Skip to main content

नाडी ग्रंथ भविष्य

नाडीपट्टीतील कथनात कुंडली ही त्या व्यक्तीच्या जन्माच्या आधीच बनून तयार आहे.

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 22/09/2020 01:29 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या ज्योतिष शास्त्राच्या नावावर भलतीच तुफान चर्चा रंगली आहे. नाडीभविष्याच्या पट्ट्यातून भविष्य कथना खेरीज अशा अनेक बाबी आहेत की ज्यावर संशोधन होणे गरजेचे आहे. यासाठी शोधक वृत्तीच्या तमिळ भाषिकांना उपयोगी पडेल असे डेटा बँकचे काम पुन्हा चालू झाले आहे. काही दिवसापासून नाडी ग्रंथ भविष्यावरील इंग्रजी व हिंदीतील पुस्तकांच्या नव्या आवृत्तीचे काम हाती घेतले आहे. त्यात आता भर पडून भारतभरातील ३४३ नाडी केंद्रांचे पत्ते सादर केले आहेत. उद्देश असा की आपापल्या शहरा, गावाजवळच्या केंद्रातून नाडीपट्ट्यातून आपले भविष्य जाणून घेता यावे.