नमस्कार मित्रांनो,
मला काहि मराठि शब्द आडले आहेत.त्यांचा नक्कि अर्थ कोणी सांगु शकेल काय?
१. सर्जनशीलता कि स्रुजनशीलता ? ह्यातला नक्की कोणता शब्द बरोबर आहे?
व त्याचा अर्थ काय?
२. "अभिजात" ह्या शब्दाचा नक्की अर्थ काय?
गंधार
वाचने
6644
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्जनशीलता म्हणजे ...
सर्जनशीलता म्हणजे Creativity ( मराठी मध्ये ) :-)
अभिजात
अभिजात या शब्दाचा इंग्रजी अर्थ classical
यावरुन मराठी अर्थ नक्कीच कळला असेल? ;;)
"अनामिका"
अर्थ!
अभिजात=१)उच्चकुलीन , श्रेष्ठ, २)निपुण, निष्णात, ३) शास्त्रोक्त
सर्जनशीलता आणि सृजनशीलता = नवनिर्माण करण्याची क्षमता
माझ्यामते
सर्जनशीलता म्हणजे कलात्मकता,आणि सृजनशीलता म्हणजे नवनिर्माण क्षमता. दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत ना?
वेताळ
सृजन = नवे
सृजन = नवे सुचणे/घडणे
सर्जन = -तेच-
सर्जक = घडवणारा
सर्जनशिलता = नवे घडवण्याची क्षमता
अभिजात = अगोदर जन्मलेला / मुळ /आद्य /उच्चकुलीन/श्रेष्ठ
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
धन्यवाद.
सर्वांचे धन्यवाद.
गंधार.
शस्त्रक्रीया विशारद?
सर्जन शब्दाचा इंग्लीश सर्जन (शस्त्रक्रीया विशारद) ह्या शब्दाशी काही संबंध आहे काय?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
इंग्लिश
In reply to शस्त्रक्रीया विशारद? by सुनील
'सर्जन' हा मराठी 'सर्जन' असतोच पण मराठी 'सर्जन' हा इंग्लिश 'सर्जन' असेलच असे नाही! ;)
चतुरंग
मला नाही
मला नाही वाटत.
शब्दांची व्युत्पत्ती
पहिला शब्द :
येथे मूळ धातू सृज् ६ गण परस्मैपद आणि ४ गण आत्मनेपद असा आहे
त्याचा अर्थ निर्माण करणे असा आहे. त्यापासून तयार झालेले नाम म्हणजे सर्जन.
त्यापासून तयार केलेला सामासिक शब्द सर्जनशील म्हणजे निर्माणकार्यांत भाग घेणारा
त्याचे गुणवाचक नाम म्हणजे सर्जनशीलता = निर्माणकार्यांत भाग घेणे
त्यामुळे सर्जनशील हा शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे.
दुसरा शब्द :
येथे मूळ धातू जन् ४ गण आत्मनेपद असा आहे.
त्याला अभि हा उपसर्ग लावल्यावर त्याचा अर्थ जन्माला येणे, पासून जन्माला येणे, उच्च कुळात जन्माला येणे असा आहे.
त्याचे क. भू. धा. वि. (कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषण ) होते अभिजात.
म्हणून त्याचा अर्थ होतो उच्च दर्जाचा किंवा उच्च कुळात जन्माला आलेला.
कळावे,
आपला ("अभिजात" आणि "सर्जनशील")
भाषांतर अनुदिनी - संचालक