सृजन = नवे सुचणे/घडणे
सर्जन = -तेच-
सर्जक = घडवणारा
सर्जनशिलता = नवे घडवण्याची क्षमता
अभिजात = अगोदर जन्मलेला / मुळ /आद्य /उच्चकुलीन/श्रेष्ठ
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
पहिला शब्द :
येथे मूळ धातू सृज् ६ गण परस्मैपद आणि ४ गण आत्मनेपद असा आहे
त्याचा अर्थ निर्माण करणे असा आहे. त्यापासून तयार झालेले नाम म्हणजे सर्जन.
त्यापासून तयार केलेला सामासिक शब्द सर्जनशील म्हणजे निर्माणकार्यांत भाग घेणारा
त्याचे गुणवाचक नाम म्हणजे सर्जनशीलता = निर्माणकार्यांत भाग घेणे
त्यामुळे सर्जनशील हा शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे.
दुसरा शब्द :
येथे मूळ धातू जन् ४ गण आत्मनेपद असा आहे.
त्याला अभि हा उपसर्ग लावल्यावर त्याचा अर्थ जन्माला येणे, पासून जन्माला येणे, उच्च कुळात जन्माला येणे असा आहे.
त्याचे क. भू. धा. वि. (कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषण ) होते अभिजात.
म्हणून त्याचा अर्थ होतो उच्च दर्जाचा किंवा उच्च कुळात जन्माला आलेला.
कळावे,
आपला ("अभिजात" आणि "सर्जनशील")
भाषांतर अनुदिनी - संचालक
प्रतिक्रिया
सर्जनशीलता म्हणजे ...
अभिजात
अर्थ!
माझ्यामते
सृजन = नवे
धन्यवाद.
शस्त्रक्रीया विशारद?
इंग्लिश
मला नाही
शब्दांची व्युत्पत्ती