत खोटे प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यांना अचानक काढून त्यांच्या जागी जावडेकर ह्यांना आणले. ह्यांनी त्या पदावर विक्रमी स्तराची कामचुकारी दाखवली आणि वरून त्याचे समर्थन केले. त्यानंतर ह्या पोखरीयल ह्या माणसाची नेमणूक झाली. ह्यांचे नाव सुद्धा लक्षांत ठेवणे कठीण होते आणि हि व्यक्ती कालपर्यंत आपण उर्दू भाषेच्या प्रसारासाठी किती मेहनत घेतली आहे ह्याची बतावणी करत होते. आता पोखरीयल ह्यांना दोष देऊन फायदा नाही कारण ह्या मंत्रिपदाचा सुप्रीम लीडर काहीही महत्व देत नाहीत हेच कदाचित त्याचे कारण असावे. पोखरीयल ह्यांची राजकीय कार्यकीर्द तशी मोठी नाव घेण्यासारखी नव्हतीच. **** स्म्रिती इराणी - ह्यांना वस्त्रोद्योग मधून काढून आता महिला कल्याणात टाकले आहे. ह्यांची उचलबांगडी वारंवार का होत आहे हे मला एक कोडे आहे. MHRD मध्ये ह्यांनी आधी भरपूर गोधळ घातला असला तरी उत्तरार्धांत त्यांना तेथील कामाची बऱ्यापैकी समज आली होती. RTE ह्या विषयावर गांभीर्याने विचार केलेली हि एकमेव भाजपाची मंत्री. आधी तिने काहीच ऐकून घेण्यास नकार दिला असला तरी शेवटी त्यांनी ह्या विषयांत लक्ष घातले. पण तेंव्हाच त्यांना काढून जावडेकर ह्यांना आणले. आता वस्त्रोद्योगात त्यांचा जम बसला असे वाटत होते तेंव्हाच त्यांना महिला कल्याणात टाकले आहे. हे प्रोमोशन आहे कि डिमोशन समजणे अशक्य आहे. **** सुप्रीम लीडर ह्यांचे कॅबिनेट मधील टॅलेंट डेफिसिट अतिशय उघड दिसून येत आहे. स्वयंप्रकाशी असे एक दोनच नेते इथे आहेत. त्यांच्यांत सुद्धा विशेष कार्यक्षमता आहे असे दिसत नाही. जेटली, स्वराज, पर्रीकर ह्यांना परमेश्वराने अकाली नेले. त्यांच्यात जी नेतृत्व क्षमता होती ती धमेंद्र प्रधान, राजनाथ सिंग, सीतारामन किंवा पियुष गोयल ह्यांच्यात दिसत नाही. पप्पू च्या आजूबाजूला जो घोळका असतो तसाच हा घोळका वाटतो. कदाचित सुप्रीम लीडर ना सुद्धा हे ठाऊक आहे. त्यांना कदाचित स्वयंप्रकाशी नेत्यांची भीती तरी वाटत असावी किंवा त्यांना आपली स्वतंत्र बुद्धी आहे हा त्यांच्या साठी अडथळा बनत असावा. त्यामुळे परराष्ट्र खाते सारख्या विभागांत ह्यांनी जुन्या बाबूंना मंत्री म्हणून नेमले आहे. आता सुद्धा विविध मंत्रिपदावर जुने बाबू लोक आहे. ह्यांना हुकूम ऐकून निर्बुद्ध पणे अंमलबजावणी करण्याची सवय असते आणि सुप्रीम लीडर च्या कार्यशैलीला हे कदाचित चांगले वाटत असावे.

वाचने 57669
प्रतिक्रिया 206

प्रतिक्रिया

काहीही असले तरी सरबानंद सोनोवालांना केंद्रीय मंत्री केले यामुळे बरे वाटले. संघाची पार्श्वभूमी नसलेले आणि पूर्वी बरेचसे राजकारण इतर पक्षात केलेले सोनोवालांसारखे चांगले नेते पक्षात घेतले त्याला दहा वर्षे झाली. आता घरी घेतात ते कृपाशंकरसिंग, विजयसिंग मोहिते पाटील, गणेश नाईक आणि पदमसिंग पाटील यांच्यासारखे लोक. रेल्वेमंत्री म्हणूनही अश्विनी वैष्णव या टेक्नोक्रॅटला नेमले आहे ते चांगले झाले. कधीतरी रेल्वेचेही खाजगीकरणच व्हावे असे फार वाटते पण ते पुढील काही दशके तरी होणे नाही. तेव्हा रेल्वेमंत्री म्हणून कोणा राजकारण्याला न नेमता टेक्नोक्रॅटला नेमावे असेही फार वर्षांपासून वाटायचे. ते आता झाले आहे ही चांगली गोष्ट आहे. मीनाक्षी लेखींना पण मंत्री केले हे चांगले झाले असे आता तरी वाटत आहे. पी.एन.लेखी या बर्‍यापैकी पुरोगामी वकीलाचा मुलगा अमन आणि सून मीनाक्षी दोघेही तसे नाहीत हे चांगले आहे. निष्क्रीय हर्षवर्धन यांच्यानंतर दिल्लीतून काहीतरी करणारी मंत्री मिळेल अशी अपेक्षा. पुढे काय होते ते बघू.

In reply to by स्वराजित

मला तर वाटते की त्यांची मते विचारांत घेण्यासारखी असतात. पण तिरकस व बहुधा, त्यांच्या दृष्टिने विनोदी, लेखनशैलीमुळे लेखाची प्रत कमी होते. असो.

In reply to by प्रदीप

वाहून जाणे असे म्हणतात... म्हणजे व्यक्तीचे मुद्दे विचारायोग्य असतात पण तिरकसपणामुळे व्यक्ती गांभीर्याने घेतली जात नाही

सुप्रीम लीडर ह्यांचे कॅबिनेट मधील टॅलेंट डेफिसिट अतिशय उघड दिसून येत आहे.
अग साहने, लोकशाही देशात हे असेच होत असते. मनमोहन सिंगात गुणवत्ता कमी होती का? अर्थशास्त्र कोळून प्यायलेली व्यक्ती आहे ती. शशी थरूर कमी हुशार होते? पृथ्विराज चव्हाण हुशार नाहीत? सुरेश प्रभु कमी हुशार होते? एखादा गुणवत्त्ता असलेला अभियंता उत्तम सी ई ओ होतोच असे नाही. तसेच येथे आहे. 'निवडून येणे म्हणजे कार्यक्षंम असणे' असे लोक्शाहीत मानले जाते. खात्यात यशस्वी रित्या काम करण्यासाठी फक्त व्यक्तिगत गुणवत्त्ता पुरेशी नसते.त्यामुळे "अमुक मंत्र्याने काहीच केले नाही" वगैरेला काही अर्थ नसतो. धर्मेंद्र प्रधान ह्यांचे उदाहरण्न घे. भारत ८२ ते ८३% तेल आयात करतो. जेव्हा तेलाची किंमत १$ ने वाढते तेव्हा भारताला साधारण ५००० कोटी रुपये जास्त मोजावे लागतात. आधीच प्रचंड कर्ज असते. आता तू पेट्रोलियम मंत्री झालीस तर तू काय वेगळे करशील ते येथे सांग

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आता तू पेट्रोलियम मंत्री झालीस तर तू काय वेगळे करशील ते येथे सांग
बुल्सआय माई... माई तुम्हीसुद्धा आता स्कुटी ऐवजी सायकल वापरायला सुरुवात करा ;)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई लॉजिक बरोबर. पण भाजपाने पेट्रोल डिझेल मुद्द्यावर लोकांच्या अजुनी लक्षात राहील इतका दंगा केला होता, मग विरोधक का गप्प बसणार ?

In reply to by कॉमी

विरोधकानी आवाज उठवलाच पाहिजे. पण साहना बुद्धिमंत आहे व विरोधक्/समर्थक नाही असे आमचे आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

टेलेन्ट ह्याचा अर्थ पुस्तकी ज्ञान असा घेऊ नये. मनमोहन सिंग ह्याना काही डिग्र्या होत्या पण मूलभूत अर्थशास्त्राचे त्यांना खूप ज्ञान होते असे वाटत नाही कारण आर्थिक दृष्टया त्यांच्या निर्णयांचे वाभाडे सर्वानीच काढले होते. थरूर सुद्धा इंग्रजी चांगले बोलत असले तरी पोरींना पटवणे ह्या व्यतिरिक्त त्यांना काही टॅलेंट आहे असे नाही. ह्या उलट शरद पवार किंवा नितीन गडकरी आहेत. ह्यांना काय शिक्षण आहे किंवा हे काय बोलतात ह्यापेक्षा अनेक गोष्टी घडवून आणण्याचे खूप टॅलेंट आहे. > खात्यात यशस्वी रित्या काम करण्यासाठी फक्त व्यक्तिगत गुणवत्त्ता पुरेशी नसते. वैयक्तिक नेतृत्वक्षमता अत्यंत महत्वाची असते.म्हणून पर्रीकरांना मोदींनी मुद्दाम हुन दिल्लीत नेले. ते खासदार सुद्धा नव्हते. वाजपेयी सरकारातील शॉरी, महाजन, जसवंत सिंग, सिन्हा खूपच कार्यक्षम व्यक्ती होत्या. मुंबईतील सेंटॉर हॉटेल विकणे शौरी सोडून आणखीन कुणाला शक्य सुद्धा नव्हते. त्यांनी निर्गुंतवणुकीचा जो पाय घातला त्यावर आजलाकची निर्गुंतवणूक होते. > धर्मेंद्र प्रधान ह्यांचे उदाहरण्न घे. भारत ८२ ते ८३% तेल आयात करतो. जेव्हा तेलाची किंमत १$ ने वाढते तेव्हा भारताला साधारण ५००० कोटी रुपये जास्त मोजावे लागतात. आधीच प्रचंड कर्ज असते. आता तू पेट्रोलियम मंत्री झालीस तर तू काय वेगळे करशील ते येथे सांग खयाली पुलाव खायचाच आहे तर आपण वाट्टेल तितके मसाले घालू. मी पेट्रोलियम मंत्री असते तर सर्वप्रथम पेट्रोलियम मंत्रालय बंद करण्याचा निर्णय घेतला असता. पेट्रोलियम हा एक कच्चा माल असून इतर लक्षावधी आयात माला प्रमाणेच आहे. ह्याच्यासाठी वेगळे मंत्रालय ठेवणे हीच चूक आहे आणि आज काळ ह्या क्षेत्रांत ज्या समस्या आम्हाला सहन कराव्या लागतात त्याला कारणीभूत पेट्रोलियम मंत्रालयच आहे. ह्यावर मी विस्तृत पणे मिपा वर लिहिले होते असे मला आठवते पण लिंक सापडत नाही. अमेरिकेत तथाकथित 'ऊर्जा मंत्रालय" आहे. हे बंद करण्याचा सल्ला मिल्टन फ्रीडमन ह्यांनी दिला होता आणि त्यावर विस्तृत पणे त्यांनी व्यख्यान दिले होते. तेच मुद्दे भारताला सुद्धा लागू पडतात. देशांतील कच्या तेलाची कमतरता, त्याचे कडाडलेले भाव आणि निकृष्ट दर्जाची सेवा (पम्प वरील) ह्याला कारणीभूत भारत सरकार आणि पेट्रोलियम मंत्रालय आहे ह्यांत शंकाच नाही. जपान सुद्धा १००% तेल आयात करतो. त्यांना कशी बरे काहीच समस्या होत नाही ? https://www.youtube.com/watch?v=mEEU1d8Cz7M

In reply to by साहना

मी पेट्रोलियम मंत्री असते तर सर्वप्रथम पेट्रोलियम मंत्रालय बंद करण्याचा निर्णय घेतला असता.
या दोन ओळि विरोधाभासी आहेत... मी मासा असतो तर सर्वप्रथम समुद्र आटवायचा निर्णय घेतला असता म्हणजे मासेमारी समुळ बंद करता येइल.

In reply to by गॉडजिला

चुकीचे उदाहरण आहे. देशांत पेट्रोलियम उद्योग पेट्रोलियम मंत्रालयामुळे आहे असे म्हणायचे आहे का ? हे मंत्रालय नसते तर विदेशांतून पेट्रोलियम पदार्थ कसे आणायचे आणि विकायचे ह्याचे ज्ञान भारतीय लोकांना नसावे इतके आम्ही लोक निर्बुद्ध आहोत असे म्हणायचे आहे का ? आम्ही तैवान मधून चिप्स आणतो तेंव्हा कुठल्याही सिलिकॉन मंत्रालयाची गरज नसते किंवा, आफ्रिकेतून हिरे आयात करतो तेंव्हा हिरा मंत्रालयाची गरज नसते. काही छोटी मोठी परमिशन हवी असेल तर ती अर्थ खाते आणि उद्योग खात्याकडून घेतली जातात. पेट्रोलियम ला असे विशेष मंत्रालय कशाला बरे हवे आहे ? काहीही गरज नाही.

In reply to by साहना

पेट्रोलियम ला असे विशेष मंत्रालय कशाला बरे हवे आहे ? काहीही गरज नाही.
हम्म... हरकत नाही... मी अंबानी उद्या पेट्रोल आणतो आणी २०० रु लिटर ने विकतो परवडत असेल तर घ्या अन्यथा.... (इराणमधुन पेट्रोल आणणे तैवान मधून चिप्स आणण्याइतके सोपे मानणारा )- गॉडजिला

In reply to by गॉडजिला

अंबानी किंवा ऍमेझॉन सर्व गोष्टी स्वस्तात तर विकतेच पण उत्तम ग्राहक सेवा देते. अगदी ऑक्सिमीटर पासून वॉशिंग मशीन पर्यंत सर्वच गोष्टी अंबानी किंवा ऍमेझॉन द्वारे जास्त स्वस्तात आणि चांगल्या दर्जाच्या मिळतात. जिओ आज जास्त स्वस्त आहे. उलट सरकारी विनवण्या करून जी भीक मिळते (bsnl प्रमाणे) ती अत्यंत निकृष्ट तर असतेच पण वरून प्रचंड महाग सुद्धा. खाजगी आणि विशेषतः जागतिक स्तराच्या कंपन्या कडून आम्हाला जास्त चांगले आणि स्वस्त पेट्रोल मिळाले असते पण आम्हा भारतीयाना सरकारी भिकेवर जगण्याची अत्यंत आवड असावी म्हणून लोक पेट्रोलियम मंत्रालय सारख्या तद्दन उपद्रवी मंत्रालयाची भलावण करत आहेत.

In reply to by साहना

द्या नाड्या मग अमेजॉन च्या हातात... स्वस्तात विकतात ते हात्पाय पसरायचे आहेत म्हणुन... एकदा तुम्ही अवलंबुन झालात कि... स्विगि वगैरेनी लॉकडाउनमधे जि पिळवणुक भारतात केली आहे त्याला तोड नाही...

In reply to by गॉडजिला

स्वीगी झोमॅटो ह्या धंदा करायला आल्या आहेत इकडे हैदराबाद मध्ये लोकडोवन मध्ये kcr ह्यांनी झोमॅटो स्वीगजि वर अचानक बंदी आणली ,खाण्याचे खूप वांधे झाले होते ,भांडी ग्यास सगळे करावे लागले

In reply to by एकुलता एक डॉन

तुम्हाला पर्याय उरत नाहीत. म्हणुनच पेट्रोल सारखी अत्यावश्यक बाब यांच्या हातत सोपवता येणार नाही.

In reply to by गॉडजिला

काय पिळवणूक केली आहे ? ह्यातील कुठल्याही कंपनीने तुम्हाला माल घ्यायची जबररदस्ती केली नाही. उलट संपूर्ण लोकडवून मध्ये ह्यांनी समाजाची प्रचंड मदत केली. आज कुठल्या क्षेत्रांत कुठल्या खाजगी कंपनीने तथाकथित नाड्या आवळल्या आहेत ? उलट जिथे जिथे सरकारी लुडबुड आहे किंवा सरकारी मदतीने जिथे खाजगी कंपन्यांनी मक्तेदारी निर्माण केली आहे तिथे सर्वत्र नाड्याच काय इतर सर्व अवयव सरकारी यंत्रणेने अवूळले आहेत. आणि ह्याच प्रकारच्या लाचारीच्या जीवनात भारतीयांना सुख मिळते असे वाटते.

In reply to by साहना

काय पिळवणूक केली आहे ? ह्यातील कुठल्याही कंपनीने तुम्हाला माल घ्यायची जबररदस्ती केली नाही. उलट संपूर्ण लोकडवून मध्ये ह्यांनी समाजाची प्रचंड मदत केली.
वा आम्ही खोटं बोलतोय तर विविध शहरात त्यांच्यावर बॅन करायचे प्रस्तावावर अथवा पर्यायी व्यवस्था उभारणावर विविध शहरातील हॉटेल मालक एकत्र येऊन का विचार करत होते ?

In reply to by गॉडजिला

आपल्याला स्पर्धा झाली कि सरकारची मदत घेऊन स्पर्धेला बंद करायची जुनी सवय सर्वानाच आहे. लाला टाईप लोकांनी नाही का फ्लिपकार्ट वर बंदी आणायचा प्रयत्न केला किंवा गोव्यांत का नाही टॅक्सी माफिया ने उंबर वर बंदी आणली ? ग्राहक म्हणून तुम्हाला स्वीग्गी ने कधी जबरदस्ती केली आहे का ? पण पेट्रोल मात्र तुम्हाला जबरदस्तीने सरकारी दारावर सरकार नियंत्रित पम्प वरूनच घ्यावे लागते.

बाहेर आणतांना आपलेही कपडे फाटतात. --------------- काय आहे मंत्री लोक अगतिक असतात. त्यांना मोठ्या म्हणजे त्यांच्यांच पक्षातील वरीष्ठांची मर्जी सांभाळणे आणि ज्यांना डावलून वर आणले केंद्रात त्यांच्या कारवायांपासून वाचणे यातच वेळ जातो. मग परफॉर्मन्स दाखवणार कधी?

नवे आरोग्य मंत्री हे मैलाचा दगड ठरणार . त्यांची मुक्ताफळे वाचून पुढचा अंदाज आला आहे. महाराष्ट्रात कपिल पाटील - राष्ट्रवादी कडून भाजप, राणे- हा तर गावचे उकिरडे फुंकून आलाय , भा रती पवार - राष्ट्रवादी कडून भाजप आणि आख्खा आयुष्य घालवन मुंडे किंवा इतर निष्ठावंत बसले झक्क मारत

In reply to by कपिलमुनी

जर लोक सन्कटात असताना घरी बसलेला माणूस महाराष्ट्रासारख राज्य चालवू शकतो तर हे मन्त्री चान्गला काम नक्की करतील.. कारण मोदीन्सारखा प्रशासक आहे, काम करून घ्यायला

In reply to by कपिलमुनी

नवे आरोग्य मंत्री हे मैलाचा दगड ठरणार .
या वाक्यात मैलाचा शब्द वाचून पैजार बुवांच्या (मल-आशय !) ची आठवण झाली, आणि मैलाचा दगड शब्द वाचून काही वेळी नाईलाजाने उपयोगी पडणाऱ्या दगडगोट्यांची आठवण झाली! हघ्याहेवेसांन

या मन्त्रीमन्डळाच सर्वात आवडलेल वैशिष्ट्य म्हणजे बहुतान्श मन्त्री शिकलेले आहेत.. आजोबा, वडीलान्च्या जीवावर, राजकारणात आलेले नाहीत

समर्थन करण्यासाठी सर्व विवेक बुध्दी बाजूला ठेवून मत व्यक्त करण्यास खूप कष्ट पडत असतील. ११० रुपये नी पेट्रोल विकत घेवू पण मोदी नाच जिंकून देवू.

स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून येण्याची नैतिक ताकत किती नेत्या मध्ये आहे. ना पैसे वाटप ,ना गुंडा गर्दी,ना लोकांवर दडपण फक्त चांगले उत्तम कार्य,जनतेचे त्या मुळे असलेले प्रेम . ह्या वर निवडूनुक हमखास जिंकण्याची कुवत असणारे देशात दहा लोक तरी असतील का? त्या मुळे जा लायक हा नालायक ज्या वर चर्चा व्यर्थ आहे. इंदिराजी,राजीव जी,आणि आता मोदी जी ह्यांनी पाळलेली मेंढर म्हणजे खासदार ,आमदार आहेत. आणि स्थानिक पातळीवर स्थानिक नेते हे मेंढपाळ. आणि हा पक्ष चांगला हा नेता चांगला असा गैर समज असणारा देशातील सामान्य जनता ही सर्वात मूर्ख जमात. सत्ता कोणाची ही असू ध्या उद्योग पती,गुंड, भ्रष्ट लोक ही नेहमीच सुखात असतात आणि सामान्य लोक नेहमी दुःखात असतात तरी कोणत्या तरी पक्षाचे कडवे समर्थक कोणत्या तरी पक्षाचे समर्थन करत असतात गुलामी रकतात च असते.

मला वाटते २००४च्या लोकसभा निवडणुकीत (उत्तर मुंबई) राम नाईक गोविंदासारख्या एका अभिनेत्याकडून पराजित झाले. राम नाईक हे लोकप्रिय स्थानिक नेते होते, त्यांनी अंत्यंत सचोटीने, प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली परंतु त्याच जनतेने त्यांच्या ऐवजी एका विदूषकाच्या बाजूने कौल दिला. मुंबईची जनता सुबुद्ध, सुशिक्षित व समंजस आहे असा माझा समज होता, पण ह्या एका निकालाने माझा भ्रमनिरास झाला होता.

In reply to by सौन्दर्य

मूर्ख जनतेला उत्तम दर्जा असलेले सरकार मिळू शकत नाही. भारतात लोकशाही आहे ह्याचे कौतुक फक्त जनता मूर्ख आहे तो पर्यंत च टिकणार. जनता सुबुद्ध झाली की सत्ता मिळवण्याची आस असणाऱ्या नेत्यांना लोकशाही टोचायला लागेल.

उत्तर मुंबई मधून राम नाईक सारखा प्रामाणिक, उत्तम प्रशासकीय जण असलेला नेता जेव्हा गोविंदासारख्या एका पांचट अभिनेत्याकडून पराजित झाले. तेव्हा मतदार म्हणून मला खूप लाज वाटली. त्यानंतर भाजप मध्ये एका चांगल्या उत्तम नेत्यांची फ़ळी ( जेटली, स्वराज, पर्रीकर ) अकाली गेली. आता आपले सुप्रीम लीडर , नारायण राणे नावाच्या उकिरड्या वरच्या बैलाला मंत्री बनवतात. पप्पू कढून अपेक्षा नाहीत. विरोधी पक्ष संधी साधून कधीपण दल बदलतो. जशी प्रजा तसा राजा आणखी काय अच्छे दिन जाने वाले है

In reply to by डाम्बिस बोका

+ १ राणे, कृपाशंकर, विखे, पद्मसिंह, मोहिते, पिचड, पाचपुते वगैरेंना पक्षात घेणे हीच मोठी चूक होती. राणे मंत्री करणे ही त्याहून मोठी चूक. महाराष्ट्र संदर्भात पाहिलं तर निष्ठावंतांना अडगळीची खोली व आयाराम आणि अजिबात मताधार नसलेल्यांना पायघड्या असे धोरण दिसत आहे. जनता पहात असते. पुढील निवडणुकीत ते समजेल.

तुम्ही केलेले पृथक्करण वरवरचे वाटते. काही नवीन मंत्री राजकीय सोय म्हणून नक्कीच केलेले असावेत. पण हे एकमेव कारण या बदलाला कारणीभूत नक्कीच नसावे. प्रत्येक मिनिस्ट्री पुढचे प्रश्न वेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्यांना वेगाने आणि ताकतीने धसास लावणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ नागरी हवाईप्रवास या खात्याने फार efficiently काम करावयास हवे. एअर इंडिया विकणे, विमानतळांची निर्मिती आणि upgrade या सगळ्यात आपण टार्गेट पेक्षा फार मागे आहोत. नवीन मंत्री तिथे उत्साहाने काम करतील ही अपेक्षा. दुसरं म्हणजे जावडेकर आणि प्रसाद याना बाजूला सारणे हे वाटते तितके सोपे नसावे. ते केले गेलेय याचा अर्थ त्यांची कामगिरी खराब होती. हर्षवर्धन यांची तर होतीच. या बदलाचे रिझल्ट्स पुढच्या 3 वर्षात दिसतीलच.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

> दुसरं म्हणजे जावडेकर आणि प्रसाद याना बाजूला सारणे हे वाटते तितके सोपे नसावे. ते केले गेलेय याचा अर्थ त्यांची कामगिरी खराब होती दोन्ही व्यक्ती संघाच्या मर्जीतल्या होत्या आणि "सिनियर" होत्या. वाजपेयी सरकारात सुद्धा दोन्ही व्यक्ती कॅबिनेट पोस्टवर होत्या आणि मागील ७ वर्षे सुप्रीम लीडर नि ह्यांना दोघांना महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या आणि डोक्यावर चढवले होते. दोन्ही लोकांना आता बाजूला फेकले ह्यावरून फक्त त्यांची कामगिरी खराब होती असे नाही तर अत्यंत निकृष्ट दर्जाच्या व्यक्ती काहीही कर्तृत्व नसताना इतक्या वर पोचल्याचा कश्या आणि मागील ७ वर्षे सुप्रीम लीडर ह्यांच्या निवडीच्या बाबतीत चुकले कसे हा प्रश्न विचारावासा वाटतो.

पेट्रोल डिझेल बाबत उद्वेग करुन काहीही उपयोग नाही. उद्या राहुलजी गांधी ह्यांचे सरकार आले तरीही इंधनाचे भाव चढेच रहातील, समजा त्यांनी काहीतरी चमत्कार करुन केंद्रीय कर कमी केला तरी राज्य सरकार स्वतःचा कर वाढवतील कारण पेट्रोल आणि दारु हेच दोन राज्यसरकारच्या कमाई चे मोठ्ठे सोर्स शिल्लक राहिले आहेत आता ! रडत कुढत बसण्यापेक्षा ओएन्जीसी , ओईल इंडीया , पेट्रोनेट , आणि रिलायन्स चे शेयर्स विकत घ्यावेत हे उत्तम. ह्याचे दुहेरी फायदे आहेत : पहिलीगोष्ट म्हणजे ह्यांच्या मधुन येणार्‍या डिव्हिडंड मधुन पेट्रोल डिझेल चा खर्च काढता येईल ! आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा पेट्रोल चे भाव अजुन वाढले तर ह्या कंपन्यांची प्रॉफिटॅबिलिटीही वाढेल आणि शेयर किंमत अन पर्यायाने आपली नेटवर्थ ही वाढेल . ह्या नंतर तुम्हाला पेट्रोल भाववाढीच्या वातम्या वाचुन राग उद्वेग आणि हेल्पलेस वाटायचे बंद होईल आणि आनंद वाटायला लागेल ! Statutory Warning : share market investments are subject to market risk . Do your own research. Always consult a professional SEBI certified Investment Advisor before doing any investments. - Übermensch Capital

In reply to by प्रसाद गोडबोले

पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढल्या ह्याचा अर्थ कंपन्यांचे प्रॉफिट वाढेल असे होत नाही. उलट मागणी कमी होऊन नफा कमी होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे दुष्काळांत तेरावा महिना ह्या न्यायाने आणखीन नुकसान होऊ शकते. त्याशिवाय ज्या कंपन्यांत बहुतांश समभाग आणि व्यवस्थापन हक्क सरकार कडे आहेत तिथे पैसे गुंतवताना शंभर वेळा विचार करावा. ONGC चा मागील १५ वर्षांतील परफॉर्मन्स फारच खराब आहे. सध्या समभाग किंमत ११८ आहे. २००६ मध्ये ती १४१ होती. इंडियन ऑइल सुद्धा मागील ५ वर्षाचा ग्राफ पहिला तर विशेष चांगली गुंतवणूक वाटत नाही. पेट्रोलियम स्टॉक पासून मी नेहमीच चार हात लांब राहिले आहे आणि ह्यातील गुंतवणुकीचा अनुभव शून्य आहे. Statutory Warning : share market investments are subject to market risk . Do your own research. Always consult a professional SEBI certified Investment Advisor before doing any investments.

In reply to by साहना

उलट मागणी कमी होऊन
भाववाढ झाल्याने पेट्रोल ची मागणी कमी होते ही अंधश्रध्दा आहे. अगदी गडकरी साहेब म्हणतात तसे २०३० पर्यंत संपुर्ण इलेक्त्रिक गाड्या आल्या तरीही मागणी कमी होणार नाहीये. लिहुन घ्या. पेट्रोल ची मागणी केवळ आणि केवळ एकाच परिस्थितीत कमी होऊ शकते ते म्हणजे देशव्यापी लॉकडाऊन आणि एकुणच दळणवळणावरील निर्बंध ! लॉकडाऊन जे की मागच्यावर्षी झालेले तेव्हाचे रेट्स पहा आणि अत्ताचे रेट्स पहा ! आणि महत्वाचे म्हणजे त्याचे डिव्हिडंड यिल्ड पहा. बाकी एनर्जी कंझम्प्शन आणि देशाची जी.डी.पी ग्रोथ हे सरळ सरळ गुणोत्तरात वाढतात हे विधान संख्याशास्त्रीय पुराव्याने शाबित करता येते . आणि भारत अजुन किमान १००+ वर्षे तरी अमेरिका जर्मनी इंग्लंड सारखा विकसीत देश होणार नाही. एनर्जी ची डिमांड वाढतीच रहाणार आहे. . अर्थात हे सारे कळण्यासाठी आणि त्याचा सुयोग्य फायदा घेता येण्यासाठी हुशार फायनान्शियल अ‍ॅडव्हायझरची नितांत गरज असते ह्यात शंका नाही! बाकी देशात कोणाचेही सरकार असो , भाजप असो की काँग्रेस असो की कम्युनिस्ट , आपल्यावर त्याचा परिणाम पडता कामा नये . आम्ही गेर तोशाव आहोत , स्वतःचा विचार स्वत:लाच करावा लागेल !

कच्चे तेल महाग नाही मग पेट्रोल का महाग आहे? अंबानी नी ल कृष्णा गोदावरी खोरे आंदण दिले आहे फुकट .ती सरकारी मालमत्ता फुकट अंबानी ला दिल्याचा देशाला काय फायदा जर पेट्रोल दरावर काही फरक पडत नसेल तर? इथोनोल किंवा अनेक घटक पेट्रोल डिझेल ला पर्याय आहेत त्याचा फायदा का करून घेतला जात नाही? इंधनावर परदेशी देशावर अव अवलंबून भारत आहे तर इराण ,इराक,सौदी,कुवेत ह्या देश बरोबर अत्यंत जवळचे संबंध भारत सरकार का निर्माण करू शकले नाही. इंधनाच्या बाबतीत पूर्णतः ाा चुकीचे निर्णय घेण्यात ह्या सरकार चा जात कोणी धरू शकणार नाही. अतिशय कमजोर सरकार भारताच्या उरावर बसले आहे .

In reply to by Rajesh188

तुम्ही बिडिंग का केलं नाही म्हणे गोदावरी बेसिन मध्ये एक्सप्लोरेशन करण्यासाठी? बाकी ती मुन्सीपालटी ची इलेक्ट्रिसिटी ची, पाणीपट्टी ची बिलं वगैरे वेळेत भरत जा. कापतील नाही तर वीज/पाणी. जिओ चे सबस्क्रिप्शन पण संपले असेल तर भरा. मिसळपाव वर लिहायचंय ना अंबानी विरुद्ध?

तेच-तेच मुद्दे वाचून कंटाळा आला. बहुतांश मंत्रीपदे म्हणजे शोभेच्या बाहुल्या असतात. दैनंदिन कामकाज हे बहुतांशी सचिवांच्या पातळीवर चालत असते. मंत्र्यांचे काम हे त्याला योग्य दिशा (vision) देण्याचे असते. ते बहुतेकांना साधत नाही, आणि या सरकारमध्ये PMO आणि सचिव यांचा थेट संबंध/monitoring असल्याने तसे अवघडही आहे. जितके PMO ताकदवान तितकी मंत्रीपदे निष्प्रभ असतात. परिणामी मंत्री वरवरच्या समारंभ, देखावा, प्रसिद्धी, मान-मरातब या कामातच गुंतलेले दिसतात. त्यामुळं आपली अपेक्षा कार्यक्षमतेची असली तरी मंत्रिपदाची अवस्था सरकारी बक्षिसांसारखी झालेली आहे. या वस्तुस्थितिमध्ये विस्ताराद्वारे मोदी सरकारने पुढील उत्तर प्रदेश निवडणुका आणि २०२४ ची सोय करण्याचा श्रीगणेशा केलेला आहे. अनेकपदरी, दूरगामी असा हा निर्णय आहे. सरकारने लोकांमध्ये असलेला असंतोष ओळखून अगोदरच आपल्या बेरजा जास्तीत जास्त व्यापक करण्याचा हा प्रयत्न आहे. याला उत्तर वाचाळपणाद्वारे न देता, जमिनीवरचे राजकारण करूनच द्यावे लागणार आहे. पंजाबमधील कलह काँग्रेसजन कसा मिटवतात, त्यावर त्यांना पुढे काय करता येईल ते ठरेल. 'असेल हरी, तर देईल खाटल्यावरी' ही काही रणनीती होऊ शकत नाही. आगामी दोन वर्षात संजय राऊत, अजितदादा यांच्या शिवराळपणात आता राणेंची भर पडणार असं दिसतं आहे.

IIT कानपूर, गोल्ड मेडलिस्ट, IAS अधिकारी, सीमेन्सचे VP, स्टार्टअप ते रेल्वेमंत्री; CV पाहून तुम्हीही म्हणाल, ‘एक नंबर चॉइस’ - https://www.loksatta.com/photos/trending-gallery/2524255/modi-new-cabin…

In reply to by साहना

आय आय टी कानपूरला प्रवेश मिळणे,भारतात यु पी एस सीत २७ वा क्रमांक मिळवणे.. ह्यात काहीच कर्त्रुत्व नाही ? मी म्हणते सीमेन्समध्ये व्ही पी म्हणून कामाला लागणे ह्यात विशेष ते काय? सीमेन्स कम्पनीचा व्याप पाहता त्यांच्याकडे शेकड्यात व्ही पी असतील.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

म्हणजे तो व्यक्ती उत्तम काम करेल असे काही नाही रेल्वे दिली आहे मोदी साहेबांनी त्यांच्या कडे बघुया रेल्वे मधून लोकांनाच प्रवास किती सुख कारक आणि सुरक्षित होतो ते. देशाचा कारभार आयएएस ऑफीसर च चालवतात ते आयएएस पास झाले म्हणजे उत्तम प्रशासक झाले असे असते . तर भारतीय प्रशासन गतिशिल असते. लोकांची काम सहज झाली असती. Ground reality hi आहे सरकारी कारभार अतिशय भोंगळ आहे. सरकारी ऑफिस मध्ये जाणे म्हणजे सर्वात मोठी डोके दुखी असते एक काम वेळेत पूर्ण होत नाही. ह्याचा अनुभव सर्व च जन घेतात

In reply to by Rajesh188

सरकारी कचेर्यात काम करणारे बहुतांशी आपल्यासारखे मध्यमवर्गीयच असतात रे राजेशा. मंत्री ह्या लोकाना १/२ वर्षात बदलेल हा गैसमज आहे. अगदी नेहरूंच्या कारर्कीर्दीतही हाच प्रकार असायचा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

> आय आय टी कानपूरला प्रवेश मिळणे,भारतात यु पी एस सीत २७ वा क्रमांक मिळवणे.. ह्यात काहीच कर्त्रुत्व नाही ? नाही. फार तर परीक्षा उत्तीर्ण होण्यात प्राविण्य आहे असे म्हणू शकतो ते मन्नू सिंग कडे सुद्धा होते काय फायदा झाला ? सिमेन्स हि नफ्यासाठी चालणारी कंपनी आहे, इथे काम सारखे नाही केले तर हाकलून लावतात, तिथे ह्यांनी चांगली कामगिरी केली असेल तर त्यांत कर्तृत्व आहे. माझ्या दृष्टिकोनातून साधा चहाचा ठेला चालविणारा माणूस कुठल्याही IAS पेक्षा जास्त स्ट्रीट स्मार्ट आहे.

In reply to by साहना

माझ्या दृष्टिकोनातून साधा चहाचा ठेला चालविणारा माणूस कुठल्याही IAS पेक्षा जास्त स्ट्रीट स्मार्ट आहे.
आणि कंपाउंडर डॉक्टरपेक्षा हुशार ;) असो, तुमच्या विधानाशी जनता सहमत असल्यानेच देश सध्या कुठल्याही IAS पेक्षा जास्त स्ट्रीट स्मार्ट व्यक्ती चालवत आहे म्हटले तर चूक ठरू नये, थोडक्यात काय तर त्या व्यक्तीविरोधात किमान तुम्हाला तरी काहीच तक्रार असली नाही पाहीजे बरोबर ना ?

In reply to by बाजीगर

श्री. राजीव चंद्रशेखर (विद्यमान राज्यसभेचे खासदार) एमआयटीचे एक प्रतिष्ठित माजी विद्यार्थी (ई ऍण्ड ई) यांनी केंद्रीय सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्य - इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणून शपथ घेतली. एमआयटी मधून पदवी घेतल्यानंतर श्री चंद्रशेखर यांनी शिकागो येथील संगणक विज्ञान विषयात एमएस केले. ते इंटेल येथील टीमचे वरिष्ठ डिझाइन अभियंता होते ज्या टिमनी 32 बिट 80486 मायक्रोप्रोसेसर आणि सीपीयू आर्किटेक्ट डिझाइन आणि लाँच केले. पेंटियम संघातील सीपीयू आर्किटेक्ट ते पेंटियम मायक्रोप्रोसेसरच्या आर्किटेक्चरची रचना करणार्या संघाचे सदस्य होते. 1994-2005 दरम्यान त्यांनी बीपीएल समूहाचे नेतृत्व केले.

In reply to by नावातकायआहे

आशियानेट हि मीडिया कंपनी ह्यांच्या मालकीची आहे. परवा कुणी तरी ह्यांच्या (चॅनेल च्या) एक लाईव्ह प्रोग्राम मध्ये "बंगाल मधील भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येवर आपण काहीच बातमी का दिली नाही असा प्रश्न विचारला तेंव्हा वृत्तनिवेदिकेने "कोविद धुमाकूळ घालत असताना काही संघी लोकांना ठार मारले म्हणून कुणाला फरक पडत नाही" असे उत्तर दिले.

बुडणार्‍या जहाजातील सामान्य प्रवाशांनी, ते कसे चालवावे यावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नसतो. लाईफ जॅकेटस कमीच असतात. ती आधीच शोधून ठेवायची, एवढेच त्यांच्या हातात असते.

कांग्रेसने. -------- अगोदर शिवसेनेतून डच्चू मिळणार हे त्यांनी वेळीच ओळखले नाही. ---------- माझे मत.

"खयाली पुलाव खायचाच आहे तर आपण वाट्टेल तितके मसाले घालू. मी पेट्रोलियम मंत्री असते तर सर्वप्रथम पेट्रोलियम मंत्रालय बंद करण्याचा निर्णय घेतला असता. पेट्रोलियम हा एक कच्चा माल असून इतर लक्षावधी आयात माला प्रमाणेच आहे. ह्याच्यासाठी वेगळे मंत्रालय ठेवणे हीच चूक आहे आणि आज काळ ह्या क्षेत्रांत ज्या समस्या आम्हाला सहन कराव्या लागतात त्याला कारणीभूत पेट्रोलियम मंत्रालयच आहे." ते कसे काय ?पेट्रोल्/डिझेलच्या किंमती कशा ठरवायच्या? केण्द्र सरकारने व राज्य सरकारानी किती कर लावला पाहिजे असे तुझे मत आहे? समजा किमती अर्ध्यावर आणल्या तर सरकारी उत्पन्न घटणार? मग सरकारी योजना कशा चालवायच्या ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

> पेट्रोल्/डिझेलच्या किंमती कशा ठरवायच्या? किमती ठरविण्यास भारतीय लोक नालायक आहेत का ? साखर पासून कोल्ड ड्रिंक पर्यंत किमती कोण ठरविते ? मार्केट भाव. त्याच पद्धतीने पेट्रोल आणि डिझेल चे भाव प्रत्येक पम्प वर तिथल्या मागणी प्रमाणे वेगळे असतील. > केण्द्र सरकारने व राज्य सरकारानी किती कर लावला पाहिजे असे तुझे मत आहे? शून्य > समजा किमती अर्ध्यावर आणल्या तर सरकारी उत्पन्न घटणार? मग सरकारी योजना कशा चालवायच्या ? सरकारने अंथरून पाहून पाय पसरावेत. पेट्रोल च्या आडून गरिबांचा पैसा चोरू नये. बहुतेक स्कीम्स बंद केल्या तरी चालतील. एअर इंडिया पासून विजय सुपर स्कुटर पर्यंत आणि ONGc पासून राजघाट पर्यंत सर्व सरकारी ऍसेट्स विकून पाहिजे तर पैसे उभारावेत.

In reply to by कॉमी

योग्य बोललात. नोकरी गेली तर वडिलोपार्जित जमीन विका असा सल्ला देण्यासारखे आहे हे. साहने, पेट्रोल्/डिझेल्/दारू ह्यांतून मिळणारे हे सरकारच्या उत्पन्नचे मुख्य स्त्रोत असतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

जनता सरकारी उत्पन्न साठी नाही ! सरकार जनतेच्या सोयी साठी आहे. त्यामुळे उगाच वायफळ पैसे खर्च करण्यापेक्षा खर्च कमी करणे चांगले. नाहीतर उद्या पैसे पाहिजेत म्हणून सरकारने कुंटणखाने सुद्धा चालवावेत नाही तरी मंदिरे ह्या नालायकानी आधीच ताब्यात घेतली आहेत. पण लाचारीची सवय एकदा लागली कि आपल्यावर अत्याचार करणाऱ्याचे पोट कसे भरेल ह्याची काळजी बिचार्या व्हिक्टीम ला लागते.

In reply to by साहना

मग सरकारी शाळा/महाविद्यालये, सरकारी रुग्णालये, धरणे बांधणे,वीज पुरवणे वगैरे चालवण्यासाठी पैसा कुठुन आणायचा म्हणतेस? की तेही बाजारभावानेच? ज्याना परवडेल ते घेतील, नाहीतर गेलात उडत?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ज्या गोष्टी "पब्लिक गुड्स" ह्या श्रेणीत मोडतात फक्त त्याच गोष्टीवर खर्च सरकारने करणे अपेक्षित आहे. आपण ज्या गोष्टी वर लिहिल्या आहेत त्यांत फार तर शाळा महाविद्यालये पब्लिक गुड्स ह्या श्रेणीत मोडतात, त्यांत सुद्धा सरकारी शाळा चालविण्यापेक्षा विद्यार्थ्यांना थेट पैसे देणे जास्त चांगले आहे आणि स्वस्त सुद्धा आहे. धरणे बांधणे हे सरकारचे कामच नव्हे, पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा ह्यांत सुद्धा सरकार का आहे हा मोठा प्रश्न आहे. दोन्ही ठिकाणी निकृष्ट सेवा, पर्यावरणावर अत्यंत प्रतिकूल परिणाम, पाणी आणि विजेची प्रचंड नासाडी आणि ग्राहकांना अत्यंत निकृष्ट सेवा हेच आज पर्यंत आपण आम्ही पाहत आलो आहोत. भाक्रा नांगल पासून धरणाच्या नावाने प्रचंड भ्रष्टाचार भारत सरकार करत आले आहे आणि वरून लोकांना टाळ्या मारायला सांगितले जाते.

In reply to by साहना

यु आर विजनरी... अफलातून विचार वाचायला मिळत आहेत.
त्यांत सुद्धा सरकारी शाळा चालविण्यापेक्षा विद्यार्थ्यांना थेट पैसे देणे जास्त चांगले आहे आणि स्वस्त सुद्धा आहे.
हे जरा स्पष्ट करता का ? तसेच विद्यार्थी आयुष्यभर नापास होत राहिला तर त्याला आयुष्यभर पैसा पुरवायचा का ?

In reply to by साहना

"त्याच पद्धतीने पेट्रोल आणि डिझेल चे भाव प्रत्येक पम्प वर तिथल्या मागणी प्रमाणे वेगळे असतील. " मग हे भाव कोण ठरवणार? ज्या लोकांना पेट्रोल आणि डिझेल वर कर द्यायचा नाही त्यांनी खुशाल जगातुन कुठुनही पेट्रोल आयात करावे ... स्वतः रीफाईन करावे .. वापरावे ... हाय काय आन नाय काय ...