Skip to main content

अर्थ सान्गाल का?

लेखक नील_गंधार यांनी रविवार, 16/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, मला काहि मराठि शब्द आडले आहेत.त्यांचा नक्कि अर्थ कोणी सांगु शकेल काय? १. सर्जनशीलता कि स्रुजनशीलता ? ह्यातला नक्की कोणता शब्द बरोबर आहे? व त्याचा अर्थ काय? २. "अभिजात" ह्या शब्दाचा नक्की अर्थ काय? गंधार

वाचने 6607
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

अभिजात या शब्दाचा इंग्रजी अर्थ classical यावरुन मराठी अर्थ नक्कीच कळला असेल? ;;) "अनामिका"

अभिजात=१)उच्चकुलीन , श्रेष्ठ, २)निपुण, निष्णात, ३) शास्त्रोक्त सर्जनशीलता आणि सृजनशीलता = नवनिर्माण करण्याची क्षमता

सर्जनशीलता म्हणजे कलात्मकता,आणि सृजनशीलता म्हणजे नवनिर्माण क्षमता. दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत ना? वेताळ

सृजन = नवे सुचणे/घडणे सर्जन = -तेच- सर्जक = घडवणारा सर्जनशिलता = नवे घडवण्याची क्षमता अभिजात = अगोदर जन्मलेला / मुळ /आद्य /उच्चकुलीन/श्रेष्ठ झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

सर्वांचे धन्यवाद. गंधार.

सर्जन शब्दाचा इंग्लीश सर्जन (शस्त्रक्रीया विशारद) ह्या शब्दाशी काही संबंध आहे काय? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पहिला शब्द : येथे मूळ धातू सृज्‌ ६ गण परस्मैपद आणि ४ गण आत्मनेपद असा आहे त्याचा अर्थ निर्माण करणे असा आहे. त्यापासून तयार झालेले नाम म्हणजे सर्जन. त्यापासून तयार केलेला सामासिक शब्द सर्जनशील म्हणजे निर्माणकार्यांत भाग घेणारा त्याचे गुणवाचक नाम म्हणजे सर्जनशीलता = निर्माणकार्यांत भाग घेणे त्यामुळे सर्जनशील हा शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. दुसरा शब्द : येथे मूळ धातू जन्‌ ४ गण आत्मनेपद असा आहे. त्याला अभि हा उपसर्ग लावल्यावर त्याचा अर्थ जन्माला येणे, पासून जन्माला येणे, उच्च कुळात जन्माला येणे असा आहे. त्याचे क. भू. धा. वि. (कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषण ) होते अभिजात. म्हणून त्याचा अर्थ होतो उच्च दर्जाचा किंवा उच्च कुळात जन्माला आलेला. कळावे, आपला ("अभिजात" आणि "सर्जनशील") भाषांतर अनुदिनी - संचालक