आणीबाणीची चाहूल- भाग १२
संजय गांधी आपल्या आईबरोबर
(संदर्भः https://www.sundayguardianlive.com/wp-content/uploads/2020/06/Untitled-design-4-2.png)
संजयने आपल्याभोवती काही लोकांचा गोतावळा उभा केला होता. त्यात महत्वाचे होते यशपाल कपूरांचे भाचे राजिंदर कुमार धवन (आर.के.धवन). हे धवन इंदिरा गांधींच्या पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त खाजगी सचिव होते. एकेकाळी रेल्वेमध्ये कारकून म्हणून कामाला असलेले धवन थेट पंतप्रधान कार्यालयात पोहोचले ते आपले मामा यशपाल कपूर आणि संजय यांच्या आशीर्वादाने. संजय या धवनकरवी सरकारी कामात लुडबूड करायला लागला होता. धवन आता इतके ताकदवान झाले होते की ते पंतप्रधानांच्या नावाने कनिष्ठ मंत्र्यांना परस्पर खडसावू शकत.
आर.के.धवन इंदिरा गांधींबरोबर
(संदर्भः https://gumlet.assettype.com/nationalherald/2018-08/70a378d3-ec85-4f87-997e-043d72fa9b36/congress_party_mourn_passing_of_veteran_leader_rk_dhawan_aged_81_former_prime_minister_indira_gandhi.jpg?w=1200&h=675)
संजयच्या गोतावळ्यामध्ये आणखी एक नाव होते आणि ते म्हणजे हरियाणाचे मुख्यमंत्री बन्सीलाल यांचे. याच बन्सीलालांनी संजयच्या मारूती कंपनीला गुरगावजवळ मानेसर येथे जवळपास ३०० एकर जमिन देऊ केली होती. संजय-धवन-बन्सीलाल या तिघांना इंदिरा गांधींभोवतीची त्रिमूर्ती असे म्हटले जायचे. कोणत्याही थराला जाऊन इंदिरांसाठी वाटेल ते करून देणे हा या तिघांचा हातखंडा होता.
बन्सीलाल
(संदर्भः https://www.jagranimages.com/images/13_09_2019-bansilal_19573458.jpg)
इंदिरांच्या गोतावळ्यामध्ये आणखी एक गृहस्थ होते. ते होते काँग्रेसचे अध्यक्ष देवकांत बरूआ. इंदिरा गांधींचे दिवंगत पती फिरोज गांधींचे हे मित्र होते. फिरोज आणि इंदिरांमध्ये मतभेद होत असताना दोघांमध्ये मध्यस्थी करून समेट घडवून आणायचा प्रयत्न या बरूआंनी वेळोवेळी केला होता. काँग्रेसमध्ये असले तरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी जवळीक असलेले काही नेते होते. त्यात चंद्रजीत यादवांबरोबर या बरूआंचाही समावेश होता. संजयला कम्युनिस्ट अजिबात आवडायचे नाहीत त्यामुळे या बरूआंविषयी त्याचे मत फारसे चांगले नव्हते. पण आताचा प्रसंगच असा होता की असल्या सगळ्या गोष्टी गुंडाळून ठेऊन सगळ्यांना एकत्र येणे भाग पडले.
देवकांत बरूआ
(संदर्भः https://lh3.googleusercontent.com/proxy/34Ft6MbvMKg-GDPicDXBLloy_KvvhLvm0i-sEez_Ca19V0vPSzkUWLmIoE4ooMRjJM0ir_-Ht7Ke1YAwGJPw0dhbqPiXiIfzAJLAOJSYfAtq-YUR1jOvBu2hm6naIORfns72tSC25AGnuUTN17gqP03AfHosfynKb2J7U_Tfcd4_Cnk_X4Z1Rl5inn-eOfEl8RsPivCEvQO_jYHafr9Wto_pEwinWMW22C_5U7FUwkRMq-wVhWA)
१९६९ मध्ये इंदिरांनी बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय घेतला होता तेव्हा त्या निर्णयाच्या समर्थनार्थ पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर समर्थकांची गर्दी जमली होती आणि त्या निर्णयाच्या बाजूने घोषणाबाजी त्यांच्याकडून होत होती. ही गर्दी जमा करण्यात त्यावेळी पंतप्रधान कार्यालयात विशेष अधिकारी असलेल्या यशपाल कपूर यांनी पुढाकार घेतला होता. त्याचीच पुनरावृत्ती करायचे ठरले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालात यशपाल कपूर यांच्या नावाचा थेट उल्लेख असल्याने ते यावेळी प्रत्यक्षपणे यात नव्हते तर त्यांचे भाचे आर.के.धवन यांनी उत्तर भारतातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना (पंजाबचे मुख्यमंत्री ग्यानी झैलसिंग, हरियाणाचे मुख्यमंत्री बन्सीलाल, राजस्थानचे मुख्यमंत्री हरिदेव जोशी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणा) पंतप्रधान कार्यालयातून फोन केले आणि इंदिरांच्या समर्थनासाठी लोक पाठवायचा आदेश दिला. या चारही मुख्यमंत्र्यांनी लगेच त्या आदेशाचे पालन केले. १३ आणि १४ तारखेला संध्याकाळी या गर्दीपुढे भाषण करायला बाहेर आल्या. या दोन्ही दिवशी त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य केले. इंदिरा नक्की काय म्हणाल्या याविषयी सोशालिस्ट इंडियाच्या १४ जून १९७५ च्या अंकात आलेली बातमीच इथे देतो.
सोशालिस्ट इंडियाच्या २१ जून १९७५ च्या अंकात इंदिरांच्या समर्थनार्थ दिल्लीत लावलेल्या पोस्टर्सचा पुढील फोटो होता.
१८ जूनची काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक
१८ जूनला दिल्लीत काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक झाली. तरूण तुर्क सोडून काँग्रेसचे लोकसभा आणि राज्यसभेतील सगळे खासदार या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी यशपाल कपूर काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार असल्याने ते पण या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी 'देश की नेता इंदिरा गांधी' अशी घोषणा दिली. काँग्रेस अध्यक्ष देवकांत बरूआंनी यावेळी बोलताना लाचारीची आणि लाळघोटेपणाची परमावधी गाठत Indira is India, India is Indira हे वक्तव्य केले. या घोषणेमुळे आपले नाव इतिहासात कायमच काँग्रेसचा एक दरबारी भाट म्हणून अनादरानेच घेतले जाईल अशी व्यवस्था देवकांत बरूआंनी करून ठेवली. संरक्षणमंत्री स्वर्णसिंग यांना आता आपल्याला पंतप्रधानपद मिळणे शक्य नाही हे लक्षात आले असावे. कारण त्यांनीही या बैठकीत 'What happens to her happens to India and what happens to India happens to her' असे काहीसे त्या प्रकारचेच वक्तव्य दिले. या बैठकीला स्वतः इंदिरा गांधी पण उपस्थित होत्या. त्या तिथून लवकर निघाल्या. त्या बैठकीतून गेल्यानंतर काँग्रेस संसदीय पक्षाने परत एकदा इंदिरा गांधींच्या समर्थनाचा ठराव पास केला.
२० जूनची काँग्रेस पक्षाची बोट क्लबमधील सभा
२० जूनला इंदिरांच्या समर्थनासाठी काँग्रेस पक्षाने एक मोठ्या सभेचे आयोजन केले. या सभेसाठी परत एकदा वर उल्लेख केलेल्या चार मुख्यमंत्र्यांना या सभेसाठी लोक पाठवायचा आदेश संजयच्या चौकडीतून दिला गेला. या सभेसाठी उत्तर प्रदेशातून अगदी वाराणसीपासून लोक आणले गेले. दिल्लीचे उपराज्यपाल आणि माजी आय.सी.एस अधिकारी किशन चंद यांनी तर 'इंदिरांच्या समर्थनासाठी लोकांचा महापूर आणायला हवा' असे म्हटले. या किशन चंद यांचे सचिव होते २००८-०९ या काळात मुख्य निवडणुक आयुक्त झालेले नवीन चावला. किशन चंद आणि नवीन चावला यांनी २० तारखेच्या सभेसाठी दिल्लीतील डी.टी.सीच्या बस सामान्य लोकांसाठी जवळपास शिल्लक ठेवल्याच नाहीत तर दिल्लीतील जवळपास सगळ्या बस या सभेसाठी लोकांची ने-आण करायला वापरल्या.
२० तारखेची बोट क्लबवरील सभा प्रचंड मोठी होती. स्वतः इंदिरा गांधींनी या सभेला 'a sea of humanity' असे म्हटले. या सभेला काँग्रेसचे सगळे मोठे नेते व्यासपीठावर उपस्थित होते. या सभेत परत एकदा देवकांत बरूआंनी आपल्या लाचारीचे प्रदर्शन घडविले. 'इंदिरा तेरे सुबह की जय, तेरे शाम की जय, तेरे नाम की जय, तेरे काम की जय' अशी घोषणा आणखी एकदा दिली. या सभेत इंदिरा गांधींनी विरोधकांवर कडाडून हल्ला चढवला. आपण गरीबांसाठी लढत असल्यानेच त्यांच्या डोळ्यात खुपत होतो. या लोकांना आपल्याला निवडणुकीत हरवता येणे शक्य नाही म्हणून ते लोक ही लढाई न्यायालयाकरवी लढत आहेत अशा स्वरूपाचा आरोप त्यांनी परत एकदा केला.
या सभेची २१ जून १९७५ च्या सोशालिस्ट इंडियाच्या अंकात आलेला फोटो इथे देत आहे.
या भागात आपण बघितले की राजीनामा द्यायचा नाही हे नक्की केल्यानंतर काँग्रेसच्या जी-हुजूर संस्कृतीचे आणि लाचारीचे ओंगळवाणे प्रदर्शन पुढील काही दिवस चालू होते. या कामासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून सरकारच्या बस इंदिरांच्या समर्थनासाठी लोकांची ने-आण करायला वापरल्या गेल्या. आणीबाणी आणायची तयारी तेव्हापासूनच चालू होती. मागच्या एका भागावरील एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे ८ जानेवारी १९७५ रोजी सिध्दार्थ शंकर रे यांनी इंदिरांना लिहिलेल्या एका पत्रात 'कडक भूमिका घ्या' अशा स्वरूपाची मागणी केली होती. अनेक पुस्तकांमध्ये असा उल्लेख असतो की २५ जूनच्या सभेत जयप्रकाश नारायणांनी लष्कर आणि पोलिस यांना इंदिरा सरकारचे आदेश मानू नका असे आवाहन केल्यामुळे इंदिरांनी आणीबाणीची घोषणा केली. आणखी एका पुस्तकात मी असेही वाचले आहे की आणीबाणी आणावी ही कल्पनाच सिध्दार्थ शंकर रेंनी इंदिरांच्या मनात २५ जूनच्या संध्याकाळी भरवली आणि मग आणीबाणी लादली गेली. पण तुरूंगात टाकायच्या नेत्यांची यादीचा पहिला आराखडा १५ जूनच्या सुमारासच पूर्ण झाला होता आणि त्यावर संजय लक्ष ठेऊन होता. त्यावरून आणीबाणी लादायचे अचानक ठरले असे वाटत नाही. याविषयी पुढच्या भागात लिहेन.
अवांतरः २०१७ मध्ये आलेल्या इंदू सरकार चित्रपटात नवीन सरकार हा आणीबाणीकाळात उच्चपदस्थ सरकारी अधिकारी दाखवला आहे आणि त्याने शेवटी आत्महत्या केली असेही दाखवले आहे. मला वाटते की नवीन सरकार हे पात्र दिल्लीचे उपराज्यपाल किशन चंद आणि त्यांचा सचिव नवीन चावला या दोघांच्या मिश्रणातून या चित्रपटासाठी तयार केले गेले असावे. कारण १९७८ मध्ये किशन चंद यांनी आत्महत्या केली.
In reply to विद्याचरण शुक्ल सुद्धा by श्रीगुरुजी
In reply to विद्याचरण शुक्ल सुद्धा by श्रीगुरुजी
In reply to आणिबाणीची योजना बहुतेक ५-६ महिन्यांपासून योजली जात होती. by तुषार काळभोर
In reply to १९७७ च्या प्रचारात एक by श्रीगुरुजी
In reply to छोटा वाटला हा भाग, पण अर्थात by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to संजयच्या पत्नी मनेका आणि by मनो
In reply to छोटा वाटला हा भाग, पण अर्थात by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to कॉन्स्पिरसी थिअरीज by चंद्रसूर्यकुमार
In reply to कॉन्स्पिरसी थिअरीज by चंद्रसूर्यकुमार
In reply to खुशवंतसिंग यांच्या शब्दांत ती by मनो
A week after Sanjay's death in June 1980, Mrs Gandhi suggested to Maneka on her own that she work as her secretary. A few days later, Dhirendra Brahmachari came to her room to inform her that Mrs Gandhi was too embarrassed to tell her so but Sonia had put her foot down on the proposal, and had threatened to return to Italy with her family unless Mrs Gandhi withdrew the offer to Maneka.इंदिरा गांधी आपल्या म्हणण्यावर अडून राहिल्या असत्या तर किती चांगले झाले असते!!
In reply to आणीबाणीची प्रक्रिया by तुषार काळभोर
In reply to आणीबाणीची प्रक्रिया by तुषार काळभोर
घटनेमध्ये जरी आणीबाणी ची व्यवस्था असली तरीही यापूर्वी कधीही अमलात आणलेली गोष्ट आता अमलात आणावी असा विचार कसा सुचला असावा?राज्यघटनेत कलम ३५२ प्रमाणे अंतर्गत आणि बाह्य अशा दोन कारणांमुळे आणीबाणी आणता येते. या दोन कारणांमुळे आणलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीत राज्यघटनेत काहीही फरक केलेला नाही. म्हणजे बाह्य कारणामुळे आणीबाणी असेल तर अमुक एक गोष्टी करता येत नाहीत आणि त्यासाठी अंतर्गत कारणामुळे आणीबाणी आणायला हवी असे काही नाही. १९७५ च्या आणीबाणीविषयी एक गंमत आहे. त्यापूर्वी देशात आणीबाणी आणली गेली नव्हती असे नाही. सगळ्यात पहिल्यांदा १९६२ मध्ये चीन युध्दाच्या वेळेस आणीबाणी आणली गेली. ती तब्बल ६ वर्षे चालू होती आणि ती शेवटी १९६८ मध्ये मागे घेतली गेली. डिसेंबर १९७१ मध्ये पाकिस्तानने उत्तर भारतातील हवाई तळांवर हल्ला केल्यानंतर युध्द सुरू झाले. त्यावेळी परत आणीबाणी आणली गेली होती. १९७५ मध्ये ही तिसरी आणीबाणी आणली तेव्हा १९७१ ची आणीबाणी मागे घेतली गेली नव्हती. त्यामुळे या नव्या अध्यादेशाची तशी काही गरज नव्हती. १९७१ मध्ये आणलेली आणि १९७५ मध्ये आणलेली अशा दोन्ही आणीबाणी शेवटी मार्च १९७७ मध्ये मागे घेण्यात आल्या. मिसा या कायद्याखाली १९७५-७६ दरम्यान मोठ्या प्रमाणावर लोकांना तुरूंगात डांबले गेले होते तो कायदाही आणीबाणीदरम्यान आणला गेला होता असेही काही ठिकाणी म्हटले जाते. पण ते अयोग्य आहे. तो कायदाही (सुरवातीला वटहुकूम म्हणून) मे १९७१ मध्येच आणला गेला होता. १९७७ नंतर पत्रकार म्हणून प्रसिध्द झालेले संतोष भारतीय १९७३ मध्ये विद्यार्थी नेते होते. त्यांना मिसाखाली १९७३ मध्येच अटक करण्यात आली होती. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की १९७५ नंतर जे रामायण झाले त्यासाठी कायद्याच्या दृष्टीकोनातून सगळी पार्श्वभूमी आधीच तयार करून ठेवलेली होती. त्याप्रमाणेच इंदिरांची हुकूमशाहीकडे वाटचाल पूर्वीपासूनच सुरू झाली होती. १९७१ मध्ये मिसासारखा कायदा आणून कोणालाही संशयावरून अटक करणे, जामिन मिळणे कठीण करणे वगैरे गोष्टी करण्यासारखी नक्की कोणती परिस्थिती होती? नंतरच्या काळात १९८५ मध्ये टाडा आणि २००२ मध्ये पोटा आला त्यावेळी देशात दहशतवादाचे थैमान चालू होते. तसे काही १९७१ मध्ये होते का? मिसा हा कायदा आणला तो १९५० चा प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन अॅक्ट १९६९ मध्ये संपल्यावर. १९५० मध्ये नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतात अस्थिरता असताना असा कायदा आणणे गरजेचे होते हे समजा गृहित धरले तरी तो कायदा इतकी वर्षे चालू ठेवणे, १९७१ मध्ये मिसा हा कायदा आणणे वगैरे गोष्टी हुकूमशाहीकडे होणारी वाटचाल दर्शवत नाहीत का?
आणीबाणी वाईट होती, इंदिरा गांधी आणि काँग्रेसने स्वार्थासाठी लागू केली होती इत्यादी इत्यादी गोष्टी जरी असल्या तरी ही आणीबाणी लागू करण्याचा विचार ही एक हुशारीची गोष्ट म्हणावी लागेल का?आणीबाणी आणणे ही हुशारीची गोष्ट केली का नाही माहित नाही पण ती उठवून १९७७ मध्ये निवडणुकांची घोषणा करणे ही इंदिरांनी त्यांच्या दृष्टीकोनातून मूर्खपणाची गोष्ट केली हे नक्की. त्यांना इंटेलिजेन्स ब्युरोकडून लोक आणीबाणीमुळे खूष आहेत असा अहवाल प्राप्त झाला होता. त्याचे कारण लोक घरी चार भिंतीआड जे काही बोलायचे असेल ते बोलत होते पण बाहेर काहीही बोलायला घाबरत होते. त्यामुळे असंतोष असला तरी तो दिसत नव्हता. त्यामुळे निवडणुका घेऊन जिंकायचे आणि आणीबाणी आणायच्या निर्णयाला लोकांची मान्यता मिळाली असा प्रचार करायचा, आंतरराष्ट्रीय स्तरावर आणीबाणीविरूध्द प्रतिक्रिया आली होती त्याला उत्तर द्यायचे असा काहीतरी डाव त्यांचा असावा. पण तिथे त्यांना फसायला झाले.
In reply to नाही by चंद्रसूर्यकुमार
त्यांना इंटेलिजेन्स ब्युरोकडून लोक आणीबाणीमुळे खूष आहेत असा अहवाल प्राप्त झाला होता.
तो अहवाल बरोबर असावा. आणिबाणी खूप चांगली होती असे आणिबाणी रद्द करून ४४ वर्षे उलटल्यानंतरही काही जणांचे मत आहे (यात १९७७ नंतर जन्म झालेले सुद्धा आहेत). मग त्या काळात बऱ्याच जणांचे हे मत असणार.In reply to नाही by चंद्रसूर्यकुमार
त्यापूर्वी देशात आणीबाणी आणली गेली नव्हती असे नाही>> १९६२ आणि १९७१ च्या आणीबाणीविषयी माहिती नव्हते. त्यावेळी बंधने फारशी नव्हती का? की काही ठराविक बंधने होती? त्याविरुद्ध फारसे बोलले न गेल्याने त्या दोन घटनांची चर्चा होत नाही. जितक्या लोकांना १९७५ च्या आणीबाणी विषयी माहिती असते, त्याच्या १ टक्का लोकांनाही १९६२ व १९७१ विषयी माहिती असेल का शंका आहे. की १९७५ समोर आधीच्या दोन घटना झाकोळल्या गेल्या? १९६२ - बाह्य कारण - चीन आक्रमण १९७५ - अंतर्गत कारण - (सांगण्यापुरते) विद्यार्थी, रेल्वे आंदोलन इत्यादी + (खरे) न्यायालयाचा निकाल. १९७१ - बांग्लादेश युद्ध? सांगताना काय कारण होते? जमल्यास पुढे मागे १९६२ व १९७१ च्या आणीबाणी निर्बंधांविषयी लिहावे ही विनंती - का झाले, कसे झाले, काय निर्बंध होते, काय परिणाम झाले? १९७५ नंतर परत कधी आणीबाणी लागू झाली होती का? (ज्याचा गाजावाजा झाला नव्हता?) - --(माझ्या मते शक्यता शून्य आहे. कारण १९७५ चे चटके सोसल्या नंतर कोणत्याही पक्षाने तसा प्रयत्न केला असता तर कोणत्यही विरोधी पक्षाने त्याला प्राणपणाने विरोध केला असता, आणि हे लपून राहिलं नसतं.) २.
इंदिरांची हुकूमशाहीकडे वाटचाल पूर्वीपासूनच सुरू झाली होती.शेजारील देशातील हुकुमशाही राजवटी पाहून तसेच महायुद्धोत्तर काळात स्वतंत्र झालेल्या प्रदेशातील निम्म्याहून अधिक देशांत हुकुम्शाही/लष्करी राजवट असल्याने इंदिरा गांधी यांना तो मोह झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही हे इतक्या योजनाबद्ध पद्धतीन १९७१ पासून सुरू असणे धक्कादायक आहे. भारतात खरेच हुकुमशाही आली असती तर आताच्या क्षणापर्यंत त्याचे भयानक परिणाम भोगावे लागले असते, हे नक्की! आतापर्यंत (सर्वपक्षीय सरकारांचा कालावधी) भारताची जी काही क्रेडेबिलिटी आंतरराष्ट्रीय राजकारणात आहे, त्यात भारतात सलग (विथ ऑल इट्स ड्रॉबॅक्स) लोकशाही असण्याचा मोठा हात आहे, असं वाटतं.
In reply to बरीच माहिती नवीन आणि रोचक आहे by तुषार काळभोर
१९६२ आणि १९७१ च्या आणीबाणीविषयी माहिती नव्हते. त्यावेळी बंधने फारशी नव्हती का? की काही ठराविक बंधने होती?१९६२ आणि १९७१ मध्ये शत्रूदेशाने आपल्यावर हल्ला केल्यामुळे आणीबाणी आणण्यात आली होती. १९६२ मध्ये अनेक कम्युनिस्ट नेत्यांना सरकारने तुरूंगात टाकले होते* कारण चीन कम्युनिस्ट विचारसरणीचा देश असल्याने भारतातल्या कम्युनिस्ट नेत्यांनी चीनच्या बाजूची भूमिका घेतली होती. त्याव्यतिरिक्त या दोन आणीबाणींच्या वेळेस इतर काही कारवाई केली नव्हती. तशी गरजच नव्हती. आणीबाणीच्या परिस्थितीत सरकारला कडक पावले उचलायचा अधिकार मिळतो पण तो किती वापरायचा हे सरकारच ठरविते. *: कम्युनिस्ट हे चीन समर्थक ही प्रतिमा झाली होती ती पुसायला म्हणून पक्षातर्फे देशाच्या जवानांसाठी रक्तदान शिबिरे आयोजित करावीत ही मागणी नंतर २००६ ते २०११ या काळात केरळचे मुख्यमंत्री झालेल्या व्ही.एस.अच्युतानंदन यांनी चीन युध्दाच्या वेळेस केली होती. त्यानंतर अच्युतानंदनना पक्षाच्या पॉलिट ब्युरोमधून काढण्यात आले होते.
१९७५ नंतर परत कधी आणीबाणी लागू झाली होती का? (ज्याचा गाजावाजा झाला नव्हता?)नाही. आतापर्यंत अंतर्गत आणि बाह्य अशांतता या कारणांनी आणीबाणी आणली गेली आहे (कलम ३५२). पण त्याव्यतिरिक्त आर्थिक कारणांमुळेही आणीबाणी आणता येते (कलम ३६०). यामुळे सरकारी कर्मचार्यांचे पगार कमी करणे, भत्ते रोखणे अशाप्रकारची पावले सरकारला उचलता येतात. इंदिरा सरकारनेच १९७४ च्या अर्थसंकल्पात सरकारी कर्मचार्यांचा महागाई भत्ता रोखायचा निर्णय जाहिर केला होता. त्यासाठी कलम ३६० अंतर्गत आणीबाणी आणली गेली नव्हती पण त्या स्वरूपाचे पाऊल सरकारने उचलले होते. मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या वेळेस मोदी सरकार आर्थिक आणीबाणी जाहिर करणार का ही चर्चाही झाली होती. असे काही करायची वेळ कधीच यायला नको ही सदिच्छा.
शेजारील देशातील हुकुमशाही राजवटी पाहून तसेच महायुद्धोत्तर काळात स्वतंत्र झालेल्या प्रदेशातील निम्म्याहून अधिक देशांत हुकुम्शाही/लष्करी राजवट असल्याने इंदिरा गांधी यांना तो मोह झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही हे इतक्या योजनाबद्ध पद्धतीन १९७१ पासून सुरू असणे धक्कादायक आहे.इंदिरांची पावले नक्कीच त्या दिशेने पडत होती. राज्यघटनेत नागरिकांचे मूलभूत अधिकार अत्यंत महत्वाचे मानले गेले आहेत आणि मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा कोणताही कायदा सरकार करू शकणार नाही असे राज्यघटनेतच म्हटले आहे. याविषयी आपल्या न्यायालयांच्या इतिहासात दोन केसेस अगदी मैलाचा दगड आहेत. त्यातील पहिली केस होती गोलकनाथ केस. या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की मूलभूत अधिकारांमध्ये बदल करायचा अधिकार संसदेला (पक्षी सरकारला) नाही. त्यावेळी राज्यघटनेत 'Right to property' हा मूलभूत अधिकार होता. इंदिरांच्या तथाकथित समाजवादी धोरणांना हा मूलभूत अधिकार खुपत होता. त्यात गोलकनाथ केसचा निकाल आला. त्यामुळे इंदिरांच्या सरकारने २५ वी घटनादुरूस्ती १९७१ मध्ये करून मूलभूत अधिकारांसह राज्यघटनेच्या कोणत्याही भागात बदल करायचा अधिकार संसदेला (पक्षी सरकारला) आहे असे म्हटले. आता राज्यघटनेत म्हटले आहे की मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा कोणताही कायदा सरकार करू शकणार नाही त्याचे काय? तर त्यावर असे स्पष्टीकरण देण्यात आले की सरकार कायदा करत नाहीये आणि हा बदल राज्यघटनेतच करत आहे. तसेच राज्यघटना हा काही कायदा नाही. पुढे १९७३ मध्ये केशवानंद भारती केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की संसदेला राज्यघटनेचा मूलभूत गाभा सोडून इतर कशातही बदल करता येतील. त्यातून इंदिरा सरकारच्या राज्यघटनेत वाटेल ते बदल करायच्या स्वातंत्र्यावर बंधने आणली गेली. हा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या १३ न्यायाधीशांच्या खंडपीठाने ७ विरूध्द ६ मतांनी दिला होता. नवे सरन्यायाधीश नेमायच्या वेळेस इंदिरा सरकारला न आवडणारा निकाल देणार्या जे.एम.शेलाट, के.एस.हेगडे आणि ग्रोव्हर या तीन वरीष्ठ न्यायाधीशांना डावलून इंदिरांच्या सरकारने ए.एन.रे या आपल्या बाजूने निकाल देणार्या न्यायाधीशाची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली होती. आणीबाणीदरम्यान ए.डी.एम जबलपूर केस या प्रसिध्द केसविषयी मागे एका प्रतिसादात लिहिले होते. त्यावेळी सरकारचे अॅटर्नी जनरल निरेन डे यांनी म्हटले होते की आणीबाणी असताना नागरिकांना 'Right to life and liberty' पण नसेल. जर गोलकनाथ आणि केशवानंद भारती केसचा निकाल आला नसता तर मूलभूत अधिकारांच्या यादीतून हा अधिकार इंदिरा सरकारने वगळला नसता तरी त्याला कोण अडवू शकणार होते? १९७१ मध्येच सरकारने मिसा कायदा पास केला होता. १९७६ च्या ४२ व्या घटनादुरूस्तीत तो कायदा राज्यघटनेच्या नवव्या परिशिष्टात टाकण्यात आला म्हणजे न्यायालयांना त्या कायद्याचे परिक्षण करायचा अधिकार गेला. तसेच पंतप्रधानांच्या निवडीला कोणी आव्हान देऊ शकणार नाही, पंतप्रधानांवर त्यांनी सत्तेवर येण्यापूर्वी, सत्तेत असताना आणि सत्तेतून गेल्यानंतर काहीही केले तरी त्यासाठी खटला चालवता येणार नाही असे राज्यघटनेत बदल करणे ही हुकूमशहा बनायची तयारी नव्हती तर दुसरे काय होते? कोणी म्हणेल की राज्यघटनेत बदल करून सनदशीर मार्गाने हा प्रयत्न चालू असेल तर ती हुकूमशाहीकडे पावले कशी होती? पण हिटलरही असा सनदशीर मार्गानेच निवडून आला होता आणि सनदशीर मार्गानेच त्याने सुरवातीला सर्वाधिकार आपल्याकडे घेतले होते हे पण विसरता येणार नाही. ही सगळी हुकूमशहा बनायची तयारी नव्हती तर काय होते? नागरिकांच्या मूलभूत अधिकारात वाटेल ते बदल करायची इच्छा असणे हा खरोखरच धक्कादायक प्रकार होता. केशवानंद भारती केसमध्ये नानी पालखीवालांनी केरळमधील स्वामी केशवानंद भारतींच्या मठाच्या बाजूने तीन आठवडे प्रभावी युक्तीवाद केला आणि आपले मूलभूत अधिकार वाचवले. पण ते काढून घेण्याच्या दिशेनेच इंदिरा सरकारची वाटचाल चालू होती.
भारतात खरेच हुकुमशाही आली असती तर आताच्या क्षणापर्यंत त्याचे भयानक परिणाम भोगावे लागले असते, हे नक्की! आतापर्यंत (सर्वपक्षीय सरकारांचा कालावधी) भारताची जी काही क्रेडेबिलिटी आंतरराष्ट्रीय राजकारणात आहे, त्यात भारतात सलग (विथ ऑल इट्स ड्रॉबॅक्स) लोकशाही असण्याचा मोठा हात आहे, असं वाटतं.नक्कीच.
In reply to प्रतिसाद by चंद्रसूर्यकुमार
In reply to 1977 मध्ये जर इंदिरा परत by आनन्दा
1977 मध्ये जर इंदिरा परत निवडून आल्या असत्या तर भारतात हुकूमशाही आलीच असती.हो आणि आणीबाणीच्या काळात सगळे प्रकार केले होते त्याला लोकांकडून मान्यता मिळाली असा उलटा प्रचार करायची संधी त्यांना मिळाली असती.
In reply to बरीच माहिती नवीन आणि रोचक आहे by तुषार काळभोर
भारतात सलग (विथ ऑल इट्स ड्रॉबॅक्स) लोकशाही असण्याचा मोठा हात आहे, असं वाटतं.भारत शतको शतके राजेशाही मध्ये पिचलेला असल्याने येथील जनता सहजा सहजी लोकशाहीचा त्याग करेल हा मुद्दाच निर्माण होत नाही... विथ ऑल इट्स ड्रॉबॅक्स मी ठामपणे म्हणू शकतो की भविष्यात सर्वात चांगली लोकशाहीची राबवणूक करणाऱ्या देशात भारताचे स्थानही अव्वल असेल. त्यामुळे इथली लोकशाही भक्कम आहे जगाने काळजी करू नये अनेक नेते मंडळी मात्र अजूनही सरंजामी मानसिकतेमध्ये अडकून आहेत हे खरे पण तयातून डावखुरे फार काहीही साध्य करणार नाहीत
In reply to भारतात सलग (विथ ऑल इट्स by गॉडजिला
In reply to भारतात लोकशाही रुजण्याचे आणि by सुबोध खरे
In reply to भारत कम्युनीस्ट न बनण्यामागेही बहुसंख्य हिंदुत्वच असेल... by गॉडजिला
In reply to त्याचे माहीत नाही, पण हिंदू by आनन्दा
In reply to भारत कम्युनीस्ट न बनण्यामागेही बहुसंख्य हिंदुत्वच असेल... by गॉडजिला
In reply to अगदी बरोबर by सुबोध खरे
In reply to नाही by चंद्रसूर्यकुमार
In reply to आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुकीत by Rajesh188
In reply to Ok. म्हणजे बहुतेक उत्तर भारतच by आनन्दा
In reply to आणि मोदीना पण आणीबाणी आणायला by आनन्दा
In reply to ज्या राज्यात भाजपचे सरकार by श्रीगुरुजी
In reply to तरी काही प्रश्न येतातच by Rajesh188
In reply to तरी काही प्रश्न येतातच by Rajesh188
In reply to आणीबाणी ची कारण by Rajesh188
In reply to Congress मधिल असंतुष्ट जनता by तिता
In reply to मिपा प्रशासन by Rajesh188
In reply to "मीडिया नी (ते पण भारतीय by सुक्या
In reply to कायम आत्मविश्वासाने ठोकून by श्रीगुरुजी
In reply to राजेश188 प्रत्येक धाग्यावर by रावसाहेब चिंगभूतकर
वाचतोय