यापूर्वीचे लेखन
आणीबाणीची चाहूल- भाग १
आणीबाणीची चाहूल- भाग २
आणीबाणीची चाहूल- भाग ३
आणीबाणीची चाहूल- भाग ४
आणीबाणीची चाहूल- भाग ५
आणीबाणीची चाहूल- भाग ६
आणीबाणीची चाहूल- भाग ७
आणीबाणीची चाहूल- भाग ८
आणीबाणीची चाहूल- भाग ९
आणीबाणीची चाहूल- भाग १०
आणीबाणीची चाहूल- भाग ११
मागच्या भागात आपण १२ जूनला अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर दिल्लीत झालेल्या घटनांचा परामर्श घेतला.
१९७५ पूर्वीपासूनच इंदिरा गांधी त्यांचे कनिष्ठ पुत्र संजयवर अधिक प्रमाणावर अवलंबून राहायला लागल्या होत्या. असे म्हणतात की १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विरोधकांच्या 'इंदिरा हटाओ' ला प्रत्युत्तर म्हणून इंदिरांकडून 'गरीबी हटाओ' चा नारा दिला त्यामागे संजयचे डोके होते. आताही संजयच या अडचणीच्या वेळेस आपल्यामागे उभा राहिल आणि यातून मार्ग काढेल अशी इंदिरांना विश्वास होता. देहरादूनचे डून स्कूल आणि स्वित्झर्लंडमधील एक बोर्डिंग स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलेल्या संजयने इंग्लंडमध्ये रोल्स रॉईस या उंची गाड्यांची निर्मिती करणार्या कंपनीच्या कारखान्यात त्याने तीन वर्षे उमेदवारी केली होती. भारतात परतल्यावर सामान्य लोकांना गाडी परवडायला हवी या उद्देशाने मारूती मोटर्स लिमिटेड या कंपनीची स्थापना त्याने केली.
संजय गांधी आपल्या आईबरोबर
(संदर्भः https://www.sundayguardianlive.com/wp-content/uploads/2020/06/Untitled-…)
संजयने आपल्याभोवती काही लोकांचा गोतावळा उभा केला होता. त्यात महत्वाचे होते यशपाल कपूरांचे भाचे राजिंदर कुमार धवन (आर.के.धवन). हे धवन इंदिरा गांधींच्या पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त खाजगी सचिव होते. एकेकाळी रेल्वेमध्ये कारकून म्हणून कामाला असलेले धवन थेट पंतप्रधान कार्यालयात पोहोचले ते आपले मामा यशपाल कपूर आणि संजय यांच्या आशीर्वादाने. संजय या धवनकरवी सरकारी कामात लुडबूड करायला लागला होता. धवन आता इतके ताकदवान झाले होते की ते पंतप्रधानांच्या नावाने कनिष्ठ मंत्र्यांना परस्पर खडसावू शकत.
आर.के.धवन इंदिरा गांधींबरोबर
(संदर्भः https://gumlet.assettype.com/nationalherald/2018-08/70a378d3-ec85-4f87-…)
संजयच्या गोतावळ्यामध्ये आणखी एक नाव होते आणि ते म्हणजे हरियाणाचे मुख्यमंत्री बन्सीलाल यांचे. याच बन्सीलालांनी संजयच्या मारूती कंपनीला गुरगावजवळ मानेसर येथे जवळपास ३०० एकर जमिन देऊ केली होती. संजय-धवन-बन्सीलाल या तिघांना इंदिरा गांधींभोवतीची त्रिमूर्ती असे म्हटले जायचे. कोणत्याही थराला जाऊन इंदिरांसाठी वाटेल ते करून देणे हा या तिघांचा हातखंडा होता.
बन्सीलाल
(संदर्भः https://www.jagranimages.com/images/13_09_2019-bansilal_19573458.jpg)
इंदिरांच्या गोतावळ्यामध्ये आणखी एक गृहस्थ होते. ते होते काँग्रेसचे अध्यक्ष देवकांत बरूआ. इंदिरा गांधींचे दिवंगत पती फिरोज गांधींचे हे मित्र होते. फिरोज आणि इंदिरांमध्ये मतभेद होत असताना दोघांमध्ये मध्यस्थी करून समेट घडवून आणायचा प्रयत्न या बरूआंनी वेळोवेळी केला होता. काँग्रेसमध्ये असले तरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी जवळीक असलेले काही नेते होते. त्यात चंद्रजीत यादवांबरोबर या बरूआंचाही समावेश होता. संजयला कम्युनिस्ट अजिबात आवडायचे नाहीत त्यामुळे या बरूआंविषयी त्याचे मत फारसे चांगले नव्हते. पण आताचा प्रसंगच असा होता की असल्या सगळ्या गोष्टी गुंडाळून ठेऊन सगळ्यांना एकत्र येणे भाग पडले.
देवकांत बरूआ
(संदर्भः https://lh3.googleusercontent.com/proxy/34Ft6MbvMKg-GDPicDXBLloy_KvvhLv…)
१९६९ मध्ये इंदिरांनी बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय घेतला होता तेव्हा त्या निर्णयाच्या समर्थनार्थ पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर समर्थकांची गर्दी जमली होती आणि त्या निर्णयाच्या बाजूने घोषणाबाजी त्यांच्याकडून होत होती. ही गर्दी जमा करण्यात त्यावेळी पंतप्रधान कार्यालयात विशेष अधिकारी असलेल्या यशपाल कपूर यांनी पुढाकार घेतला होता. त्याचीच पुनरावृत्ती करायचे ठरले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालात यशपाल कपूर यांच्या नावाचा थेट उल्लेख असल्याने ते यावेळी प्रत्यक्षपणे यात नव्हते तर त्यांचे भाचे आर.के.धवन यांनी उत्तर भारतातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना (पंजाबचे मुख्यमंत्री ग्यानी झैलसिंग, हरियाणाचे मुख्यमंत्री बन्सीलाल, राजस्थानचे मुख्यमंत्री हरिदेव जोशी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणा) पंतप्रधान कार्यालयातून फोन केले आणि इंदिरांच्या समर्थनासाठी लोक पाठवायचा आदेश दिला. या चारही मुख्यमंत्र्यांनी लगेच त्या आदेशाचे पालन केले. १३ आणि १४ तारखेला संध्याकाळी या गर्दीपुढे भाषण करायला बाहेर आल्या. या दोन्ही दिवशी त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य केले. इंदिरा नक्की काय म्हणाल्या याविषयी सोशालिस्ट इंडियाच्या १४ जून १९७५ च्या अंकात आलेली बातमीच इथे देतो.
सोशालिस्ट इंडियाच्या २१ जून १९७५ च्या अंकात इंदिरांच्या समर्थनार्थ दिल्लीत लावलेल्या पोस्टर्सचा पुढील फोटो होता.
१८ जूनची काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक
१८ जूनला दिल्लीत काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक झाली. तरूण तुर्क सोडून काँग्रेसचे लोकसभा आणि राज्यसभेतील सगळे खासदार या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी यशपाल कपूर काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार असल्याने ते पण या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी 'देश की नेता इंदिरा गांधी' अशी घोषणा दिली. काँग्रेस अध्यक्ष देवकांत बरूआंनी यावेळी बोलताना लाचारीची आणि लाळघोटेपणाची परमावधी गाठत Indira is India, India is Indira हे वक्तव्य केले. या घोषणेमुळे आपले नाव इतिहासात कायमच काँग्रेसचा एक दरबारी भाट म्हणून अनादरानेच घेतले जाईल अशी व्यवस्था देवकांत बरूआंनी करून ठेवली. संरक्षणमंत्री स्वर्णसिंग यांना आता आपल्याला पंतप्रधानपद मिळणे शक्य नाही हे लक्षात आले असावे. कारण त्यांनीही या बैठकीत 'What happens to her happens to India and what happens to India happens to her' असे काहीसे त्या प्रकारचेच वक्तव्य दिले. या बैठकीला स्वतः इंदिरा गांधी पण उपस्थित होत्या. त्या तिथून लवकर निघाल्या. त्या बैठकीतून गेल्यानंतर काँग्रेस संसदीय पक्षाने परत एकदा इंदिरा गांधींच्या समर्थनाचा ठराव पास केला.
२० जूनची काँग्रेस पक्षाची बोट क्लबमधील सभा
२० जूनला इंदिरांच्या समर्थनासाठी काँग्रेस पक्षाने एक मोठ्या सभेचे आयोजन केले. या सभेसाठी परत एकदा वर उल्लेख केलेल्या चार मुख्यमंत्र्यांना या सभेसाठी लोक पाठवायचा आदेश संजयच्या चौकडीतून दिला गेला. या सभेसाठी उत्तर प्रदेशातून अगदी वाराणसीपासून लोक आणले गेले. दिल्लीचे उपराज्यपाल आणि माजी आय.सी.एस अधिकारी किशन चंद यांनी तर 'इंदिरांच्या समर्थनासाठी लोकांचा महापूर आणायला हवा' असे म्हटले. या किशन चंद यांचे सचिव होते २००८-०९ या काळात मुख्य निवडणुक आयुक्त झालेले नवीन चावला. किशन चंद आणि नवीन चावला यांनी २० तारखेच्या सभेसाठी दिल्लीतील डी.टी.सीच्या बस सामान्य लोकांसाठी जवळपास शिल्लक ठेवल्याच नाहीत तर दिल्लीतील जवळपास सगळ्या बस या सभेसाठी लोकांची ने-आण करायला वापरल्या.
२० तारखेची बोट क्लबवरील सभा प्रचंड मोठी होती. स्वतः इंदिरा गांधींनी या सभेला 'a sea of humanity' असे म्हटले. या सभेला काँग्रेसचे सगळे मोठे नेते व्यासपीठावर उपस्थित होते. या सभेत परत एकदा देवकांत बरूआंनी आपल्या लाचारीचे प्रदर्शन घडविले. 'इंदिरा तेरे सुबह की जय, तेरे शाम की जय, तेरे नाम की जय, तेरे काम की जय' अशी घोषणा आणखी एकदा दिली. या सभेत इंदिरा गांधींनी विरोधकांवर कडाडून हल्ला चढवला. आपण गरीबांसाठी लढत असल्यानेच त्यांच्या डोळ्यात खुपत होतो. या लोकांना आपल्याला निवडणुकीत हरवता येणे शक्य नाही म्हणून ते लोक ही लढाई न्यायालयाकरवी लढत आहेत अशा स्वरूपाचा आरोप त्यांनी परत एकदा केला.
या सभेची २१ जून १९७५ च्या सोशालिस्ट इंडियाच्या अंकात आलेला फोटो इथे देत आहे.
या भागात आपण बघितले की राजीनामा द्यायचा नाही हे नक्की केल्यानंतर काँग्रेसच्या जी-हुजूर संस्कृतीचे आणि लाचारीचे ओंगळवाणे प्रदर्शन पुढील काही दिवस चालू होते. या कामासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून सरकारच्या बस इंदिरांच्या समर्थनासाठी लोकांची ने-आण करायला वापरल्या गेल्या. आणीबाणी आणायची तयारी तेव्हापासूनच चालू होती. मागच्या एका भागावरील एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे ८ जानेवारी १९७५ रोजी सिध्दार्थ शंकर रे यांनी इंदिरांना लिहिलेल्या एका पत्रात 'कडक भूमिका घ्या' अशा स्वरूपाची मागणी केली होती. अनेक पुस्तकांमध्ये असा उल्लेख असतो की २५ जूनच्या सभेत जयप्रकाश नारायणांनी लष्कर आणि पोलिस यांना इंदिरा सरकारचे आदेश मानू नका असे आवाहन केल्यामुळे इंदिरांनी आणीबाणीची घोषणा केली. आणखी एका पुस्तकात मी असेही वाचले आहे की आणीबाणी आणावी ही कल्पनाच सिध्दार्थ शंकर रेंनी इंदिरांच्या मनात २५ जूनच्या संध्याकाळी भरवली आणि मग आणीबाणी लादली गेली. पण तुरूंगात टाकायच्या नेत्यांची यादीचा पहिला आराखडा १५ जूनच्या सुमारासच पूर्ण झाला होता आणि त्यावर संजय लक्ष ठेऊन होता. त्यावरून आणीबाणी लादायचे अचानक ठरले असे वाटत नाही. याविषयी पुढच्या भागात लिहेन.
अवांतरः २०१७ मध्ये आलेल्या इंदू सरकार चित्रपटात नवीन सरकार हा आणीबाणीकाळात उच्चपदस्थ सरकारी अधिकारी दाखवला आहे आणि त्याने शेवटी आत्महत्या केली असेही दाखवले आहे. मला वाटते की नवीन सरकार हे पात्र दिल्लीचे उपराज्यपाल किशन चंद आणि त्यांचा सचिव नवीन चावला या दोघांच्या मिश्रणातून या चित्रपटासाठी तयार केले गेले असावे. कारण १९७८ मध्ये किशन चंद यांनी आत्महत्या केली.

वर्गीकरण
वाचने
21385
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचतोय
विद्याचरण शुक्ल सुद्धा
हो
In reply to विद्याचरण शुक्ल सुद्धा by श्रीगुरुजी
आणिबाणीची योजना बहुतेक ५-६ महिन्यांपासून योजली जात होती.
In reply to विद्याचरण शुक्ल सुद्धा by श्रीगुरुजी
तर आणिबाणी लागू केली नसती.
In reply to आणिबाणीची योजना बहुतेक ५-६ महिन्यांपासून योजली जात होती. by तुषार काळभोर
१९७७ च्या प्रचारात एक
ही अजून एक
In reply to १९७७ च्या प्रचारात एक by श्रीगुरुजी
इंदिरा तेरे सुबह की जय,
ह्याच विद्याचरण शुक्लान्चा
छोटा वाटला हा भाग, पण अर्थात
संजयच्या पत्नी मनेका आणि
In reply to छोटा वाटला हा भाग, पण अर्थात by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मनेका लग्नापूर्वी मॉडेलिंग
In reply to संजयच्या पत्नी मनेका आणि by मनो
कॉन्स्पिरसी थिअरीज
In reply to छोटा वाटला हा भाग, पण अर्थात by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
डंपी आणि मनेकाच्या
In reply to कॉन्स्पिरसी थिअरीज by चंद्रसूर्यकुमार
खुशवंतसिंग यांच्या शब्दांत ती
In reply to कॉन्स्पिरसी थिअरीज by चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद
In reply to खुशवंतसिंग यांच्या शब्दांत ती by मनो
आणीबाणीची प्रक्रिया
अत्यंत स्वार्थी माणूस जे
In reply to आणीबाणीची प्रक्रिया by तुषार काळभोर
नाही

त्यांना इंटेलिजेन्स
In reply to नाही by चंद्रसूर्यकुमार
त्यांना इंटेलिजेन्स ब्युरोकडून लोक आणीबाणीमुळे खूष आहेत असा अहवाल प्राप्त झाला होता.तो अहवाल बरोबर असावा. आणिबाणी खूप चांगली होती असे आणिबाणी रद्द करून ४४ वर्षे उलटल्यानंतरही काही जणांचे मत आहे (यात १९७७ नंतर जन्म झालेले सुद्धा आहेत). मग त्या काळात बऱ्याच जणांचे हे मत असणार.बरीच माहिती नवीन आणि रोचक आहे
In reply to नाही by चंद्रसूर्यकुमार
प्रतिसाद
In reply to बरीच माहिती नवीन आणि रोचक आहे by तुषार काळभोर
1977 मध्ये जर इंदिरा परत
In reply to प्रतिसाद by चंद्रसूर्यकुमार
हो
In reply to 1977 मध्ये जर इंदिरा परत by आनन्दा
भारतात सलग (विथ ऑल इट्स
In reply to बरीच माहिती नवीन आणि रोचक आहे by तुषार काळभोर
भारतात लोकशाही रुजण्याचे आणि
In reply to भारतात सलग (विथ ऑल इट्स by गॉडजिला
भारत कम्युनीस्ट न बनण्यामागेही बहुसंख्य हिंदुत्वच असेल...
In reply to भारतात लोकशाही रुजण्याचे आणि by सुबोध खरे
त्याचे माहीत नाही, पण हिंदू
In reply to भारत कम्युनीस्ट न बनण्यामागेही बहुसंख्य हिंदुत्वच असेल... by गॉडजिला
?
In reply to त्याचे माहीत नाही, पण हिंदू by आनन्दा
अगदी बरोबर
In reply to भारत कम्युनीस्ट न बनण्यामागेही बहुसंख्य हिंदुत्वच असेल... by गॉडजिला
हा प्रतिसाद श्री गॉडजिला याना
In reply to अगदी बरोबर by सुबोध खरे
ही खूपच रोचक माहिती आहे.
In reply to नाही by चंद्रसूर्यकुमार
हा भाग वाचायला थोडा उशीरच
आणिबाणीत आमच्या शाळेतील काही
पुढील भागाची वाट बघत आहे.
आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुकीत
Ok. म्हणजे बहुतेक उत्तर भारतच
In reply to आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुकीत by Rajesh188
आणि मोदीना पण आणीबाणी आणायला
In reply to Ok. म्हणजे बहुतेक उत्तर भारतच by आनन्दा
ज्या राज्यात भाजपचे सरकार
In reply to आणि मोदीना पण आणीबाणी आणायला by आनन्दा
मुळात
In reply to ज्या राज्यात भाजपचे सरकार by श्रीगुरुजी
तरी काही प्रश्न येतातच
खरे कारण फक्त मला माहिती आहे.
In reply to तरी काही प्रश्न येतातच by Rajesh188
चला !!
In reply to तरी काही प्रश्न येतातच by Rajesh188
आणीबाणी ची कारण
ही खरी कारणे नाहीत. खरे कारण
In reply to आणीबाणी ची कारण by Rajesh188
Congress मधिल असंतुष्ट जनता
त्यांनी सत्ता मिळवली असती
In reply to Congress मधिल असंतुष्ट जनता by तिता
संपादक मंडळाला विनंती.
मिपा प्रशासन
"मीडिया नी (ते पण भारतीय
In reply to मिपा प्रशासन by Rajesh188
कायम आत्मविश्वासाने ठोकून
In reply to "मीडिया नी (ते पण भारतीय by सुक्या
खरयं.
In reply to कायम आत्मविश्वासाने ठोकून by श्रीगुरुजी
राजेश188 प्रत्येक धाग्यावर
:)
In reply to राजेश188 प्रत्येक धाग्यावर by रावसाहेब चिंगभूतकर
हे नाव तुम्ही मिपा वर कसा
पु भा प्र