Skip to main content

नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात citizenship amendment Bill 2019

लेखक chittmanthan.OOO यांनी शुक्रवार, 13/12/2019 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
रामनाथ कोविंद यांनी केलेल्या सहिने नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले. आता सर्व देशात हा कायदा लागू होईल. जसे इतर कायदे परित होतात तसाच हा कायदा देखील परीत झाला पण याला मिळणारा प्रतिसाद काहीसा नकारात्मक असाच होता. वर्तमानपत्राची पानेच पाने भरून येत आहेत. हिंसाचाराच्या बातम्या हेडलाईन्स बनत आहेत. त्यामुळेच याबद्दल तुमच्याशी बोलायच ठरवलं आहे. हा कायदा नक्की काय आहे हे समजावून घेऊ. या कायद्याद्वारे ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतामध्ये अवैधपणे स्थलांतरित झालेले व सध्या भारतात वास्तव्यास असणारे मुस्लिमेतर लोक म्हणजेच हिंदू , शीख, बौद्ध धर्मीय नागरिक म्हणून गणले जातील. त्यांच्या स्थलान्तर मागे त्यांच्या पूर्वीच्या देशात झालेला धार्मिक हिंसाचार याला कारण मानून हेच नागरिकत्व देण्यासाठीच पाया ठरवला गेला. एखाद्या देशात धार्मिक हिंसाचार होत असेल व त्या कारणाने अल्पसंख्याक समाज दुसऱ्या देशात स्थलांतर करत असेल तर त्याला नागरिकत्व देणे त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे योग्य की अयोग्य? या कायद्याला संपूर्ण देशात विरोध केला जातोय.प्रत्येकाचे विरोध करण्याचे कारण व मार्ग वेगळे आहेत.विरोधी पक्षांनी बिल पारित झालेल्या दिवसाला काळा दिवस असे संबोधले . काहींनी तर हा धर्मभेद्यांचा विजय असा मानला गेला . उर्दू लेखक शिरीन दळवी यांनी अवॉर्ड वापसी केली. सगळ्या विरोधाचे प्रखर केंद्रबिदू ठरले ते आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्ये. इतर वेळी ही राज्य मुख्य प्रवाहापासून दूर आपल्याच नादात शीळ घालत जाणाऱ्या स्वछंद्याप्रमाने वाटतात.पण तीच राज्य सर्वात जास्त पेटलेली दिसत आहेत. पोलिस गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू झालाय. आसाममधील इंटरनेट सुविधा तर कालपासून बंद केली गेली आहे .आज सकाळीच माननीय प्रधानमंत्र्यांच आसामला शांततेसाठी संबोधित करणारे ट्विट आले. आता इंटरनेट नसताना हे ट्विट लोकांपर्यंत कशी पोचणार आणि त्याला लोक कसं उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. फक्त विरोध करून उपयोग नाही तर त्यामागची कारणे देखील आपल्याला जाणून घेतली पाहिजेत. सगळ्यात पहिला आरोप जो विरोधकांकडून केला जातोय तो म्हणजे हा कायदा संविधान विरोधी आहे. खरंच तस आहे काय? आपल्या संविधानाने समान व सर्वसमावेशक नागरिकत्वाची तरतूद केली आहे . त्यामुळे मुस्लिमांना वगळून इतर धर्मियांना नागरिकत्व देणे म्हणजे ह्या तरतुदीचा भंग आहे का हे तपासले पाहिजे . ह्याच मुद्द्याला धरून खूप सरी मते प्रदर्शित होतात. त्यामध्ये सत्ताधाऱ्यांडून ह्याला देशहिताचा व सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा कायदा मानला जातो. ह्याला विरोध करणारे पाकिस्तानची भाषा बोलतात असाही आरोप केला जातो.विरोधक या गोष्टीला मतपेटीचे राजकारण मानतात. मुस्लिमांना वंचित ठेवल्याने सत्ताधाऱ्यांना खुपसा फरक पडत नसल्याने हा अन्याय चालवला असा आरोप आहे. तसाच विरोधकांवर सुध्दा मुस्लिम मतासाठी घाणेरड्या राजकारणाचा आरोप होतो. त्याच्या पलीकडे जाऊन काहीसा वेगळा मतप्रवाह आहे जो सर्वच धर्मातील अवैध स्थलांतराचा विरोध करतो व नागरिकत्व न देण्याची मागणी करतो. त्यामध्ये ईशान्येकडील राज्ये अग्रेसर आहेत.काही लोक असाही म्हणतात की ज्या मुस्लिमेतर लोकांना भारतात यायचं होत ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्थलांतरित झाली त्यातले एक पंतप्रधान पण झाले(मनमोहन सिंह यांचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतातला). आता कोण येत असेल तर धर्म न पाहता नागरिकत्व नाकारण्यात यावं. काही लोक या कायद्याला आसाम कराराचा भंग मानतात. कारण या कराराने १९७१ पूर्वीच्या स्थलांतर करणाऱ्यांना नागरिकत्वाची तरतूद केली होती.आता नागरिकत्व कायद्याने ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत स्थलांतर नागरिकत्वाासाठी पात्र ठरवला गेला. १९७१ असे किती लोक स्थलांतरित झाले असतील असा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येते की बांगलादेशातून आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांमध्ये लाखो हिंदू स्थलांतरित झाले ज्यामुळे मूळचे असामी बोडो व इतर आदिवासी अल्पसंख्याक झाले. त्यामुळे आपल्यावर हिंदू संस्कृती लादली जाईल व आपली मूळची संस्कृती आणि भाषा नामशेष होतील अशी भीती त्यांना जाणवते . आत्ता आणि एक प्रश्न पडला तो म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश मधून मुस्लिम का भारतामध्ये स्थलांतरित झाले? त्यावेळी अस लक्षात येत की या देशात असलेल्या शिया सुन्नी मधल्या जीवघेण्या संघर्षाला कंटाळून अनेक मुस्लिमांनी भारतात स्थलांतर केले .तसेच म्यानमार व चीन यासारख्या मुस्लिम अल्पसंख्यांक असलेल्या देशातून खूप मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले . चीन मधे तर अताही ऊयगुर मुस्लिमांचा छळ सुरू आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या दोन्ही बाजू ऐकल्यावर आपण संभ्रमात पडतो की नक्की याला समर्थन द्यायचे की नाही. ह्याचे उत्तर काय? मला अस वाटत की जेव्हा भारतातल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर भारताच्या हिताच्या दृष्टीने हवे असेल तर पुन्हा एकदा गांधी नावाच्या देशभक्ताचा प्रेमात पडावे लागेल व त्याचा मानवतेचा मंत्र घेवून संपूर्ण देशातच नव्हे तर जगात धार्मिक हिंसाचाराच्या विरोधात लढले पाहिजे . इतर देशातील धार्मिक शोषण थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील . तसेच आपल्या देशातील सामाजिक सलोखा नीट ठेवावा लागेल जेणेकरून कोणत्याही कारणाने अवैध स्थलांतर होणार नाही व ज्यांचे शोषण झाले त्यांना त्यांच्या देशातच न्याय मिळेल. मानवता परमो धर्म !!

वाचने 47565
प्रतिक्रिया 153

प्रतिक्रिया

In reply to by मुक्त विहारि

पाक‍िस्‍तान से आईं ड‍िंपल वरंदानी ने सुनाई ह‍िंदुओं की दर्दनाक दास्‍तां, कहा- 'लड़कि‍यां ही नहीं, लड़कों का भी बुरा हाल' https://www.abplive.com/news/india/caa-rules-in-india-rolls-out-dimple-…

इंडियन यूनियन मुस्लिम लीग ने सुप्रीम कोर्ट में उठाया सीएए का मामला, मंगलवार को होगी सुनवाई https://www.abplive.com/news/india/supreme-court-to-hear-indian-union-m… ------- हीच लीग, पाकिस्तान आणि बांगलादेशच्या अल्पसंख्यांकांना पाठिंबा का देत नाही?

In reply to by मुक्त विहारि

न्यायालयाने विधिमंडळाच्या कायदे निर्मितीच्या क्षमतेवर कधीही शंका उपस्थित केलेली नाही. मात्र केलेला कायदा घटनेच्या विरोधात असेल तर आणि तरंच न्यायालय तो रद्द ठरवू शकतं. मोदींनी पुरेपूर अब्यास करूनंच कायदा बनवला असणार. -नाठाळ नठ्या

सगळी चर्चा उशिरा वाचली. मला या कायद्याबद्दल कोणताही आक्षेप नाही. कायद्यामध्ये भारतीय धर्म (भारतात जन्मलेले धर्म) असे स्पष्टपणे नमूद असावे असे वाटते. जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात भारतीय वंशाच्या लोकांना भारतीय धर्मामुळे छळ सोसावा लागत असेल तर भारताने या सगळ्यांना दारे खुली करावीत. मी तर म्हणेन भारतीय वंशाचा नसला तरी जपानी माणसाला बौद्ध स्वीकारल्यामुळे शिक्षा होत असेल तर त्याला देखील भारताने नागरिकत्व द्यावे. फक्त एकच मुद्दा आहे की या गोष्टी केस टू केस बेसिस वर कराव्यात. एकगठ्ठा समुदायावर होणारे धार्मिक अत्याचार अगदी स्वयंस्पष्ट असतील तर त्यांना खुशाल नागरिक करावे. उदा. पाकिस्तानातील हिंदू किंवा शीख समुदाय. अफगाणिस्तानातील बौद्ध समुदाय इत्यादी. पण प्रत्यक्षातली आकडेवारी आणि प्रचार केली जाणारी आकडेवारी यात तफावत आहे. नागरिकत्वासाठी आलेले अर्ज आकड्यानिशी मांडा असे म्हणाले तर सरकारने ते लगेच सांगावे. संसदेत कुणीतरी हे प्रश्न विचारलेही होते. जे उत्तर आले ते आणि सरकार करत असलेली जाहिरात यात खूपच फरक होता. हे कायदे आणायचे सरकारचे हेतू उदात्त असले तरी वेळा ध्रुवीकरण करण्यासाठीच आहेत हे मात्र सहज लक्षात येते. माझा तसेच अनेक विद्यमान सरकारविरोधी लोकांचा, तसेच प्रो कायदे असणार्‍या अनेक लोकांचा आक्षेप कायद्यांना नसून त्यायोगे मते मिळवण्यासाठी केल्या जाणार्‍या बुद्धिभेदाला आणि ध्रुवीकरणाला आहे. काही हजार लोकांना यातून भारतीय नागरिक होता येत असेल तर काय असा विशेष फरक पडणार आहे. लोकांना काही विशेष पडलेली नाही. ठीक आहे म्हणतात. काही विरोधक मात्र हे कायदे जणू आभाळ कोसळणार असल्यासारखे आहेत अशी का बतावणी करत आहेत हे काही कळत नाही. एकतर यातून कोणालाही हाकलणार नाहीत. मग विरोधकांनी सुद्धा उलट कायदा विस्तारित करायला मदत केली पाहिजे. श्रीलंकेतून आलेल्या तामिळ हिंदूंचा प्रश्न सुद्धा या अंतर्गत सोडवता येईल. दोन्ही बाजूंनी नको तितका फालतू बुद्धीभेद सुरु आहे. प्रत्यक्षात मात्र स्कोप खूपच लिमिटेड आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

क्षमा करा अण्णा पण जर कायदा योग्य वाटतो तर त्याने "उजवी बाजू बुद्धिभेद कशी करीत आहे?" इस्राएल जर उघडपणे जगातील ज्यू धर्मियांना दरवाजे उघडे करतात ( कागदपत्री सर्वधर्मसमावेशक असलेले पाश्चिमात्य देश पण मुख्यत्वे ख्रस्ती बहुल आपल्या धोरणात इतर जगातील ख्रस्ती बांधवांना अप्रत्यक्ष पणे मदत करतात - अप्रत्यक्ष म्हणजे असे उदाहरण , कॅथॉलिक चर्च धर्म प्रसारासाठी जगभर पैसे खर्च करते, आता उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेल्यात त्यांच्या शाळांना सरकारी शांलांसारखेच अनुदान मिळते मग त्यांचा तो पैसे वाचतो आणि ते तो धर्म प्रसार साठी वापरतात = झाली कि नाही अप्रत्यक्ष मदत ? मग जर भाजप सारखया उजवाय सरकारे जगातील पीडित हिंदू , शीख , जैन बुद्ध आणि ३ देशातील ख्रिस्ती पीडितांना मदत करणारा कायदा केला तर बिघडेल काय ? हा कायदा नरसिह रावांनी किंवा इंदिराजींनी केला असता तरी त्याला पाठिंबा देण्यात काय ती चूक बरे ??? मते मिळवण्यासाठी म्हणता तर शहाबानो प्रकरणी राजीव गांधींनी कोणाची बरे मते मिळवण्यासाठी सगळे केले?

In reply to by चौकस२१२

कागदपत्री सर्वधर्मसमावेशक असलेले पाश्चिमात्य देश पण मुख्यत्वे ख्रस्ती बहुल आपल्या धोरणात इतर जगातील ख्रस्ती बांधवांना अप्रत्यक्ष पणे मदत करतात
ज्या लोकांना याचे उदाहरण हवे असे त्यांनी युक्रेनियन विस्थापित आणि इतर देशातील विस्थापित ह्यातील फरक बघावा. https://www.nature.com/articles/s41586-023-06417-6 https://hir.harvard.edu/the-limitations-of-humanity-differential-refuge…

@हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर धाग्यावर आलेली एकमेव संयत प्रतिक्रिया.
दोन्ही बाजूंनी नको तितका फालतू बुद्धीभेद सुरु आहे. प्रत्यक्षात मात्र स्कोप खूपच लिमिटेड आहे.
संपूर्णपणे सहमत. कायद्याचा मसुदा वाचला तरी हे सहज लक्षात येते. ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी जे गैर-मुस्लिम पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा बांगलादेश येथून अवैधमार्गे आले, त्यांना भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करता येतील. थोडक्यात ज्या व्यक्ती किमान दहा वर्षांपासून भारतात राहात आहेत त्यांच्यासाठीचा हा कायदा अहे. आता हे सहजमान्य व्हावे की जी मंडळी इथे दहा वर्षांपासून राहात आहेत त्यांच्याकडे रेशनकार्ड तर असेलच पण आधारकार्ड असण्याचीदेखिल शक्यता खूपच आहे. तेव्हा अर्ज करणांची संख्या फार असणार नाही. तेव्हा ह्या कायद्याच्या विरोधात आक्रसताळेपणा करणे जितके अनावश्यक तितकेच अनावश्यक ह्या कायद्यामुळे हुरळून जाणे हे आहे! केवळ ध्रूवीकरणाराठी केलेला जुमला हेच ह्या कायद्याचे खरे वर्णन. तसेही ह्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे. बहुधा पुढील आठवड्यात तो सुनावणीस येईल. तेव्हा जे होईल ते होईल. असो.

In reply to by सुनील

>>धाग्यावर आलेली एकमेव संयत प्रतिक्रिया. हणमंतराव मिपावर फारसे सक्रिय नसतात. त्यामुळे त्यांना धागालेखक आणि काही प्रतिसादकांचे अंतस्थ हेतू माहीत नसावेत (असा अंदाज आहे). त्यामुळे त्यांनी भाबडेपणामुळे नेमका प्रतिसाद दिला. बाकी मिपाकर वाह्यात लोकांना ओळखून आहेत त्यांनी तसे प्रतिसाद दिले. तुम्ही जुने जाणते (जरी डाव्या कंपूतील असले तरी) आहात तुम्हाला हे माहित नसावे हे आश्चर्य आहे. की कालाच्या ओघात असे विस्मरण झाले ? हरकत नाही. होते असे.

https://www.amarujala.com/india-news/caa-indian-citizenship-matua-commu… ----- सलाह सरकार की तरफ से नहीं, मतुआ समुदाय के शीर्ष संगठन की तरफ से दी गई है। ----- कूठे, सहनशील मतूआ समाज आणि कुठे रोहींग्या आणि बांगलादेशी मुस्लीम?

भारत में सीएए लागू होते ही पाकिस्‍तान में मंदिर पर हमला, गिरे हिन्दुओं और सिखों की संपत्तियों के दाम https://navbharattimes.indiatimes.com/world/pakistan/caa-triggers-quit-… ----- अशा पाकिस्तानी मुस्लिमाना, भारतात का थारा द्यायचा?

पाकिस्तान की आर्मी में कैप्टन और लेफ्टिनेंट थे 2 अफगान नागरिक, देश से किए गए निष्कासित https://www.indiatv.in/world/asia/two-officer-rank-afghans-serving-in-p… ------ आता, CAA ला विरोध करणारे, काय प्रतिसाद देतात, हे वाचणे रोचक ठरेल....