नाडीपट्टीतील कथनात कुंडली ही त्या व्यक्तीच्या जन्माच्या आधीच बनून तयार आहे.
सध्या ज्योतिष शास्त्राच्या नावावर भलतीच तुफान चर्चा रंगली आहे.
नाडीभविष्याच्या पट्ट्यातून भविष्य कथना खेरीज अशा अनेक बाबी आहेत की ज्यावर संशोधन होणे गरजेचे आहे. यासाठी शोधक वृत्तीच्या तमिळ भाषिकांना उपयोगी पडेल असे डेटा बँकचे काम पुन्हा चालू झाले आहे.
काही दिवसापासून नाडी ग्रंथ भविष्यावरील इंग्रजी व हिंदीतील पुस्तकांच्या नव्या आवृत्तीचे काम हाती घेतले आहे. त्यात आता भर पडून भारतभरातील ३४३ नाडी केंद्रांचे पत्ते सादर केले आहेत. उद्देश असा की आपापल्या शहरा, गावाजवळच्या केंद्रातून नाडीपट्ट्यातून आपले भविष्य जाणून घेता यावे. केंद्रवाले माझे कोणी लागत नाहीत, पण प्राचीन भारतीय नाडी महर्षींच्या या अदभूत कार्याची माहिती व्हावी म्हणून हे पत्ते लोकांच्या उपयोगी पडावेत. काहींच्या ताडपट्टया तिथे सापडतील काहींच्या नाही. काहींना कथन समाधान कारक वाटणार नाही. तर काहींना हा खर्चिक प्रकार असल्याने त्या वाटेला न जाणे योग्य वाटेल. ज्याच्या त्याच्या विचारांचा प्रश्न असल्याने मला त्यात पडायची गरज वाटत नाही.
या पार्श्वभूमीवर ताडपट्ट्यात व्यक्तीचे नाव कोरून असते का असा प्रश्न मनात येतो. विशेेषतः जर व्यक्ती तमिळ न जाणणारी असेल तर तो आणखीन गंभीर बनतो.
सन २०१५ मधे मी आणि विवेक चौधरी नेपाळला भृगु संहितेच्या शोधात गेलो होतो. परतताना लखनौ व प्रतापगढच्या भृगु केंद्रांना भेट द्यायला निघालो होतो. लखनौला स्टेशनवरून सकाळी भृगुशास्त्रींना ठरल्याप्रमाणे आम्ही येत आहोत म्हणून फोन लावला तर कळले की ते आज भेटू शकत नाहीत. वाईट वाटले की आधी ठरवूनही असे घडावे म्हणून. दिवस फुकट जाणार होता. नाश्ता घेता घेता मी माझ्या पुस्तकातील नाडीकेंद्रांच्या पत्त्यातून लखनौ केंद्राचा फोन क्रमांक काढून संपर्क साधला.
'हो, याना १० वाजेनंतर' म्हणून तमिळटोन मधे उत्तर मिळाले. गुरुनाथना मी आधी ओळखत नव्हतो. ना त्यांनी माझे तमिळ मधील पुस्तक वाचले होते. पण भेटीच्या सुरवातीलाच त्यांनी आपण एखाद्या ताडपट्टीचे वाचन करून त्याचे चित्रिकरण करून द्यायला आढेवेढे न घेता मान्य केले. त्याच फ्लॅटमधे त्यांची मंडळी राहत होती. त्यांनी कपाळाला भस्मम, चंदनाचा टीका लावून, सजून एका ताडपट्टीच्या बंडलातील पट्ट्या सुट्या करत म्हटले, 'कोणाचे पहायचे आहे?'
'आम्ही त्यांना कुठलीही पट्टी चालेल' म्हटल्यावर काही पट्टीतील व्यक्तींची नावे वाचायला सुरु केले. एके ठिकाणी विवेक म्हणाला, 'सर ही पट्टी चांगली वाटते, यात नावाची फोड करून ती पहाणाऱ्यांना, पट्टीत नावे, जन्मदिनांक व ग्रहमान कसे लिहिलेले असते ते समजून घ्यायला सोपे जाईल.'
त्या पट्टीतील नावे असलेले, ग्रहपरिस्थिती व जन्म दिनांक असलेले श्लोक एका नोटबुकमधे लिहून काढल्यावर त्याच्या संदर्भाने चित्रीकरण सुरु झाले.
हे चित्रण विवेकच्या मोबाईलवरून केले गेले आहे. शिवाय माझा मोबाईलवरील चित्रण मिळून (65,167 views•18 Jun 2015) इतक्या प्रचंड प्रमाणात पाहिले गेले आहे.
कुंडली बनवताना जन्मस्थळ, जन्मवेळ व जन्मतारीख या गोष्टी मूलभूत डेटा म्हणून वापरला जातो.
नाडीपट्टीतील कथनात कुंडली ही त्या व्यक्तीच्या जन्माच्या आधीच बनून तयार आहे.
ते कसे ते पाहू.
त्यामुळे सामान्य जोतिषशास्त्राच्या संकल्पनांना तडा जातो. असे झाल्याने जोतिषशास्त्री फुरंगटतात. आलेत मोठे हे लुंगीवाले, यांना काय कळतय? म्हणून संभावना त्यांच्या पदरी पडते. आमच्या सारख्या संशोधक नाडीप्रेमींवर खोटेपणाचा, आमचे त्यांच्याशी साटेलोटे असल्याचा आळ येतो. या सर्वाला टक्कर देत आम्ही नाडी ग्रंथ प्रेमींनी १८००शे स्कॅन्सचा डेटा गोळा केला आहे.
ही डेटाबँक माझ्या पश्चात अशा संस्थेच्या किंवा विश्वविद्यालयात ठेवली जावी कि जे इंडॉलॉजीचे अभ्यासक आहेत त्यातील ताडपत्यावरील तमिळ लेखनाच्या शोधकार्याला वाहून घेतलेल्यांना त्यातील डेटा सहजपणे उपलब्ध व्हावा व त्यांचे शोधकार्य विद्वानांसमोर ठेवले जावे...
वर्गीकरण
चांगला उपक्रम.
अरे देवा....!
In reply to अरे देवा....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ही क्लिप सरांच्या बरोबर मी केली होती हे विसरून गेलो होतो
In reply to अरे देवा....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमचं नाव आहे का हो सर
In reply to तुमचं नाव आहे का हो सर by प्रचेतस
पट्टी नव्हे उसके हाथो की लकिरो पर...
In reply to पट्टी नव्हे उसके हाथो की लकिरो पर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वप्नातून सत्यात
In reply to स्वप्नातून सत्यात by शशिकांत ओक
स्वप्न ते सत्य.
In reply to स्वप्न ते सत्य. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्यासारख्या विचारकाने
In reply to पट्टी नव्हे उसके हाथो की लकिरो पर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वप्नातून सत्यात
In reply to स्वप्नातून सत्यात by शशिकांत ओक
हे कष्ट करण्यात जे लोक मदत
In reply to हे कष्ट करण्यात जे लोक मदत by सतिश गावडे
फूकट काय नसतं हो.....
In reply to तुमचं नाव आहे का हो सर by प्रचेतस
इथे सादर
लेखात म्हणतात ते खरं आहे.
सलाम तुमच्या तपश्चर्येला
छान
In reply to छान by Gk
बरोबर
In reply to बरोबर by शशिकांत ओक
.
In reply to . by Gk
नाडी ग्रंथ भविष्य
In reply to . by Gk
हे म्हणजे .....
In reply to हे म्हणजे ..... by गामा पैलवान
तसे नाही..
In reply to तसे नाही.. by आनन्दा
छान
असे कोणी उत्सुक सदस्य इथे
In reply to असे कोणी उत्सुक सदस्य इथे by शशिकांत ओक
माझी शंका
In reply to माझी शंका by सतिश गावडे
अहो असं काय करता ?
In reply to माझी शंका by सतिश गावडे
शोध कार्यात सहभागी होण्याच्या
एक शंका ..हि क्लीप पाहिल्यानंतर.
भाषेचा खुलासा
In reply to भाषेचा खुलासा by शशिकांत ओक
मला आवडेल असे प्रात्यक्षिक.
ते अपेक्षित होते...
In reply to ते अपेक्षित होते... by शशिकांत ओक
नवा धागा सादर करतोय
नवा धागा सादर करतोय
नाडीपट्टीतील कथनात कुंडली ही